Shuru
Apke Nagar Ki App…
वडवणी प्रतिनिधी. दिनांक ५/४/२०२६ रविवार रोजी वडवणी शहरात भाजपा च्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान संपन्न
शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
वडवणी प्रतिनिधी. दिनांक ५/४/२०२६ रविवार रोजी वडवणी शहरात भाजपा च्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान संपन्न
More news from महाराष्ट्र and nearby areas
- --- अनाधिकृत पुतळे उभारून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी.. बीड जिल्ह्यात गेल्या २७ महिन्यात १२८ अनाधिकृत पुतळे उभारण्यात आले असुन नवीन वर्षाच्या ३ महिन्यात ३९ ठिकाणी अनाधिकृत पुतळे उभारण्यात आले असुन १०९ ठिकाणी गुन्हे दाखल आहेत तर ५०० पेक्षा जास्त लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे..राज्य सरकारची परवानगी घेऊन वादग्रस्त नसलेल्या तसेच वाहतुकीस अडथळा नसलेल्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊन पुतळे उभारणं आवश्यक असताना राजकीय हेतूने प्रेरित काहीजण स्वतःच्या स्वार्थासाठी सामाजिक सलोखा बिघडवत आहेत आणि मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कठोर कारवाई करत नसल्याने हे प्रमाण वाढत आहे.. अनाधिकृत पुतळ्याचे संरक्षण कोण करणार?? विटंबना होऊनही जातीय दंगली होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर जबाबदार कोण?? त्यामुळे अनाधिकृत पुतळे उभारणी प्रकरणात शासनाने कठोर भूमिका घ्यावी. --- (सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर)1
- सुट्टीचा आनंद ठरला मृत्यूचा वार; हर्सूल तलावात चार तरुणांचा बुडून मृत्यू.. छत्रपती संभाजीनगर : शहराजवळील हर्सूल तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली. सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी तलावावर गेलेल्या या तरुणांवर काळाने अचानक घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुरुवातीला तिघे तरुण तलावात बुडाल्याची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करत तिघांचे मृतदेह बाहेर काढले. दरम्यान, तलावाच्या दुसऱ्या बाजूला आणखी एक तरुण बेपत्ता असल्याचे समोर आले. त्यानंतर शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आणि काही वेळाने चौथ्या तरुणाचाही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. या दुर्घटनेत अफान खान इस्माईल खान (वय अंदाजे १७) आणि शेख आदिल शेख मोहसीन (वय अंदाजे १५) यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून उर्वरित दोन मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. सर्व मृतदेह पुढील तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.1
- लातूर शहरात वाहतुकीचे शिस्तबद्ध नियमन करणे, ध्वनीप्रदूषणावर आळा घालणे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी लातूर पोलीस दलाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. विशेषतः बुलेट मोटार सायकलींना अनधिकृतरित्या बसविण्यात येणारे मोडिफाईड (फटाका आवाज करणारे) सायलेंसर वापरणाऱ्या वाहनधारकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल दराडे यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत दि. ०४/०४/२०२६ रोजी लातूर शहरात मोठा आवाज करणारे फटाका सायलेंसर बसविलेल्या बुलेट वाहनांवर कडक कारवाई करण्यात आली असून विविध पोलीस ठाण्यांत खालीलप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १) बुलेट मोटार सायकल क्र. MH-24 CC 0229 चे मालक वैजनाथ चंद्रसेन घोडके (वय २२ वर्षे, रा. एकुर्गा, ता. जि. लातूर) यांनी वाहनामध्ये अनधिकृत बदल करून कर्णकर्कश आवाजाचा मोडिफाईड सायलेंसर बसविला होता. सदर वाहन चालक किशोर सुरेश लाळगे (वय २९ वर्षे, रा. हरंगुळ बु., ता. जि. लातूर) यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन एमआयडीसी, लातूर येथे भारतीय न्याय संहिता २०२३ व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २) बुलेट