टिपू सुलतान फोटोवरून पुन्हा वाद ! फोटो काढायला लावणार - दादा भुसे मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर दालनात पुन्हा एकदा लागला टिपू सुलतान यांचा फोटो लागल्याचं पाहायला मिळालं. आता, या फोटोवरुन पुन्हा नवा वाद सुरू झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांच्या फोटो समवेत लागला टिपू सुलतान यांचा फोटो झळकला. कार्यालयाच्या नूतनीकरणानंतर टिपू सुलतान यांचा फोटो कार्यालयात लावणार असल्याचे शान ए हिंद यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यावरून मालेगावात पुन्हा वादंग उठले असून यापूर्वी देखील वाद झाल्याचं पाहायला मिळालं. आता, पुन्हा फोटो लावल्याने वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमहापौर शान ए हिंद यांनी आज नूतनीकरण केलेल्या दालनात प्रवेश केला. त्यावेळी, टिपू सुलतान यांनी देशासाठी बलिदान दिल्याने त्यांचा फोटो कार्यालयात लावल्याचा पुनरुच्चार उपमहापौर शान-ए-हिंद यांनी केला. त्यामुळे, आता मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या या भूमिकेवर इतर विरोधी पक्षातील सदस्य काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे. त्यात, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत मला माहिती नाही, पण फोटो असेल तर काढायला लावणार असे स्पष्ट केले. नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावला आहे का, याची माहिती घेईल आणि तसे असेल तर फोटो काढण्यासाठी सूचना करणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांच्या फोटोवरुन नवा वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.

- शिवसेनेच्या नगरसेवकांचे मनपा उपमहापौर दालनाबाहेर रणकंदन, टिपूचा फोटो काढा अन्यथा दालन तोडून फोटो काढू शिवसेनेच्या नगरसेवकांचे मनपा उपमहापौर दालनाबाहेर रणकंदन पाहवयास मिळाले. टिपू सुलतानचा फोटो काढा, अन्यथा दालन तोडून फोटो काढू .. असा ईशारा यावेळी त्यांनी दिला. सत्ताधारी व विरोधकांमधील वादावादीमुळे नगरसचिवांची मात्र कोंडी झाली.1
- मालेगांव कॉरपोरेशन डिप्टी मेयर शान ए हिंद की ऑफ़िस ग्रैंड ओपनिंग, फ़िर लगा टीपू सुल्तान का फ़ोटो मालेगांव कॉरपोरेशन डिप्टी मेयर शान ए हिंद की ऑफ़िस ग्रैंड ओपनिंग, फ़िर लगा टीपू सुल्तान का फ़ोटो1
- माझ्या छातीवरून गाडी जाऊ द्या, पण शेतकऱ्याच्या घामाचा घात होऊ देणार नाही!" काळ्या आईच्या कुशीत घाम गाळून संपूर्ण देशाचं पोट भरणाऱ्या बळीराजाची अवस्था आज काय झाली आहे? नाशिकच्या लाल मातीतून उठलेला एक तरुण शेतकरी, श्री गणेशभाऊ निंबाळकर, जेव्हा रेल्वेच्या रुळांवर उभा राहून भरल्या डोळ्यांनी आक्रोश करतो, तेव्हा फक्त एक माणूस रडत नसतो, तर उभ्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचा स्वाभिमान टाहो फोडत असतो! रात्रंदिवस काबाडकष्ट करून, कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला जेव्हा मातीमोल भाव मिळतो आणि दुसरीकडे दलालांच्या फायद्यासाठी निकृष्ट कांदा पाठवून शेतकऱ्यांचे भाव पाडले जातात, तेव्हा एका शेतकऱ्याच्या काळजात होणाऱ्या वेदनांची कल्पना कोण करणार? अधिकारी, नाफेड, सी.डब्ल्यू.सी.च्या उंबरठ्यावर चपला झिजवूनही जेव्हा न्याय मिळत नाही, तेव्हा संतापाने आणि हतबलतेने डोळ्यातून अश्रू वाहत असताना "मला या देशाचं नागरिकत्वच नको" असा टोकाचा उद्गार एका अन्नदात्याच्या मुखातून निघावा, ही संपूर्ण व्यवस्थेसाठी शरमेची बाब आहे. गणेशभाऊ, तुम्ही एकटे नाही आहात! तुमच्या कंठातून निघालेला प्रत्येक शब्द हा शेतात राबणाऱ्या माय-बाप शेतकऱ्याची खरी व्यथा2
- शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी काढले रेल्वे अडवणाऱ्या शेतकरी पुत्राचे कांद्यावर तैलचित्र लासलगाव येथे रेल्वे अडवल्यानंतर गणेश निंबाळकर यांचे कांद्यावर चित्र काढून त्यांना पाठिंबा वअभिनंदन करण्यासाठी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी रेखाटले कांद्यावरच गणेश निंबाळकर यांचे चित्र1
- जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांचे स्वस्त धान्य दुकानदारांना कडक इशारा, नंदुरबार: जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांचे जिल्हाभरातील स्वस्त धान्य दुकानदारांना कडक इशारा दिला असून यापुढे शिधापत्रिका धारकांना भेसळयुक्त व खराब धान्याचे वाटप करण्यात येऊ नये. पुरवठा विभागाकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.1
- स्वामी मुक्तानंद विद्यालयात ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमासह रक्षाबंधन उत्साहात स्वामी मुक्तानंद विद्यालयात ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमासह रक्षाबंधन उत्साहात येवला (प्रतिनिधी): स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, येवला येथे रक्षाबंधनाचा पवित्र सण अत्यंत उत्साही व देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. देशाचे रक्षण करणाऱ्या वीर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यालयात 'एक राखी सैनिकांसाठी' या विशेष उपक्रमांतर्गत सैनिक औक्षण व राखीबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व ईशस्तवाने झाली. उपप्राचार्य खेरणार सर यांनी प्रास्ताविकातून उपक्रमामागची पार्श्वभूमी स्पष्ट केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या सुंदर राख्या उपस्थित आजी-माजी सैनिकांना बांधून त्यांचे औक्षण केले व सन्मान केला. सैनिकांनी सीमेवरील अनुभव सांगून विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा दिली. या सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमृत पहिलवान, सचिव डॉ. किरण पहिलवान, खजिनदार तेजस गायकवाड, संचालक अमोल एंडाईत, प्राचार्य सोनवणे आर. बी., उपप्राचार्य खेरणार सर, मुंडे सर, राऊळ सर व शिक्षकवृंद उपस्थित होते. अध्यक्ष व प्राचार्यांनी आपल्या भाषणातून सैनिकांच्या त्यागाचे कौतुक केले. हादगे मॅडम, जाडीई मॅडम व गोसावी मॅडम यांनी सैनिकांविषयी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गायकवाड मॅडम यांनी केले, तर राऊत मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- जायखेडा पोलिसांनी पाठलाग करून पिकअप मधून गोवंश जनावरे केली जप्त जायखेडा पोलिसांची पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत ३ लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अवैध गोवंश घेऊन जाणारी पिक अप पाठलाग करून ताब्यात घेणेत आली.1
- Dhule Accident News | धुळे: मुंबई-आग्रा महामार्गावर तापी पुलाजवळ भीषण अपघात; 6 जण जखमी, एका महिलेचा हात तुटून वेगळा... धुळे: मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर दभाषी येथील तापी पुलाजवळ मध्यरात्री भीषण अपघात घडला. शिरपूरहून धुळ्याकडे जाणारी आर्टिगा कार तांत्रिक बिघाड झाल्याने महामार्गावर बंद पडली होती. कार सुरू करण्यासाठी शिरपूरहून नातेवाईक मोटारसायकलने घटनास्थळी आले होते. ते महामार्गावरच कार सुरू करण्याचा प्रयत्न करत असतानाच भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने उभ्या असलेल्या आर्टिगा कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कंटेनरने कारला काही अंतरापर्यंत फरफटत नेले. या अपघातात आर्टिगा मधील प्रवासी आणि मदतीसाठी आलेले नातेवाईक असे एकूण 6 जण गंभीर जखमी झाले. या अपघातात एका महिलेला गंभीर दुखापत झाली असून, तिचा एक हात तुटून शरीरापासून वेगळा झाला आहे. सर्व जखमींना तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. या प्रकरणी शिरपूर पोलीस पुढील तपास करत आहेत. - #DhuleNews #ShirpurAccident #MumbaiAgraHighway #DhulePolice #RoadAccident1