logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शेतकरी पाल्यांसाठी विशेष व्यासपीठ; ६ सप्टेंबरला मराठा वधू-वर परिचय मेळावा शेतकरी पाल्यांसाठी विशेष व्यासपीठ; ६ सप्टेंबरला मराठा वधू-वर परिचय मेळावा नाशिक : मराठा समाजातील विवाहेच्छुक युवक-युवती तसेच शेतकरी कुटुंबातील पाल्यांना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी एक विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मराठा प्राईड, छत्रपती शिवाजी ब्रिगेड आणि कृषि सम्मान फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मराठा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती निवृत्त पोलीस उपअधीक्षक तथा मुख्य संयोजक प्रभाकर रायते यांनी दिली. हा मेळावा रविवार, ६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता श्रीहरी लॉन्स, नारायण बापू नगर चौक, इंदिरा गांधी पुतळा, टाकळी रोड, शिवराम नगर, जेल रोड-नाशिक रोड येथे होणार आहे. बदलत्या सामाजिक परिस्थितीत विवाहासाठी योग्य स्थळ शोधणे ही अनेक कुटुंबांसमोरील आव्हानात्मक बाब बनली आहे. विशेषतः शेतकरी कुटुंबातील युवक-युवतींसाठी योग्य स्थळ शोधताना अनेक अडचणी येतात. ही गरज लक्षात घेऊन विवाहेच्छुक युवक-युवती तसेच त्यांच्या पालकांना एकाच व्यासपीठावर आणून परिचयाची आणि परस्पर संवादाची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या मेळाव्यातून केला जाणार आहे. मेळाव्यात विविध शैक्षणिक, व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रातील विवाहेच्छुक युवक-युवती सहभागी होणार आहेत. शिक्षण, नोकरी, व्यवसाय तसेच कौटुंबिक व सामाजिक पार्श्वभूमीची माहिती जाणून घेता येणार असून, पालकांनाही परस्पर संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. शेतकरी कुटुंबातील पाल्यांसाठी विशेष व्यासपीठ उपलब्ध करून योग्य जोडीदार शोधण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. मेळाव्याची नोंदणी प्रक्रिया शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असून, समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मराठा समाजातील विवाहेच्छुक युवक-युवती, त्यांचे पालक तसेच शेतकरी कुटुंबांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. विश्वासाचे नाते आणि योग्य परिचयाचे व्यासपीठ विवाहाच्या नात्यांना विश्वासाची, परिचयाला योग्य व्यासपीठाची आणि समाजाच्या सक्षम भविष्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे, या भावनेतून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याच्या आयोजनासाठी मुख्य संयोजक प्रभाकर रायते (निवृत्त पोलीस उपअधीक्षक), अशोकराव शिंदे, बाबुराव आढाव, ज्ञानदीप पाटील तसेच चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

1 day ago
user_Anil GUNJAL
Anil GUNJAL
नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
1 day ago
a7cee75a-48a8-4b09-9002-d6eb5d0d0abf

शेतकरी पाल्यांसाठी विशेष व्यासपीठ; ६ सप्टेंबरला मराठा वधू-वर परिचय मेळावा शेतकरी पाल्यांसाठी विशेष व्यासपीठ; ६ सप्टेंबरला मराठा वधू-वर परिचय मेळावा नाशिक : मराठा समाजातील विवाहेच्छुक युवक-युवती तसेच शेतकरी कुटुंबातील पाल्यांना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी एक विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मराठा प्राईड, छत्रपती शिवाजी ब्रिगेड आणि कृषि सम्मान फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मराठा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती निवृत्त पोलीस उपअधीक्षक तथा मुख्य संयोजक प्रभाकर रायते यांनी दिली. हा मेळावा रविवार, ६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता श्रीहरी लॉन्स, नारायण बापू नगर चौक, इंदिरा गांधी पुतळा, टाकळी रोड, शिवराम नगर, जेल रोड-नाशिक रोड येथे होणार आहे. बदलत्या सामाजिक परिस्थितीत विवाहासाठी योग्य स्थळ शोधणे ही अनेक कुटुंबांसमोरील आव्हानात्मक बाब बनली आहे. विशेषतः शेतकरी कुटुंबातील युवक-युवतींसाठी योग्य स्थळ शोधताना अनेक अडचणी येतात. ही गरज लक्षात घेऊन विवाहेच्छुक युवक-युवती तसेच त्यांच्या पालकांना एकाच व्यासपीठावर आणून परिचयाची आणि परस्पर संवादाची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या मेळाव्यातून केला जाणार आहे. मेळाव्यात विविध शैक्षणिक, व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रातील विवाहेच्छुक युवक-युवती सहभागी होणार आहेत. शिक्षण, नोकरी, व्यवसाय तसेच कौटुंबिक व सामाजिक पार्श्वभूमीची माहिती जाणून घेता येणार असून, पालकांनाही परस्पर संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. शेतकरी