दुष्काळाच्या उंबरठ्यावर संग्रामपूर! सोयाबीन-कापूस करपला; शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले — दीड महिन्यापासून पावसाची ऐतिहासिक ओढ, प्रशासनाच्या मदतीकडे बळीराजाचे डोळे दुष्काळाच्या उंबरठ्यावर संग्रामपूर! सोयाबीन-कापूस करपला; शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले — दीड महिन्यापासून पावसाची ऐतिहासिक ओढ, प्रशासनाच्या मदतीकडे बळीराजाचे डोळे पातुर्डा, ता. संग्रामपूर : एकीकडे आभाळाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा आणि दुसरीकडे दिवसेंदिवस करपणारी शेती... अशी भयावह परिस्थिती संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा, खिरोडा आणि परिसरात निर्माण झाली आहे. गेल्या दीड महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने हजारो हेक्टरवरील सोयाबीन-कापूस पिके अक्षरशः होरपळून निघाली आहेत. पिकांच्या शेतात हिरवाईऐवजी पिवळेपणा आणि करपलेली पाने दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याचे चित्र आहे. संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थचक्र प्रामुख्याने सोयाबीन आणि कापूस या दोन प्रमुख पिकांवर अवलंबून आहे. याच पिकांच्या भरवशावर बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि कर्जाची परतफेड करण्याचे गणित शेतकरी आखतो. मात्र यंदा पावसाने ऐन निर्णायक टप्प्यावर दगा दिल्याने हे संपूर्ण आर्थिक गणितच कोलमडण्याच्या मार्गावर आहे. शेंगा भरण्याच्या काळातच सोयाबीनची वाताहत सध्या सोयाबीनला शेंगा भरण्याचा, तर कापसाला पाते-फुले आणि बोंडे धरण्याचा महत्त्वाचा कालावधी आहे. मात्र जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने सोयाबीनची पाने पिवळी पडत असून शेंगा पोचट राहत आहेत. दुसरीकडे कापसाची बोंडे गळून पडत असल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. पातुर्डा, सोनाळा, संग्रामपूर, पळशी, वरवट, खिरोडा, टुनकी आदी परिसरात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. पावसाने तातडीने हजेरी लावली नाही तर उर्वरित पिकेही हातातून जाण्याची भीती आहे. कर्जमाफीची घोषणा झाली; पण नापिकीचा नवा घाव! शासनाने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी तिचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यापूर्वीच नापिकीचे नवे संकट शेतकऱ्यांच्या दारात उभे ठाकले आहे. नवीन पीककर्ज घेऊन महागडी बियाणे, खते, कीटकनाशके आणि फवारण्यांवर हजारो रुपये खर्च केले. मात्र पावसाअभावी उत्पादनच धोक्यात आल्याने कर्जाचा डोंगर आणि उत्पन्नाची शून्य शक्यता, अशा दुहेरी कात्रीत बळीराजा सापडला आहे. फक्त आश्वासन नको, बांधावर येऊन पंचनामे करा! शेतकऱ्यांची मागणी आता केवळ घोषणांची राहिलेली नाही. पातुर्डा मंडळात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून दुष्काळी उपाययोजना लागू कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. प्रशासनाने कागदोपत्री अहवाल तयार करण्याऐवजी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत आणि तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतीपूरक उद्योगांची उभारणी करा केवळ कर्जमाफी करून शेतकऱ्यांच्या समस्या संपणार नाहीत. सोयाबीन-कापूस प्रक्रिया उद्योग, हमीभाव खरेदी केंद्र आणि शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी ठोस व्यवस्था उभी करावी. पातुर्डा परिसरात शासकीय युनिट किंवा लघुउद्योग उभारून स्थानिक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम द्यावे, अशीही मागणी पुढे आली आहे. “शेती वाचली तरच शेतकरी वाचेल आणि शेतकरी वाचला तरच पातुर्डा परिसराचे अर्थचक्र टिकेल. त्यामुळे आता प्रशासनाने विलंब न करता शेतकऱ्यांच्या बांधावर उतरावे,” अशी संतप्त भावना परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आता प्रश्न केवळ पिकांचा नाही; तो हजारो शेतकरी कुटुंबांच्या जगण्याचा आहे. प्रशासन आणखी किती दिवस आभाळाकडे पाहत बसणार?
