logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मंठा तहसीलदारांवर गंभीर आरोप; ‘जलद पुनरागमन’ मागे नेमकं काय? बदलीची मागणी जोरात! मंठा तालुक्यातील प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक बाब समोर आली असून, तहसीलदार सौ. सुमन उद्धव मोरे यांच्या तात्काळ बदलीसाठी प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ईमेलद्वारे मागणी करण्यात आली आहे. विविध गंभीर आरोपांमुळे मंठा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. निवेदनानुसार, २०२० ते २०२२ या कालावधीत मंठा येथे कार्यरत असलेल्या मोरे यांची बदली यवतमाळ जिल्ह्यात करण्यात आली होती. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच त्या पुन्हा जालना जिल्ह्यात परत येऊन मंठा तहसीलदार म्हणूनच रुजू झाल्याने या संपूर्ण प्रक्रियेवर संशयाची छाया पसरली आहे. या ‘जलद पुनरागमनामागे’ नेमके कोणते सूत्र हलले, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे. याहून गंभीर बाब म्हणजे, त्यांच्या सेवाकाळात वैजापूर, जाफ्राबाद आणि बदनापूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत कारवाई झाल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे तहसीलदार पदाचा वापर जनसेवेऐवजी आर्थिक फायद्यासाठी केल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे. पूर्णा नदी पात्रातील वाळू घाटांबाबतही मोठे गौप्यस्फोट करण्यात आले असून, वाळू उपसा व वाहतुकीतून कोट्यवधींचे व्यवहार होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या साखळीत प्रशासनातील काही घटकांचे संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या प्रमाणावर स्थावर मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर येत असून, त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तहसीलदार हे तालुका दंडाधिकारी म्हणून अत्यंत जबाबदारीचे पद असताना, अशा आरोपांच्या भोवऱ्यातील अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रशासनाच्या विश्वासार्हतेला तडा देणारी असल्याची टीका निवेदनात करण्यात आली आहे. मुख्य मागण्या काय? तहसीलदारांची तात्काळ बदली पुन्हा त्या पदावर नियुक्ती न देणे संपूर्ण कार्यकाळाची चौकशी आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे निवेदनाची अधिकृत पावती मिळाली नसली, तरी जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांना ई-मेलद्वारे तक्रार पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मागणीची दखल न घेतल्यास छत्रपती संभाजीनगर खंडपीठात न्यायालयीन लढा उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

16 hrs ago
user_Sandip Gaikwad
Sandip Gaikwad
Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
16 hrs ago

मंठा तहसीलदारांवर गंभीर आरोप; ‘जलद पुनरागमन’ मागे नेमकं काय? बदलीची मागणी जोरात! मंठा तालुक्यातील प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक बाब समोर आली असून, तहसीलदार सौ. सुमन उद्धव मोरे यांच्या तात्काळ बदलीसाठी प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ईमेलद्वारे मागणी करण्यात आली आहे. विविध गंभीर आरोपांमुळे मंठा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. निवेदनानुसार, २०२० ते २०२२ या कालावधीत मंठा येथे कार्यरत असलेल्या मोरे यांची बदली यवतमाळ जिल्ह्यात करण्यात आली होती. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच त्या पुन्हा जालना जिल्ह्यात परत येऊन मंठा तहसीलदार म्हणूनच रुजू झाल्याने या संपूर्ण प्रक्रियेवर संशयाची छाया पसरली आहे. या ‘जलद पुनरागमनामागे’ नेमके कोणते सूत्र हलले, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे. याहून गंभीर बाब म्हणजे, त्यांच्या सेवाकाळात वैजापूर, जाफ्राबाद आणि बदनापूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत कारवाई झाल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे तहसीलदार पदाचा वापर जनसेवेऐवजी आर्थिक फायद्यासाठी केल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे. पूर्णा नदी पात्रातील वाळू घाटांबाबतही मोठे गौप्यस्फोट करण्यात आले असून, वाळू उपसा व वाहतुकीतून कोट्यवधींचे व्यवहार होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या साखळीत प्रशासनातील काही घटकांचे संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या प्रमाणावर स्थावर मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर येत असून, त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तहसीलदार हे तालुका दंडाधिकारी म्हणून अत्यंत जबाबदारीचे पद असताना, अशा आरोपांच्या भोवऱ्यातील अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रशासनाच्या विश्वासार्हतेला तडा देणारी असल्याची टीका निवेदनात करण्यात आली आहे. मुख्य मागण्या काय? तहसीलदारांची तात्काळ बदली पुन्हा त्या पदावर नियुक्ती न देणे संपूर्ण कार्यकाळाची चौकशी आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे निवेदनाची अधिकृत पावती मिळाली नसली, तरी जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांना ई-मेलद्वारे तक्रार पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मागणीची दखल न घेतल्यास छत्रपती संभाजीनगर खंडपीठात न्यायालयीन लढा उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शेतकऱ्यांच्या घामाची लूट आता थांबली पाहिजे! मंठा तालुक्यातील नाफेड खरेदी केंद्रांमध्ये सुरू असलेला भ्रष्ट कारभार हा केवळ अन्याय नाही, तर शेतकऱ्यांच्या कष्टांचा अपमान आहे. कृषीप्रधान देश म्हणवणाऱ्या भारतात आजही शेतकरी आपल्या हक्कासाठी झगडतो आहे, ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे. शासनाने तात्काळ या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. अन्यथा संभाजी ब्रिगेड तहसील कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन उभारेल, याची नोंद घ्यावी. शेतकऱ्यांच्या घामाला न्याय मिळालाच पाहिजे. त्यांच्या कष्टांवर कुनालाही संभाजी ब्रिगेड डाका घालू देणार नाही! शेतकऱ्यांची अवलाद आमची शेतकरी बापावर अन्याय होऊ देणार नाही. ✊✊ जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
