logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

न्याहळोद येथे 'एक झाड मैत्रीचं' उपक्रमांतर्गत उत्साहात वृक्षारोपण. नूतन विद्यालय आणि साने गुरुजी विद्यालय माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम. दोंडाईचा :- न्याहळोद, ता. जि. धुळे "एक वृक्ष लावा, एक जीवन वाचवा" या संदेशाला प्रत्यक्षात आणत नूतन विद्यालय जवळील प्राथमिक शाळा, न्याहळोद येथे आज दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. नूतन विद्यालय तसेच साने गुरुजी विद्यालय माजी विद्यार्थी मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात "झाडे लावा, झाडे जगवा, हिरवेगार भविष्य घडवा" या घोषणांनी झाली. यावेळी शाळेच्या परिसरात वड, पिंपळ, आंबा, लिंब, कडुनिंब यासारख्या देशी आणि पर्यावरणपूरक चाळीस झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी माजी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. झाडे लावण्यासोबतच त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी देखील मित्र परिवाराने घेतली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करणे काळाची गरज आहे, असे मत यावेळी आयोजकांनी व्यक्त केले. यासाठी माजी विद्यार्थी दिनेश शिरसाठ , राहुल सोनवणे , अमोल वाघ , अविनाश माळी , सुनील चौधरी , दीपक वाघ , अनिल माळी , संभाजी कोळी , नाना माळी , पंकज कोळी , रुपेश माळी , प्रकाश कोळी , शरद बोरसे ,विनोद जाधव ,निलेश अमृतकर ,अल्पेश कोळी, राजधार कोळी , शीतल भावसार , मनीषा माळी , सोनाली घरटे , वैशाली शिंदे , ऋणल शिंदे , सोनाली रायते , रोहिणी रोकडे, छाया जगदेव , रुपाली जाधव , मोनाली माळी , निकिता महाले , देवयानी रायते सर्वांचे सहकार्यातून झाडे लावण्याचा कार्यक्रम पार पडला . तसेच कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा.ज्येष्ठ माजी शिक्षक श्री बी .एम.खाटिक सर उपस्थित होते तसेच माननीय शिक्षक श्री महेंद्र विक्रम भामरे यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले तसेच *ग्रामोदय प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

12 hrs ago
user_दोंडाईचा एक्सप्रेस,संजय कोळी
दोंडाईचा एक्सप्रेस,संजय कोळी
Carpenter सिंदखेडा, धुळे, महाराष्ट्र•
12 hrs ago
ea8c89fe-8df0-4b88-834b-d5435ed4cb67

न्याहळोद येथे 'एक झाड मैत्रीचं' उपक्रमांतर्गत उत्साहात वृक्षारोपण. नूतन विद्यालय आणि साने गुरुजी विद्यालय माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम. दोंडाईचा :- न्याहळोद, ता. जि. धुळे "एक वृक्ष लावा, एक जीवन वाचवा" या संदेशाला प्रत्यक्षात आणत नूतन विद्यालय जवळील प्राथमिक शाळा, न्याहळोद येथे आज दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. नूतन विद्यालय तसेच साने गुरुजी विद्यालय माजी विद्यार्थी मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात "झाडे लावा, झाडे जगवा, हिरवेगार भविष्य घडवा" या घोषणांनी झाली. यावेळी शाळेच्या परिसरात वड, पिंपळ, आंबा, लिंब, कडुनिंब यासारख्या देशी आणि पर्यावरणपूरक चाळीस झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी माजी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. झाडे लावण्यासोबतच त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी देखील मित्र परिवाराने घेतली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करणे काळाची गरज आहे, असे मत यावेळी आयोजकांनी व्यक्त केले. यासाठी माजी विद्यार्थी दिनेश शिरसाठ , राहुल सोनवणे , अमोल वाघ , अविनाश माळी , सुनील चौधरी , दीपक वाघ , अनिल माळी , संभाजी कोळी , नाना माळी , पंकज कोळी , रुपेश माळी , प्रकाश कोळी , शरद बोरसे ,विनोद जाधव ,निलेश अमृतकर ,अल्पेश कोळी, राजधार कोळी , शीतल भावसार , मनीषा माळी , सोनाली घरटे , वैशाली शिंदे , ऋणल शिंदे , सोनाली रायते , रोहिणी रोकडे, छाया जगदेव , रुपाली जाधव , मोनाली माळी , निकिता महाले , देवयानी रायते सर्वांचे सहकार्यातून झाडे लावण्याचा कार्यक्रम पार पडला . तसेच कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा.ज्येष्ठ माजी शिक्षक श्री बी .एम.खाटिक सर उपस्थित होते तसेच माननीय शिक्षक श्री महेंद्र विक्रम भामरे यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले तसेच *ग्रामोदय प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Dhule Crime News | धुळ्यात 'त्या' एका फोटोवरून उलगडले गावठी कट्ट्याचे बिंग; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, अल्पवयीन मुलासह चौघे ताब्यात... - जुन्या धुळे परिसरात एका तरुणाच्या हातात गावठी कट्टा असलेल्या फोटोवरून धुळे LCB ने मोठी कारवाई केली आहे. पो. नि. ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या माहितीवरून डी-मार्ट जवळ सापळा रचून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले - गावठी कट्टा विकणारा सागर जोंधळे, कुंतेश बागुल, बुलेटच्या सीटखाली कट्टा लपवणारा कल्पेश यादव आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. या कारवाईत 40 हजारांचा एक गावठी कट्टा, 4 हजारांच्या 4 जिवंत काडतुसे आणि 1 लाखांची बुलेट असा एकूण 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई SP विशाल आनंद, Additional SP अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB पथकाने केली. #DhuleNews #DhuleCrime #LCBAction #GavthiKatta #DhulePolice Dhule Crime News | धुळ्यात 'त्या' एका फोटोवरून उलगडले गावठी कट्ट्याचे बिंग; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, अल्पवयीन मुलासह चौघे ताब्यात... - जुन्या धुळे परिसरात एका तरुणाच्या हातात गावठी कट्टा असलेल्या फोटोवरून धुळे LCB ने मोठी कारवाई केली आहे. पो. नि. ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या माहितीवरून डी-मार्ट जवळ सापळा रचून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले - गावठी कट्टा विकणारा सागर जोंधळे, कुंतेश बागुल, बुलेटच्या सीटखाली कट्टा लपवणारा कल्पेश यादव आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. या कारवाईत 40 हजारांचा एक गावठी कट्टा, 4 हजारांच्या 4 जिवंत काडतुसे आणि 1 लाखांची बुलेट असा एकूण 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई SP विशाल आनंद, Additional SP अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB पथकाने केली. #DhuleNews #DhuleCrime #LCBAction #GavthiKatta #DhulePolice
    1
    Dhule Crime News | धुळ्यात 'त्या' एका फोटोवरून उलगडले गावठी कट्ट्याचे बिंग; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, अल्पवयीन मुलासह चौघे ताब्यात...
-
जुन्या धुळे परिसरात एका तरुणाच्या हातात गावठी कट्टा असलेल्या फोटोवरून धुळे LCB ने मोठी कारवाई केली आहे. पो. नि. ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या माहितीवरून डी-मार्ट जवळ सापळा रचून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेले - गावठी कट्टा विकणारा सागर जोंधळे, कुंतेश बागुल, बुलेटच्या सीटखाली कट्टा लपवणारा कल्पेश यादव आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.

या कारवाईत 40 हजारांचा एक गावठी कट्टा, 4 हजारांच्या 4 जिवंत काडतुसे आणि 1 लाखांची बुलेट असा एकूण 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई SP विशाल आनंद, Additional SP अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB पथकाने केली.

#DhuleNews #DhuleCrime #LCBAction #GavthiKatta #DhulePolice 
Dhule Crime News | धुळ्यात 'त्या' एका फोटोवरून उलगडले गावठी कट्ट्याचे बिंग; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, अल्पवयीन मुलासह चौघे ताब्यात...
-
जुन्या धुळे परिसरात एका तरुणाच्या हातात गावठी कट्टा असलेल्या फोटोवरून धुळे LCB ने मोठी कारवाई केली आहे. पो. नि. ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या माहितीवरून डी-मार्ट जवळ सापळा रचून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेले - गावठी कट्टा विकणारा सागर जोंधळे, कुंतेश बागुल, बुलेटच्या सीटखाली कट्टा लपवणारा कल्पेश यादव आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.