कुटुंबातील पाल्यांसाठी विशेष व्यासपीठ उपलब्ध करून योग्य जोडीदार शोधण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. मेळाव्याची नोंदणी प्रक्रिया शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असून, समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मराठा समाजातील विवाहेच्छुक युवक-युवती, त्यांचे पालक तसेच शेतकरी कुटुंबांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. विश्वासाचे नाते आणि योग्य परिचयाचे व्यासपीठ विवाहाच्या नात्यांना विश्वासाची, परिचयाला योग्य व्यासपीठाची आणि समाजाच्या सक्षम भविष्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे, या भावनेतून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याच्या आयोजनासाठी मुख्य संयोजक प्रभाकर रायते (निवृत्त पोलीस उपअधीक्षक), अशोकराव शिंदे, बाबुराव आढाव, ज्ञानदीप पाटील तसेच चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पुस्तकांचा तुटवडा निफाड तालुक्यात मोफत पाठ्यपुस्तकांच्या १,५२७ संचांची कमतरता; तातडीने पुस्तके द्या, अन्यथा शिक्षण विभागाला टाळे ठोकू : शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही निफाड तालुक्यातील विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणारी मोफत पाठ्यपुस्तके पूर्णपणे उपलब्ध झालेली नाहीत. तालुक्यात तब्बल १,५२७ संचांचा तुटवडा असून, पुस्तकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हा तुटवडा तातडीने दूर करून विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून द्यावीत; अन्यथा शिक्षण विभागाच्या दालनास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांनी दिला. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत दरवर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. शाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक पुस्तकांची मागणी नोंदवून ती जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर वितरित करण्याची व्यवस्था असते. मात्र, यंदा शाळा सुरू होऊन अडीच महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी अनेक विद्यार्थ्यांच्या हातात अद्याप पुस्तके पोहोचलेली नाहीत. निफाड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दुसरी, चौथी, पाचवी, सहावी व सातवीच्या पुस्तकांचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. विशेषतः दुसरी, चौथी आणि सहावीच्या अभ्यासक्रमात बदल झाल्याने जुन्या पाठ्यपुस्तकांचा वापर करणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण वाढली आहे. काही शाळांमध्ये शिक्षकांनी जुनी पुस्तके जमा करून तात्पुरती व्यवस्था केली असली तरी नवीन पुस्तके उपलब्ध नसल्याने अध्यापनात अडथळे येत आहेत. या प्रश्नाबाबत प्रकाश पाटील यांनी निफाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप व सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे जाब विचारला. तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठ्यपुस्तकांचा तुटवडा असताना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्याबाबत पुरेशी माहिती नसल्याचे चर्चेतून समोर आल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी लासलगाव शिवसेना शहरप्रमुख प्रमोद पाटील, लासलगाव शहर विकास समितीचे राजेंद्र कराड, संदीप उगले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. वर्गनिहाय तुटवडा इयत्ता २ री — ७ संच इयत्ता ४ थी — २७ संच इयत्ता ५ वी — ७६८ संच इयत्ता ६ वी — ६१४ संच इयत्ता ७ वी — १११ संच एकूण — १,५२७ संच “विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणारी मोफत पुस्तके वेळेत मिळणे हा त्यांचा हक्क आहे. पुस्तकांचा तुटवडा तातडीने दूर करून सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण संच उपलब्ध करून द्यावेत.” — प्रकाश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य
    1
    पुस्तकांचा तुटवडा

निफाड तालुक्यात मोफत पाठ्यपुस्तकांच्या १,५२७ संचांची कमतरता; तातडीने पुस्तके द्या, अन्यथा शिक्षण विभागाला टाळे ठोकू
: शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही निफाड तालुक्यातील विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणारी मोफत पाठ्यपुस्तके पूर्णपणे उपलब्ध झालेली नाहीत. तालुक्यात तब्बल १,५२७ संचांचा तुटवडा असून, पुस्तकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हा तुटवडा तातडीने दूर करून विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून द्यावीत; अन्यथा शिक्षण विभागाच्या दालनास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांनी दिला.
