येवला शहरातील प्रसिद्ध महामृत्युंजय मंदिरामध्ये सोमप्रदोषानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन येवला शहरातील प्रसिद्ध महामृत्युंजय मंदिरामध्ये सोमप्रदोषानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोमप्रदोषाच्या निमित्ताने सायंकाळच्या सुमारास मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. यावेळी महादेवाच्या मूर्तीची तसेच पिंडीची विधिवत महापूजा करण्यात आली. विविध धार्मिक विधींसह महादेवाच्या पिंडीला अभिषेक करण्यात आला. अभिषेक व पूजेदरम्यान भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले. दरम्यान, मंदिरातील नंदीभोवती काढण्यात आलेली आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. महादेवाची पिंड आणि त्रिशूळ यांची सुंदर रांगोळी साकारण्यात आली होती. या रांगोळीमुळे मंदिराच्या परिसराच्या सौंदर्यात आणखी भर पडली होती.
येवला शहरातील प्रसिद्ध महामृत्युंजय मंदिरामध्ये सोमप्रदोषानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन येवला शहरातील प्रसिद्ध महामृत्युंजय मंदिरामध्ये सोमप्रदोषानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोमप्रदोषाच्या निमित्ताने सायंकाळच्या सुमारास मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. यावेळी महादेवाच्या मूर्तीची तसेच पिंडीची विधिवत महापूजा करण्यात आली. विविध धार्मिक विधींसह महादेवाच्या पिंडीला अभिषेक करण्यात आला. अभिषेक व पूजेदरम्यान भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले. दरम्यान, मंदिरातील नंदीभोवती काढण्यात आलेली आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. महादेवाची पिंड आणि त्रिशूळ यांची सुंदर रांगोळी साकारण्यात आली होती. या रांगोळीमुळे मंदिराच्या परिसराच्या सौंदर्यात आणखी भर पडली होती.
- बजाज कंपनीसमोर विद्यार्थ्यांचा ठिय्या; टीम लीजकडून फसवणुकीचा आरोप, ४ दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन वाळूज एमआयडीसीतील बजाज कंपनीसमोर हजारो विद्यार्थी कामगारांनी ठिय्या आंदोलन करत डिग्री प्रमाणपत्र, कायमस्वरूपी नोकरी आणि पगारवाढीची मागणी केली. टीम लीजमार्फत तीन वर्षे काम करूनही डिग्री प्रमाणपत्र मिळाले नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थी, टीम लीज, बजाज कंपनी आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. चार दिवसांत मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.1
- विंचूरमध्ये संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न निफाड तालुक्यातील विंचूर येथील श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिरात संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. ३ ते १० ऑगस्टदरम्यान आयोजित या सप्ताहात अखंड हरिनाम, महिलांचे भजन, हरिपाठ तसेच कीर्तनाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे किरण नवले दांपत्याच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर ह.भ.प. संगीतामाई गुंजाळ (लासलगाव) यांचे काल्याचे कीर्तन झाले. दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी संत नामदेव महाराजांच्या पालखीची भव्य दिंडी काढण्यात आली. या दिंडीत ह.भ.प. सुवर्णाताई जमदाडे यांच्या ज्ञानराज वारकरी संस्थेतील ६० विद्यार्थ्यांसह शिंपी समाज बांधव, वारकरी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात निघालेल्या या दिंडीमुळे विंचूर परिसर भक्तिमय झाला होता. हा धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी समस्त शिंपी समाज तसेच विंचूर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. श्री संत नामदेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने किरण नवले यांनी उपस्थित भाविक, वारकरी, ग्रामस्थ व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.3
- आदिवासी संस्कृतीचा जल्लोष; जव्हारमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा पारंपरिक तारपा नृत्य, ढोल-ताशांचा गजर अन् पद्मश्री भिकल्या लाडक्या घिंडा यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक आदिवासी संस्कृतीचा जल्लोष; जव्हारमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा पारंपरिक तारपा नृत्य, ढोल-ताशांचा गजर अन् पद्मश्री भिकल्या लाडक्या घिंडा यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक दिव्य भारत बीएसएम न्यूज मोखाडा / प्रतिनिधी : अशोक मालक) जव्हार : आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, कला, लोकजीवन आणि सामाजिक