या कारवाईत 40 हजारांचा एक गावठी कट्टा, 4 हजारांच्या 4 जिवंत काडतुसे आणि 1 लाखांची बुलेट असा एकूण 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई SP विशाल आनंद, Additional SP अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB पथकाने केली.
#DhuleNews #DhuleCrime #LCBAction #GavthiKatta #DhulePolice
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • नंदुरबारच्या श्री रामदूत हनुमान मंदिरात गुरुवारी पहाटे धाडसी चोरी... नंदुरबारच्या श्री रामदूत हनुमान मंदिरात गुरुवारी पहाटे धाडसी चोरी... नंदुरबार शहरातील मध्यवर्ती गजबजलेल्या अमृत चौक परिसरात श्री रामदूत हनुमान मंदिर आहे. गुरुवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास एका चोरट्याने मंदिराचे प्रवेशद्वाराचा कडी कोंडा तोडून प्रवेश केला. त्यानंतर हनुमान मूर्तीवरील साडेसातशे ग्रॅम वजन आणि सुमारे दोन लाख रुपये किंमत असलेले चांदीचे दागिने लंपास केले. सीसीटीव्ही कॅमेरात चोरटा कैद झाला असून पोलीस दलाच्या श्वानपथका मार्फत तपासणी करण्यात आली. चोरी करणाऱ्याचा लवकरच तपास लावण्यासाठी पोलीस पथक शहराच्या चारही दिशांना रवाना झाले. मंदिरात चोरी झाल्याचे सकाळी भाविकांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली. मंदिरात नियमित दर्शनाची येणाऱ्या भाविकांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथका मार्फत चोरीचा मागोवा घेण्यात आला. ठसे तज्ञांसह फॉरेन्सिक व्हेन देखील दाखल झाली. श्री रामदूत हनुमान मंदिरात झालेल्या चोरी बद्दल नियमित दर्शणार्थी भाविकाने माहिती दिली.
    1
    नंदुरबारच्या श्री रामदूत हनुमान मंदिरात गुरुवारी पहाटे  धाडसी चोरी...

नंदुरबारच्या श्री रामदूत हनुमान मंदिरात गुरुवारी पहाटे  धाडसी चोरी...
नंदुरबार शहरातील मध्यवर्ती गजबजलेल्या अमृत चौक परिसरात श्री रामदूत हनुमान मंदिर आहे. गुरुवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास एका चोरट्याने मंदिराचे प्रवेशद्वाराचा कडी कोंडा तोडून प्रवेश केला. त्यानंतर हनुमान मूर्तीवरील साडेसातशे ग्रॅम वजन आणि सुमारे दोन लाख रुपये किंमत असलेले चांदीचे दागिने लंपास केले. 
सीसीटीव्ही कॅमेरात चोरटा कैद झाला असून पोलीस दलाच्या श्वानपथका मार्फत तपासणी करण्यात आली.
चोरी करणाऱ्याचा लवकरच तपास लावण्यासाठी पोलीस पथक शहराच्या चारही दिशांना रवाना झाले. 
मंदिरात चोरी झाल्याचे  सकाळी भाविकांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली. मंदिरात नियमित दर्शनाची येणाऱ्या भाविकांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथका मार्फत चोरीचा मागोवा घेण्यात आला. ठसे तज्ञांसह फॉरेन्सिक व्हेन देखील दाखल झाली. श्री रामदूत हनुमान मंदिरात झालेल्या चोरी बद्दल नियमित दर्शणार्थी भाविकाने माहिती दिली.
