मंठा न्यायालयात कुटे ग्रुपचे चेअरमन-व्हाईस चेअरमन हजर; ठेवीदारांना दिलासा मिळण्याची शक्यता मंठा (प्रतिनिधी) – चेक बाऊन्स प्रकरणात (कलम १३८) दाखल असलेल्या केस क्र. 55C/१७७ ते १८१/२०२५ संदर्भात आज महत्त्वाची घडामोड घडली. फिर्यादी अलका बन्सीधर सानप, रामप्रसाद नारायण सानप, मोरेश्वर बोराडे व ए. डी. बोराडे यांनी दाखल केलेल्या प्रकरणात माननीय अँड. कल्याण झोल वकील यांच्या प्रयत्नातून ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., बीडचे चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे आणि व्हाईस चेअरमन यशवंत व्ही. कुलकर्णी यांना प्रोडक्शन वॉरंटद्वारे मंठा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान सुरेश कुटे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ठेवीदारांना दिलासा देणारे विधान केले. “ठेवीदारांचे पैसे देणे ही मोठी गोष्ट नाही. सध्या अंदाजे 1300 ते 1400 कोटी रुपयांचे देणे आहे. कुटे ग्रुपच्या मालमत्तेची किंमत सुमारे 3 हजार कोटी रुपये असून, त्यातून आतापर्यंत सुमारे 20 कोटी रुपयांचे धनादेश देण्यात आले आहेत,” असे त्यांनी सांगितले. तसेच, “पुढील तीन महिन्यांत प्रशासकीय व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन ठेवीदारांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल,” असा विश्वासही कुटे यांनी व्यक्त केला. दरम्यान, या प्रकरणाकडे ठेवीदारांचे लक्ष लागले असून, न्यायालयीन प्रक्रियेतील पुढील टप्पे महत्त्वाचे ठरणार आहेत.

- परभणी महापालिका जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विश्वनाथ गोबाडे यांची निवड1
- वडवणी प्रतिनिधी. दिनांक ५/४/२०२६ रविवार रोजी वडवणी शहरात भाजपा च्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान संपन्न1
- --- (प्रतिनिधी) :- आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील सुपुत्र व नवी मुंबई पनवेल येथून दैनिक युवक आधारच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे संपादक संतोष शिवदास आमले यांना World Cultural and Educational Organisation तर्फे ‘Honorary Doctorate Award’ या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा सन्मान मिळाल्याने परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर संस्था भारत सरकार मान्यताप्राप्त असून, संस्थेच्या मूल्यांकन मंडळाने संचालक व अध्यक्ष यांच्या अधिकाराने हा सन्मान जाहीर केला आहे. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे निष्ठावान, धडाडीचे व समाजाभिमुख कार्य लक्षात घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. आमले यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत सामान्य जनतेच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम सातत्याने केले आहे. त्यांच्या लेखणीने समाजप्रबोधन घडवून आणत जनजागृतीची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ‘दैनिक युवक आधार’च्या माध्यमातून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, विविध वर्तमानपत्रांमध्ये उपसंपादक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम पाहिले आहे. सध्या ते नवी मुंबई, पनवेल येथे वास्तव्यास असून ‘दैनिक युवक आधार’चे सर्व कामकाज ते समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांच्या कार्यातून सामाजिक बांधिलकी, प्रामाणिकपणा आणि जनहिताचा ध्यास स्पष्टपणे दिसून येतो. पत्रकारितेला केवळ व्यवसाय न मानता समाजसेवेचे प्रभावी साधन म्हणून त्यांनी जपले आहे. या सन्मानामुळे अंभोरा गावासह आष्टी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संतोष आमले यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा मिळत असून, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते, याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे.1
- एकाच अखंड हरिनाम सप्ताहातील दोन कीर्तनकारांची वेगवेगळ्या स्टाईलने एन्ट्री तुम्हाला कोणती आवडली हे नक्की कमेंट करून सांगा.1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- Post by Santosh Bahekar PRESS1
- एकाचवेळी ९ जनावर अंत्यसंस्कार भयानक दृश्य मृतदेह कोणता कुणाचा??? नाशिकची घटना मन हेलावून टाकणारी आहे.. दिंडोरी शहरात स्नेहसंमेलनासाठी आलेल्या दरगोडे कुटुंबातील 9 सदस्य असलेली कार कडे नसलेल्या विहिरीत कोसळली.. सर्वच्या सर्व सदस्यांचा या अपघातात बळी गेला. त्या विहिरीला मजबूत कडे नसल्याने ती विहिर चालकाच्या लक्षातच आलेली नव्हती.. वळण घेऊन मुख्य रस्त्याला लागण्याच्या वेळी ऐन वळणावर असलेल्या या विहिरीने 9 जणांचा अकस्मात बळी घेतला. अंत्यविधी वेळी कोणता मृतदेह कुणाचा? हे देखील गावकऱ्यांना कळत नव्हते.मानवी इतिहासात ह्या घटना मनाला हादरवून जाणाऱ्या आहेत.1
- --- अनाधिकृत पुतळे उभारून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी.. बीड जिल्ह्यात गेल्या २७ महिन्यात १२८ अनाधिकृत पुतळे उभारण्यात आले असुन नवीन वर्षाच्या ३ महिन्यात ३९ ठिकाणी अनाधिकृत पुतळे उभारण्यात आले असुन १०९ ठिकाणी गुन्हे दाखल आहेत तर ५०० पेक्षा जास्त लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे..राज्य सरकारची परवानगी घेऊन वादग्रस्त नसलेल्या तसेच वाहतुकीस अडथळा नसलेल्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊन पुतळे उभारणं आवश्यक असताना राजकीय हेतूने प्रेरित काहीजण स्वतःच्या स्वार्थासाठी सामाजिक सलोखा बिघडवत आहेत आणि मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कठोर कारवाई करत नसल्याने हे प्रमाण वाढत आहे.. अनाधिकृत पुतळ्याचे संरक्षण कोण करणार?? विटंबना होऊनही जातीय दंगली होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर जबाबदार कोण?? त्यामुळे अनाधिकृत पुतळे उभारणी प्रकरणात शासनाने कठोर भूमिका घ्यावी. --- (सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर)1
- सिल्लोड तालुक्यातील भवन येथे छोट्या भावाने वहिनीचा विनयभंग करत असताना महिलेचा पती आरोपीचा भाऊ याला मारहाण करीत भावाने गंभीर जखमी करून त्याच्या मृत्यू कारणीभूत ठरला म्हणून दोन आरोपी विरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस यांनी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे1