अंबाजोगाई शहरातून दोन दुचाकींची चोरी; पोलिसात गुन्हा दाखल अंबाजोगाई (प्रतिनिधी): अंबाजोगाई शहरातील खडकपुरा कोष्टेगल्ली व प्रशांतनगर परिसर येथून अज्ञात चोरट्याने दोन दुचाकी लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिली चोरी ६ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४.०० वाजेच्या सुमारास खडकपुरा कोष्टेगल्ली येथून झाली. महादेव प्रल्हाद चव्हाण (वय ४०, रा. खडकपुरा कोष्टेगल्ली, ता. अंबाजोगाई, जि. बीड) यांची १५ हजार रुपये किमतीची 'हिरो' कंपनीची दुचाकी (क्रमांक: MH 44 R 0460) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. तसेच दुसरी घटना ७ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास प्रशांतनगर, अंबाजोगाई येथे घडली. दीपक विष्णु मारवाल यांची सुमारे २० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची 'स्प्लेंडर प्लस' दुचाकी (क्रमांक: MH 44 X 8452) अज्ञात चोरट्याने लांबवली. दुचाकी चोरीला गेल्याप्रकरणी महादेव चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात १५ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोह गायकवाड करत आहेत.
अंबाजोगाई शहरातून दोन दुचाकींची चोरी; पोलिसात गुन्हा दाखल अंबाजोगाई (प्रतिनिधी): अंबाजोगाई शहरातील खडकपुरा कोष्टेगल्ली व प्रशांतनगर परिसर येथून अज्ञात चोरट्याने दोन दुचाकी लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिली चोरी ६ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४.०० वाजेच्या सुमारास खडकपुरा कोष्टेगल्ली येथून झाली. महादेव प्रल्हाद चव्हाण (वय ४०, रा. खडकपुरा कोष्टेगल्ली, ता. अंबाजोगाई, जि. बीड) यांची १५ हजार रुपये किमतीची 'हिरो' कंपनीची दुचाकी (क्रमांक: MH 44 R 0460) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. तसेच दुसरी घटना ७ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास प्रशांतनगर, अंबाजोगाई येथे घडली. दीपक विष्णु मारवाल यांची सुमारे २० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची 'स्प्लेंडर प्लस' दुचाकी (क्रमांक: MH 44 X 8452) अज्ञात चोरट्याने लांबवली. दुचाकी चोरीला गेल्याप्रकरणी महादेव चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात १५ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोह गायकवाड करत आहेत.
- रस्त्याच्या कडेला झाडे वाढल्याने आपेगाव च्या एसटीला अनेक अडचणी1
- सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न1
- नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान. नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. नांदेड रोडवरील कृपासदन शाळा परिसरात बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी एक मोठी दुर्घटना टळली. रस्त्यावरून जात असलेल्या एका चालत्या कारवर अचानक रस्त्याच्या कडेला असलेले जुने वडाचे झाड कोसळले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कारचालक यातून सुखरूप बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड रोडवरील कृपासदन परिसराकडून एक कार (क्रमांक एमएच 02 इझेड 2579) शहराच्या दिशेने जात होती. कार कृपासदन शाळेजवळ आली असता, अचानक रस्त्याच्या बाजूला असलेले एक भलेमोठे वडाचे झाड चालत्या कारच्या पुढील भागावर कोसळले. झाड पडल्याचा जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी प्रसंगावधान राखून कारमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. झाड थेट कारच्या बोनेटवर व टपाच्या समोरील भागावर पडल्याने कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहतूक विस्कळीत. मुख्य रस्त्यावरच झाड कोसळल्यामुळे नांदेड रोडवरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी पोहोचून रस्ता साफ करण्याचे काम सुरू केले. क्रेन आणि कटरच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. जुनी झाडे हटवण्याची मागणी या परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली अनेक झाडे अत्यंत जुनी व धोकादायक झाली आहेत. प्रशासनाने अशा धोकादायक झाडांची त्वरित पाहणी करून ती हटवावीत, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुनरावृत्त होणार नाहीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व वाहनधारकांनी केली आहे.4
- ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला1