वाहन क्र. MH-24 BF 0833 चे चालक व मालक सुनील गुरुनाथ बिराजदार (वय ३८ वर्षे, रा. ताजपूर, ता. निलंगा, जि. लातूर) यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन गांधी चौक, लातूर येथे संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ३) बुलेट वाहन क्र. MH-24 AM 1777 चे चालक आलेश व्यंकट सुरवसे (वय २१ वर्षे, रा. चिकुर्डा, ता. जि. लातूर) यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन शिवाजीनगर, लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४) बुलेट वाहन क्र. MH-24 BD 5703 चे चालक प्रणव प्रताप गरड (वय २१ वर्षे, रा. मासुर्डी, ता. औसा, जि. लातूर) यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन शिवाजीनगर, लातूर येथे कारवाई करण्यात आली आहे. ५) बुलेट वाहन क्र. MH-24 AQ 4042 चे चालक प्रेम भास्कर चव्हाण (रा. प्रकाश नगर, लातूर) यांच्याविरुद्धही संबंधित कायद्यान्वये पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६)बुलेट मोटार सायकल क्र. MH-14 BG 3121 चे चालक तेजस भास्कर केंद्रे (वय ३३ वर्षे, रा. डोंगरपिंपळा, ता. अंबाजोगाई, जि. बीड) याने सदर वाहनाला अनधिकृतरित्या बदल केलेला (मोडिफाईड) सायलेंसर बसविण्यात आला होता. ध्वनी मापन यंत्राद्वारे तपासणी केली असता १०१.७ डेसिबल इतका आवाज नोंदविण्यात आला, जो निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ व मोटार वाहन कायद्यांतर्गत पोलीस ठाणे गांधी चौक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७) दिपक दिलीप नवले (वय ३३ वर्षे, रा. चिंचोली (ब), ता. जि. लातूर) याने बुलेट मोटार सायकल क्र. MH-24 BF 6983 ही धोकादायक पद्धतीने चालविताना आढळून आला. सदर वाहनालाही अनधिकृतरित्या मोडिफाईड सायलेंसर बसविण्यात आलेला असून संबंधित कायद्यांनुसार पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८)बालाजी विशवनाथ कांबळे वय 45 वर्ष,राहणार गांधी नगर, उदगीर याने त्याची बुलेट क्र MH 24 BQ 3740 ही इतरांचे जिविताला घोका निर्माण होईल अशा भरधाव वेगात हयगय व निष्काळजीपणाने वाहन चालवुन अनाधिकृतरित्या बदल केलेले मॉडीफाय सायलेन्सर बसून दोन्ही प्रदूषण केले म्हणून पोलीस ठाणे उदगीर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरील सर्व प्रकरणांमध्ये संबंधित वाहनधारकांनी सार्वजनिक रस्त्यावर भरधाव वेगात, निष्काळजीपणे व धोकादायक पद्धतीने वाहन चालवून इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचे आढळून आले. तसेच वाहनांमध्ये अनधिकृतरित्या मोडिफाईड सायलेंसर बसवून कर्णकर्कश आवाज निर्माण करण्यात येत होता. ध्वनी मापन यंत्राद्वारे (डेसीबल मीटर) तपासणी केली असता आवाजाची पातळी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले असल्याने वरनमूद आरोपी विरुद्ध कलम 281 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 184,198 मोटार वाहन कायदा, केंद्रीय मोटार बाहन अधिनियम 1989 चे कलम 120 प्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली आहे. या प्रकारामुळे विशेषतः वयोवृद्ध नागरिक, महिला, बालके, तसेच हृदयविकार व इतर आजारांनी ग्रस्त रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कडक कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेत वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे, पोलीस ठाणे गांधी चौक चे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गित्ते, पोउपनि माधव केंद्रे तसेच वाहतूक शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी सक्रिय सहभाग घेतला. लातूर पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या दुचाकी वाहनांमध्ये कंपनीने दिलेले मूळ सायलेंसरच वापरावेत. कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बदल करू नयेत किंवा मोडिफाईड सायलेंसर बसवू नयेत. ही मोहीम पुढील काळात अधिक तीव्र करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई कायम सुरू राहणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व शांततामय वातावरण राखण्यासाठी लातूर पोलीस दल सदैव कटिबद्ध आहे.1
