logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

ए.टी.डी. द्वितीय वर्षात कु.भूमी मनोज पाटील राज्यातून प्रथम ए.टी.डी. द्वितीय वर्षात कु.भूमी मनोज पाटील राज्यातून प्रथम ‘माँ से बेटी सवाई’ उपक्रमांतर्गत लिनेस क्लब पाचोरा तर्फे सत्कार बालपणापासूनच चित्रकलेची आवड जोपासत, वडिलांकडून मिळालेल्या कलेच्या वारसाला मेहनत, जिद्द आणि चिकाटीची जोड देत कु. भूमी मनोज पाटील हिने ए.टी.डी. द्वितीय वर्षाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून, तिच्या यशाचा गौरव म्हणून लिनेस क्लब ऑफ पाचोरातर्फे ‘माँ से बेटी सवाई’ या उपक्रमांतर्गत तिचा सत्कार करण्यात आला. भूमीचे माध्यमिक शिक्षण श्री. गो से हायस्कूल, पाचोरा येथे पूर्ण झाले. शालेय जीवनापासूनच तिच्या अंगी असलेली चित्रकलेची आवड आणि कलागुण तिने जोपासले. विशेष म्हणजे, लिनेस क्लब ऑफ पाचोराच्या अध्यक्षा प्रा. सौ. जयश्रीताई वाघ यांच्या फिनिक्स अकॅडमीची भूमी विद्यार्थिनी होती. विद्यार्थीदशेपासूनच तिला प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. भूमीला चित्रकलेचा वारसा तिचे वडील पेंटर मनोज पाटील यांच्याकडून मिळाला. तिचे वडील साईन बोर्ड पेंटर असल्याने बालपणापासूनच ती त्यांची पेंटिंगची कला जवळून पाहत होती. सुरुवातीला कार्टून व स्केच काढण्यापासून तिच्या चित्रकलेच्या प्रवासाला सुरुवात झाली. मुलीतील कलागुण ओळखून तिचे वडील तिच्या चित्रकलेकडे विशेष लक्ष देऊ लागले आणि वेळोवेळी तिला मार्गदर्शन करू लागले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसतानाही तिच्या वडिलांनी तिच्या कलेला कधीही अडथळा येऊ दिला नाही. आवश्यक चित्रकला साहित्य उपलब्ध करून देत त्यांनी तिला सातत्याने प्रोत्साहन दिले. प्राथमिक शालेय जीवनापासूनच भूमीने तालुकास्तरीय तसेच विविध चित्रकला स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. अनेक स्पर्धांमध्ये तिने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवत आपल्या कलेची छाप उमटवली. घरातील कामे सांभाळूनही भूमीने स्केचिंग, रंगकाम आणि चित्रकलेचा नियमित सराव सुरू ठेवला. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने फाईन आर्ट्स, मुंबई येथे शिक्षण घेण्याची इच्छा वडिलांकडे व्यक्त केली. वडिलांनी तिच्या इच्छेला पाठिंबा देत सीईटी परीक्षेच्या तयारीसाठी प्रोत्साहन दिले. भूमीने कठोर सराव करून सीईटी परीक्षा दिली आणि तिची चित्रकलेच्या अभ्यासक्रमासाठी निवड झाली. त्यानंतर तिने सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे एक वर्षे शिक्षण घेतले. मात्र दुसऱ्या वर्षी लेडीज हॉस्टेलची योग्य व्यवस्था उपलब्ध न झाल्यामुळे तिला हे शिक्षण दुसऱ्या वर्षी अपूर्ण सोडावे लागले. त्यामुळे ती काही काळ निराश झाली. मात्र तिच्या वडिलांनी तिला खंबीरपणे आधार देत “पेंटिंग कधीही बंद करू नकोस, तुझ्यात कला आहे” असा आत्मविश्वास दिला. वडिलांच्या प्रेरणेतून भूमीने स्व. अनिलदादा देशमुख चित्रकला महाविद्यालयात ए.टी.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. संदीप पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले. भूमीने नियमित शिक्षण घेत अथक सराव सुरू ठेवला आणि अखेर तिच्या मेहनतीला यश मिळाले. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात ए.टी.डी. द्वितीय वर्षाच्या परीक्षेत भूमीने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. तिच्या या यशामुळे कुटुंबीय, शिक्षक, महाविद्यालय आणि पाचोरा परिसराचा गौरव झाला आहे. भूमीचे पुढील ध्येय जी.डी. आर्टचे शिक्षण पूर्ण करून चित्रकलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याचे आहे. प्रतिकूल परिस्थितीतही स्वप्नांचा पाठलाग करून यश संपादन करणाऱ्या भूमीची यशोगाथा अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाचा गौरव करण्यासाठी लिनेस क्लब ऑफ पाचोरातर्फे ‘माँ से बेटी सवाई’ या उपक्रमांतर्गत भूमीचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार अध्यक्षा प्रा. सौ. जयश्रीताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली, लिनेस क्लबच्या ज्येष्ठ संचालिका ॲड. प्रा. सौ. वैशालीताई बोरकर,ज्येष्ठ संचालिका सौ रूपालीताई पाटील,सचिव सौ. सरलाताई पाटील, कोषाध्यक्ष सौ. प्रियाजी लाहोटी, PRO व सहसचिव कु. चेतना रणदीप हिरे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी कु.नेहा न्यानेश्वर पाटील आणि कु.साक्षी दादाराव शेळके उपस्थित होते भूमीच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, तिच्या पुढील कलाप्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