दुष्काळाच्या उंबरठ्यावर संग्रामपूर! सोयाबीन-कापूस करपला; शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले — दीड महिन्यापासून पावसाची ऐतिहासिक ओढ, प्रशासनाच्या मदतीकडे बळीराजाचे डोळे दुष्काळाच्या उंबरठ्यावर संग्रामपूर! सोयाबीन-कापूस करपला; शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले — दीड महिन्यापासून पावसाची ऐतिहासिक ओढ, प्रशासनाच्या मदतीकडे बळीराजाचे डोळे पातुर्डा, ता. संग्रामपूर : एकीकडे आभाळाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा आणि दुसरीकडे दिवसेंदिवस करपणारी शेती... अशी भयावह परिस्थिती संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा, खिरोडा आणि परिसरात निर्माण झाली आहे. गेल्या दीड महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने हजारो हेक्टरवरील सोयाबीन-कापूस पिके अक्षरशः होरपळून निघाली आहेत. पिकांच्या शेतात हिरवाईऐवजी पिवळेपणा आणि करपलेली पाने दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याचे चित्र आहे. संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थचक्र प्रामुख्याने सोयाबीन आणि कापूस या दोन प्रमुख पिकांवर अवलंबून आहे. याच पिकांच्या भरवशावर बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि कर्जाची परतफेड करण्याचे गणित शेतकरी आखतो. मात्र यंदा पावसाने ऐन निर्णायक टप्प्यावर दगा दिल्याने हे संपूर्ण आर्थिक गणितच कोलमडण्याच्या मार्गावर आहे. शेंगा भरण्याच्या काळातच सोयाबीनची वाताहत सध्या सोयाबीनला शेंगा भरण्याचा, तर कापसाला पाते-फुले आणि बोंडे धरण्याचा महत्त्वाचा कालावधी आहे. मात्र जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने सोयाबीनची पाने पिवळी पडत असून शेंगा पोचट राहत आहेत. दुसरीकडे कापसाची बोंडे गळून पडत असल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. पातुर्डा, सोनाळा, संग्रामपूर, पळशी, वरवट, खिरोडा, टुनकी आदी परिसरात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. पावसाने तातडीने हजेरी लावली नाही
तर उर्वरित पिकेही हातातून जाण्याची भीती आहे. कर्जमाफीची घोषणा झाली; पण नापिकीचा नवा घाव! शासनाने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी तिचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यापूर्वीच नापिकीचे नवे संकट शेतकऱ्यांच्या दारात उभे ठाकले आहे. नवीन पीककर्ज घेऊन महागडी बियाणे, खते, कीटकनाशके आणि फवारण्यांवर हजारो रुपये खर्च केले. मात्र पावसाअभावी उत्पादनच धोक्यात आल्याने कर्जाचा डोंगर आणि उत्पन्नाची शून्य शक्यता, अशा दुहेरी कात्रीत बळीराजा सापडला आहे. फक्त आश्वासन नको, बांधावर येऊन पंचनामे करा! शेतकऱ्यांची मागणी आता केवळ घोषणांची राहिलेली नाही. पातुर्डा मंडळात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून दुष्काळी उपाययोजना लागू कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. प्रशासनाने कागदोपत्री अहवाल तयार करण्याऐवजी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत आणि तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतीपूरक उद्योगांची उभारणी करा केवळ कर्जमाफी करून शेतकऱ्यांच्या समस्या संपणार नाहीत. सोयाबीन-कापूस प्रक्रिया उद्योग, हमीभाव खरेदी केंद्र आणि शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी ठोस व्यवस्था उभी करावी. पातुर्डा परिसरात शासकीय युनिट किंवा लघुउद्योग उभारून स्थानिक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम द्यावे, अशीही मागणी पुढे आली आहे. “शेती वाचली तरच शेतकरी वाचेल आणि शेतकरी वाचला तरच पातुर्डा परिसराचे अर्थचक्र टिकेल. त्यामुळे आता प्रशासनाने विलंब न करता शेतकऱ्यांच्या बांधावर उतरावे,” अशी संतप्त भावना परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आता प्रश्न केवळ पिकांचा नाही; तो हजारो शेतकरी कुटुंबांच्या जगण्याचा आहे. प्रशासन आणखी किती दिवस आभाळाकडे पाहत बसणार?
