logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महाडीबीटी 2.0 प्रणालीवर नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी ‘महाआयडी’ तयार करावा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी आवाहन अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आदी योजनांचा लाभ मिळण्यासाठी महाडीबीटी 2.0 या नवीन प्रणालीवर शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी व पालकांनी अर्ज भरताना आवश्यक बाबींची पूर्तता करून महाडीबीटी 2.0 प्रणालीवर नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी ‘महाआयडी’ तयार करावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केले आहे. महाडीबीटी 2.0 वर नोंदणी करून अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम नवीन ‘महाआयडी’ तयार करणे आवश्यक आहे. मागील पोर्टलवरील जुना आयडी किंवा पासवर्ड यापुढे आवश्यक राहणार नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या आधार क्रमांकाचा वापर करून नवीन महाआयडी तयार करावा. आधार पोर्टलवरील विद्यार्थ्यांची सर्व माहिती अचूक व अद्ययावत असणे आवश्यक आहे. नवीन अर्ज तसेच नूतनीकरण अशा दोन्ही प्रकारच्या अर्जांसाठी नवीन महाआयडी व आधार लॉगिन करणे आवश्यक आहे. नूतनीकरणाच्या विद्यार्थ्यांनी लॉगिन केल्यानंतर ‘माझा अर्ज नूतनीकरण करायचा’ हा पर्याय निवडावा. अर्ज भरताना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे स्पष्ट पीडीएफ स्वरूपात अपलोड करावीत. प्रलंबित अर्जांचा तातडीने निपटारा करण्याचे आवाहन शैक्षणिक वर्ष 2025-26 व त्यापूर्वीच्या वर्षातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क (फ्रीशिप) प्रतिपूर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आदी योजनांचे अर्ज वारंवार सूचना देऊनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांची तपासणी करून त्यामध्ये काही त्रुटी असल्यास संबंधित विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्या तात्काळ दूर कराव्यात. परिपूर्ण अर्ज 30 ऑगस्ट 2026 पर्यंत जिल्हा कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्जांची पूर्तता करून घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहणार आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांबाबत संबंधित विद्यार्थ्यांनी दोन दिवसांत परिपूर्ण अर्ज महाविद्यालयास सादर करावा. अन्यथा शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थी व त्यांच्या पालकांची राहील. सर्व महाविद्यालयांनी प्रलंबित अर्जांची विहित कालावधीत अथवा त्यापूर्वी प्राधान्याने कार्यवाही करून प्रलंबित अर्ज निकाली काढावेत, असेही सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी आवाहन केले आहे.

6 hrs ago
user_दिपक हैबतराव चोरमले
दिपक हैबतराव चोरमले
Local Politician Aundha (Nagnath), Hingoli•
6 hrs ago

महाडीबीटी 2.0 प्रणालीवर नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी ‘महाआयडी’ तयार करावा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी आवाहन अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आदी योजनांचा लाभ मिळण्यासाठी महाडीबीटी 2.0 या नवीन प्रणालीवर शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी व पालकांनी अर्ज भरताना आवश्यक बाबींची पूर्तता करून महाडीबीटी 2.0 प्रणालीवर नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी ‘महाआयडी’ तयार करावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केले आहे. महाडीबीटी 2.0 वर नोंदणी करून अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम नवीन ‘महाआयडी’ तयार करणे आवश्यक आहे. मागील पोर्टलवरील जुना आयडी किंवा पासवर्ड यापुढे आवश्यक राहणार नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या आधार क्रमांकाचा वापर करून नवीन महाआयडी तयार करावा. आधार पोर्टलवरील विद्यार्थ्यांची सर्व माहिती अचूक व अद्ययावत असणे आवश्यक आहे. नवीन अर्ज तसेच नूतनीकरण अशा दोन्ही प्रकारच्या अर्जांसाठी नवीन महाआयडी व आधार लॉगिन करणे आवश्यक आहे. नूतनीकरणाच्या विद्यार्थ्यांनी लॉगिन केल्यानंतर ‘माझा अर्ज नूतनीकरण करायचा’ हा पर्याय