किरनळीच्या महादेव डोंगरावर गुरं राखणाऱ्या पायवाटेपासून अक्कलकोट तालुक्यातील किरनळी मराठीवर कन्नड भाषेचा प्रभाव असलेलं छोटंसं गाव. याच गावात, महादेव डोंगरावर दोन म्हशी आणि एक गाय राखणारा एक मुलगा… आज थेट मुंबईच्या अंधेरीत बसून बातमीदारी करतोय. चंद्रशेखर भांगे ज्याचं नाव आज राज्यातील कुठल्याही पोलीस ठाण्यात घेतलं, तर आदराने “चहा घ्या” असं ऐकायला मिळतं. अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून लढणारा कार्यकर्ता, चपळगाव आणि वागदरीच्या श्री.एस.ए. शेळके प्रशालेत शिकताना अगदी शेवटच्या नंबरवरून पास झालेला हा अवलिया… आज मात्र लोकशाहीच्या चौथ्या स्तंभात ठाम उभा आहे. प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी, ग्रामीण वास्तव यावर मात करत अक्कलकोट तालुक्यातून थेट देशाच्या आर्थिक राजधानीत मंत्रालयापर्यंत पोहोचून अनेक महत्त्वाचे विषय जनतेसमोर आणतोय. पत्रकार तेथील सर्वोत्कृष्ट गोइंका पुरस्कारापासून पुणे विद्यापीठाचा गोल्ड मेडलिस्ट म्हणून भांगे यांचा गौरव आहे.हा प्रवास केवळ यशाचा नाही,तर जिद्द, संघर्ष आणि स्वप्नांवर विश्वास ठेवण्याचा आहे. या संघर्षपूर्ण प्रवासाला मानाचा मुजरा!
किरनळीच्या महादेव डोंगरावर गुरं राखणाऱ्या पायवाटेपासून अक्कलकोट तालुक्यातील किरनळी मराठीवर कन्नड भाषेचा प्रभाव असलेलं छोटंसं गाव. याच गावात, महादेव डोंगरावर दोन म्हशी आणि एक गाय राखणारा एक मुलगा… आज थेट मुंबईच्या अंधेरीत बसून बातमीदारी करतोय. चंद्रशेखर भांगे ज्याचं नाव आज राज्यातील कुठल्याही पोलीस ठाण्यात घेतलं, तर आदराने “चहा घ्या” असं ऐकायला मिळतं. अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून लढणारा कार्यकर्ता, चपळगाव आणि वागदरीच्या श्री.एस.ए. शेळके प्रशालेत शिकताना अगदी शेवटच्या नंबरवरून पास झालेला हा अवलिया… आज मात्र लोकशाहीच्या चौथ्या स्तंभात ठाम उभा आहे. प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी, ग्रामीण वास्तव यावर मात करत अक्कलकोट तालुक्यातून थेट देशाच्या आर्थिक राजधानीत मंत्रालयापर्यंत पोहोचून अनेक महत्त्वाचे विषय जनतेसमोर आणतोय. पत्रकार तेथील सर्वोत्कृष्ट गोइंका पुरस्कारापासून पुणे विद्यापीठाचा गोल्ड मेडलिस्ट म्हणून भांगे यांचा गौरव आहे.हा प्रवास केवळ यशाचा नाही,तर जिद्द, संघर्ष आणि स्वप्नांवर विश्वास ठेवण्याचा आहे. या संघर्षपूर्ण प्रवासाला मानाचा मुजरा!