एकजूट यांचा उत्स्फूर्त जागर घडवत जव्हार शहरात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भव्य मिरवणूक आणि पारंपरिक कलांचे सादरीकरण करण्यात आले. पारंपरिक वेशभूषेतील नागरिक, तारपा नृत्य करणारे युवक-युवती, महिला, पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने संपूर्ण जव्हार शहराला आदिवासी संस्कृतीचे रंग लाभले होते. जागतिक आदिवासी दिन हा आदिवासी समाजाच्या हक्कांबरोबरच त्यांच्या संस्कृती, भाषा, परंपरा, कला आणि जीवनपद्धतीचे जतन व संवर्धन करण्याचा संदेश देणारा महत्त्वाचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर जव्हारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक वेशभूषेतून संस्कृतीचे दर्शन जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने जव्हार शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषा परिधान केली होती. महिलांनी पारंपरिक दागिने व वेशभूषा परिधान करून सहभाग नोंदविला, तर युवक-युवतींनीही पारंपरिक पोशाखात उपस्थित राहून आदिवासी संस्कृतीचा अभिमान व्यक्त केला. मिरवणुकीदरम्यान पारंपरिक वाद्यांचा निनाद, ढोल-ताशांचा गजर आणि तारपाच्या तालाने वातावरण भारावून गेले होते. तारपाच्या तालावर युवक-युवतींसह महिला व पुरुषांनी उत्स्फूर्तपणे नृत्य सादर केले. पारंपरिक नृत्य आणि वाद्यांच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या लोककलेचे प्रभावी दर्शन नागरिकांना घडले. तारपा नृत्याने वेधले नागरिकांचे लक्ष आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक जीवनात पारंपरिक नृत्य आणि वाद्यांना विशेष महत्त्व आहे. याच परंपरेचा जागर करत मिरवणुकीमध्ये तारपा नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. तारपाच्या तालावर एकसंधपणे सादर होणाऱ्या नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घेतला. नव्या पिढीला आपल्या पारंपरिक कला आणि संस्कृतीची ओळख व्हावी, तसेच आधुनिकतेच्या प्रवाहातही आपल्या सांस्कृतिक मुळांशी नाते कायम राहावे, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. पद्मश्री भिकल्या लाडक्या घिंडा यांच्या स्मृतींना अभिवादन या सोहळ्यात आदिवासी समाजाच्या विकासासाठी आणि संस्कृतीच्या जतनासाठी योगदान देणाऱ्या थोर व्यक्ती, समाजसुधारक आणि महनीय व्यक्तींच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. विशेषतः पद्मश्री भिकल्या लाडक्या घिंडा यांच्या पुतळ्याची पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. पद्मश्री भिकल्या लाडक्या घिंडा यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. त्यांच्या कार्यातून आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपरा, लोककला आणि सामाजिक जाणीव यांना मिळालेल्या प्रेरणेचे स्मरण यावेळी करण्यात आले. पुतळ्याच्या मिरवणुकीत महिला, पुरुष, युवक-युवती तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे मिरवणुकीला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. विविध पारंपरिक कलांचे सादरीकरण, घोषणांनी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी शहरातील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. नव्या पिढीला संस्कृतीशी जोडण्याचा प्रयत्न आदिवासी समाजाची संस्कृती ही केवळ परंपरांचा संग्रह नसून ती निसर्गाशी असलेले नाते, सामूहिक जीवनपद्धती, लोककला, लोकगीत, नृत्य, बोलीभाषा आणि सामाजिक मूल्ये यांचा समृद्ध वारसा आहे. आधुनिक काळात बदलत्या जीवनशैलीमुळे पारंपरिक कला आणि प्रथा हळूहळू मागे पडत असताना अशा सांस्कृतिक कार्यक्रमांना विशेष महत्त्व प्राप्त होते. जागतिक आदिवासी दिनाच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश देण्यात आला. युवक-युवती आणि लहान मुलांचा कार्यक्रमातील सहभाग हा विशेष आकर्षणाचा विषय ठरला. एकजुटीचे दर्शन या कार्यक्रमाच्या निमित्ताने जव्हारमधील आदिवासी समाजाची सांस्कृतिक आणि सामाजिक एकजूटही प्रकर्षाने दिसून आली. विविध स्तरांतील नागरिकांनी एकत्र येऊन जागतिक आदिवासी दिन साजरा केला. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांचा उत्स्फूर्त सहभाग असल्याने कार्यक्रमाला व्यापक लोकसहभाग लाभला. मिरवणुकीच्या मार्गावर नागरिकांनी मोठ्या उत्सुकतेने पारंपरिक नृत्य, वेशभूषा आणि सांस्कृतिक सादरीकरणाचा आनंद घेतला. पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचणाऱ्या नागरिकांमुळे शहरातील वातावरणात उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. आदिवासी अस्मितेचा जागर जागतिक आदिवासी दिन हा आदिवासी समाजाच्या अस्मितेचा, अधिकारांचा आणि सांस्कृतिक वारशाचा जागर करणारा दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. जव्हारमध्ये झालेल्या या सोहळ्यातूनही आदिवासी समाजाच्या समृद्ध परंपरेचा अभिमान व्यक्त करण्यात आला. आपली संस्कृती, भाषा, लोककला आणि परंपरा जपणे ही प्रत्येक पिढीची जबाबदारी आहे. त्यासाठी नव्या पिढीने आपल्या सांस्कृतिक वारशाशी जोडले जाणे आवश्यक आहे. अशा कार्यक्रमांमुळे तरुण पिढीमध्ये आपल्या संस्कृतीविषयी अभिमान निर्माण होतो आणि पारंपरिक कला पुढे नेण्यासाठी प्रेरणा मिळते. जव्हार शहरात दिवसभर उत्साहाचे वातावरण जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने संपूर्ण जव्हार शहरात दिवसभर उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते. पारंपरिक वेशभूषा, नृत्य, वाद्यांचा गजर आणि नागरिकांचा मोठा सहभाग यामुळे शहराला जणू सांस्कृतिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. या सोहळ्यामुळे जव्हारच्या आदिवासी संस्कृतीची समृद्ध परंपरा, लोककला आणि सामाजिक एकजूट पुन्हा एकदा अधोरेखित झाली. आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन आणि पुढील पिढीपर्यंत त्याचा वारसा पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने जव्हारमध्ये झालेला हा सांस्कृतिक सोहळा आदिवासी अस्मिता, परंपरा आणि एकजुटीचा उत्स्फूर्त उत्सव ठरला. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” प्रतिनिधी :अशोक मालक2
- कन्नड चे जुने बस स्टॅन्ड अतिक्रमण च्या विळख्यात कन्नड तालुक्यातील नगर परिषद ला लागून असलेली व डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान तसेच तहसील कन्नड, शहरी पोलीस स्टेशनं ला जवळ असलेल्या कन्नड तालुक्यातील मुख्य जुने बस स्टॅन्ड अतिक्रमण च्या विळख्यात आहे. सदर अतिक्रमण हटवून जुने बस स्टॅन्ड चि जागा खुली करण्याची शासनाने तजवीज करावी.1
- नाशिक मध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा कला संस्कृतीचे दर्शन नाशिकमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा; पारंपरिक कला-संस्कृतीचे अनोखे दर्शन नाशिक : जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिक शहरातील विविध ठिकाणी आदिवासी संस्कृतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.नगरसेवक किरण भाऊ राजवाडे यांचे संपर्क कार्यालया लगत सिहस्थनगर सिडको येथे ठाकर समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात परंपरा, संस्कृती आणि लोककलेचा जागर करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी जननायक बिरसा मुंडा, स्वातंत्र्यसेनानी राघोजी भांगरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ठाकर समाज बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून लोकनृत्य, पारंपरिक गीत आणि विविध सांस्कृतिक कलांचे सादरीकरण केले. जल, जंगल आणि जमीन यांच्याशी असलेले आदिवासी समाजाचे अतूट नातेही या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले. आयोजक नगरसेवक किरण भाऊ राजवाडे यांच्यासह विविध मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. आदिवासी समाजाची समृद्ध कला, परंपरा आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नाशिक प्रतिनिधी — सचिन देवरे.2
- आज का दिन बेहद खास है, क्योंकि आज दिव्या रानी साहू का जन्मदिन है। 🎉🎂 इस खास मौके पर दिव्या रानी साहू को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं ढेरों शुभकामनाएं। 💐❤️ ईश्वर से प्रार्थना है कि उनका जीवन हमेशा खुशियों से भरा रहे, वे स्वस्थ और खुश रहें तथा जीवन में खूब सफलता प्राप्त करें। उनके सभी सपने पूरे हों और हर कदम पर परिवार एवं अपनों का प्यार मिलता रहे। 🎂 Happy Birthday Divya Rani Sahu 🎂 📅 11 अगस्त 2026 अगर आपको यह जन्मदिन की शुभकामना पसंद आए तो वीडियो को Like 👍, Share 🔄 और Subscribe 🔔 जरूर करें। आज का दिन बेहद खास है, क्योंकि आज दिव्या रानी साहू का जन्मदिन है। 🎉🎂 इस खास मौके पर दिव्या रानी साहू को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं ढेरों शुभकामनाएं। 💐❤️ ईश्वर से प्रार्थना है कि उनका जीवन हमेशा खुशियों से भरा रहे, वे स्वस्थ और खुश रहें तथा जीवन में खूब सफलता प्राप्त करें। उनके सभी सपने पूरे हों और हर कदम पर परिवार एवं अपनों का प्यार मिलता रहे। 🎂 Happy Birthday Divya Rani Sahu 🎂 📅 11 अगस्त 2026 अगर आपको यह जन्मदिन की शुभकामना पसंद आए तो वीडियो को Like 👍, Share 🔄 और Subscribe 🔔 जरूर करें।1