    1
    शेतकऱ्यांच्या घामाची लूट आता थांबली पाहिजे!
मंठा तालुक्यातील नाफेड खरेदी केंद्रांमध्ये सुरू असलेला भ्रष्ट कारभार हा केवळ अन्याय नाही, तर शेतकऱ्यांच्या कष्टांचा अपमान आहे. कृषीप्रधान देश म्हणवणाऱ्या भारतात आजही शेतकरी आपल्या हक्कासाठी झगडतो आहे, ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे.
शासनाने तात्काळ या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. अन्यथा संभाजी ब्रिगेड तहसील कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन उभारेल, याची नोंद घ्यावी.
शेतकऱ्यांच्या घामाला न्याय मिळालाच पाहिजे. त्यांच्या कष्टांवर कुनालाही संभाजी ब्रिगेड डाका घालू देणार नाही!
शेतकऱ्यांची अवलाद आमची शेतकरी बापावर अन्याय होऊ देणार नाही.      ✊✊
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
    user_Suresh D Dawane Patil
    Suresh D Dawane Patil
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • मंठा तालुक्यातील प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक बाब समोर आली असून, तहसीलदार सौ. सुमन उद्धव मोरे यांच्या तात्काळ बदलीसाठी प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ईमेलद्वारे मागणी करण्यात आली आहे. विविध गंभीर आरोपांमुळे मंठा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. निवेदनानुसार, २०२० ते २०२२ या कालावधीत मंठा येथे कार्यरत असलेल्या मोरे यांची बदली यवतमाळ जिल्ह्यात करण्यात आली होती. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच त्या पुन्हा जालना जिल्ह्यात परत येऊन मंठा तहसीलदार म्हणूनच रुजू झाल्याने या संपूर्ण प्रक्रियेवर संशयाची छाया पसरली आहे. या ‘जलद पुनरागमनामागे’ नेमके कोणते सूत्र हलले, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे. याहून गंभीर बाब म्हणजे, त्यांच्या सेवाकाळात वैजापूर, जाफ्राबाद आणि बदनापूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत कारवाई झाल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे तहसीलदार पदाचा वापर जनसेवेऐवजी आर्थिक फायद्यासाठी केल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे. पूर्णा नदी पात्रातील वाळू घाटांबाबतही मोठे गौप्यस्फोट करण्यात आले असून, वाळू उपसा व वाहतुकीतून कोट्यवधींचे व्यवहार होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या साखळीत प्रशासनातील काही घटकांचे संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या प्रमाणावर स्थावर मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर येत असून, त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तहसीलदार हे तालुका दंडाधिकारी म्हणून अत्यंत जबाबदारीचे पद असताना, अशा आरोपांच्या भोवऱ्यातील अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रशासनाच्या विश्वासार्हतेला तडा देणारी असल्याची टीका निवेदनात करण्यात आली आहे. मुख्य मागण्या काय? तहसीलदारांची तात्काळ बदली पुन्हा त्या पदावर नियुक्ती न देणे संपूर्ण कार्यकाळाची चौकशी आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे निवेदनाची अधिकृत पावती मिळाली नसली, तरी जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांना ई-मेलद्वारे तक्रार पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मागणीची दखल न घेतल्यास छत्रपती संभाजीनगर खंडपीठात न्यायालयीन लढा उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
    1
    मंठा तालुक्यातील प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक बाब समोर आली असून, तहसीलदार सौ. सुमन उद्धव मोरे यांच्या तात्काळ बदलीसाठी प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ईमेलद्वारे मागणी करण्यात आली आहे. विविध गंभीर आरोपांमुळे मंठा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
निवेदनानुसार, २०२० ते २०२२ या कालावधीत मंठा येथे कार्यरत असलेल्या मोरे यांची बदली यवतमाळ जिल्ह्यात करण्यात आली होती. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच त्या पुन्हा जालना जिल्ह्यात परत येऊन मंठा तहसीलदार म्हणूनच रुजू झाल्याने या संपूर्ण प्रक्रियेवर संशयाची छाया पसरली आहे. या ‘जलद पुनरागमनामागे’ नेमके कोणते सूत्र हलले, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे, त्यांच्या सेवाकाळात वैजापूर, जाफ्राबाद आणि बदनापूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत कारवाई झाल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे तहसीलदार पदाचा वापर जनसेवेऐवजी आर्थिक फायद्यासाठी केल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे.
