logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वाढवण बंदर परिसरात जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारणार ! राज्यातील १९० बाजार समित्यांमध्ये 'शेतकरी भवन' कोपरगाव येथे पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती शिर्डी, दि. २९ :- शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून तो देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्याला सक्षम केल्यावरच राज्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल. याच दृष्टिकोनातून राज्यातील ३०६ पैकी जवळपास १९० कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी सर्व सोयीसुविधांनी युक्त असे 'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन' उभारण्यात येत आहे. तसेच, शेतमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी वाढवण बंदर परिसरात तब्बल १२०० एकर जागेवर पॅरिसच्या धर्तीवर जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प शासनाने केला असल्याची माहिती पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आज येथे दिली. कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाचे भूमिपूजन व‌ विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, कोपरगावचे नगराध्यक्ष पराग संधान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम आदी उपस्थित होते. श्री. रावल म्हणाले , राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज देण्याच्या उद्देशाने सौर कृषिपंप योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जात असून सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावाने खरेदी करून शासनाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. यासोबतच महिलांच्या सक्षमीकरणासाठी 'लाडकी बहीण' योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. शेतीमालाच्या विक्रीत आधुनिकता आणण्यासाठी 'राष्ट्रीय कृषी बाजार' (ई-नाम) प्रणालीचा वापर वाढविला जात आहे. 'एक देश, एक बाजारपेठ' या संकल्पनेनुसार राज्यात 'एकत्रित परवाना' व्यवस्था लागू केली जात आहे, जेणेकरून राज्यातील कोणत्याही बाजार समितीतून शेतमालाची खरेदी करणे व्यापाऱ्यांना शक्य होईल. आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने २१०० कोटी रुपयांचा 'मॅग्नेट २.०' हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यातून शेतमालावर प्राथमिक प्रक्रिया, मालवाहतूक व साठवणूक प्रकल्पांसाठी विशेष अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे, असेही श्री. रावल यांनी सांगितले. श्री. रावल पुढे म्हणाले , कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाने विशेष कृती आराखडा तयार केला आहे. या अंतर्गत राज्यात 'कांदा महाबँक' उभारण्यात येणार असून समृद्धी महामार्गावर पाच ठिकाणी 'कांदा बँक' निर्माण केल्या जातील. या माध्यमातून कांद्याची साठवणूक, वर्गीकरण, वेष्टन व मूल्यवर्धन करण्यावर भर दिला जाणार आहे. कांदा उत्पादकांना योग्य भाव मिळावा व त्यांचे नुकसान टळावे, यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीमार्फत तातडीने उपाययोजना केल्या जात आहेत. कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने सहकार व विकासाचा मोठा वारसा अत्यंत चांगल्या पद्धतीने जपला आहे. बाजार समितीच्या वाढत्या उलाढालीची दखल घेत भविष्यात येथे शीतगृह, साठवणूक गोदामे व शेतमाल प्रतवारी यंत्रणा उभारण्यासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल. भौगोलिक मानांकन प्राप्त शेतमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी परदेशांसोबत व्यापार करार केले जाणार आहेत. येथील शेतकरी भवनाचे काम लवकरच पूर्ण होईल व भविष्यातील सर्व योजनांमध्ये कोपरगाव बाजार समितीला प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. यावेळी स्नेहलता कोल्हे, बिपीन कोल्हे व विवेक कोल्हे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कोपरगाव बाजार समितीच्या शेतकरी भवनासाठी १ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिल्याचे साहेबराव रोहोम यांनी प्रास्ताविकात सांगितले. #VadhvanPort #InternationalAgriMarket #JaykumarRawal #ShetkariBhavan #FarmerEmpowerment #KopargaonNews #MaharashtraAgriculture #AgriExport #GlobalMarket #KandaBank #MagnetProject #DigitalKrishi #ShetkariSanman #RuralEconomy #MaharashtraDevelopment

16 hrs ago
user_राविराज शिंदे
राविराज शिंदे
Farmer नगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
16 hrs ago
789163a4-8dd5-4f06-a8e5-774c98868e77

More news from Pune and nearby areas
  • शिरूर तालुक्यातील वरुडे-धामारी रोडवर भरधाव वेगातील कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर आदळून खड्ड्यात कोसळली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले.घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविणे व रुंदीकरण करण्याची मागणी करण्यात येत आहे.
    1
    शिरूर तालुक्यातील वरुडे-धामारी रोडवर भरधाव वेगातील कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर आदळून खड्ड्यात कोसळली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले.घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविणे व रुंदीकरण करण्याची मागणी करण्यात येत आहे.
    user_Sachin Reporter Pune
    Sachin Reporter Pune
    पत्रकार Shirur, Pune•
    12 hrs ago
  • Post by कर्जत लाईव्ह
    1
    Post by कर्जत लाईव्ह
    user_कर्जत लाईव्ह
    कर्जत लाईव्ह
    Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    43 min ago
  • Post by शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    1
    Post by शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • वैजापूर पंचायत समिती गट विकास अधिकारी शासकीय नियमा विरुद्ध. पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या दालनात A/C त बसून जनतेची सेवा करताना.
    1
    वैजापूर पंचायत समिती गट विकास अधिकारी शासकीय नियमा विरुद्ध. पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या दालनात 
A/C त बसून जनतेची सेवा करताना.
    user_SU NEWS 📡
    SU NEWS 📡
    Social Media Manager वैजापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by AapTak Hindi News Channel
    1
    Post by AapTak Hindi News Channel
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • आज ३० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली यात विजांचा मोठा कडकडाट सुरू झाला होता आमठाणा येथे एका झाडावर वीज पडल्याची घटना घडली असून सदरील प्रकार बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले आहे.
    1
    आज ३० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली यात विजांचा मोठा कडकडाट सुरू झाला होता आमठाणा येथे एका झाडावर वीज पडल्याची घटना घडली असून सदरील प्रकार बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले आहे.
    user_Rupesh Thakur
    Rupesh Thakur
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात महसूल, पोलिस, कृषी व ग्राम विकास यंत्रणा दाद देत नसल्याने हताश नागरिक न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारतात. मात्र प्रशासनाकडून आठ-आठ दिवस त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलन स्थळी साधा निवारा, पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृह या सारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने आंदोलनकर्त्यांची मोठी गैरसोय होत आहे. वाढत्या उन्हामुळे उपोषणकर्त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या चार वर्षांपासून आंदोलनकर्त्यांसाठी निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तसेच लोकवर्गणीतून निवारा शेड उभारण्यास परवानगी द्यावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे. मात्र या कडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली “जिल्हा प्रशासनाला तिरडी भेट” हे लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात माहिती आधिकार कार्यकर्ते शेख युनुस, पांडुरंग हराळे, शेख मुबीन, बाळासाहेब मोरे पाटील (शिवशक्ती भिमशक्ति प्रदेशाध्यक्ष) बाळासाहेब, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष इंटक), माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी), सादेक सय्यद (शहराध्यक्ष आम आदमी पार्टी), भिमराव कुटे (बामसेफ युवा जिल्हाध्यक्ष), किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष विश्व कल्याण महिला सेवा भावी संस्था), बबिता शिंदे (जिल्हाध्यक्ष तृप्ती देसाई ब्रिगेड), सीताबाई भोसले (रिपाई महिला आघाडी जिल्हाध्यक्ष), हनुमान घोडके, भिमराव पायाळ सह आदी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकदा नागरिक आठवडाभर किंवा पंधरा दिवस उपोषण करतात. संबंधित विभागांनी दोन दिवसांच्या आत आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नगर रोड परिसरातील शासकीय कार्यालयांजवळील झाडे तोडल्याने आंदोलनकर्त्यांचा नैसर्गिक निवारा नाहीसा झाला आहे. त्या मुळे कडक उन्हात उपोषण करणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, तातडीने निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान नाली बांधकामासाठी अनेक सार्वजनिक स्वच्छतागृहे पाडण्यात आली. त्या मुळे शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असून, तातडीने नवीन स्वच्छतागृहे उभारावीत, अशी ही मागणी करण्यात आली आहे.
    1
    (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात महसूल, पोलिस, कृषी व ग्राम विकास यंत्रणा दाद देत नसल्याने हताश नागरिक न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारतात. मात्र प्रशासनाकडून आठ-आठ दिवस त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलन स्थळी साधा निवारा, पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृह या सारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने आंदोलनकर्त्यांची मोठी गैरसोय होत आहे. वाढत्या उन्हामुळे उपोषणकर्त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या चार वर्षांपासून आंदोलनकर्त्यांसाठी निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तसेच लोकवर्गणीतून निवारा शेड उभारण्यास परवानगी द्यावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे. मात्र या कडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली “जिल्हा प्रशासनाला तिरडी भेट” हे लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात माहिती आधिकार कार्यकर्ते शेख युनुस, पांडुरंग हराळे, शेख मुबीन, बाळासाहेब मोरे पाटील (शिवशक्ती भिमशक्ति प्रदेशाध्यक्ष) बाळासाहेब, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष इंटक), माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी), सादेक सय्यद (शहराध्यक्ष आम आदमी पार्टी), भिमराव कुटे (बामसेफ युवा जिल्हाध्यक्ष), किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष विश्व कल्याण महिला सेवा भावी संस्था), बबिता शिंदे (जिल्हाध्यक्ष तृप्ती देसाई ब्रिगेड), सीताबाई भोसले (रिपाई महिला आघाडी जिल्हाध्यक्ष), हनुमान घोडके, भिमराव पायाळ सह आदी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकदा नागरिक आठवडाभर किंवा पंधरा दिवस उपोषण करतात. संबंधित विभागांनी दोन दिवसांच्या आत आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नगर रोड परिसरातील शासकीय कार्यालयांजवळील झाडे तोडल्याने आंदोलनकर्त्यांचा नैसर्गिक निवारा नाहीसा झाला आहे. त्या मुळे कडक उन्हात उपोषण करणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, तातडीने निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. अशी मागणी करण्यात आली आहे.  बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान नाली बांधकामासाठी अनेक सार्वजनिक स्वच्छतागृहे पाडण्यात आली. त्या मुळे शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असून, तातडीने नवीन स्वच्छतागृहे उभारावीत, अशी ही मागणी करण्यात आली आहे.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • शिरूर तालुक्यातील भांबर्डे गावात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद करण्यात यश आले.गेल्या काही दिवसांत बिबट्यांचा वावर वाढून पाळीव जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी अधिक पिंजरे लावण्याची मागणी केली आहे.वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, शेतात जाताना व सकाळ-संध्याकाळ विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
    1
    शिरूर तालुक्यातील भांबर्डे गावात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद करण्यात यश आले.गेल्या काही दिवसांत बिबट्यांचा वावर वाढून पाळीव जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी अधिक पिंजरे लावण्याची मागणी केली आहे.वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, शेतात जाताना व सकाळ-संध्याकाळ विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
    user_Sachin Reporter Pune
    Sachin Reporter Pune
    पत्रकार Shirur, Pune•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.