- चाकूर येथे दोन बेपत्ता अल्पवयीन मुलांपैकी एकाचा मृतदेह आढळला; पोलिसांची तातडीची शोधमोहीम व सखोल तपास सुरू. सुरू ॲप इन मराठी न्यूज. रविवार दिनांक 19 एप्रिल 2026. लातूर जिल्ह्यातील चाकूर पोलीस ठाणे हद्दीत दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची गंभीर घटना घडून त्यापैकी एका मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेत लातूर जिल्हा पोलिसांनी तातडीने व्यापक शोधमोहीम राबवून सखोल तपास सुरू केला आहे. दि. 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 07.00 वाजल्यापासून जुने महादेव मंदिर गल्ली, चाकूर येथील दोन अल्पवयीन मुले 1) साइचरण दिनेश स्वामी (वय 10 वर्षे) व 2) देवंश मंगेश स्वामी (वय 7 वर्षे) हे घरातील कोणालाही न सांगता बाहेर गेल्याची माहिती दुपारी 01.00 वाजता पोलिसांना प्राप्त झाली. सदर माहिती मिळताच चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. बालाजी भांडे यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, दुपारी सुमारे 14.10 वाजता शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली. तपास व शोधकार्य सुरू असतानाच बेपत्ता मुलांपैकी देवंश मंगेश स्वामी (वय 7 वर्षे) हा मुलगा चाकूर ते उजळंब रोडलगत नरेंद्र मनमथ आप्पा शेटे यांच्या जुन्या घराजवळील मोकळ्या जागेत मृत अवस्थेत आढळून आला. सदर बाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय, चाकूर येथे हलविण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे , अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री चौधर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व तपासाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे चाकूर तसेच स्थानिक गुन्हे शाखेची एकूण चार पथके तयार करून बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी रवाना करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक देखील कार्यरत करण्यात आले. सदर घटनेचा तपास फॉरेन्सिक टीम तसेच श्वान पथकाच्या सहाय्याने विविध अंगांनी सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्याबरोबरच अज्ञात आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. तसेच दुसऱ्या बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठीही पोलिसांकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. लातूर जिल्हा पोलीस दल या घटनेकडे अत्यंत संवेदनशीलतेने व गांभीर्याने पाहत असून, सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे तसेच कोणतीही संशयास्पद माहिती त्वरित कळवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.1
- Post by Laxman Ugile1
- Post by परळी वार्ता1
- हडोळती परिसरातील वीज व्यवस्थेचा बोजवारा; नागरिकांत तीव्र नाराजी हडोळती येथील महावितरण कार्यालयात कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंत्यांनी गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून पदाचा कार्यभार स्वीकारला असला, तरी परिसरातील अनेक ग्राहकांना आजही त्यांची ओळख नाही. ते नेमके कधी येतात, कधी जातात याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून कार्यालयीन कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हडोळती उपकेंद्रातून तब्बल २५ गावांना वीजपुरवठा केला जातो. मात्र अनेक ठिकाणी डीपींची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. डीपीवरील वायर तुटलेल्या, किटकॅट जळालेल्या, तसेच वेलींनी वेढलेल्या अवस्थेत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देखभाल व दुरुस्तीसाठी येणारे साहित्य नेमके कुठे वापरले जाते, याबाबतही नागरिकांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे. अपुर्या देखभालीमुळे दोन दिवसांपूर्वी स्पार्किंग होऊन एका नागरिकाचे घर जळाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महादेव मंदिरासमोरील डीपीला अचानक स्पार्किंग होऊन आग लागली. सुदैवाने वेळीच आग नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. या सततच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महावितरण प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नियमित मेंटेनन्स करावे, जीर्ण डीपी दुरुस्त कराव्यात तसेच वाढत्या भारानुसार नवीन डीपी बसवाव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.2
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1
- 17 तारखेला झालेल्या बीड शहरात मुस्लिम आरक्षण एल्गार मोर्चा जिल्ह्यातील नागरिकांची मोठी उपस्थिती दरम्यान अरबाज पठाण यांचे भाषण1
- लातूर जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा "यलो अलर्ट". नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. रविवार दिनांक 19 एप्रिल 2026. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, लातूर जिल्ह्यात पुढील 5 दिवस म्हणजेच 18 ते 22 एप्रिल 2026 या कालावधीत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या काळात जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने पावसाचा 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. पावसासोबतच जिल्ह्यामध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जीवित व वित्तहानीजिल्हा आपत्ती व्यवस्थापन नागरिकांना खबरदारी घेण्याचे टाळण्यासाठी प्राधिकरणाने आवाहन केले आहे. नागरिकांनी मेघगर्जना किंवा विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिकांनी उघड्यावर थांबणे टाळावे. विजा चमकत असताना झाडाखाली, विजेच्या खांबाजवळ, ट्रान्सफॉर्मर किंवा कोणत्याही उंच वस्तूंजवळ आश्रय घेऊ नये. शेतात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांनी हवामानातील बदल जाणवताच तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वादळी वाऱ्यामुळे घरावरील सैल पत्रे, जाहिरात फलक किंवा झाडांच्या फांद्या पडून अपघात होण्याची शक्यता असते. अशा वस्तूंना वेळीच सुरक्षित करावे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अनधिकृत माहितीवर किंवा सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्हा प्रशासनामार्फत वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचनांचेच पालन करावे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तात्काळ स्थानिक प्रशासन किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.1
- Post by मन्सूर शेख1
- नांदेड : कंधार तालुक्यातील मानार प्रकल्पाच्या कोठा–जगडा मार्गावर असलेल्या अरुंद पुलावरून एक कार खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार अरुंद पुलावरून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट पुलाखाली कोसळले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे त्या मार्गावरील पुलाची सुरक्षितता पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.1