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत दरवर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. शाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक पुस्तकांची मागणी नोंदवून ती जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर वितरित करण्याची व्यवस्था असते. मात्र, यंदा शाळा सुरू होऊन अडीच महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी अनेक विद्यार्थ्यांच्या हातात अद्याप पुस्तके पोहोचलेली नाहीत.
निफाड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दुसरी, चौथी, पाचवी, सहावी व सातवीच्या पुस्तकांचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. विशेषतः दुसरी, चौथी आणि सहावीच्या अभ्यासक्रमात बदल झाल्याने जुन्या पाठ्यपुस्तकांचा वापर करणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण वाढली आहे. काही शाळांमध्ये शिक्षकांनी जुनी पुस्तके जमा करून तात्पुरती व्यवस्था केली असली तरी नवीन पुस्तके उपलब्ध नसल्याने अध्यापनात अडथळे येत आहेत.
या प्रश्नाबाबत प्रकाश पाटील यांनी निफाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप व सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे जाब विचारला. तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठ्यपुस्तकांचा तुटवडा असताना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्याबाबत पुरेशी माहिती नसल्याचे चर्चेतून समोर आल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली.
यावेळी लासलगाव शिवसेना शहरप्रमुख प्रमोद पाटील, लासलगाव शहर विकास समितीचे राजेंद्र कराड, संदीप उगले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
वर्गनिहाय तुटवडा
इयत्ता २ री — ७ संच
इयत्ता ४ थी — २७ संच
इयत्ता ५ वी — ७६८ संच
इयत्ता ६ वी — ६१४ संच
इयत्ता ७ वी — १११ संच
एकूण — १,५२७ संच
“विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणारी मोफत पुस्तके वेळेत मिळणे हा त्यांचा हक्क आहे. पुस्तकांचा तुटवडा तातडीने दूर करून सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण संच उपलब्ध करून द्यावेत.”
— प्रकाश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    47 min ago
  • सार्वजनिक ठिकाण पे गंदगी करने के लिए कौन दिया परवानगी पुच्छी है जनता सार्वजनिक ठिकाण प्रति नाशिक रोड देवदली कॅम्प प्लास्टिक से कितनी बडी गंदगी होती है और बिमारी उपयोग पर रोक लगाने के लिए सरकार ने पुरा कितना प्रार्थना किया पर लोगों को समझ में आना चाहिये लोगों की राय है की सार्वजनिक स्थान पर गंडगी ना करे जब सरकार है पर कार्रवाई लेती है टैब लोगों को समझ में आता है एक सार्वजनिक स्थान पर गंदगी ना करे, यह किसी धर्म किसी मजहब के लिए नहीं हर लोग हर वर्ग के लिए है गंडगी ना करे
    1
    सार्वजनिक ठिकाण पे गंदगी करने के लिए कौन दिया परवानगी पुच्छी है जनता सार्वजनिक ठिकाण प्रति नाशिक रोड देवदली कॅम्प 
प्लास्टिक से कितनी बडी गंदगी होती है और बिमारी उपयोग पर रोक लगाने के लिए सरकार ने पुरा कितना प्रार्थना किया पर लोगों को समझ में आना चाहिये लोगों की राय है की सार्वजनिक स्थान पर गंडगी ना करे जब सरकार है पर कार्रवाई लेती है टैब लोगों को समझ में आता है एक सार्वजनिक स्थान पर गंदगी ना करे, यह किसी धर्म किसी मजहब के लिए नहीं हर लोग हर वर्ग के लिए है गंडगी ना करे
    user_Harish Kumar Gautam
    Harish Kumar Gautam
    Voice of people नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • दिंडोरी तालुक्यातील उमराणे बुद्रुक येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरावस्था, कर्मचारी दवाखान्यात येतात की नाही प्रश्नचिन्ह
    1
    दिंडोरी तालुक्यातील उमराणे बुद्रुक येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरावस्था, कर्मचारी दवाखान्यात येतात की नाही प्रश्नचिन्ह
    user_Amol jadhav
    Amol jadhav
    दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    21 min ago
  • दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील हनुमंत रायाच्या पटांगणात सुरू असलेल्यांना भेटण्याची आज सांगता करण्यात आली या नाम्यामध्ये सात दिवस हे भजन कीर्तन हरिपाठ गाथा भजन व प्रवचन असे भरगच्च कार्यक्रम राहून आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवले त्यानंतर अन्नदानातून उरलेला शिधा हा ज्ञानराज वारकरी संस्थेला ग्रामस्थांनी दान म्हणून दिला आहे या ज्ञानराज वारकरी संस्थेमध्ये आज 40 ते 45 विद्यार्थी हे गीता भागवत व पखवाज याचे शिक्षण घेत आहे ह्या वारकरी शिक्षण संस्थेत पाचवीपासून ते दहावी पर्यंत विद्यार्थी ज्ञानदान घेत आहेत .
