पांगरी नवघरे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात झाली साजरी पांगरी नवघरे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी. 14/4/26. रोजी पांगरी नवघरे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा मिरवणूक.तसेच भीम गीत कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. सर्व प्रथम सकाळी साडे आठ वाजता. सूर्यभान खडसे ह्यांचे.हसते धम्म ध्वजारोहण करण्यात आले. तसेच कोंडीराम गुडदे ह्यांचे हस्ते.भगवान बुद्ध ह्यांचे प्रतिमेच पूजन तसेच नंदू खडसे ह्यांचे हस्ते महात्मा जोतिबा फुले ह्यांचे प्रतिमेच पूजन करून किसन ताजने ह्यांचे हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेच पूजन करून. रामदास वानखेडे ह्यांनी उपासक व उपासिका समवेत त्रिशरण पंचशील घेतले. त्या नंतर सकाळी दहा वाजता चे दरम्यान मिरवणुकीस सुरवात करण्या पूर्वी. मालेगाव पो. स्टेशन चे ठाणेदार मा. राजेश खेरडे साहेब ह्यांचे हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेच पूजन करून धम्म रथाचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली.ह्या वेळी मुसळे साहेब.. काळे साहेब.शिवाजी काळदाते साहेब.लोंढे मॅडम .महादेव मुठाळ तसेच इतर पोलिस कर्मचारी उपस्थित होते. त्या नंतर नियोजित मार्ग वरून मिरवणूक अतिशय शांततेत. पार पडली. रस्त्यांमध्ये केशव लबडे. तसेच मधुकर खडसे.तसेच नाथा खंडारे. ह्यांच्याकडून सर्वांना थंड पाणी उपलब्ध.करून देण्यात आले होते नंदु भाऊ खंडारे यांच्या कडून खाऊ वाटप.w पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पोलिस अधिकारी ह्यांच्याकडून देण्यात आलेल्या वेळेत. मिरवणूक समारोप करण्यात आला. त्यानंतर संध्याकाळी भीम गीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला सुरवातीला.गावातले नव्याने नोकरी वर लागलेले .सखाराम सुर्वे.अमोल लबडे. तसेच पोलिस मध्ये लागलेल्या अश्विनी बनसोड. करण बनसोड.ह्यांचे मान्यवरांच्या हस्ते.सत्कार करण्यात आला. तसेच प्रमुख पाहुणे. प्रमोद भाऊ नवघरे. अमोल नवघरे सर.विठ्ठल भाऊ नवघरे. तसेच पोलिस पाटील. संदीपभाऊ नवघरे ह्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. त्या नंतर दीपस्तंभ आरकेश्ट्रां वाशीम ह्यांचा भीम गीताचा शानदार कार्यक्रम दशरथ जी खडसे.आणि संच.ह्यांनी सादर केला. सचिनभाऊ नवघरे ह्यांचे वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बौद्ध समाज बांधवांना भोजन दान देण्यात आले होत. सर्व कार्यक्रम पार पडण्याची जबाबदारी. अध्यक्ष.उत्तम खडसे. विठ्ठल खडसे. संतोष वानखेडे. दिलीप खडसे.विठ्ठल.लबडे वर्धमान गुडदे. गणेश खोडके. रमेश बनसोड. गजानन खोडके. जनार्दन खडसे. किसन खडसे. प्रकाश वानखेडे. साहिल गवई.आकाश सुर्वे
पांगरी नवघरे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात झाली साजरी पांगरी नवघरे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी. 14/4/26. रोजी पांगरी नवघरे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा मिरवणूक.तसेच भीम गीत कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. सर्व प्रथम सकाळी साडे आठ वाजता. सूर्यभान खडसे ह्यांचे.हसते धम्म ध्वजारोहण करण्यात आले. तसेच कोंडीराम गुडदे ह्यांचे हस्ते.भगवान बुद्ध ह्यांचे प्रतिमेच पूजन तसेच नंदू खडसे ह्यांचे हस्ते महात्मा जोतिबा फुले ह्यांचे प्रतिमेच पूजन करून किसन ताजने ह्यांचे हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेच पूजन करून. रामदास वानखेडे ह्यांनी उपासक व उपासिका समवेत त्रिशरण पंचशील घेतले. त्या नंतर सकाळी दहा
वाजता चे दरम्यान मिरवणुकीस सुरवात करण्या पूर्वी. मालेगाव पो. स्टेशन चे ठाणेदार मा. राजेश खेरडे साहेब ह्यांचे हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेच पूजन करून धम्म रथाचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली.ह्या वेळी मुसळे साहेब.. काळे साहेब.शिवाजी काळदाते साहेब.लोंढे मॅडम .महादेव मुठाळ तसेच इतर पोलिस कर्मचारी उपस्थित होते. त्या नंतर नियोजित मार्ग वरून मिरवणूक अतिशय शांततेत. पार पडली. रस्त्यांमध्ये केशव लबडे. तसेच मधुकर खडसे.तसेच नाथा खंडारे. ह्यांच्याकडून सर्वांना थंड पाणी उपलब्ध.करून देण्यात आले होते नंदु भाऊ खंडारे यांच्या कडून खाऊ वाटप.w पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पोलिस अधिकारी ह्यांच्याकडून देण्यात आलेल्या वेळेत. मिरवणूक समारोप करण्यात आला. त्यानंतर संध्याकाळी भीम गीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात
आला होता. कार्यक्रमाला सुरवातीला.गावातले नव्याने नोकरी वर लागलेले .सखाराम सुर्वे.अमोल लबडे. तसेच पोलिस मध्ये लागलेल्या अश्विनी बनसोड. करण बनसोड.ह्यांचे मान्यवरांच्या हस्ते.सत्कार करण्यात आला. तसेच प्रमुख पाहुणे. प्रमोद भाऊ नवघरे. अमोल नवघरे सर.विठ्ठल भाऊ नवघरे. तसेच पोलिस पाटील. संदीपभाऊ नवघरे ह्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. त्या नंतर दीपस्तंभ आरकेश्ट्रां वाशीम ह्यांचा भीम गीताचा शानदार कार्यक्रम दशरथ जी खडसे.आणि संच.ह्यांनी सादर केला. सचिनभाऊ नवघरे ह्यांचे वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बौद्ध समाज बांधवांना भोजन दान देण्यात आले होत. सर्व कार्यक्रम पार पडण्याची जबाबदारी. अध्यक्ष.उत्तम खडसे. विठ्ठल खडसे. संतोष वानखेडे. दिलीप खडसे.विठ्ठल.लबडे वर्धमान गुडदे. गणेश खोडके. रमेश बनसोड. गजानन खोडके. जनार्दन खडसे. किसन खडसे. प्रकाश वानखेडे. साहिल गवई.आकाश सुर्वे
- वाशीम :-तालुक्यातील अडोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय प्राथमिक शाळेत दि.१४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहुजन रत्न पुरस्कार प्राप्त राजकुमार पडघान होते.तर प्रमुख उपस्थिती म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य बंडू पडघान,के.डी जाधव होते.प्रसंगी सुरूवातीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.नंतर कार्यक्रमांचे प्रमुख असलेले राजकुमार पडघान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून आंधारात असलेल्या सर्वच समाजाला प्रकाशाकडे नेवून माणूस म्हणून जीवन जगण्याचा मार्ग दिला.एवढेच काय तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानता आणून देशातील प्रत्येकांना समान हक्क,अधिकार,बहाल करून त्यांना शिक्षणांची द्वारे खुली केली.म्हणून आज आपण मोठ्या सन्मानाने जीवन जगत आहोत.त्यामुळे सर्वांनी शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे.असे सांगून अभिवादन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भागवत मोहीरे यांनी केले तर सुत्रसंचलन शिक्षक गणेश जाधव तर आभार प्रदर्शन शिक्षक गजानन इढोळे यांनी केले.यावेळी शिक्षक वृंद संजय नाईकवाडे, विश्वनाथ इढोळे, गोरखनाथ ठोंबरे, दिपाली कापसे, सोनाली दिवटे,मंगला आसोले, उषा कव्हर, यांनी विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर दिलेल्या निबंधा विषयी मार्गदर्शन करून अभिवादन केले.2
- दारव्हा शहराजवळील दिग्रस रोडवरील एका शेतातील गोठ्याला अचानक आग लागल्याची घटना आज १५ एप्रिलला सकाळी ११ वाजता घडली. मकसूत खान यांच्या शेतातील गोठ्याला लागलेल्या या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुनील चिरडे हे स्वतः घटनास्थळी उपस्थित होते अग्निशामक दलाने वेळीच दाखल होऊन आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून या घटनेत किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आहे.1
- Post by Amravati News Update1
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरी करण्यात आली.घाटंजी येथील जयस्तंभ चौकात महिलांनी नृत्य विस्कारातुन बाबासाहेबांना आगळी वेगळी आदरांजली वाहीली.1
- संत नगरी शेगाव तापले! ४१°C च्या उकाड्याने नागरिक हैराण शेगाव (प्रतिनिधी): संत नगरी शेगावमध्ये उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून आज तापमानाने तब्बल ४० ते ४१ अंश सेल्सियस गाठल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. प्रखर उन्हामुळे शहरातील रस्ते दुपारच्या सुमारास ओस पडलेले दिसत असून, नागरिकांनी आवश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळले आहे. दुपारच्या वेळेत सूर्याची कडक किरणे अंगावर झोंबत असल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच कामगार वर्ग विशेष त्रस्त झाला आहे. बाजार मार्केट,चौक-चौकात, तसेच शेगांव -खामगांव रोड नेहमीची वर्दळ कमी झाली असून,हॉटेल,कापडं मार्केट,चौपाटी स्टॊल,व्यावसायिक यांना उकाड्याचा फटका बसताना दिसत आहे. दरम्यान, डॉक्टरांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे आणि हलका आहार घेणे यासारख्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संत नगरीत उन्हाचा कहर सुरूच; पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता!1
- आरवीशेहर1
- मका विक्रीसाठी आणला, पण बाजाराबाहेरच थांबला शेतकऱ्यांचा संताप उसळला1
- Post by Amravati News Update1