    user_ईश्वर मराठे (पत्रकार)
    ईश्वर मराठे (पत्रकार)
    Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • नवी दिल्ली : राष्ट्र उभारणी, शिक्षण व मानवतेच्या कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल जळगाव येथील प्रा. सुरेश रामचंद्र वाघ यांना ‘पद्मश्री गौरव सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २३ ऑगस्ट २०२६ रोजी द्वारका, नवी दिल्ली येथील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. प्रा. वाघ यांनी साने गुरुजी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत असताना विविध राज्य व राष्ट्रस्तरीय पुरस्कार प्राप्त करून ते महाविद्यालयाला अर्पण केले. सेवानिवृत्तीनंतर आधुनिक पद्धतीने केळी उत्पादन करत शेती क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले. तसेच सामाजिक व राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग घेत महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये संघटनात्मक कार्याचा विस्तार केला. शिक्षण क्षेत्रात अनेक डॉक्टर, अभियंते घडविण्यासह विद्यार्थ्यांना आणि कार्यकर्त्यांना त्यांनी प्रेरणा दिली आहे. यावेळी ‘द झेनिथ इंटरनॅशनल ह्युमन राइट्स कमिशन’कडून त्यांना आजीवन सभासदत्वाची मान्यताही प्रदान करण्यात आली. हा सन्मान आपल्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, सहकाऱ्यांना आणि राष्ट्राला अर्पण करत असल्याचे प्रा. वाघ यांनी सांगितले.
    1
    नवी दिल्ली : राष्ट्र उभारणी, शिक्षण व मानवतेच्या कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल जळगाव येथील प्रा. सुरेश रामचंद्र वाघ यांना ‘पद्मश्री गौरव सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २३ ऑगस्ट २०२६ रोजी द्वारका, नवी दिल्ली येथील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
प्रा. वाघ यांनी साने गुरुजी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत असताना विविध राज्य व राष्ट्रस्तरीय पुरस्कार प्राप्त करून ते महाविद्यालयाला अर्पण केले. सेवानिवृत्तीनंतर आधुनिक पद्धतीने केळी उत्पादन करत शेती क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले. तसेच सामाजिक व राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग घेत महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये संघटनात्मक कार्याचा विस्तार केला.
शिक्षण क्षेत्रात अनेक डॉक्टर, अभियंते घडविण्यासह विद्यार्थ्यांना आणि कार्यकर्त्यांना त्यांनी प्रेरणा दिली आहे. यावेळी ‘द झेनिथ इंटरनॅशनल ह्युमन राइट्स कमिशन’कडून त्यांना आजीवन सभासदत्वाची मान्यताही प्रदान करण्यात आली. हा सन्मान आपल्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, सहकाऱ्यांना आणि राष्ट्राला अर्पण करत असल्याचे प्रा. वाघ यांनी सांगितले.
    user_Kalpesh wani
    Kalpesh wani
    मुक्ताईनगर, जळगाव, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • कन्नड पिशोर खांडित भीषण अपघात झाला असून दोन्ही गाडीचे चालक किनर गंभीर जखमी आहे. कन्नड :- पिशोर खांडित चंदन नाल्याजवळ दोन वाहनाचा समोरासमोर अपघात झाला असून चालक आणि किनर गंभीर जखमी झाले आहे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. काही काळ वाहतूक कोंडी झाली होती पण स्थानिक पोलीस प्रशासन/ वन विभाग तातडीने लक्ष घालून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.
    1
    कन्नड पिशोर खांडित भीषण अपघात झाला असून दोन्ही गाडीचे चालक किनर गंभीर जखमी आहे.
कन्नड :- पिशोर खांडित चंदन नाल्याजवळ दोन वाहनाचा समोरासमोर अपघात झाला असून चालक आणि किनर गंभीर जखमी झाले आहे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. काही काळ वाहतूक कोंडी झाली होती पण स्थानिक पोलीस प्रशासन/ वन विभाग तातडीने लक्ष घालून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.