    1
    दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील हनुमंत रायाच्या पटांगणात सुरू असलेल्यांना भेटण्याची आज सांगता करण्यात आली या नाम्यामध्ये सात दिवस हे भजन कीर्तन हरिपाठ गाथा भजन व प्रवचन असे भरगच्च कार्यक्रम राहून आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवले त्यानंतर अन्नदानातून उरलेला शिधा हा ज्ञानराज वारकरी संस्थेला ग्रामस्थांनी दान म्हणून दिला आहे या ज्ञानराज वारकरी संस्थेमध्ये आज 40 ते 45 विद्यार्थी हे गीता भागवत व पखवाज याचे शिक्षण घेत आहे ह्या वारकरी शिक्षण संस्थेत पाचवीपासून ते दहावी पर्यंत विद्यार्थी ज्ञानदान घेत आहेत .
    user_आई सत्पशृंगी
    आई सत्पशृंगी
    Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे सुरगाणा तालुक्यातील आंबोडे येथील अंगणवाडीत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील अंडी निकृष्ट दर्जाची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे पालकांत नाराजी व्यक्त होत आहे. बालकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप केला जात आहे. नित्कृष्ठ प्रकाराची अंडी बालकांना दिली जात असल्याचे समजताच सरपंच राजेंद्र निकुळे यांनी अंगणवाडीत जात प्रत्यक्ष चौकशी केली. मात्र, यावेळी संबंधितांकडून समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सरपंचांनी सांगितले. त्यामुळे पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत संशय अधिकच बळावला आहे. शासनाकडून बालकांना सकस व पौष्टिक आहार मिळावा, यासाठी पोषण आहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, जर निकृष्ट दर्जाची अंडी बालकांना दिली जात असतील तर हा गंभीर प्रकार असून संबंधित विभागाने याची तातडीने चौकशी करणे गरजेचे आहे. अंगणवाडीतील अंड्यांचा दर्जा, पुरवठ्याचे स्रोत तसेच वितरणाची प्रक्रिया यांची संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी करावी. दोष आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे. बालकांच्या पोषण आहारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका सरपंच राजेंद्र निकुळे यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. -- --
    1
    आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा

सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे
आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा
सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे
सुरगाणा तालुक्यातील आंबोडे येथील अंगणवाडीत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील अंडी निकृष्ट दर्जाची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे पालकांत नाराजी व्यक्त होत आहे. बालकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप केला जात आहे.
नित्कृष्ठ प्रकाराची अंडी बालकांना दिली जात असल्याचे समजताच सरपंच राजेंद्र निकुळे यांनी अंगणवाडीत जात प्रत्यक्ष चौकशी केली. मात्र, यावेळी संबंधितांकडून समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सरपंचांनी सांगितले. त्यामुळे पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत संशय अधिकच बळावला आहे. शासनाकडून बालकांना सकस व पौष्टिक आहार मिळावा, यासाठी पोषण आहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, जर निकृष्ट दर्जाची अंडी बालकांना दिली जात असतील तर हा गंभीर प्रकार असून संबंधित विभागाने याची तातडीने चौकशी करणे गरजेचे आहे.
