खड्ड्याने घेतला सुनील बोरसेंचा बळी महापौरांसमोर आई-पत्नी-मुलींचा आक्रोश महापौरांकडून आर्थिक मदत-नोकरीचे आश्वासन अंबड लिंक रोडवरील जीवघेण्या खड्ड्याने कष्टकरी सुनील बोरसे यांचा बळी घेतल्यानंतर त्यांच्या आठ जणांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रंगकाम करून संपूर्ण कुटुंबाचा एकहाती उदरनिर्वाह करणाऱ्या सुनील यांच्या अचानक जाण्याने घराचा आधारच हरपला. या दुःखातून सावरत असतानाच बुधवारी सकाळी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी बोरसे यांच्या अशोकनगर येथील निवासस्थानी कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी सुनील यांच्या आई, पत्नी आणि मुलींनी महापौरांसमोरच एकच टाहो फोडला आणि उपस्थितांचे डोळे पाणावले. ‘घर चालवणारा माणूसच गेला… आता आम्ही कोणाकडे पाहायचं?’ या आक्रोशाने बोरसे कुटुंबीयांचे दुःख शब्दांतून व्यक्त होत होते. सुनील हे रंगकाम करून सात जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्यांच्या मृत्यूने घरातील आर्थिक आधार पूर्णपणे कोलमडला आहे. महापौरांसमोर आई, पत्नी आणि मुलींच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आणि तोंडून निघणारा आक्रोश पाहून उपस्थित वातावरण अक्षरशः हेलावून गेले. कुटुंबाचा आधार असलेला सुनील एका खड्ड्यामुळे गेला आणि मागे राहिलेल्या कुटुंबासमोर आता जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. बोरसे कुटुंबीयांचा आक्रोश पाहून महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी त्यांना धीर देत प्रशासन त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले असून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निर्देशानुसार बोरसे कुटुंबाला आर्थिक मदत देण्याबरोबरच कुटुंबातील सदस्याला मानधनावर नोकरी देण्याचे आश्वासन महापौरांनी दिले असून सुनील यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या रस्त्याच्या कामाचीही गंभीर दखल घेण्यात आली असून, संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. त्यामुळे बोरसे कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी सुनील यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी मात्र कधीही भरून निघणार नाही. महापौरांनी कुटुंबीयांना धीर देत ‘तुम्ही एकटे नाही, प्रशासन तुमच्या पाठीशी आहे’ या भावनेने मदतीचे आश्वासन दिले. मात्र, बोरसे कुटुंबीयांच्या अश्रूंनी अंबड लिंक रोडवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. या सांत्वनपर भेटीप्रसंगी नगरसेवक विश्वास नागरे, माधुरी बोलकर, इंदुमती नागरे, सभापती समाधान देवरे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश महाजन, वैभव महिरे यांच्यासह बोरसे कुटुंबीय उपस्थित होते.
खड्ड्याने घेतला सुनील बोरसेंचा बळी महापौरांसमोर आई-पत्नी-मुलींचा आक्रोश महापौरांकडून आर्थिक मदत-नोकरीचे आश्वासन अंबड लिंक रोडवरील जीवघेण्या खड्ड्याने कष्टकरी सुनील बोरसे यांचा बळी घेतल्यानंतर त्यांच्या आठ जणांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रंगकाम करून संपूर्ण कुटुंबाचा एकहाती उदरनिर्वाह करणाऱ्या सुनील यांच्या अचानक जाण्याने घराचा आधारच हरपला. या दुःखातून सावरत असतानाच बुधवारी सकाळी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी बोरसे यांच्या अशोकनगर येथील निवासस्थानी कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी सुनील यांच्या आई, पत्नी आणि मुलींनी
महापौरांसमोरच एकच टाहो फोडला आणि उपस्थितांचे डोळे पाणावले. ‘घर चालवणारा माणूसच गेला… आता आम्ही कोणाकडे पाहायचं?’ या आक्रोशाने बोरसे कुटुंबीयांचे दुःख शब्दांतून व्यक्त होत होते. सुनील हे रंगकाम करून सात जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्यांच्या मृत्यूने घरातील आर्थिक आधार पूर्णपणे कोलमडला आहे. महापौरांसमोर आई, पत्नी आणि मुलींच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आणि तोंडून निघणारा आक्रोश पाहून उपस्थित वातावरण अक्षरशः हेलावून गेले. कुटुंबाचा आधार असलेला सुनील एका खड्ड्यामुळे
गेला आणि मागे राहिलेल्या कुटुंबासमोर आता जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. बोरसे कुटुंबीयांचा आक्रोश पाहून महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी त्यांना धीर देत प्रशासन त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले असून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निर्देशानुसार बोरसे कुटुंबाला आर्थिक मदत देण्याबरोबरच कुटुंबातील सदस्याला मानधनावर नोकरी देण्याचे आश्वासन महापौरांनी दिले असून सुनील यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या रस्त्याच्या कामाचीही गंभीर दखल घेण्यात आली असून, संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. त्यामुळे
बोरसे कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी सुनील यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी मात्र कधीही भरून निघणार नाही. महापौरांनी कुटुंबीयांना धीर देत ‘तुम्ही एकटे नाही, प्रशासन तुमच्या पाठीशी आहे’ या भावनेने मदतीचे आश्वासन दिले. मात्र, बोरसे कुटुंबीयांच्या अश्रूंनी अंबड लिंक रोडवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. या सांत्वनपर भेटीप्रसंगी नगरसेवक विश्वास नागरे, माधुरी बोलकर, इंदुमती नागरे, सभापती समाधान देवरे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश महाजन, वैभव महिरे यांच्यासह बोरसे कुटुंबीय उपस्थित होते.