    user_Sandip Aaling
    Sandip Aaling
    Agricultural service कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगरमध्ये दशमेश नगरातील आईस्क्रीम शॉपला आग छत्रपती संभाजीनगरमध्ये दशमेश नगरातील आईस्क्रीम शॉपला आग छत्रपती संभाजीनगर येथील दशमेश नगर परिसरातील आईस्क्रीम शॉपला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीमुळे दुकानातील साहित्याचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
    1
    छत्रपती संभाजीनगरमध्ये दशमेश नगरातील आईस्क्रीम शॉपला आग
छत्रपती संभाजीनगरमध्ये दशमेश नगरातील आईस्क्रीम शॉपला आग
छत्रपती संभाजीनगर येथील दशमेश नगर परिसरातील आईस्क्रीम शॉपला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीमुळे दुकानातील साहित्याचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • ईद-ए-मिलादनिमित्त जाधववाडीत भव्य रक्तदान शिबीर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
    1
    ईद-ए-मिलादनिमित्त जाधववाडीत भव्य रक्तदान शिबीर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • धुळे: शेतातील विहिरींवरील मोटार चोरणारी 6 जणांची टोळी जेरबंद; निजामपूर पोलिसांची कारवाई, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त Dhule Crime News | धुळे: शेतातील विहिरींवरील मोटार चोरणारी 6 जणांची टोळी जेरबंद; निजामपूर पोलिसांची कारवाई, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त - धुळे / साक्री - बळसाणे शिवारात शेत विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर चोरी करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला निजामपूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 2,04,350 रुपयांचे 10 मोटर पंप जप्त केले आहेत. अटक आरोपींची नावे: शुभम रतनसिंग गिरासे (22) वसीमखाँ युसुफखाँ पठाण (32) रावसाहेब हिम्मत सोनवणे (24) रतनसिंग हिम्मतसिंग ठाकूर (26) करण अर्जुन ठाकरे (18) नवनाथ छोटू गायकवाड (19) - सर्व रा. बळसाणे, ता. साक्री फिर्यादी चैत्राम न्याहळदे यांच्या शेतात 22 ऑगस्ट रोजी झालेल्या चोरीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात या टोळीने इतरही चोऱ्या केल्याचे उघड झाले आहे. आरोपींना दि. 29/08/2026 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. #DhuleCrime #NizampurPolice #DhuleNews #MotorPumpChori #Sakri
    1
    धुळे: शेतातील विहिरींवरील मोटार चोरणारी 6 जणांची टोळी जेरबंद; निजामपूर पोलिसांची कारवाई, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त
Dhule Crime News | धुळे: शेतातील विहिरींवरील मोटार चोरणारी 6 जणांची टोळी जेरबंद; निजामपूर पोलिसांची कारवाई, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त
-
धुळे / साक्री - बळसाणे शिवारात शेत विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर चोरी करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला निजामपूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 2,04,350 रुपयांचे 10 मोटर पंप जप्त केले आहेत.
अटक आरोपींची नावे:
शुभम रतनसिंग गिरासे (22)
वसीमखाँ युसुफखाँ पठाण (32)
रावसाहेब हिम्मत सोनवणे (24)
रतनसिंग हिम्मतसिंग ठाकूर (26)
करण अर्जुन ठाकरे (18)
नवनाथ छोटू गायकवाड (19) - सर्व रा. बळसाणे, ता. साक्री
फिर्यादी चैत्राम न्याहळदे यांच्या शेतात 22 ऑगस्ट रोजी झालेल्या चोरीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात या टोळीने इतरही चोऱ्या केल्याचे उघड झाले आहे. आरोपींना दि. 29/08/2026 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
#DhuleCrime #NizampurPolice #DhuleNews #MotorPumpChori #Sakri