- ऋषिपंचमी निमित्त संत नगरी शेगाव भक्तिमय; श्रींच्या पालखीची भव्य प्रभातफेरी जागो जागी रांगोळी काढून स्वागत. ऋषिपंचमी निमित्त संत नगरी शेगाव भक्तिमय; श्रींच्या पालखीची भव्य प्रभातफेरी शेगाव : ऋषिपंचमीच्या पावन पर्वावर संत नगरी शेगाव आज श्री संत गजानन महाराजांच्या भक्तिरसात न्हाऊन निघाली. श्री संत गजानन महाराजांनी दि. ८ सप्टेंबर १९१० रोजी संजीवनी समाधी घेतली. त्यांच्या समाधीला ११६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर श्रींच्या पालखीची अश्वांसह व पताकाधारी वारकरी, पालखीचे भोई, सेवेकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत भव्य प्रभातफेरी संत नगरीतून काढण्यात आली. प्रभातफेरीदरम्यान सर्वत्र “गण गण गणात बोते” आणि “श्री संत गजानन महाराज की जय” या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले. टाळ-मृदंगाचा निनाद, भगव्या पताका, अश्व आणि पालखीचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. श्रींच्या नामस्मरणाने संपूर्ण शेगाव नगरीत आध्यात्मिक आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले. श्री संत गजानन महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन करून, श्री महाराज सर्व भक्तांवर सदैव कृपादृष्टी ठेवोत, सर्वांना सुख, शांती, आरोग्य व समृद्धी लाभो, अशी भक्तिभावाने प्रार्थना करण्यात आली.4
- बुलढाणा जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन खामगाव: बुलढाणा जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मुख्य मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल टिकार पाटील यांनी खामगाव तालुक्यातील अटाळी येथे टावरवर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यात ७ आमदार, १ खासदार आणि ३ मंत्री (केंद्रीय मंत्री, पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री) असूनही जिल्ह्याला दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले, ही दुर्दैवाची बाब आहे. सरकारला आमच्या थडग्यावर राज्य करायचे आहे का?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. जिल्ह्यात पावसाअभावी पिके करपली असून शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. स्थानिक तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांनी आंदोलकांची भेट घेऊन सकारात्मक मध्यस्थीचे व प्रशासकीय स्तरावर १००% प्रयत्न करण्याचे लिखित आश्वासन दिले. प्रशासनाच्या विनंतीवरून हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र येत्या १५ तारखेपर्यंत बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला नाही, तर आमदार आकाश फुंडकर यांच्या घरावर थेट घुसून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.3
- शेतकऱ्यांच्या ‘क्रांतिकारी राजा’चे बुलढाण्यात दणक्यात आगमन; शेतकऱ्यांच्या ‘क्रांतिकारी राजा’चे बुलढाण्यात दणक्यात आगमन;1
- दुष्काळ जाहीर करा, नाहीतर २८ पासून आमरण उपोषण!” जळगाव जामोद च्या शेतकऱ्यांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा; दुष्काळ जाहीर करा, नाहीतर २८ पासून आमरण उपोषण!” जळगाव जामोद च्या शेतकऱ्यांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा; जळगाव जामोद(प्रतिनिधी): अल्प व अनियमित पावसामुळे खरीप हंगाम अक्षरशः संकटात सापडला असून, पिकांची वाढ खुंटल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर संपूर्ण जळगाव जामोद तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा, या मागणीसाठी निंभोरा बु. व खेर्डा खुर्द येथील शेतकऱ्यांनी मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन दिले.प्रशासनाने मागण्यांची तातडीने दखल घेऊन कार्यवाही न केल्यास २८ सप्टेंबर २०२६ पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.त्यामुळे प्रशासनासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.यावेळी शेतकऱ्यांनी जळगाव जामोद तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करून प्रस्ताव शासनाकडे पाठवावा.खरीप पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.दुष्काळी सवलती व विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा.पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याची समस्या लक्षात घेऊन चारा व पाण्याची तातडीने व्यवस्था करावी.सन २०२५-२६ चा पीक विमा विनाविलंब शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा अशा मागण्या केल्या आहेत.या निवेदनाची प्रत बुलढाणा जिल्हाधिकारी तसेच जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी यांनाही देण्यात आली आहे. अस्मानी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.निवेदन देतेवेळी अमोल बहादरे, ज्ञानेश्वर खंडारे, पांडुरंग उगले, रमेश देशमुख, आनंद सुरळकर, आनंद बुंदे, नारायण खंडारे, विठ्ठल दिघडे, विलास डवंगे, अनंता कोंडे, प्रज्वल देशमुख, ज्ञानेश्वर अंभोरे, गजानन बुंदे, दशरथ उगले, भीमराव वानखडे, सागर सपकाळ यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.1