- पुस्तकांचा तुटवडा निफाड तालुक्यात मोफत पाठ्यपुस्तकांच्या १,५२७ संचांची कमतरता; तातडीने पुस्तके द्या, अन्यथा शिक्षण विभागाला टाळे ठोकू : शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही निफाड तालुक्यातील विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणारी मोफत पाठ्यपुस्तके पूर्णपणे उपलब्ध झालेली नाहीत. तालुक्यात तब्बल १,५२७ संचांचा तुटवडा असून, पुस्तकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हा तुटवडा तातडीने दूर करून विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून द्यावीत; अन्यथा शिक्षण विभागाच्या दालनास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांनी दिला. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत दरवर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. शाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक पुस्तकांची मागणी नोंदवून ती जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर वितरित करण्याची व्यवस्था असते. मात्र, यंदा शाळा सुरू होऊन अडीच महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी अनेक विद्यार्थ्यांच्या हातात अद्याप पुस्तके पोहोचलेली नाहीत. निफाड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दुसरी, चौथी, पाचवी, सहावी व सातवीच्या पुस्तकांचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. विशेषतः दुसरी, चौथी आणि सहावीच्या अभ्यासक्रमात बदल झाल्याने जुन्या पाठ्यपुस्तकांचा वापर करणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण वाढली आहे. काही शाळांमध्ये शिक्षकांनी जुनी पुस्तके जमा करून तात्पुरती व्यवस्था केली असली तरी नवीन पुस्तके उपलब्ध नसल्याने अध्यापनात अडथळे येत आहेत. या प्रश्नाबाबत प्रकाश पाटील यांनी निफाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप व सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे जाब विचारला. तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठ्यपुस्तकांचा तुटवडा असताना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्याबाबत पुरेशी माहिती नसल्याचे चर्चेतून समोर आल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी लासलगाव शिवसेना शहरप्रमुख प्रमोद पाटील, लासलगाव शहर विकास समितीचे राजेंद्र कराड, संदीप उगले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. वर्गनिहाय तुटवडा इयत्ता २ री — ७ संच इयत्ता ४ थी — २७ संच इयत्ता ५ वी — ७६८ संच इयत्ता ६ वी — ६१४ संच इयत्ता ७ वी — १११ संच एकूण — १,५२७ संच “विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणारी मोफत पुस्तके वेळेत मिळणे हा त्यांचा हक्क आहे. पुस्तकांचा तुटवडा तातडीने दूर करून सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण संच उपलब्ध करून द्यावेत.” — प्रकाश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य1
- सार्वजनिक ठिकाण पे गंदगी करने के लिए कौन दिया परवानगी पुच्छी है जनता सार्वजनिक ठिकाण प्रति नाशिक रोड देवदली कॅम्प प्लास्टिक से कितनी बडी गंदगी होती है और बिमारी उपयोग पर रोक लगाने के लिए सरकार ने पुरा कितना प्रार्थना किया पर लोगों को समझ में आना चाहिये लोगों की राय है की सार्वजनिक स्थान पर गंडगी ना करे जब सरकार है पर कार्रवाई लेती है टैब लोगों को समझ में आता है एक सार्वजनिक स्थान पर गंदगी ना करे, यह किसी धर्म किसी मजहब के लिए नहीं हर लोग हर वर्ग के लिए है गंडगी ना करे1
- शाळेतील शासकीय पोषण आहाराबाबत मंत्री दादा भुसे यांच्य स्पष्ट वक्तव्य1
- दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील हनुमंत रायाच्या पटांगणात सुरू असलेल्यांना भेटण्याची आज सांगता करण्यात आली या नाम्यामध्ये सात दिवस हे भजन कीर्तन हरिपाठ गाथा भजन व प्रवचन असे भरगच्च कार्यक्रम राहून आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवले त्यानंतर अन्नदानातून उरलेला शिधा हा ज्ञानराज वारकरी संस्थेला ग्रामस्थांनी दान म्हणून दिला आहे या ज्ञानराज वारकरी संस्थेमध्ये आज 40 ते 45 विद्यार्थी हे गीता भागवत व पखवाज याचे शिक्षण घेत आहे ह्या वारकरी शिक्षण संस्थेत पाचवीपासून ते दहावी पर्यंत विद्यार्थी ज्ञानदान घेत आहेत .1
- आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे सुरगाणा तालुक्यातील आंबोडे येथील अंगणवाडीत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील अंडी निकृष्ट दर्जाची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे पालकांत नाराजी व्यक्त होत आहे. बालकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप केला जात आहे. नित्कृष्ठ प्रकाराची अंडी बालकांना दिली जात असल्याचे समजताच सरपंच राजेंद्र निकुळे यांनी अंगणवाडीत जात प्रत्यक्ष चौकशी केली. मात्र, यावेळी संबंधितांकडून समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सरपंचांनी सांगितले. त्यामुळे पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत संशय अधिकच बळावला आहे. शासनाकडून बालकांना सकस व पौष्टिक आहार मिळावा, यासाठी पोषण आहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, जर निकृष्ट दर्जाची अंडी बालकांना दिली जात असतील तर हा गंभीर प्रकार असून संबंधित विभागाने याची तातडीने चौकशी करणे गरजेचे आहे. अंगणवाडीतील अंड्यांचा दर्जा, पुरवठ्याचे स्रोत तसेच वितरणाची प्रक्रिया यांची संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी करावी. दोष आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे. बालकांच्या पोषण आहारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका सरपंच राजेंद्र निकुळे यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. -- --1
- सावद ..आमने... बापगाव.... वाशेरे रस्त्याचे उपोषण सुटले......" ८ दिवसांच्या आत तीव्र आंदोलन छेडणार" कॉम्रेड रमेश गायकवाड यांचा इशारा कोट्यवधी रुपये खर्चुनही भिवंडी तालुक्यातील सावद.....आमने.... वाशेरे पडघे या रस्त्यावर खड्डे पडण्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, या रस्त्यावरचे खड्डे तात्काळ डांबराने बुजवावेत , या रस्त्यावर अपघात झालेल्या व्यक्तींना भरपाई मिळावी , या रस्त्यावर अगोदर खर्च झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या खर्चाची माहिती द्यावी अशा मागण्या करत काल भिवंडी तालुक्यातीलआमने गावाच्या शेजारी कॉम्रेड रमेश गायकवाड , जागृत नागरिक जयवंत दळवी आणि येथील ग्रामस्थांनी आमरण उपोषण केले. सध्या भिंवडी तालुक्यातील सर्वच रस्त्यावर खडुंयांचे साम्राज्य आसून लाखो वाहने दररोज जा - ये कारणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ८१ पडघा आमने रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत कार्यकारी अभियंता ठाणे यांच्याकडे ३०० नागरीकांनी तक्रार करूनही दखल न घेतल्याने अखेर जयवंत दळवी , कॉम्रेड रमेश गायकवाड यांनी काल उपोषण केले . यात डॉक्टर घनश्याम पाटील, विजय पाटील विश्वास केणे मनोहर केणे ,सुभाष दळवी , राम दळवी, भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांनी व शेकडो नागरीकांनी सहभाग घेतला . वेळी उपोषण सोडताना त्यांना सदरचा रस्ता सुव्यवस्थित ठेवण्याचे आश्वासन दिले आसले तरी मागील 3 वर्षापासून लाखो रुपयांची बिले काढूनही रस्त्यावर खड्डे पडण्यास जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई कधी होणार? याचे उत्तर प्रशासनाने दिले नाही. अधीक्षक अभियंता सत्यजीत तांबे हे त्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आसल्याचा आरोप कॉम्रेड रमेश गायकवाड यांनी यावेळी केला. यावेळी कार्यकारी अभियंता ठाणे यांचे लेखी पत्र उपोषण करणारे याना देण्यात आले. लवकरात लवकर ८ दिवसांच्या आत उपअभियंता त्या रस्त्याची पाहणी करतील. खड्डे बुजवण्याचे काम सुरू राहील. असे आश्वासन देण्यात आले. जर मागण्यांची पूर्तता झाली नाही तर पुन्हा आठ दिवसाच्या आत जाहीर रास्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी रमेश गायकवाड यांनी दिला. यावेळी कॉन्ट्रॅक्टर कल्पेश केणे, शाखा अभियंता अविनाश मैराले, स्थापत्य अभियंता दर्शन कदम आणि या परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रस्त्यावर सातत्याने खोटी बिले काढणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनाच्या अभय असल्याने हा रस्ता दुर्लक्षित आहे.4