निवडावा. अर्ज भरताना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे स्पष्ट पीडीएफ स्वरूपात अपलोड करावीत. प्रलंबित अर्जांचा तातडीने निपटारा करण्याचे आवाहन शैक्षणिक वर्ष 2025-26 व त्यापूर्वीच्या वर्षातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क (फ्रीशिप) प्रतिपूर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आदी योजनांचे अर्ज वारंवार सूचना देऊनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांची तपासणी करून त्यामध्ये काही त्रुटी असल्यास संबंधित विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्या तात्काळ दूर कराव्यात. परिपूर्ण अर्ज 30 ऑगस्ट 2026 पर्यंत जिल्हा कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्जांची पूर्तता करून घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहणार आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांबाबत संबंधित विद्यार्थ्यांनी दोन दिवसांत परिपूर्ण अर्ज महाविद्यालयास सादर करावा. अन्यथा शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थी व त्यांच्या पालकांची राहील. सर्व महाविद्यालयांनी प्रलंबित अर्जांची विहित कालावधीत अथवा त्यापूर्वी प्राधान्याने कार्यवाही करून प्रलंबित अर्ज निकाली काढावेत, असेही सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी आवाहन केले आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • शिवसेनेच्या संवाद मेळाव्यास मोठ्या संख्येने या; शिवसेना परभणी तालुका प्रमुख विनोद लोहगावकर शिवसेनेच्या संवाद मेळाव्यास मोठ्या संख्येने या; शिवसेना परभणी तालुका प्रमुख विनोद लोहगावकर
    1
    शिवसेनेच्या संवाद मेळाव्यास मोठ्या संख्येने या; शिवसेना परभणी तालुका प्रमुख विनोद लोहगावकर
शिवसेनेच्या संवाद मेळाव्यास मोठ्या संख्येने या; शिवसेना परभणी तालुका प्रमुख विनोद लोहगावकर
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    2 hrs ago
  • *आईसोबत भांडण.. अन् थेट टॉवरवर! तासभराच्या थरारानंतर तरुणाची सुखरूप सुटका* *हरसूल-सावंगी परिसरात खळबळ; पोलिस व अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे मोठी दुर्घटना टळली* *छत्रपती संभाजीनगर :* आईसोबत झालेल्या वादानंतर रागाच्या भरात एका तरुणाने थेट उंच टॉवर गाठल्याने हरसूल-सावंगी परिसरात सोमवारी मोठी खळबळ उडाली. तरुण टॉवरवर चढल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. दरम्यान, पोलिस आणि अग्निशमन दलाने तब्बल एक तास शर्थीचे प्रयत्न करून या तरुणाला सुखरूप खाली आणण्यात यश मिळविले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. करण शिवाजी माळी असे टॉवरवर चढलेल्या तरुणाचे नाव असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, करण माळी याचे आईसोबत घरगुती कारणावरून भांडण झाले होते. या वादानंतर तो संतप्त झाला आणि रागाच्या भरात थेट परिसरातील टॉवरवर चढला. तो नशेच्या अवस्थेत असल्याचीही माहिती समोर आली आहे. टॉवरवर तरुण चढल्याचे लक्षात येताच नागरिकांनी पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळातच दोन्ही विभागांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. उंच टॉवरवर असलेल्या तरुणाला सुरक्षितपणे खाली आणणे हे पथकांसमोर मोठे आव्हान होते. कोणतीही घाई न करता जवानांनी आणि पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधत त्याची समजूत काढण्यास सुरुवात केली. सुमारे एक तास सुरू असलेल्या या प्रयत्नांनंतर अखेर करण माळी याला टॉवरवरून खाली उतरविण्यात यश आले. त्यानंतर उपस्थित नागरिकांसह पोलिस आणि अग्निशमन दलाने सुटकेचा निःश्वास सोडला. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी खवड्या डोंगर परिसरात घडलेल्या अशाच प्रकारच्या घटनेनंतर आता पुन्हा हरसूल-सावंगी येथे तरुणाच्या टॉवरवर चढण्याच्या घटनेने शहरात चिंता व्यक्त होत आहे. मात्र, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे यावेळीही संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
    1
    *आईसोबत भांडण.. अन् थेट टॉवरवर! तासभराच्या थरारानंतर तरुणाची सुखरूप सुटका*