4 hrs ago
user_Pramod dada bari
Pramod dada bari
Pachora, Jalgaon•
4 hrs ago
fecfa976-4f60-4398-b998-df4f11261c84

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • छत्रपती संभाजीनगरमध्ये दशमेश नगरातील आईस्क्रीम शॉपला आग छत्रपती संभाजीनगरमध्ये दशमेश नगरातील आईस्क्रीम शॉपला आग छत्रपती संभाजीनगर येथील दशमेश नगर परिसरातील आईस्क्रीम शॉपला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीमुळे दुकानातील साहित्याचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
    1
    छत्रपती संभाजीनगरमध्ये दशमेश नगरातील आईस्क्रीम शॉपला आग
छत्रपती संभाजीनगरमध्ये दशमेश नगरातील आईस्क्रीम शॉपला आग
छत्रपती संभाजीनगर येथील दशमेश नगर परिसरातील आईस्क्रीम शॉपला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीमुळे दुकानातील साहित्याचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • नवी दिल्ली : राष्ट्र उभारणी, शिक्षण व मानवतेच्या कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल जळगाव येथील प्रा. सुरेश रामचंद्र वाघ यांना ‘पद्मश्री गौरव सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २३ ऑगस्ट २०२६ रोजी द्वारका, नवी दिल्ली येथील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. प्रा. वाघ यांनी साने गुरुजी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत असताना विविध राज्य व राष्ट्रस्तरीय पुरस्कार प्राप्त करून ते महाविद्यालयाला अर्पण केले. सेवानिवृत्तीनंतर आधुनिक पद्धतीने केळी उत्पादन करत शेती क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले. तसेच सामाजिक व राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग घेत महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये संघटनात्मक कार्याचा विस्तार केला. शिक्षण क्षेत्रात अनेक डॉक्टर, अभियंते घडविण्यासह विद्यार्थ्यांना आणि कार्यकर्त्यांना त्यांनी प्रेरणा दिली आहे. यावेळी ‘द झेनिथ इंटरनॅशनल ह्युमन राइट्स कमिशन’कडून त्यांना आजीवन सभासदत्वाची मान्यताही प्रदान करण्यात आली. हा सन्मान आपल्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, सहकाऱ्यांना आणि राष्ट्राला अर्पण करत असल्याचे प्रा. वाघ यांनी सांगितले.
    1
    नवी दिल्ली : राष्ट्र उभारणी, शिक्षण व मानवतेच्या कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल जळगाव येथील प्रा. सुरेश रामचंद्र वाघ यांना ‘पद्मश्री गौरव सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २३ ऑगस्ट २०२६ रोजी द्वारका, नवी दिल्ली येथील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
प्रा. वाघ यांनी साने गुरुजी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत असताना विविध राज्य व राष्ट्रस्तरीय पुरस्कार प्राप्त करून ते महाविद्यालयाला अर्पण केले. सेवानिवृत्तीनंतर आधुनिक पद्धतीने केळी उत्पादन करत शेती क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले. तसेच सामाजिक व राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग घेत महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये संघटनात्मक कार्याचा विस्तार केला.
शिक्षण क्षेत्रात अनेक डॉक्टर, अभियंते घडविण्यासह विद्यार्थ्यांना आणि कार्यकर्त्यांना त्यांनी प्रेरणा दिली आहे. यावेळी ‘द झेनिथ इंटरनॅशनल ह्युमन राइट्स कमिशन’कडून त्यांना आजीवन सभासदत्वाची मान्यताही प्रदान करण्यात आली. हा सन्मान आपल्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, सहकाऱ्यांना आणि राष्ट्राला अर्पण करत असल्याचे प्रा. वाघ यांनी सांगितले.
    user_Kalpesh wani
    Kalpesh wani
    मुक्ताईनगर, जळगाव, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • कन्नड पिशोर खांडित भीषण अपघात झाला असून दोन्ही गाडीचे चालक किनर गंभीर जखमी आहे. कन्नड :- पिशोर खांडित चंदन नाल्याजवळ दोन वाहनाचा समोरासमोर अपघात झाला असून चालक आणि किनर गंभीर जखमी झाले आहे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. काही काळ वाहतूक कोंडी झाली होती पण स्थानिक पोलीस प्रशासन/ वन विभाग तातडीने लक्ष घालून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.
    1
    कन्नड पिशोर खांडित भीषण अपघात झाला असून दोन्ही गाडीचे चालक किनर गंभीर जखमी आहे.
कन्नड :- पिशोर खांडित चंदन नाल्याजवळ दोन वाहनाचा समोरासमोर अपघात झाला असून चालक आणि किनर गंभीर जखमी झाले आहे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. काही काळ वाहतूक कोंडी झाली होती पण स्थानिक पोलीस प्रशासन/ वन विभाग तातडीने लक्ष घालून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.
    user_Sandip Aaling
    Sandip Aaling
    Agricultural service कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • ईद-ए-मिलादनिमित्त जाधववाडीत भव्य रक्तदान शिबीर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
    1
    ईद-ए-मिलादनिमित्त जाधववाडीत भव्य रक्तदान शिबीर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथे लाखो रुपयांच्या विकासकामांचा आज भव्य उद्घाटन सोहळा! चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथे लाखो रुपयांच्या विकासकामांचा आज भव्य उद्घाटन सोहळा!
    1
    चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथे लाखो रुपयांच्या विकासकामांचा आज भव्य उद्घाटन सोहळा!

चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथे लाखो रुपयांच्या विकासकामांचा आज भव्य उद्घाटन सोहळा!
    user_बबन धसाळ
    बबन धसाळ
    Farmer भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Dhule Crime News | धुळ्यात 'त्या' एका फोटोवरून उलगडले गावठी कट्ट्याचे बिंग; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, अल्पवयीन मुलासह चौघे ताब्यात... - जुन्या धुळे परिसरात एका तरुणाच्या हातात गावठी कट्टा असलेल्या फोटोवरून धुळे LCB ने मोठी कारवाई केली आहे. पो. नि. ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या माहितीवरून डी-मार्ट जवळ सापळा रचून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले - गावठी कट्टा विकणारा सागर जोंधळे, कुंतेश बागुल, बुलेटच्या सीटखाली कट्टा लपवणारा कल्पेश यादव आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. या कारवाईत 40 हजारांचा एक गावठी कट्टा, 4 हजारांच्या 4 जिवंत काडतुसे आणि 1 लाखांची बुलेट असा एकूण 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई SP विशाल आनंद, Additional SP अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB पथकाने केली. #DhuleNews #DhuleCrime #LCBAction #GavthiKatta #DhulePolice Dhule Crime News | धुळ्यात 'त्या' एका फोटोवरून उलगडले गावठी कट्ट्याचे बिंग; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, अल्पवयीन मुलासह चौघे ताब्यात... - जुन्या धुळे परिसरात एका तरुणाच्या हातात गावठी कट्टा असलेल्या फोटोवरून धुळे LCB ने मोठी कारवाई केली आहे. पो. नि. ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या माहितीवरून डी-मार्ट जवळ सापळा रचून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले - गावठी कट्टा विकणारा सागर जोंधळे, कुंतेश बागुल, बुलेटच्या सीटखाली कट्टा लपवणारा कल्पेश यादव आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. या कारवाईत 40 हजारांचा एक गावठी कट्टा, 4 हजारांच्या 4 जिवंत काडतुसे आणि 1 लाखांची बुलेट असा एकूण 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई SP विशाल आनंद, Additional SP अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB पथकाने केली. #DhuleNews #DhuleCrime #LCBAction #GavthiKatta #DhulePolice
    1
    Dhule Crime News | धुळ्यात 'त्या' एका फोटोवरून उलगडले गावठी कट्ट्याचे बिंग; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, अल्पवयीन मुलासह चौघे ताब्यात...
-
जुन्या धुळे परिसरात एका तरुणाच्या हातात गावठी कट्टा असलेल्या फोटोवरून धुळे LCB ने मोठी कारवाई केली आहे. पो. नि. ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या माहितीवरून डी-मार्ट जवळ सापळा रचून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेले - गावठी कट्टा विकणारा सागर जोंधळे, कुंतेश बागुल, बुलेटच्या सीटखाली कट्टा लपवणारा कल्पेश यादव आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.

