बावड्याचा अभिमान उंचावला! गायकवाड यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार” इंदापूर जनमत प्रतिनिधी ता :१९ बातमीदार गणेश कांबळे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बावडा परिसरात समाज कार्यातून वेगळी ओळख निर्माण करणारे समाजसेवक तात्या गायकवाड यांनी आपल्या कार्यातून सामाजिक एकोपा आणि सेवाभावाचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. त्यांच्या विविध उपक्रमांमुळे परिसरात त्यांचे नाव आदराने घेतले जात असून नुकतीच त्यांची ‘द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कारा साठी निवड झाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. तात्या गायकवाड यांनी कुलस्वामिनी नवरात्र उत्सव मंडळाची स्थापना करून समाजोपयोगी उपक्रमांना चालना दिली. या मंडळाच्या माध्यमातून अनेक गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व पुस्तके देऊन त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यात आला. त्यांच्या या उपक्रमांमुळे समाजातील वंचित घटकांना मोठा दिलासा मिळत आहे. या सोबतच तात्या गायकवाड यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला आहे. त्यांनी सलग दोन वर्ष मुस्लिम बांधवांप्रमाणे रमजान महिन्यात रोजे पाळून इफ्तार पार्टीचे आयोजन केले. धर्मभेद विसरून समाजात बंधुता निर्माण करण्यासाठी केलेला हा प्रयत्न अनेकां साठी प्रेरणादायी ठरत आहे. “हिंदू-मुस्लिम एकता हीच खरी ताकद आहे आणि कोणतीही शक्ती आपल्याला वेगळे करू शकत नाही हा त्यांचा संदेश त्यांच्या कार्यातून स्पष्टपणे दिसून येतो. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व पुणे जिल्हा परिषदेचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी सभापती प्रवीण माने यांच्या हस्ते देखील त्यांचा गौरव करण्यात आला आहे. याशिवाय ‘द युवा ग्रामीण पत्रकार संघ’चे जिल्हा उपाध्यक्ष अल्लाउद्दीन अलवी यांनीही तात्या गायकवाड यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला. विविध स्तरांतून मिळणारा हा सन्मान त्यांच्या कार्याची पावती ठरत आहे. तात्या गायकवाड हे यशवंत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे विद्यमान संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. या माध्यमातून ते गोरगरीब शेतकऱ्यांना कर्ज वाटप, शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री, उपसा सिंचन तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या कार्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.तात्या गायकवाड यांची ‘राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कारासाठी’ झालेली निवड ही त्यांच्या सातत्यपूर्ण समाजसेवेची दखल असून, या निवडीमुळे बावडा व इंदापूर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील काळातही ते अशाच प्रकारे समाजासाठी कार्यरत राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

- BT News शी बोलताना जय पवारांनी प्रचारात गाव भेटीत लोकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला यावेळेस ते बोलताना दादाच्या आठवणी व मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आवाहन करण्यात आले.1
- अजितदादांच्या स्टाईलमध्येच युवा नेते जय पवारांनी सोडवला शाळेचा प्रश्न..! बारामती मतदारसंघात गावभेट दौऱ्यावर असताना युवा नेते जय अजितदादा पवार यांनी भिकोबा नगर येथील एका शाळेला भेट दिली. शाळेच्या अगदी शेजारी महावितरणच्या विद्युत लाईनचे खांब असल्यामुळे शॉर्टसर्किट होण्याचा धोका निर्माण झाला होता. कमी खर्चात कंटेनरच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या शाळेसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरत होती. याबाबत शाळेच्या प्राचार्यांनी जय पवार यांच्याकडे समस्या मांडताच त्यांनी तत्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जय पवार यांनी शाळेच्या कंटेनरमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली तसेच अनाथ मुलांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.1
- Post by Digital media.1
- जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या उपोषणादरम्यान घडलेली एक गंभीर घटना समोर आली आहे. शेख नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने उपोषणकर्त्यास बळजबरीने पत्र देत ते वाचण्यासाठी कोणताही वेळ न देता त्यांना हटवण्याचा प्रयत्न केल्याचे संबंधित व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. या घटनेमुळे उपोषणकर्ते व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच, या प्रकरणात वाद निर्माण करून उपोषणकर्त्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे, जी अत्यंत गंभीर बाब आहे. लोकशाही व्यवस्थेत शांततामय आंदोलनाचा सन्मान राखणे आवश्यक असताना अशा प्रकारची जबरदस्ती अयोग्य व निषेधार्ह आहे. त्यामुळे संबंधित घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच, अशा प्रकारे वागणाऱ्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयातून तात्काळ बदली करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, अशी मागणीही करण्यात येत आहे. #अहिल्यानगर #जिल्हाधिकारी #मुख्यमंत्री1