*हरसूल-सावंगी परिसरात खळबळ; पोलिस व अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे मोठी दुर्घटना टळली*

*छत्रपती संभाजीनगर :* आईसोबत झालेल्या वादानंतर रागाच्या भरात एका तरुणाने थेट उंच टॉवर गाठल्याने हरसूल-सावंगी परिसरात सोमवारी मोठी खळबळ उडाली. तरुण टॉवरवर चढल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. दरम्यान, पोलिस आणि अग्निशमन दलाने तब्बल एक तास शर्थीचे प्रयत्न करून या तरुणाला सुखरूप खाली आणण्यात यश मिळविले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

करण शिवाजी माळी असे टॉवरवर चढलेल्या तरुणाचे नाव असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, करण माळी याचे आईसोबत घरगुती कारणावरून भांडण झाले होते. या वादानंतर तो संतप्त झाला आणि रागाच्या भरात थेट परिसरातील टॉवरवर चढला. तो नशेच्या अवस्थेत असल्याचीही माहिती समोर आली आहे.

टॉवरवर तरुण चढल्याचे लक्षात येताच नागरिकांनी पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळातच दोन्ही विभागांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. उंच टॉवरवर असलेल्या तरुणाला सुरक्षितपणे खाली आणणे हे पथकांसमोर मोठे आव्हान होते. कोणतीही घाई न करता जवानांनी आणि पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधत त्याची समजूत काढण्यास सुरुवात केली.

सुमारे एक तास सुरू असलेल्या या प्रयत्नांनंतर अखेर करण माळी याला टॉवरवरून खाली उतरविण्यात यश आले. त्यानंतर उपस्थित नागरिकांसह पोलिस आणि अग्निशमन दलाने सुटकेचा निःश्वास सोडला.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी खवड्या डोंगर परिसरात घडलेल्या अशाच प्रकारच्या घटनेनंतर आता पुन्हा हरसूल-सावंगी येथे तरुणाच्या टॉवरवर चढण्याच्या घटनेने शहरात चिंता व्यक्त होत आहे. मात्र, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे यावेळीही संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मुखेडमध्ये ईद-ए-मिलादुन्नबीचा सामाजिक संदेश; राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या शिबिरात ६४ जणांचे रक्तदान
    1
    मुखेडमध्ये ईद-ए-मिलादुन्नबीचा सामाजिक संदेश; राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या शिबिरात ६४ जणांचे रक्तदान
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • 🚨 Nanded Crime | किनवटमध्ये गुटखा निर्मितीचे साहित्य जप्त; ₹१.०३ लाखांचा मुद्देमाल ताब्यात 📍किनवट | २७ ऑगस्ट २०२६ महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या कथित निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात किनवट पोलिसांना यश आले आहे. फुलेनगर, गोकुंदा येथील एका घरावर छापा टाकून पोलिसांनी ₹१,०३,८०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त मुद्देमालात गुटखा निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या ३ लोखंडी मशीन, चुना, तंबाखूजन्य पदार्थ, सुपारी, प्लास्टिक पिशव्या, मिश्रित तंबाखूजन्य पदार्थ आणि ॲल्युमिनियमची पात्रे यांचा समावेश आहे. या प्रकरणी व्यंकट गंगाराम नागनुरवार (रा. फुलेनगर, गोकुंदा, किनवट) याच्याविरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २६ ऑगस्ट रोजी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली. 💰 एकूण जप्त मुद्देमाल : ₹१,०३,८०० या कारवाईबद्दल तुमचं मत कमेंट करा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedCrime #Kinwat #NandedNews #Gutkha #NandedPolice #PoliceAction #NandedUpdates #NandigramTimes
    1
    🚨 Nanded Crime | किनवटमध्ये गुटखा निर्मितीचे साहित्य जप्त; ₹१.०३ लाखांचा मुद्देमाल ताब्यात
📍किनवट | २७ ऑगस्ट २०२६
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या कथित निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात किनवट पोलिसांना यश आले आहे. फुलेनगर, गोकुंदा येथील एका घरावर छापा टाकून पोलिसांनी ₹१,०३,८०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त मुद्देमालात गुटखा निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या ३ लोखंडी मशीन, चुना, तंबाखूजन्य पदार्थ, सुपारी, प्लास्टिक पिशव्या, मिश्रित तंबाखूजन्य पदार्थ आणि ॲल्युमिनियमची पात्रे यांचा समावेश आहे.
