मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अर्थसंकल्प राज्याच्या प्रगतीला चालणा देणारा. :- आमदार सुरेश धस - - - - - - - शेतकरी-महिला-पायाभूत सुविधांना अर्थसंकल्पातून मोठी चालना मिळणार (प्रतिनिधी) - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला असून हा अर्थसंकल्प शेतकरी, महिला तसेच पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देणारा सर्वसमावेशक आणि संधी निर्माण करणारा असल्याची प्रतिक्रिया आष्टी–पाटोदा–शिरूर मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी दिली. या बाबत बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ही अत्यंत महत्त्वाची असून ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीककर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा आहे. याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णयही सकारात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले.या अर्थसंकल्पात शेतीमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी १० ते १५ पिकांची एकात्मिक मूल्यसाखळी उभारण्याचा निर्णय, कृषी क्षेत्रात डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे एकात्मिक इकोसिस्टीम निर्माण करण्याची योजना तसेच सिंचन आणि नदीजोड प्रकल्पांद्वारे दुष्काळग्रस्त भागांना पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन ही राज्याच्या विकासासाठी महत्त्वाची पावले असल्याचे धस यांनी सांगितले. तसेच महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लखपती दीदी अभियानाचा विस्तार, महिला बचतगटांसाठी उत्पादन व विक्रीसाठी सुविधा यांसारख्या योजना समाजातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वाच्या ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्याच्या विकासाच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प दूरदृष्टी ठेवून तयार करण्यात आला असला तरी, आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्यात नाहीत, ही निश्चितच एक मोठी उणीव आहे, अशी भावना देखील आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली. राज्याच्या आर्थिक नियोजनात अजितदादांचा अनुभव आणि मार्गदर्शन महत्त्वाचे ठरत आहे, असेही त्यांनी नमूद केले.एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प शेतकरी, महिला, ग्रामीण भाग तसेच पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देणारा ठरेल आणि राज्याच्या प्रगतीला गती देणारा ठरेल, असा विश्वास आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केला.

- Post by AapTak Hindi News Channel1
- ऐन उन्हाळ्यात नदिला आला पुर ! अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील सटाणा व बीडमधील वलीपूरमध्ये नदीला पूर.. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदिला पुर आला. बीडमध्ये अवकाळी पावसामुळे वलीपूरमध्ये नदीला पूर! 3 एप्रिल 2026 रोजी बीड जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वडवणी तालुक्यात गारपिटीचा तडाखा बसल्यानंतर आता बीड तालुक्यातील वलीपूर भागात मुसळधार पावसामुळे चक्क नदीला पूर आला आहे.1
- Post by Vijay Meher1
- Post by विलास बारहाते1
- बदनापूरच्या देवगाव फाटा परिसरात अज्ञात मृतदेह आढळल्याने खळबळ बदनापूर (प्रतिनिधी) – शहरालगत असलेल्या देवगाव फाटा परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या या परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी एका इसमाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह दिसून आला असता. याची माहिती बदनापूर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहाचा पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून, मृत्यूचे नेमके कारण काय याबाबतही स्पष्टता आलेली नसली तरी, हा घातपात असल्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे. तर पुढील तपास बदनापूर पोलीस करत आहेत.2
- मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दिला जाणारा स्वर्गीय बाबासाहेब भाऊ आकात स्मृती पुरस्कार शुक्रवारी प्राचार्य डॉक्टर भागवत कटारे यांच्या हस्ते प्रसिद्ध चित्रपट निर्माती दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला हा सोहळा परतुर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी कवी दासू वैद्य, संस्थेचे सचिव कपिल भैया आकात, प्राचार्य भारत खांदारे यांच्यासह सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.1
- Post by कर्जत लाईव्ह1
- Post by AapTak Hindi News Channel1