- दिव्यांग व्यक्ती तपासणीची होत आहे गैरसोय.!! तपासणीसाठी उपकरणे,विशेषतज्ञ लातूरला मग तपासणी देखावे येथे कशाला?? निलंगा उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींची होत आहे गैरसोय..!! तपासणी टीम चे वेळ निश्चित नाही!! महिन्यातून दोन दिवस निलंगा तालुक्यातील दिव्यांगाना तपासाला यायला सुद्धा विशेषतज्ञाना वेळ नाही?1
- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तहसील कार्यालयात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात (मुखेड :- प्रतिनिधी) मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त आज दि. १७ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. तुषार राठोड हे उपस्थित होते. यावेळी तहसीलदार अभयराय नंजुडे, पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार यांच्यासह तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार डॉ. तुषार राठोड म्हणाले की, "मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आपण पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला पाहिजे. एक झाड लावणे हीच खरी आदरांजली ठरेल." तहसीलदार अभयराय नंजुडे यांनी देखील उपस्थितांना वृक्ष संवर्धन करण्याचे आवाहन केले. हा उपक्रम अतिशय उत्साहात आणि पर्यावरणपूरक संदेश देत पार पडला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तहसील कार्यालयात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात (मुखेड :- प्रतिनिधी) मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त आज दि. १७ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. तुषार राठोड हे उपस्थित होते. यावेळी तहसीलदार अभयराय नंजुडे, पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार यांच्यासह तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार डॉ. तुषार राठोड म्हणाले की, "मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आपण पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला पाहिजे. एक झाड लावणे हीच खरी आदरांजली ठरेल." तहसीलदार अभयराय नंजुडे यांनी देखील उपस्थितांना वृक्ष संवर्धन करण्याचे आवाहन केले. हा उपक्रम अतिशय उत्साहात आणि पर्यावरणपूरक संदेश देत पार पडला.3
- धनगर समाजाच्या निर्णायक महामोर्चा महा मेळाव्यास थोड्याच वेळात शनिवारबाजार परिसरातून सुरुवात होईल;परभणी येथे निर्णायक महामोर्चास जनसागर उसळला धनगर समाजाच्या निर्णायक महामोर्चा महा मेळाव्यास थोड्याच वेळात शनिवारबाजार परिसरातून सुरुवात होईल;परभणी येथे निर्णायक महामोर्चास जनसागर उसळला सोनपेठ (दर्शन) :- परभणी धनगर समाजाच्या निर्णायक महामोर्चा महा मेळाव्यास थोड्याच वेळात शनिवारबाजार परिसरातून सुरुवात होईल. परभणी जिल्ह्यासह परिसरातील जिल्ह्यातूनही धनगर समाजबांधव या महामेळाव्याप्रसंगी एकवटला आहे.1
- आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात बीड | प्रतिनिधी बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित पाणी सोडल्याच्या कथित घटनेप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे दलित पँथरचे बीड जिल्हाध्यक्ष धम्मानंद वाघमारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होते. प्रशासनाकडून मागण्यांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर १७ सप्टेंबर रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा वाघमारे यांनी निवेदनातून दिला होता. १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीड शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित व घाण पाणी सोडण्यात आल्याचा आरोप धम्मानंद वाघमारे यांनी केला आहे. या प्रकारामुळे आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, स्वच्छता सभापती आणि बांधकाम सभापती यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. तक्रार करून सुमारे सहा महिने उलटूनही संबंधितांवर कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी घाण पाणी सोडण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व लोकप्रतिनिधींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल करावा, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींचे राजीनामे घेण्यात यावेत, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. प्रशासनाने १६ सप्टेंबरपर्यंत कारवाई न केल्यास १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी धम्मानंद वाघमारे यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी वाघमारे यांना कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होणे अपेक्षित आहे.1