या प्रकरणी व्यंकट गंगाराम नागनुरवार (रा. फुलेनगर, गोकुंदा, किनवट) याच्याविरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई २६ ऑगस्ट रोजी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली.
💰 एकूण जप्त मुद्देमाल : ₹१,०३,८००
या कारवाईबद्दल तुमचं मत कमेंट करा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा!
#NandedCrime #Kinwat #NandedNews #Gutkha #NandedPolice #PoliceAction #NandedUpdates #NandigramTimes
    user_Shaikh Jahur Dudhadkar
    Shaikh Jahur Dudhadkar
    Newspaper publisher Nanded, Maharashtra•
    23 hrs ago
  • पत्रकारांनी निर्भीडपणे काम करा; तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन! दिलीप माने यांची ग्वाही; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या गंगाखेड शाखा कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन सत्याच्या बाजूने निर्भीड पत्रकारिता करा, कोणत्याही आमिषाला, दबावाला किंवा भीतीला बळी पडू नका, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप माने यांनी केले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा गंगाखेडच्या कार्यालयाचे उद्घाटन दि. २३ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडले. यावेळी पत्रकारांनी संघटितपणे काम करण्याचे आवाहनही माने यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार गोविंद यादव होते. उद्घाटक म्हणून जिल्हाध्यक्ष दिलीप माने, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार जावेद इनामदार, तुकाराम अय्या आणि प्रा. डॉ. बालाजी शिंदे उपस्थित होते.
    1
    पत्रकारांनी निर्भीडपणे काम करा; तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन!
दिलीप माने यांची ग्वाही; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या गंगाखेड शाखा कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन
सत्याच्या बाजूने निर्भीड पत्रकारिता करा, कोणत्याही आमिषाला, दबावाला किंवा भीतीला बळी पडू नका, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप माने यांनी केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा गंगाखेडच्या कार्यालयाचे उद्घाटन दि. २३ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडले. यावेळी पत्रकारांनी संघटितपणे काम करण्याचे आवाहनही माने यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार गोविंद यादव होते. उद्घाटक म्हणून जिल्हाध्यक्ष दिलीप माने, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार जावेद इनामदार, तुकाराम अय्या आणि प्रा. डॉ. बालाजी शिंदे उपस्थित होते.