अंगणवाडीतील अंड्यांचा दर्जा, पुरवठ्याचे स्रोत तसेच वितरणाची प्रक्रिया यांची संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी करावी. दोष आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे. बालकांच्या पोषण आहारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका सरपंच राजेंद्र निकुळे यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
--
--
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • नारीशक्तीने तीन तास रोखला शहापूर-मुरबाड- खोपोली महामार्ग प्रशासनाच्या निषेधार्थ खड्डेमय महामार्गावर साजरी केली मंगळागौर शहापूर-मुरबाड-पाटगाव - खोपोली महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा आणि प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी नडगाव परिसरातील संतप्त महिलांनी मंगळवारी (२५ ऑगस्ट) आक्रमक आंदोलन केले. मंगळागौरीच्या सणाच्या दिवशीच महिलांनी खड्डेमय महामार्गावर ठिय्या देत तब्बल तीन तास महामार्ग रोखून धरला. यावेळी महिलांनी पारंपरिक मंगळागौर खेळत एमएसआरडीसी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तीन तास विस्कळीत झाली होती.विशेष म्हणजे माहिती देऊनही आंदोलनस्थळी एमएसआरडीसीचा एकही अधिकारी उपस्थित न राहिल्याने महामंडळाचा रस्त्याच्या प्रश्नाकडे असलेला निष्काळजीपणा पुन्हा एकदा स्पष्ट झाला.यावेळी संतप्त महिलांनी आठ वर्षे रस्ता रखडला, तरी आमदार- खासदारांना नागरिकांच्या वेदना दिसत नाहीत का असा सवाल करत त्यांच्या कार्यतत्परतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. एमएसआरडीसी अंतर्गत सन २०१८ पासून सुरू असलेल्या शहापूर-मुरबाड-पाटगाव-खोपोली महामार्गाचे काम तब्बल आठ वर्षांपासून रखडले आहे. महामार्गावरील जीवघेणे खड्डे, अपूर्ण रस्त्याचे काम, धुळीचे साम्राज्य,चिखल आणि वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार निवेदने, आंदोलने आणि प्रशासनाकडे मागण्या करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याने महिलांनी अखेर रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या महामार्गावरून शहापूर तालुक्यातील हजारो नागरिक, विद्यार्थी, कामगार, शेतकरी, व्यापारी आणि रुग्ण दररोज प्रवास करतात. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांचा धोका वाढला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप महिलांनी केला.शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचणे कठीण होत असून आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना रुग्णालयात नेतांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलक महिलांनी सांगितले. दरम्यान घरातून बाहेर पडलेला आपला माणूस सुखरूप घरी परत येईल की नाही अशी चिंता आता प्रत्येक कुटुंबाला वाटत आहे. महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करून खड्डे बुजवावेत आणि वाहतुकीची समस्या दूर करावी, अशी मागणी महिलांनी यावेळी केली.यापूर्वीही महिलांनी प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र त्याची गांभीर्याने दखल न घेतल्याने मंगळागौरीच्या दिवशीच आंदोलन करण्यात आले.दरम्यान प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणुन नायब तहसिलदार सदानंद घुटे व पोलीस निरीक्षक विलास कदम यांनी आंदोलक महिलांना लेखी पत्र दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले.परिणामी दिलेल्या निर्धारित वेळेत काम सुरु न केल्यास हे आंदोलन अधिक व्यापक करण्यात येईल अशी माहिती चंद्रकला दुर्गे यांनी दिली.महिलांच्या या आंदोलनाला नडगाव,भटपाडा, साखरपाडा, शिरगाव, लेनाड, दोनघर, नेहरोली,शेंद्रूण आदी गावांमधील महिलांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी विद्याताई वेखंडे, डॉ.अपर्णा खाडे,पुष्पा पानसरे,चंद्रकला दुर्गे,कमल रेरा,आशा मांजे, अनिता हरड,दर्शना भालके, सुनिता पवार,अनिता हरड, विजया बेलवले,हर्षला जागरे, सविता विशे,रेखा जागरे,जुही पवार,दिपिका भालके, वंदना हरड,भारती कदम,राधिका हरड,सारिका फर्डे यांसह शेकडो महिला उपस्थित होत्या. माहिती देऊनही आंदोलनस्थळी एमएसआरडीसीचा एकही अधिकारी उपस्थित न राहिल्याने महामंडळाचा रस्त्याच्या प्रश्नाकडे असलेला निष्काळजीपणा पुन्हा एकदा स्पष्ट झाला. यावेळी संतप्त महिलांनी “आठ वर्षे रस्ता रखडला, तरी आमदार-खासदारांना नागरिकांच्या वेदना दिसत नाहीत का असा सवाल करत त्यांच्या कार्यतत्परतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