- आमच्या गावाची स्वच्छता आमच्या dalambi गावामध्ये खूप प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. ओला कचरा सुखा कचरा आणि घरातील wastage कचरा यामुळे गावात बिमारी च प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.3
- अकोली जहागीर शेतशिवारात बिबट्याची दहशत; शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण कुत्र्याची शिकार; दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शितशिवारात गायीचीही शिकार केल्याची घटना! अकोली जहागीर शेतशिवारात बिबट्याची दहशत; शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण कुत्र्याची शिकार; दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शितशिवारात गायीचीही शिकार केल्याची घटना! अकोट तालुका प्रतिनिधी... अकोट तालुक्यातील अकोली जहागीर परिसरातील शेतशिवारात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी व शेतमजूर वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याने आकोली जहांगीर शेतशिवारात एका कुत्र्याची शिकार केली असून, दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शेतशिविरात एका गायीचीही शिकार सुद्धा केल्याची घटना घडल्याचे येथील नागरीकांन कडुन सांगण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांमध्ये चिंतेचे व भिंतीचे वातावरण आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने भविष्यात मनुष्य किंवा पाळीव प्राण्यांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन विभागाने तातडीने या परिसराची पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून जोर धरत आहे.2
- बुलढाण्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक; लोणारमध्ये वाजवले 'डफडे', ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास सिंदखेडराजा येथे बैलजोड्यांसह चक्काजामचा इशारा!1
- महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या :- संभाजी ब्रिगेड सद्ध्याच्या परिस्थितीत पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला असून, तातडीच्या उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे. सध्या मराठवाड्यासह विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील शेतीची परिस्थिती अत्यंत भयावह असून कोरडा दुष्काळसदृश बनली आहे. तरी मुख्यमंत्री यांनी वरील विभागातील परिस्थितीचा आढावा घेऊन कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी बँका, विविध पतपुरवठा संस्था तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. मात्र, पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावरच पाऊस न झाल्याने या शेतकऱ्यांसमोर कर्ज फेडण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, कोरडा दुष्काळ जाहीर करून सवलती लागू कराव्यात : विशेषतः बुलढाणा जिल्हा जो कोरडा दुष्काळ यादीतून वगळला आहे तो तातडीने कोरडा दुष्काळ म्हणून घोषित करावा.सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सर्व शासकीय सवलती द्या, तातडीची आर्थिक खरीप पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आर्थिक मदत, आगामी रब्बी हंगामाचे नियोजन, बियाणे उपलब्धता, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था यावर तातडीने निर्णय घ्या,शेतीच्या नुकसानीकडे लक्ष देताना कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क व स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करून दिलासा द्या, पावसाअभावी तलाव, विहिरी आणि इतर जलस्रोतांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पुढील काळात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. यासाठी टँकरने पाणीपुरवठा आणि चारा छावण्या यांचे पूर्वनियोजन करणे आवश्यक आहे. मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेऊन, मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन मदतीचे विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी आमची आग्रही मागणी आहे. तरी आपण वरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय द्यावा व शेतकरी सुरक्षित ठेवावा या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचे निवेदन आज नांदूर तहसील मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.हे निवेदन संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष ॲड.मनोज आखरे यांच्या आदेशानुसार व प्रदेश संघटक शिवश्री योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनात व बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमर रमेश पाटील यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी जिल्हा मार्गदर्शक विनोद वनारे,शेतकरी नेते अरविंद बाठे,जिल्हा कार्याध्यक्ष सचिन बाठे,तालुका उपाध्यक्ष सचिन गणगे,वाहतूक आघाडी तालुकाध्यक्ष अमोल भगत,विशाल इंगळे,विनायक वडोदे,रोहन मनस्कार,सुनील अंभोरे,प्रतीक धांडे,संतोष पारस्कार,ज्ञानेश्वर मनस्कार,अंबादास मनस्कार,बाळू डाबेराव,सुनील बाठे,श्रीकृष्ण गायेल,पत्रकार अमोल करुटले व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.2