शिलाई व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण आणि मशिन मिळालेल्या महिलांनी उत्तम व्यवसाय करत आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकले पाऊल, रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन, भागीरथी महिला संस्था आणि वस्त्रम् गारमेंटचा आदर्शवत उपक्रम कोल्हापूर ०१ सिटी न्यूज नेटवर्क ग्रामीण भागातील महिला स्वावलंबी आणि प्रगत झाल्या पाहिजेत, या हेतुने रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन, भागीरथी महिला संस्था आणि वस्त्रम् गारमेंटच्यावतीने महिलांना मोफत प्रशिक्षण आणि शिलाई मशिन प्रदान उपक्रम राबवण्यात येत आहे. वडणगे परिसरातील सुमारे १०० महिलांना प्रशिक्षित बनवले जात आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २५ महिलांना प्रशिक्षण देवून त्यांना वर्षभरापूर्वी शिलाई मशिन देण्यात आली आहेत. या मशिनधारक महिलांच्या स्वावलंबनाचा प्रवास जाणून घेण्यासाठी सौ. अरूंधती महाडिक यांच्यासह रोटरी सदस्यांनी लाभार्थी महिलांना भेट देवून माहिती घेतली. रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन, भागीरथी महिला संस्था आणि करवीर तालुक्यातील वडणगे मधील वस्त्रम संस्थेच्यावतीने २५ महिलांना शिलाई कामाचे मोफत प्रशिक्षण देवून, त्यांना २५ शिलाई मशिन प्रदान करण्यात आली आहेत. ग्लोबल ग्राम अंतर्गत हा उपक्रम रोटरी मिडटाऊनच्या माजी अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांच्या कार्यकालात सुरू करण्यात आला आहे. दरम्यान शिलाई मशिन घेतलेल्या महिलांच्या स्वावलंबनाचा आणि प्रगतीचा प्रवास जाणून घेण्यासाठी सौ. अरूंधती महाडिक यांनी, रोटरी सदस्यांसमवेत लाभार्थी महिलांच्या घरी भेट दिली. यावेळी महिलांनी या प्रशिक्षणाचा आणि मिळालेल्या शिलाई मशिनचा आपल्या व्यवसायासाठी मोठा फायदा झाल्याचे सांगितले. शिलाई मशिनद्वारे रोजगाराचे साधन उपलब्ध झाल्याने, मिळालेल्या प्रशिक्षणाचा लाभ घेवून, आपण भरघोस कमाई करत असल्याचे आणि त्यामुळे कुटूंबही सुखी समाधानी बनल्याचे लाभार्थी महिलांनी सांगितले. दरम्यान हा उपक्रम पहिल्या टप्प्यात यशस्वी ठरला आहे. आता पुढील टप्प्यात २५ महिलांना या महिन्यात प्रशिक्षण आणि त्यानंतर मोफत शिलाई मशिन देणार आहे. एकूण १०० महिलांना प्रशिक्षित करून, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत, आत्मनिर्भर बनवणार असल्याचे सौ. अरूंधती महाडिक यांनी सांगितले. या भेटी वेळी रोटरीचे राजाराम शिंपुकडे, प्रतिभा शिंपुकडे, लक्ष्मी शिरगावकर, योगिनी कुलकर्णी आणि वस्त्रम गारमेंटच्या वर्षा संकपाळ उपस्थित होत्या.

- "सरकारने भरभरून मदत केली, मग उद्घाटनाला विरोध कशासाठी?"; खासदार धनंजय महाडिकांचा सवाल कोल्हापूर : रविराज कांबळे केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीनंतर राज्य सरकारने तातडीने मदत करून नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक सहकार्य केले आहे. त्यामुळे आता उद्घाटनाला विरोध करण्याचे कारण काय, असा सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला. नाट्यगृहाच्या खाजगी व्यवस्थापनाला विरोध करत रंगकर्मींनी उद्घाटनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून, काँग्रेसनेही आगप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर महाडिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली.1
- kolhapur che rajkarni dalbadlu nete zoplet kaay tyana sarkari gaadit firnyashathi nivdun dilele nahi1
- राज ठाकरे यांनी आज पुण्यात सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली राज ठाकरे यांनी आज पुण्यात सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली1
- वाटेत येऊ द्या कितीही काटे एकच आदर्श ठेवा अण्णाभाऊ साठे! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई येथे आवरून महाराष्ट्र जो काही प्रगती पथावर आहे या पाठीमागे एकच प्रेरणा ते म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या वर कविता सांगितले1
- भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय, सांगोला येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय, सांगोला येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती, जिल्हा परिषद सोलापूर तथा माजी जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या कार्यक्रमास मंडल अध्यक्ष विजय मगर, विजय इंगोले, विशाल बनसोडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- फिरस्ता मेंढपाळ कुटुंबाची मेंढरांचा चारा व पोटाची खळगी भरण्यासाठी मरेपर्यंत भटकंती. फिरस्ता मेंढपाळ कुटुंबाची मेंढरांचा चारा व पोटाची खळगी भरण्यासाठी मरेपर्यंत भटकंती लोणंद शहरात फिरस्त्या मेंढपाळ कुटुंबाचे आगमन झाले असून सर्वत्र शेतामध्ये पिके असल्याने चारा व भूक भागवण्यासाठी भटकंती सुरू असल्याचे निदर्शनाला आले सध्या पावसाळा सर्वत्र जिल्ह्यामध्ये असल्याने रात्री अपरात्री शेतामध्ये किंवा माळावर मेंढरास कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे या कुटुंबाचा शासनाने फेरविचार करून बारमाही चारा व पोटाची खळगी भरण्यासाठी खास सवलत दिल्यास जीवनाचे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल असे मेंढपाळ कुटुंबाने म्हटले आहे1
- कर्जमाफी प्रोसेस वर्षभर सुरू राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे1
- तासगाव ते तुरची मार्गे जुना सातारा रोड वर येरळा नदीवरील पुलावर, रस्त्यावर सळ्या उघड्या पडल्या असून मोठी जिवितहानी, आर्थिक हानी होण्याचा धोका आहे. असे म्हणत तुरचीचे सरपंच विकास डावरे यांनी पोलखोल केली, तासगाव ते तुरची मार्गे जुना सातारा रोड वर येरळा नदीवरील पुलावर, रस्त्यावर सळ्या उघड्या पडल्या असून मोठी जिवितहानी, आर्थिक हानी होण्याचा धोका आहे. असे म्हणत तुरचीचे सरपंच विकास डावरे यांनी पोलखोल केली, सार्वजनिक बांधकाम विभागाचे या समस्ये कडे लक्ष वेधले.1