- Post by शेख अजहर ताहेर (पत्रकार)1
- श्रमसंहिता रद्द करा; ३० हजार किमान वेतन द्या!” टाके घोटी येथे कामगारांचा महामार्गावर एल्गार केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ तसेच चार श्रमसंहिता रद्द करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या निर्णयानुसार सीटूच्या वतीने टाके घोटी येथे मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको व ‘झेलभरो’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन इगतपुरी तहसीलदारांना देण्यात आले. शेतीमालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार C-2 + ५० टक्के प्रमाणे हमीभाव द्यावा, वनजमिनीच्या वाढीव क्षेत्रासह स्वतंत्र सातबारा तयार करून अपात्र वनहक्क दावे पात्र ठरवावेत, गायरान, देवस्थान, इनामी व इतर सरकारी जमिनीवरील निवासी व शेतीची अतिक्रमणे नियमित करावीत, अशी मागणी करण्यात आली. सन २०२५-२६ मधील भात खरेदी योजनेअंतर्गत जाहीर केलेला बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करावा, स्मार्ट मीटर योजना रद्द करावी, गावठाण फिडरवरील लोडशेडिंग बंद करून २४ तास वीजपुरवठा करावा, तसेच जिल्ह्यातील निकृष्ट रस्त्यांची चौकशी करून दोषी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. वाढती महागाई व बेरोजगारी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात तसेच नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. कॉर्पोरेटधार्जिण्या व कामगारविरोधी चार श्रमसंहिता रद्द करून आठ तासांच्या कामासाठी किमान ३० हजार रुपये प्रतिमहिना वेतन लागू करावे, खाजगी उद्योग तसेच शासकीय विभागातील कंत्राटी, शिकाऊ व इतर कर्मचाऱ्यांना कायम करून समान कामाला समान वेतन व सर्व कायदेशीर लाभ द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. अंगणवाडी सेविका-मदतनीस, आशा, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार, स्त्री परिचर, पैसा मोबिलायझर, उमेद कर्मचारी, राष्ट्रीय आरोग्य अभियान व इतर योजना कर्मचाऱ्यांना कायम करून त्यांना ईएसआय, भविष्यनिर्वाह निधी (PF) व पेन्शन योजना लागू कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली. असंघटित कामगारांसाठी स्वतंत्र सामाजिक सुरक्षा कायदा लागू करून सर्व कल्याणकारी मंडळे प्रभावीपणे कार्यान्वित करावीत व त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करावी. तसेच रोथे एर्डे कंपनीतील कमी केलेल्या कामगारांसह १६० कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, अशी मागणीही करण्यात आली. या आंदोलनाला सीटूचे राज्य सचिव कॉ. देविदास आडोळे, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस कॉ. छाया जाधव, सीटू तालुका अध्यक्ष कॉ. दत्ता राक्षे व कॉ. आप्पासाहेब भोले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कॉ. विजया टिक्कल, कॉ. निवृत्ती कडू, कॉ. वासुदेव भागडे, कॉ. बाळू म्हसने, कॉ. अन्वर खान, कॉ. मच्छिंद्र गतीर, कॉ. गोकुळ गोवर्धने, कॉ. भाऊसाहेब जाधव, कॉ. तुकाराम नाठे, कॉ. विश्वास दुभाषे, कॉ. रोहिदास तोकडे, कॉ. संदीप कातोरे, कॉ. सदानंद शेळके, कॉ. राजू अवघडे, कॉ. सुरेश कोरडे, कॉ. रामदास चारस्कर, कॉ. विशाल घोटेकर, कॉ. सुनील आडोळे, कॉ. विनोद आडोळे यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार, शेतकरी व योजना कर्मचारी उपस्थित होते.3
- पांडाणेच्या देवनदीच्या पुलावर सायंकाळी साडेचारच्या सुमारास कार आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक दिंडोरी तालुक्यातील वनी ते सापुतारा रस्त्यावरील असलेल्या पांडाने गावाच्या देव नदीच्या पुलावरती मोटरसायकल व चार चाकी अपघात झाला असुन एक ठार तर तीन गंभीर जखमी झाले आहेत .वणी-सापुतारा रस्त्यावर पांडाणेच्या देवनदीच्या पुलावर सायंकाळी साडेचारच्या सुमारास कार आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. अपघातानंतर दुचाकीने पेट घेतल्याने ती पूर्णपणे जळून खाक झाली. मोटरसायकल क्रमांक एमएच-१५ जेव्ही-१२५९ क्रमांकाची दुचाकी व एमएच-४१ एझेड-३४९८ क्रमांकाची कार या दोन्ही वाहनाची पांडाणे गावाजवळ समोरासमोर झाली. धडक एवढी जोरदार होती की, या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे . सदर अपघात झाल्यानंतर पांडाणे येथील ग्रामस्थ व रस्त्याने जाणारे प्रवासी यांनी जखमींना त्वरित मदत करून त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात पाठवले जखमी डॉक्टर रुग्णांवरती उपचार सुरू असून वणी पोलीस स्टेशनला अपघात त्याची नोंद करण्याचे काम सुरू आहे .1