    user_मराठवाडा संवाद न्युज
    मराठवाडा संवाद न्युज
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • अजमेरच्या प्रवासाला काळाचा घाला! उमरखेडच्या स्विफ्ट डिझायरला भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, चार जखमी पातूर-अकोला मार्गावरील भीषण दुर्घटना; दोघांची प्रकृती चिंताजनक, नांदेड येथे उपचार सुरू उमरखेड/ढाणकी, दि. २७ ऑगस्ट २०२६ : अजमेरच्या दिशेने निघालेल्या उमरखेड परिसरातील प्रवाशांच्या स्विफ्ट डिझायर कारला पातूर-अकोला मार्गावर भीषण अपघात झाला. २६ ऑगस्ट रोजी रात्री उमरखेडहून अजमेरसाठी दोन कार रवाना झाल्या होत्या. त्यापैकी एका स्विफ्ट डिझायर कारचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, चालकाला झोपेची डुलकी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडरवर आदळली. या भीषण अपघातात ढाणकी येथील अदनान खान रफिक खान यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघाताची तीव्रता एवढी होती की, कारचे इंजिन तुटून वाहनापासून बाहेर पडले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघातात सय्यद बाबू सय्यद हमीद (३०), सय्यद अक्रम सय्यद इब्राहिम (३२), सय्यद तोहिद सय्यद समशेर (२०) तसेच चालक फरान शेख जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. यातील काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला अपघातानंतर एका जखमीने प्रसंगावधान राखत पुढे जात असलेल्या दुसऱ्या कारमधील सहकाऱ्यांना फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर पुढील कारमधील सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तसेच उमरखेडमधील नातेवाईकांनाही घटनेची माहिती देण्यात आली. नगरसेवक पप्पू चिकन यांची तातडीची धाव अपघाताची माहिती मिळताच उमरखेडचे नगरसेवक पप्पू चिकन यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने अकोला गाठले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्याची व्यवस्था करण्यात आली. सध्या सय्यद बाबू, सय्यद अक्रम आणि सय्यद तोहिद यांच्यावर नांदेड येथील ऋतुराज जाधव यांच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. रात्रीचा प्रवास ठरतोय जीवघेणा? या दुर्घटनेने रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासातील सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः चालकाला झोप येत असताना वाहन चालवणे किती धोकादायक ठरू शकते, याचे हे अपघात अत्यंत भीषण उदाहरण आहे. काही क्षणांची झोपेची डुलकी संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. दरम्यान, या अपघाताची अधिकृत कारणे आणि वाहनचालकाची स्थिती याबाबत संबंधित पोलिसांकडून तपासानंतरच स्पष्ट माहिती समोर येणार आहे. मात्र, या दुर्घटनेत एका तरुणाचा गेलेला जीव आणि गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांमुळे उमरखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. — प्रतिनिधी, उमरखेड
    4
    अजमेरच्या प्रवासाला काळाचा घाला! उमरखेडच्या स्विफ्ट डिझायरला भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, चार जखमी

पातूर-अकोला मार्गावरील भीषण दुर्घटना; दोघांची प्रकृती चिंताजनक, नांदेड येथे उपचार सुरू
उमरखेड/ढाणकी, दि. २७ ऑगस्ट २०२६ :
अजमेरच्या दिशेने निघालेल्या उमरखेड परिसरातील प्रवाशांच्या स्विफ्ट डिझायर कारला पातूर-अकोला मार्गावर भीषण अपघात झाला. २६ ऑगस्ट रोजी रात्री उमरखेडहून अजमेरसाठी दोन कार रवाना झाल्या होत्या. त्यापैकी एका स्विफ्ट डिझायर कारचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, चालकाला झोपेची डुलकी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडरवर आदळली.
या भीषण अपघातात ढाणकी येथील अदनान खान रफिक खान यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघाताची तीव्रता एवढी होती की, कारचे इंजिन तुटून वाहनापासून बाहेर पडले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
अपघातात सय्यद बाबू सय्यद हमीद (३०), सय्यद अक्रम सय्यद इब्राहिम (३२), सय्यद तोहिद सय्यद समशेर (२०) तसेच चालक फरान शेख जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. यातील काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.
प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
अपघातानंतर एका जखमीने प्रसंगावधान राखत पुढे जात असलेल्या दुसऱ्या कारमधील सहकाऱ्यांना फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर पुढील कारमधील सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तसेच उमरखेडमधील नातेवाईकांनाही घटनेची माहिती देण्यात आली.