    1
    नारीशक्तीने तीन तास रोखला शहापूर-मुरबाड- खोपोली महामार्ग 

 प्रशासनाच्या निषेधार्थ खड्डेमय महामार्गावर साजरी केली मंगळागौर
शहापूर-मुरबाड-पाटगाव - खोपोली महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा आणि प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी नडगाव परिसरातील संतप्त महिलांनी मंगळवारी (२५ ऑगस्ट) आक्रमक आंदोलन केले. मंगळागौरीच्या सणाच्या दिवशीच महिलांनी खड्डेमय महामार्गावर ठिय्या देत तब्बल तीन तास महामार्ग रोखून धरला. यावेळी महिलांनी पारंपरिक मंगळागौर खेळत एमएसआरडीसी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तीन तास विस्कळीत झाली होती.विशेष म्हणजे माहिती देऊनही आंदोलनस्थळी एमएसआरडीसीचा एकही अधिकारी उपस्थित न राहिल्याने महामंडळाचा रस्त्याच्या प्रश्नाकडे असलेला निष्काळजीपणा पुन्हा एकदा स्पष्ट झाला.यावेळी संतप्त महिलांनी आठ वर्षे रस्ता रखडला, तरी आमदार- खासदारांना नागरिकांच्या वेदना दिसत नाहीत का असा सवाल करत त्यांच्या कार्यतत्परतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
एमएसआरडीसी अंतर्गत सन २०१८ पासून सुरू असलेल्या शहापूर-मुरबाड-पाटगाव-खोपोली महामार्गाचे काम तब्बल आठ वर्षांपासून रखडले आहे. महामार्गावरील जीवघेणे खड्डे, अपूर्ण रस्त्याचे काम, धुळीचे साम्राज्य,चिखल आणि वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार निवेदने, आंदोलने आणि प्रशासनाकडे मागण्या करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याने महिलांनी अखेर रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या महामार्गावरून शहापूर तालुक्यातील हजारो नागरिक, विद्यार्थी, कामगार, शेतकरी, व्यापारी आणि रुग्ण दररोज प्रवास करतात. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांचा धोका वाढला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप महिलांनी केला.शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचणे कठीण होत असून आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना रुग्णालयात नेतांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलक महिलांनी सांगितले. दरम्यान घरातून बाहेर पडलेला आपला माणूस सुखरूप घरी परत येईल की नाही अशी चिंता आता प्रत्येक कुटुंबाला वाटत आहे. महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करून खड्डे बुजवावेत आणि वाहतुकीची समस्या दूर करावी, अशी मागणी महिलांनी यावेळी केली.यापूर्वीही महिलांनी प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र त्याची गांभीर्याने दखल न घेतल्याने मंगळागौरीच्या दिवशीच आंदोलन करण्यात आले.दरम्यान प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणुन नायब तहसिलदार सदानंद घुटे व पोलीस निरीक्षक विलास कदम यांनी आंदोलक महिलांना लेखी पत्र दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले.परिणामी दिलेल्या निर्धारित वेळेत काम सुरु न केल्यास हे आंदोलन अधिक व्यापक करण्यात येईल अशी माहिती चंद्रकला दुर्गे यांनी दिली.महिलांच्या या आंदोलनाला नडगाव,भटपाडा, साखरपाडा, शिरगाव, लेनाड, दोनघर, नेहरोली,शेंद्रूण आदी गावांमधील महिलांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी विद्याताई वेखंडे, डॉ.अपर्णा खाडे,पुष्पा पानसरे,चंद्रकला दुर्गे,कमल रेरा,आशा मांजे, अनिता हरड,दर्शना भालके, सुनिता पवार,अनिता हरड, विजया बेलवले,हर्षला जागरे, सविता विशे,रेखा जागरे,जुही पवार,दिपिका भालके, वंदना हरड,भारती कदम,राधिका हरड,सारिका फर्डे यांसह शेकडो महिला उपस्थित होत्या.
माहिती देऊनही आंदोलनस्थळी एमएसआरडीसीचा एकही अधिकारी उपस्थित न राहिल्याने महामंडळाचा रस्त्याच्या प्रश्नाकडे असलेला निष्काळजीपणा पुन्हा एकदा स्पष्ट झाला. यावेळी संतप्त महिलांनी “आठ वर्षे रस्ता रखडला, तरी आमदार-खासदारांना नागरिकांच्या वेदना दिसत नाहीत का असा सवाल करत त्यांच्या कार्यतत्परतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • टिपू सुलतान फोटोवरून पुन्हा वाद ! फोटो काढायला लावणार - दादा भुसे मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर दालनात पुन्हा एकदा लागला टिपू सुलतान यांचा फोटो लागल्याचं पाहायला मिळालं. आता, या फोटोवरुन पुन्हा नवा वाद सुरू झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांच्या फोटो समवेत लागला टिपू सुलतान यांचा फोटो झळकला. कार्यालयाच्या नूतनीकरणानंतर टिपू सुलतान यांचा फोटो कार्यालयात लावणार असल्याचे शान ए हिंद यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यावरून मालेगावात पुन्हा वादंग उठले असून यापूर्वी देखील वाद झाल्याचं पाहायला मिळालं. आता, पुन्हा फोटो लावल्याने वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमहापौर शान ए हिंद यांनी आज नूतनीकरण केलेल्या दालनात प्रवेश केला. त्यावेळी, टिपू सुलतान यांनी देशासाठी बलिदान दिल्याने त्यांचा फोटो कार्यालयात लावल्याचा पुनरुच्चार उपमहापौर शान-ए-हिंद यांनी केला. त्यामुळे, आता मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या या भूमिकेवर इतर विरोधी पक्षातील सदस्य काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे. त्यात, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत मला माहिती नाही, पण फोटो असेल तर काढायला लावणार असे स्पष्ट केले. नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावला आहे का, याची माहिती घेईल आणि तसे असेल तर फोटो काढण्यासाठी सूचना करणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांच्या फोटोवरुन नवा वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
    1
    टिपू सुलतान फोटोवरून  पुन्हा वाद !                                                    फोटो काढायला लावणार - दादा भुसे
मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर दालनात पुन्हा एकदा लागला टिपू सुलतान यांचा फोटो लागल्याचं पाहायला मिळालं. आता, या फोटोवरुन पुन्हा नवा वाद सुरू झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांच्या फोटो समवेत लागला टिपू सुलतान यांचा फोटो झळकला. कार्यालयाच्या नूतनीकरणानंतर टिपू सुलतान यांचा फोटो कार्यालयात लावणार असल्याचे शान ए हिंद यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यावरून मालेगावात पुन्हा वादंग उठले असून यापूर्वी देखील वाद झाल्याचं पाहायला मिळालं.
आता, पुन्हा फोटो लावल्याने वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमहापौर शान ए हिंद यांनी आज नूतनीकरण केलेल्या दालनात प्रवेश केला. त्यावेळी, टिपू सुलतान यांनी देशासाठी बलिदान दिल्याने त्यांचा फोटो कार्यालयात लावल्याचा पुनरुच्चार उपमहापौर शान-ए-हिंद यांनी केला. त्यामुळे, आता मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या या भूमिकेवर इतर विरोधी पक्षातील सदस्य काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे. त्यात, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत मला माहिती नाही, पण फोटो असेल तर काढायला लावणार असे स्पष्ट केले.
नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावला आहे का, याची माहिती घेईल आणि तसे असेल तर फोटो काढण्यासाठी सूचना करणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांच्या फोटोवरुन नवा वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
    user_नागेश मोरे,पत्रकार
    नागेश मोरे,पत्रकार
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • खड्ड्याने घेतला सुनील बोरसेंचा बळी महापौरांसमोर आई-पत्नी-मुलींचा आक्रोश महापौरांकडून आर्थिक मदत-नोकरीचे आश्वासन अंबड लिंक रोडवरील जीवघेण्या खड्ड्याने कष्टकरी सुनील बोरसे यांचा बळी घेतल्यानंतर त्यांच्या आठ जणांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रंगकाम करून संपूर्ण कुटुंबाचा एकहाती उदरनिर्वाह करणाऱ्या सुनील यांच्या अचानक जाण्याने घराचा आधारच हरपला. या दुःखातून सावरत असतानाच बुधवारी सकाळी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी बोरसे यांच्या अशोकनगर येथील निवासस्थानी कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी सुनील यांच्या आई, पत्नी आणि मुलींनी महापौरांसमोरच एकच टाहो फोडला आणि उपस्थितांचे डोळे पाणावले. ‘घर चालवणारा माणूसच गेला… आता आम्ही कोणाकडे पाहायचं?’ या आक्रोशाने बोरसे कुटुंबीयांचे दुःख शब्दांतून व्यक्त होत होते. सुनील हे रंगकाम करून सात जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्यांच्या मृत्यूने घरातील आर्थिक आधार पूर्णपणे कोलमडला आहे. महापौरांसमोर आई, पत्नी आणि मुलींच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आणि तोंडून निघणारा आक्रोश पाहून उपस्थित वातावरण अक्षरशः हेलावून गेले. कुटुंबाचा आधार असलेला सुनील एका खड्ड्यामुळे गेला आणि मागे राहिलेल्या कुटुंबासमोर आता जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. बोरसे कुटुंबीयांचा आक्रोश पाहून महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी त्यांना धीर देत प्रशासन त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले असून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निर्देशानुसार बोरसे कुटुंबाला आर्थिक मदत देण्याबरोबरच कुटुंबातील सदस्याला मानधनावर नोकरी देण्याचे आश्वासन महापौरांनी दिले असून सुनील यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या रस्त्याच्या कामाचीही गंभीर दखल घेण्यात आली असून, संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. त्यामुळे बोरसे कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी सुनील यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी मात्र कधीही भरून निघणार नाही. महापौरांनी कुटुंबीयांना धीर देत ‘तुम्ही एकटे नाही, प्रशासन तुमच्या पाठीशी आहे’ या भावनेने मदतीचे आश्वासन दिले. मात्र, बोरसे कुटुंबीयांच्या अश्रूंनी अंबड लिंक रोडवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. या सांत्वनपर भेटीप्रसंगी नगरसेवक विश्वास नागरे, माधुरी बोलकर, इंदुमती नागरे, सभापती समाधान देवरे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश महाजन, वैभव महिरे यांच्यासह बोरसे कुटुंबीय उपस्थित होते.
    4
    खड्ड्याने घेतला सुनील बोरसेंचा बळी महापौरांसमोर आई-पत्नी-मुलींचा आक्रोश

महापौरांकडून आर्थिक मदत-नोकरीचे आश्वासन
अंबड लिंक रोडवरील जीवघेण्या खड्ड्याने कष्टकरी सुनील बोरसे यांचा बळी घेतल्यानंतर त्यांच्या आठ जणांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रंगकाम करून संपूर्ण कुटुंबाचा एकहाती उदरनिर्वाह करणाऱ्या सुनील यांच्या अचानक जाण्याने घराचा आधारच हरपला. या दुःखातून सावरत असतानाच बुधवारी सकाळी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी बोरसे  यांच्या अशोकनगर येथील निवासस्थानी कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी सुनील यांच्या आई, पत्नी आणि मुलींनी महापौरांसमोरच एकच टाहो फोडला आणि उपस्थितांचे डोळे पाणावले.
‘घर चालवणारा माणूसच गेला… आता आम्ही कोणाकडे पाहायचं?’ या आक्रोशाने बोरसे कुटुंबीयांचे दुःख शब्दांतून व्यक्त होत होते. सुनील हे रंगकाम करून सात जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्यांच्या मृत्यूने घरातील आर्थिक आधार पूर्णपणे कोलमडला आहे.
महापौरांसमोर आई, पत्नी आणि मुलींच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आणि तोंडून निघणारा आक्रोश पाहून उपस्थित वातावरण अक्षरशः हेलावून गेले. कुटुंबाचा आधार असलेला सुनील एका खड्ड्यामुळे गेला आणि मागे राहिलेल्या कुटुंबासमोर आता जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.
बोरसे कुटुंबीयांचा आक्रोश पाहून महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी त्यांना धीर देत प्रशासन त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले असून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निर्देशानुसार बोरसे कुटुंबाला आर्थिक मदत देण्याबरोबरच कुटुंबातील सदस्याला मानधनावर नोकरी देण्याचे आश्वासन महापौरांनी दिले असून 
सुनील यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या रस्त्याच्या कामाचीही गंभीर दखल घेण्यात आली असून, संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. त्यामुळे बोरसे कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी सुनील यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी मात्र कधीही भरून निघणार नाही.
महापौरांनी कुटुंबीयांना धीर देत ‘तुम्ही एकटे नाही, प्रशासन तुमच्या पाठीशी आहे’ या भावनेने मदतीचे आश्वासन दिले. मात्र, बोरसे कुटुंबीयांच्या अश्रूंनी अंबड लिंक रोडवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
या सांत्वनपर भेटीप्रसंगी नगरसेवक विश्वास नागरे, माधुरी बोलकर, इंदुमती नागरे, सभापती समाधान देवरे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश महाजन, वैभव महिरे यांच्यासह बोरसे कुटुंबीय उपस्थित होते.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    54 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.