- मोहरी खुर्द येथे विराट हिंदू संमेलन संपन्न विक्रम शिंदे /भोर दि.२१ मोहरी खुर्द (ता.भोर) येथे सकल हिंदू समाज गुंजन मावळ खोरे यांच्या वतीने विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते,या संमेलनात गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजाने उपस्थिती दाखवून एकतेचे दर्शन घडवले,कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली,हिंदू जनजागृती समितीच्या डॉ.ज्योती काळे यांनी मातृशक्ती वर मार्गदर्शन केले,ह.भ.प.नवनाथ महाराज गाडे यांनी भारताचा गौरवशाली इतिहास सर्वांसमोर मांडला,हिंदुत्ववादी वक्ते सर्वेश मेहेंदळे यांनी माता-भगिनींना येणाऱ्या संकटांपासून सावध राहण्याचे आवाहन केले,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रमेश आंबेकर यांनी संघ शताब्दी वर्षानिमित्त पंच परिवर्तन याविषयी मार्गदर्शन केले, संमेलन यशस्वी करण्यासाठी स्थानिक आयोजन समिती आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले, शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेले संमेलन गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजासाठी एक ऊर्जा स्रोत ठरले.2
- ----- (प्रतिनिधी):- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे रस्त्यालगतच्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेनंतर राज्यभरात अशा धोकादायक विहिरींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील विविध गावांमध्येही रस्त्यालगत असलेल्या विहिरींबाबत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार बीड यांना निवेदन देऊन रस्त्यालगत धोकादायक स्थितीत असलेल्या विहिरींची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाय योजना करण्याची मागणी केली आहे. संबंधित विहिरींच्या मालकांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संरक्षक भिंत किंवा कठडा उभारण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशीही त्यांनी मागणी केली. दरम्यान, बीड तालुक्यातील पोखरी (घाट) येथील खिल्लारे वस्ती परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली विहीर अत्यंत धोकादायक अवस्थेत असून तिच्याभोवती कोणतीही संरक्षण व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या विहिरीमुळे लहान मुले, दुचाकीस्वार, बैलगाड्या तसेच जनावरांच्या जीविताला धोका असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर ध्रुपदी खिल्लारे, गोरख खिल्लारे, मधुकर खिल्लारे, मच्छिंद्र खिल्लारे, बबन खिल्लारे, जालिंदर खिल्लारे, हौसराव खिल्लारे, साहेबराव धुमाळ, दत्तु खिल्लारे यांच्या सह खिल्लारे, मुळीक व झांजुर्णे वस्तीवरील ग्रामस्थांनी संबंधित विहिरीला तातडीने संरक्षक कठडा किंवा भिंत उभारण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी “दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने उपाय योजना कराव्यात,” अशी ठाम भूमिका घेतली असून, या कडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.1
- पिंपरी चिंचव्हडं :- नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर होण्यास विरोध करणाऱ्या इंडिया आघाडीच्या खासदारांच्या निषेधार्थ आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी आक्रमक पवित्रा घेतला.... भाजपच्या सर्व महिला नगरसेविकांनी काळे पेहराव परिधान करून सभागृहाच्या कामकाजात सहभाग नोंदवत आपला निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारने महिलांना राजकारणात हक्काचे प्रतिनिधित्व देण्यासाठी नारी शक्ती वंदन विधेयक आणले आहे. मात्र, विरोधी पक्षातील इंडिया आघाडीच्या खासदारांनी या विधेयकावरून घेतलेल्या भूमिकेचा भाजप महिला आघाडीने तीव्र शब्दांत निषेध केला. महिलांच्या सक्षमीकरणाचा मार्ग रोखणाऱ्या विरोधकांचा चेहरा जनतेसमोर उघड झाला आहे, अशी भावना यावेळी नगरसेविकांनी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच, काळ्या साड्या परिधान केलेल्या भाजप नगरसेविकांनी लक्ष वेधून घेतले. यावेळी घोषणाबाजी करत विरोधकांच्या भूमिकेचा धिक्कार करण्यात आला. या अनोख्या आंदोलनामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.... #नारीशक्तीवंदनविधेयक #महिलाआरक्षण #भाजप #भाजपमहिलाआघाडी #पिंपरीचिंचवड #महापालिका #निषेधआंदोलन #काळीसाडी #राजकारण #महिलासक्षमीकरण #इंडियाआघाडी #घोषणाबाजी #NariShaktiVandanBill #WomenReservation #BJP #BJPMahilaMorcha #PimpriChinchwad #MunicipalCorporation #Protest #BlackSareeProtest #Politics #WomenEmpowerment #INDIAAlliance #Sloganeering1
- Post by मन्सूर शेख1