नगरसेवक पप्पू चिकन यांची तातडीची धाव
अपघाताची माहिती मिळताच उमरखेडचे नगरसेवक पप्पू चिकन यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने अकोला गाठले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्याची व्यवस्था करण्यात आली. सध्या सय्यद बाबू, सय्यद अक्रम आणि सय्यद तोहिद यांच्यावर नांदेड येथील ऋतुराज जाधव यांच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
रात्रीचा प्रवास ठरतोय जीवघेणा?
या दुर्घटनेने रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासातील सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः चालकाला झोप येत असताना वाहन चालवणे किती धोकादायक ठरू शकते, याचे हे अपघात अत्यंत भीषण उदाहरण आहे. काही क्षणांची झोपेची डुलकी संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते.
दरम्यान, या अपघाताची अधिकृत कारणे आणि वाहनचालकाची स्थिती याबाबत संबंधित पोलिसांकडून तपासानंतरच स्पष्ट माहिती समोर येणार आहे. मात्र, या दुर्घटनेत एका तरुणाचा गेलेला जीव आणि गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांमुळे उमरखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
— प्रतिनिधी, उमरखेड
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • धनंजय मुंडेंचे रक्षाबंधन; मंत्री पंकजाताई मुंडे, आदिती ताई तटकरे तसेच प्रमिलाताई केंद्रे यांनी बांधली राखी* *धनंजय मुंडेंचे रक्षाबंधन; मंत्री पंकजाताई मुंडे, आदिती ताई तटकरे तसेच प्रमिलाताई केंद्रे यांनी बांधली राखी* मुंबई (प्रतिनिधी) - माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मुंबई येथे आपल्या भगिनी मंत्री पंकजाताई मुंडे, मंत्री आदिती ताई तटकरे तसेच पुणे येथे सौ. प्रमिलाताई पुरुषोत्तम केंद्रे यांच्या कडून राखी बांधून रक्षा बंधन साजरे केले आहे. तीनही बहिणींकडून राखी बांधून तिघींच्या प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावा तसेच कायम जनतेची सेवा घडावी, अशा शुभेच्छा धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणींना दिल्या. पंकजाताई मुंडे, प्रमिलाताई केंद्रे तसेच आपल्या सर्व बहिणी यांच्याबरोबरच आदितीताई तटकरे यांच्या समवेत धनंजय मुंडे हे दरवर्षी न चुकता रक्षा बंधन साजरे करतात, ही परंपरा त्यांनी अनेक वर्षांपासून जपली आहे.
    2
    धनंजय मुंडेंचे रक्षाबंधन; मंत्री पंकजाताई मुंडे, आदिती ताई तटकरे तसेच प्रमिलाताई केंद्रे यांनी बांधली राखी*
*धनंजय मुंडेंचे रक्षाबंधन; मंत्री पंकजाताई मुंडे, आदिती ताई तटकरे तसेच प्रमिलाताई केंद्रे यांनी बांधली राखी*
मुंबई (प्रतिनिधी) - माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मुंबई येथे आपल्या भगिनी मंत्री पंकजाताई मुंडे, मंत्री आदिती ताई तटकरे तसेच पुणे येथे सौ. प्रमिलाताई पुरुषोत्तम केंद्रे यांच्या कडून राखी बांधून रक्षा बंधन साजरे केले आहे. 
तीनही बहिणींकडून राखी बांधून तिघींच्या प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावा तसेच कायम जनतेची सेवा घडावी, अशा शुभेच्छा धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणींना दिल्या. 
पंकजाताई मुंडे, प्रमिलाताई केंद्रे तसेच आपल्या सर्व बहिणी यांच्याबरोबरच आदितीताई तटकरे यांच्या समवेत धनंजय मुंडे हे दरवर्षी न चुकता रक्षा बंधन साजरे करतात, ही परंपरा त्यांनी अनेक वर्षांपासून जपली आहे.
    user_M. p. gitte
    M. p. gitte
    परळी, बीड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संवाद मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहा; कृषी बाजार सभापती पंढरीनाथ घुले
    1
    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संवाद
मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहा; 
कृषी बाजार सभापती पंढरीनाथ घुले
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.