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • गणपती वर्गणीच्या वादातून सुरगाण्याच्या युवकाची सापुताऱ्यात हत्या मागील वर्षीच्या गणपती विसर्जनाच्या वादाचा राग; चाकूने तीन वार केल्याचा तक्रारीत उल्लेख गुजरातमधील सापुतारा येथे गणपती वर्गणीच्या कारणावरून झालेल्या वादातून सुरगाणा येथील २९ वर्षीय युवकाची चाकूने वार करून हत्या झाल्याची घटना दि. २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी कुणाल किरण परदेशी (रा. सुरगाणा) याच्याविरुद्ध सापुतारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत युवकाचे नाव हेमंत उर्फ विकी सूर्यवंशी (वय २९, रा. होळी चौक बसस्टॉपजवळ, सुरगाणा) असे आहे. पोलिस तक्रारीनुसार, हेमंत व आरोपी कुणाल परदेशी यांच्यात मागील वर्षी गणपती विसर्जनाच्या वेळी वाद झाला होता. या जुन्या वादाचा राग आरोपीच्या मनात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दि. २६ ऑगस्ट रोजी हेमंत हा त्याचे मित्र विजय खंबायत, माधव गवळी व राज गाडेकर यांच्यासोबत सापुतारा येथे मॉनसून फेस्टिव्हल पाहण्यासाठी गेला होता. रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास हे मित्र बडोदा बँकेच्या एटीएमजवळील पावभाजीच्या दुकानात गेले होते. गेले होते. पोलिस तक्रारीतील माहितीनुसार, त्याच ठिकाणी कुणाल किरण परदेशी व प्रदीप रविंद्र पवार हे देखील आले. पावभाजी खाल्ल्यानंतर हेमंत व राज गाडेकर तेथे थांबले असताना कुणाल व हेमंत यांच्यात मागील वर्षीच्या गणपती विसर्जनाच्या वादासह यावर्षीच्या गणपती वर्गणीवरून पुन्हा वाद झाला. वाद वाढल्यानंतर कुणाल याने चाकूसदृश तीक्ष्ण हत्याराने हेमंतच्या पोटावर दोन वार व छातीच्या खालील भागात एक वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. गंभीर जखमी झाल्यानंतर कुणाल मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात आले. हेमंतला त्याचे मित्र तातडीने मोटारसायकलवरून बोरगाव येथील सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी वणी येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तक्रारीनुसार, दि. २७ ऑगस्ट रोजी रात्री १.१० वाजता हेमंतचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हेमंतची आई पद्माबेन सूर्यवंशी, त्यांचे पती व नातेवाईक वणी रुग्णालयात दाखल झाले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
    1
    गणपती वर्गणीच्या वादातून सुरगाण्याच्या युवकाची सापुताऱ्यात हत्या
मागील वर्षीच्या गणपती विसर्जनाच्या वादाचा राग; चाकूने तीन वार केल्याचा तक्रारीत उल्लेख
गुजरातमधील सापुतारा येथे गणपती वर्गणीच्या कारणावरून झालेल्या वादातून सुरगाणा येथील २९ वर्षीय युवकाची चाकूने वार करून हत्या झाल्याची घटना दि. २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी कुणाल किरण परदेशी (रा. सुरगाणा) याच्याविरुद्ध सापुतारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत युवकाचे नाव हेमंत उर्फ विकी सूर्यवंशी (वय २९, रा. होळी चौक बसस्टॉपजवळ, सुरगाणा) असे आहे. पोलिस तक्रारीनुसार, हेमंत व आरोपी कुणाल परदेशी यांच्यात मागील वर्षी गणपती विसर्जनाच्या वेळी वाद झाला होता. या जुन्या वादाचा राग आरोपीच्या मनात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दि. २६ ऑगस्ट रोजी हेमंत हा त्याचे मित्र विजय खंबायत, माधव गवळी व राज गाडेकर यांच्यासोबत सापुतारा येथे मॉनसून फेस्टिव्हल पाहण्यासाठी गेला होता. रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास हे मित्र बडोदा बँकेच्या एटीएमजवळील पावभाजीच्या दुकानात गेले होते. गेले होते.
पोलिस तक्रारीतील माहितीनुसार, त्याच ठिकाणी कुणाल किरण परदेशी व प्रदीप रविंद्र पवार हे देखील आले. पावभाजी खाल्ल्यानंतर हेमंत व राज गाडेकर तेथे थांबले असताना कुणाल व हेमंत यांच्यात मागील वर्षीच्या गणपती विसर्जनाच्या वादासह यावर्षीच्या गणपती वर्गणीवरून पुन्हा वाद झाला.
वाद वाढल्यानंतर कुणाल याने चाकूसदृश तीक्ष्ण हत्याराने हेमंतच्या पोटावर दोन वार व छातीच्या खालील भागात एक वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. गंभीर जखमी झाल्यानंतर कुणाल मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात आले.
हेमंतला त्याचे मित्र तातडीने मोटारसायकलवरून बोरगाव येथील सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी वणी येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तक्रारीनुसार, दि. २७ ऑगस्ट रोजी रात्री १.१० वाजता हेमंतचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हेमंतची आई पद्माबेन सूर्यवंशी, त्यांचे पती व नातेवाईक वणी रुग्णालयात दाखल झाले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
    user_नागेश मोरे,पत्रकार
    नागेश मोरे,पत्रकार
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.