पूर्णा नदी पात्रातील वाळू घाटांबाबतही मोठे गौप्यस्फोट करण्यात आले असून, वाळू उपसा व वाहतुकीतून कोट्यवधींचे व्यवहार होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या साखळीत प्रशासनातील काही घटकांचे संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या प्रमाणावर स्थावर मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर येत असून, त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तहसीलदार हे तालुका दंडाधिकारी म्हणून अत्यंत जबाबदारीचे पद असताना, अशा आरोपांच्या भोवऱ्यातील अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रशासनाच्या विश्वासार्हतेला तडा देणारी असल्याची टीका निवेदनात करण्यात आली आहे.
मुख्य मागण्या काय?
तहसीलदारांची तात्काळ बदली
पुन्हा त्या पदावर नियुक्ती न देणे
संपूर्ण कार्यकाळाची चौकशी
आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी
दोषी आढळल्यास कठोर कारवाई
महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे निवेदनाची अधिकृत पावती मिळाली नसली, तरी जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांना ई-मेलद्वारे तक्रार पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मागणीची दखल न घेतल्यास छत्रपती संभाजीनगर खंडपीठात न्यायालयीन लढा उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • जालन्यात डीपीला लागली भयानक आग ! आगीचे लोळच लोळ बाहेर -परिसरात घबराट जालना शहरातील चोर बाजार परिसरात २५ एप्रिल शनिवारी संध्याकाळी विद्युत डीपीला आग लागली.
    1
    जालन्यात डीपीला लागली भयानक आग ! आगीचे लोळच लोळ बाहेर -परिसरात घबराट 
जालना शहरातील चोर बाजार परिसरात २५ एप्रिल शनिवारी संध्याकाळी विद्युत डीपीला आग लागली.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • जालन्यात बँक घोटाळ्यांचे सत्र सुरूच! आता बदनापूर कॅनरा बँकेत 7 कोटी 31 लाखाचा घोटाळा ऊघड... लाॕकरमध्ये बनावट सोने आणि स्ट्राँग रूममधून पाकिटांची चोरी बँक मॅनेजरसह तिघांवर गुन्हा दाखल, दोघांना बेड्या
    1
    जालन्यात बँक घोटाळ्यांचे सत्र सुरूच!
आता बदनापूर कॅनरा बँकेत 7 कोटी 31 लाखाचा घोटाळा ऊघड...