- निर्भीड पत्रकार तथा दैनिक बुलंद शक्ती चे संपादक मा. रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ रद्द करावा, त्यांना पोलीस संरक्षण द्यावे आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भगवान खवणे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात दरेकर हे निर्भीड, पुराव्यानिशी पत्रकारिता करणारे व जनहितासाठी सातत्याने लढणारे पत्रकार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. निवेदनानुसार, राज्यातील शेतकरी संकटाच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानानंतर दरेकर यांनी संबंधितांच्या मालमत्तेबाबत सखोल व पुराव्यानिशी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी पोलीस ठाणे, छत्रपती संभाजीनगर येथे प्रकरण क्रमांक 167/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 352, 353(2), 356(2), 67 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा फिर्यादी पांडुरंग विठ्ठलराव डक मांडकीकर यांच्या तक्रारीवरून नोंदविण्यात आला असला, तरी तो महसूलमंत्री यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या प्रभावाखाली दाखल करण्यात आल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे. रामेश्वर दरेकर यांनी यापूर्वीही विविध प्रकरणांमध्ये पोलिसांच्या कथित भ्रष्टाचाराचे व्हिडिओ व पुरावे समोर आणणे, लाचलुचपत प्रकरणांमध्ये पाठपुरावा करणे तसेच अवैध धंदे व प्रशासनातील त्रुटी जनतेसमोर मांडण्याचे काम केले आहे. त्यामुळेच सूडबुद्धीने खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. या प्रकरणाला लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आघात असल्याचे नमूद करत, गुन्ह्याची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून तो तात्काळ रद्द करावा, संबंधितांची चौकशी करून कारवाई करावी तसेच दरेकर यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.1
- Post by Vijay Meher1
- सोयगाव तालुक्यातील शिवारामध्ये आमदार अब्दुल सत्तार यांची नुकसानग्रस्त शेती ची पाहणी, पाऊस वारा गारपिट मुळे पिकाचे नुकसान झाले आहेत आमदार अब्दुल सत्तार यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याची सूचना दिली.1
- छत्रपती संभाजीनगर - पिकअप विहिरीत कोसळले; पहा भयानक व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर-जळगाव सीमेलगत असलेल्या कंकराळा शिवारात एक पिकअप चारचाकी वाहन विहिरीत कोसळल्याची घटना रविवारी समोर आली आहे. ही घटना सोयगाव तालुक्यात घडली असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पिकअप वाहन शिवारातून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते थेट शेतातील विहिरीत जाऊन पडले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सुदैवाने, वाहनातील सर्वजण सुरक्षित बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते1
- अल्पवयीन मुलीला बलात्कार करून गरोदर करणाऱ्या आरोपीला अजिंठा पोलीस यांनी अटक केल्याची माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली असून मोहोळ येथील एका तरुणीला आरोपीने बळजबरीने बलात्कार करून तिला गरोदर करून पाहून गेला होता सदरील आरोपीला आज रोजी अजिंठा पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.1
- मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊस बिल अद्याप दिले नाही कारखान्याला ऊस नेल्यापासून 14 दिवसाच्या आज शेतकऱ्यांना ऊस बिल देणे बंधनकारक असतानाही दिले नाही. बँकांचे हप्ते गेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याला मार्च एंड चा आर्थिक फटका सहन करावा लागला. साखर कारखान्याने त्वरित ऊस बिल न दिल्यास साखर कारखान्यासमूर्तीवर आंदोलन करण्याचा इशारा डिजिटल शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल पाटील यांनी दिला आहे.1