- टिपू सुलतान फोटोवरून पुन्हा वाद ! फोटो काढायला लावणार - दादा भुसे मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर दालनात पुन्हा एकदा लागला टिपू सुलतान यांचा फोटो लागल्याचं पाहायला मिळालं. आता, या फोटोवरुन पुन्हा नवा वाद सुरू झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांच्या फोटो समवेत लागला टिपू सुलतान यांचा फोटो झळकला. कार्यालयाच्या नूतनीकरणानंतर टिपू सुलतान यांचा फोटो कार्यालयात लावणार असल्याचे शान ए हिंद यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यावरून मालेगावात पुन्हा वादंग उठले असून यापूर्वी देखील वाद झाल्याचं पाहायला मिळालं. आता, पुन्हा फोटो लावल्याने वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमहापौर शान ए हिंद यांनी आज नूतनीकरण केलेल्या दालनात प्रवेश केला. त्यावेळी, टिपू सुलतान यांनी देशासाठी बलिदान दिल्याने त्यांचा फोटो कार्यालयात लावल्याचा पुनरुच्चार उपमहापौर शान-ए-हिंद यांनी केला. त्यामुळे, आता मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या या भूमिकेवर इतर विरोधी पक्षातील सदस्य काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे. त्यात, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत मला माहिती नाही, पण फोटो असेल तर काढायला लावणार असे स्पष्ट केले. नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावला आहे का, याची माहिती घेईल आणि तसे असेल तर फोटो काढण्यासाठी सूचना करणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांच्या फोटोवरुन नवा वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.1
- खड्ड्याने घेतला सुनील बोरसेंचा बळी महापौरांसमोर आई-पत्नी-मुलींचा आक्रोश महापौरांकडून आर्थिक मदत-नोकरीचे आश्वासन अंबड लिंक रोडवरील जीवघेण्या खड्ड्याने कष्टकरी सुनील बोरसे यांचा बळी घेतल्यानंतर त्यांच्या आठ जणांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रंगकाम करून संपूर्ण कुटुंबाचा एकहाती उदरनिर्वाह करणाऱ्या सुनील यांच्या अचानक जाण्याने घराचा आधारच हरपला. या दुःखातून सावरत असतानाच बुधवारी सकाळी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी बोरसे यांच्या अशोकनगर येथील निवासस्थानी कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी सुनील यांच्या आई, पत्नी आणि मुलींनी महापौरांसमोरच एकच टाहो फोडला आणि उपस्थितांचे डोळे पाणावले. ‘घर चालवणारा माणूसच गेला… आता आम्ही कोणाकडे पाहायचं?’ या आक्रोशाने बोरसे कुटुंबीयांचे दुःख शब्दांतून व्यक्त होत होते. सुनील हे रंगकाम करून सात जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्यांच्या मृत्यूने घरातील आर्थिक आधार पूर्णपणे कोलमडला आहे. महापौरांसमोर आई, पत्नी आणि मुलींच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आणि तोंडून निघणारा आक्रोश पाहून उपस्थित वातावरण अक्षरशः हेलावून गेले. कुटुंबाचा आधार असलेला सुनील एका खड्ड्यामुळे गेला आणि मागे राहिलेल्या कुटुंबासमोर आता जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. बोरसे कुटुंबीयांचा आक्रोश पाहून महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी त्यांना धीर देत प्रशासन त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले असून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निर्देशानुसार बोरसे कुटुंबाला आर्थिक मदत देण्याबरोबरच कुटुंबातील सदस्याला मानधनावर नोकरी देण्याचे आश्वासन महापौरांनी दिले असून सुनील यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या रस्त्याच्या कामाचीही गंभीर दखल घेण्यात आली असून, संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. त्यामुळे बोरसे कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी सुनील यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी मात्र कधीही भरून निघणार नाही. महापौरांनी कुटुंबीयांना धीर देत ‘तुम्ही एकटे नाही, प्रशासन तुमच्या पाठीशी आहे’ या भावनेने मदतीचे आश्वासन दिले. मात्र, बोरसे कुटुंबीयांच्या अश्रूंनी अंबड लिंक रोडवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. या सांत्वनपर भेटीप्रसंगी नगरसेवक विश्वास नागरे, माधुरी बोलकर, इंदुमती नागरे, सभापती समाधान देवरे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश महाजन, वैभव महिरे यांच्यासह बोरसे कुटुंबीय उपस्थित होते.4