या कारवाईत 40 हजारांचा एक गावठी कट्टा, 4 हजारांच्या 4 जिवंत काडतुसे आणि 1 लाखांची बुलेट असा एकूण 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई SP विशाल आनंद, Additional SP अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB पथकाने केली.

#DhuleNews #DhuleCrime #LCBAction #GavthiKatta #DhulePolice 

    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • भोकरदन शहरातील अतिक्रमण धारकांनी तीन दिवसात अतिक्रमण काढण्याचे आवाहन
    1
    भोकरदन शहरातील अतिक्रमण धारकांनी तीन दिवसात अतिक्रमण काढण्याचे आवाहन
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    32 min ago
  • धुळे: शेतातील विहिरींवरील मोटार चोरणारी 6 जणांची टोळी जेरबंद; निजामपूर पोलिसांची कारवाई, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त Dhule Crime News | धुळे: शेतातील विहिरींवरील मोटार चोरणारी 6 जणांची टोळी जेरबंद; निजामपूर पोलिसांची कारवाई, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त - धुळे / साक्री - बळसाणे शिवारात शेत विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर चोरी करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला निजामपूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 2,04,350 रुपयांचे 10 मोटर पंप जप्त केले आहेत. अटक आरोपींची नावे: शुभम रतनसिंग गिरासे (22) वसीमखाँ युसुफखाँ पठाण (32) रावसाहेब हिम्मत सोनवणे (24) रतनसिंग हिम्मतसिंग ठाकूर (26) करण अर्जुन ठाकरे (18) नवनाथ छोटू गायकवाड (19) - सर्व रा. बळसाणे, ता. साक्री फिर्यादी चैत्राम न्याहळदे यांच्या शेतात 22 ऑगस्ट रोजी झालेल्या चोरीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात या टोळीने इतरही चोऱ्या केल्याचे उघड झाले आहे. आरोपींना दि. 29/08/2026 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. #DhuleCrime #NizampurPolice #DhuleNews #MotorPumpChori #Sakri
    1
    धुळे: शेतातील विहिरींवरील मोटार चोरणारी 6 जणांची टोळी जेरबंद; निजामपूर पोलिसांची कारवाई, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त
Dhule Crime News | धुळे: शेतातील विहिरींवरील मोटार चोरणारी 6 जणांची टोळी जेरबंद; निजामपूर पोलिसांची कारवाई, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त
-
धुळे / साक्री - बळसाणे शिवारात शेत विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर चोरी करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला निजामपूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 2,04,350 रुपयांचे 10 मोटर पंप जप्त केले आहेत.
अटक आरोपींची नावे:
शुभम रतनसिंग गिरासे (22)
वसीमखाँ युसुफखाँ पठाण (32)
रावसाहेब हिम्मत सोनवणे (24)
रतनसिंग हिम्मतसिंग ठाकूर (26)
करण अर्जुन ठाकरे (18)
नवनाथ छोटू गायकवाड (19) - सर्व रा. बळसाणे, ता. साक्री
फिर्यादी चैत्राम न्याहळदे यांच्या शेतात 22 ऑगस्ट रोजी झालेल्या चोरीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात या टोळीने इतरही चोऱ्या केल्याचे उघड झाले आहे. आरोपींना दि. 29/08/2026 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
#DhuleCrime #NizampurPolice #DhuleNews #MotorPumpChori #Sakri
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.