लाॕकरमध्ये बनावट सोने आणि स्ट्राँग रूममधून पाकिटांची चोरी
बँक मॅनेजरसह तिघांवर गुन्हा दाखल, दोघांना बेड्या
    user_जालना आंदोलन
    जालना आंदोलन
    मुख्य संपादक - जालना आंदोलन जालना, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • जालना येथे फाएज मेडिकल जवळ आता गणना कॅम्पचा आयोजन 28 तारखेला डॉक्टर मुनीर कादरी यांच्या अध्यक्षते खाली
    1
    जालना येथे फाएज मेडिकल जवळ आता गणना कॅम्पचा आयोजन 28 तारखेला डॉक्टर मुनीर कादरी यांच्या अध्यक्षते खाली
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • TCS नासिक जैसा केस मुंबई में, मल्टिनैशल कंपनी का अशरफ सिद्दीकी गिरफ्तार, हिंदू लड़कियों को टारगेट करने का आरोप मुंबई पुलिस ने एक प्राइवेट कंपनी के कर्मचारी अशरफ को यौन उत्पीड़न और पीछा करने के आरोपों में गिरफ़्तार किया है। उस पर आरोप है कि उसने अपनी एक महिला सहकर्मी को अश्लील मैसेज भेजे थे। मुंबई पुलिस के एक सीनियर अधिकारी के मुताबिक, इस मामले में पीड़ित महिला एक कॉर्पोरेट कंपनी के लिए थर्ड-पार्टी टेली-कॉलर के तौर पर काम करती है। महाराष्ट्र के नासिक में कथित धर्मांतरण और यौन शोषण, फिर अमरावती में सेक्स स्कैंडल के खुलासे के बाद मुंबई से नया मामला सामने आया है। आरोप है कि एक अशरफ नाम का युवक कथित तौर पर कंपनी में साथ काम करने वाली हिंदू लड़कियों को टारगेट करता था। आरोपों के बाद मुंबई पुलिस ने युवक को गिरफ्तार कर लिया है। एक लड़की ने आरोप लगाया कि आरोपी उसके साथ अश्लील बात करता था। वह धर्म से जुड़ी हुई बातें भी करता था। मुंबई पुलिस के अधिकारियों ने बताया कि आरोपी को गिरफ्तार कर लिया गया है। आरोपी और पीड़िता जिस कंपनी में काम करते थे, वो कंपनी बंद हो गई है। आरोपी कंपनी में किसी बड़े पोस्ट पर नहीं था, बल्कि वह एक सहकर्मी था।
    1
    TCS नासिक जैसा केस मुंबई में, मल्टिनैशल कंपनी का अशरफ सिद्दीकी गिरफ्तार, हिंदू लड़कियों को टारगेट करने का आरोप
मुंबई पुलिस ने एक प्राइवेट कंपनी के कर्मचारी अशरफ को यौन उत्पीड़न और पीछा करने के आरोपों में गिरफ़्तार किया है। उस पर आरोप है कि उसने अपनी एक महिला सहकर्मी को अश्लील मैसेज भेजे थे। मुंबई पुलिस के एक सीनियर अधिकारी के मुताबिक, इस मामले में पीड़ित महिला एक कॉर्पोरेट कंपनी के लिए थर्ड-पार्टी टेली-कॉलर के तौर पर काम करती है।
महाराष्ट्र के नासिक में कथित धर्मांतरण और यौन शोषण, फिर अमरावती में सेक्स स्कैंडल के खुलासे के बाद मुंबई से नया मामला सामने आया है। आरोप है कि एक अशरफ नाम का युवक कथित तौर पर कंपनी में साथ काम करने वाली हिंदू लड़कियों को टारगेट करता था। आरोपों के बाद मुंबई पुलिस ने युवक को गिरफ्तार कर लिया है। एक लड़की ने आरोप लगाया कि आरोपी उसके साथ अश्लील बात करता था। वह धर्म से जुड़ी हुई बातें भी करता था।
मुंबई पुलिस के अधिकारियों ने बताया कि आरोपी को गिरफ्तार कर लिया गया है। आरोपी और पीड़िता जिस कंपनी में काम करते थे, वो कंपनी बंद हो गई है। आरोपी कंपनी में किसी बड़े पोस्ट पर नहीं था, बल्कि वह एक सहकर्मी था।
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    2 hrs ago
  • परवानगीच्या नावाखाली चांगतपुरी वाळू घाटावर अनाधिकृत वाळू उपसा; एजन्सी मालकाची गुंडगिरी आणि दहशत प्रकाश सोळंके, जिल्हाध्यक्ष परतूर तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातील चांगतपुरी वाळू घाटावर सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर वाळू उत्खननाविरोधात मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी मुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी, जालना यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार दाखल करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. महसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर ही तक्रार करण्यात आल्याचे समजते. निवेदनानुसार, चांगतपुरी वाळू घाटाचा ठेका मे. साई वेब एक्सप्रेस प्रा. लि. या एजन्सीस देण्यात आला असून, शासनाने घालून दिलेल्या ४८ अटी व शर्तींचा मोठ्या प्रमाणावर भंग होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. घाटावर जेसीबी व पोकलेन यंत्रांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात अनाधिकृत उत्खनन सुरू असून, २५ ते ३० हायवा गाड्यांद्वारे २४ तास वाळूची वाहतूक सुरू असल्याचे निवेदनात नमूद आहे. या प्रकाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, विविध माध्यमांतही याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले आहे. दरम्यान, संबंधित एजन्सीच्या मालकांकडून स्थानिक स्तरावर गुंडगिरी व दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. “मोठ्या टक्केवारीचे पार्टनर आणि प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असल्यामुळे महसूल यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे,” असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. महसूल कर्मचारी प्रत्यक्ष परिस्थिती पाहूनही वरिष्ठांना अहवाल सादर करत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा अहवाल मागविल्यानंतर तहसीलदार, परतूर यांनी मंडळ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करून अटी व शर्तींचा भंग झाल्यास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, संबंधित मंडळ अधिकारी तेजश्री माळी यांनी अद्याप कोणताही ठोस अहवाल सादर केलेला नसल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात स्थानिक पातळीवर अशीही चर्चा आहे की, संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणातून आर्थिक लाभ होत असल्यामुळे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच, एजन्सीचे प्रतिनिधी शाहाजी बनसारव सुंगर व इतर भागीदार संगनमताने राष्ट्रीय संपत्ती असलेल्या वाळूची लूट करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित एजन्सीवर कठोर कारवाई करून वाळू घाटाचे टेंडर तात्काळ रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या निवेदनासोबत उत्खननाचे छायाचित्रे व प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या प्रतीही सादर करण्यात आल्या आहेत. चांगतपुरी वाळू घाटावरील बेकायदेशीर उत्खनन तात्काळ बंद करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच एजन्सीच्या गुंडगिरीला आळा घालावा, अशी ठाम मागणी प्रकाश सोळंके यांनी केली आहे.
    1
    परवानगीच्या नावाखाली चांगतपुरी वाळू घाटावर अनाधिकृत वाळू उपसा; एजन्सी मालकाची गुंडगिरी आणि दहशत
प्रकाश सोळंके, जिल्हाध्यक्ष
परतूर तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातील चांगतपुरी वाळू घाटावर सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर वाळू उत्खननाविरोधात मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी मुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी, जालना यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार दाखल करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. महसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर ही तक्रार करण्यात आल्याचे समजते. निवेदनानुसार, चांगतपुरी वाळू घाटाचा ठेका मे. साई वेब एक्सप्रेस प्रा. लि. या एजन्सीस देण्यात आला असून, शासनाने घालून दिलेल्या ४८ अटी व शर्तींचा मोठ्या प्रमाणावर भंग होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. घाटावर जेसीबी व पोकलेन यंत्रांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात अनाधिकृत उत्खनन सुरू असून, २५ ते ३० हायवा गाड्यांद्वारे २४ तास वाळूची वाहतूक सुरू असल्याचे निवेदनात नमूद आहे. या प्रकाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, विविध माध्यमांतही याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले आहे. दरम्यान, संबंधित एजन्सीच्या मालकांकडून स्थानिक स्तरावर गुंडगिरी व दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. “मोठ्या टक्केवारीचे पार्टनर आणि प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असल्यामुळे महसूल यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे,” असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. महसूल कर्मचारी प्रत्यक्ष परिस्थिती पाहूनही वरिष्ठांना अहवाल सादर करत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा अहवाल मागविल्यानंतर तहसीलदार, परतूर यांनी मंडळ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करून अटी व शर्तींचा भंग झाल्यास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, संबंधित मंडळ अधिकारी तेजश्री माळी यांनी अद्याप कोणताही ठोस अहवाल सादर केलेला नसल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात स्थानिक पातळीवर अशीही चर्चा आहे की, संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणातून आर्थिक लाभ होत असल्यामुळे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच, एजन्सीचे प्रतिनिधी शाहाजी बनसारव सुंगर व इतर भागीदार संगनमताने राष्ट्रीय संपत्ती असलेल्या वाळूची लूट करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित एजन्सीवर कठोर कारवाई करून वाळू घाटाचे टेंडर तात्काळ रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या निवेदनासोबत उत्खननाचे छायाचित्रे व प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या प्रतीही सादर करण्यात आल्या आहेत. चांगतपुरी वाळू घाटावरील बेकायदेशीर उत्खनन तात्काळ बंद करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच एजन्सीच्या गुंडगिरीला आळा घालावा, अशी ठाम मागणी प्रकाश सोळंके यांनी केली आहे.
    user_Suresh D Dawane Patil
    Suresh D Dawane Patil
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.