logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

तटाकडील तालीम चौक ते महाद्वाररोड परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. २ (छ. शिवाजी मार्केट) व अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज तटाकडील तालीम चौक ते ताराबाई रोड तसेच महाद्वार परिसरात संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान 3 लोखंडी टेबल, 11 पार्किंग जाळ्या, 4 स्टॅन्ड बोर्ड, 4 छत्र्या, 5 लोखंडी स्टॅन्ड, 3 लोखंडी कॉट, 2 कॅरेट, 15 लाकडी टेबल, 1 स्पीकर, 6 पुतळे, 20 लोखंडी पाईप, 1 लोखंडी स्टूल, 4 स्टॅन्ड, 2 रांगोळी बॅग, 1 ढकल गाडी व इतर साहित्य जप्त करण्यात आले. सदर कारवाई महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये उपशहर अभियंता सुरेश पाटील, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत तसेच अतिक्रमण विभाग व विभागीय कार्यालय क्र. २ मधील कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला. महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील अनधिकृत फेरीवाले तसेच रस्त्यावर दुकाने बाहेर उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्सवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित दुकानदार व फेरीवाल्यांनी आपले अनधिकृत अतिक्रमण त्वरित स्वत:हून काढून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

4 hrs ago
user_Journalist Ajay
Journalist Ajay
करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
4 hrs ago

तटाकडील तालीम चौक ते महाद्वाररोड परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. २ (छ. शिवाजी मार्केट) व अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज तटाकडील तालीम चौक ते ताराबाई रोड तसेच महाद्वार परिसरात संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान 3 लोखंडी टेबल, 11 पार्किंग जाळ्या, 4 स्टॅन्ड बोर्ड, 4 छत्र्या, 5 लोखंडी स्टॅन्ड, 3 लोखंडी कॉट, 2 कॅरेट, 15 लाकडी टेबल, 1 स्पीकर, 6 पुतळे, 20 लोखंडी पाईप, 1 लोखंडी स्टूल, 4 स्टॅन्ड, 2 रांगोळी बॅग, 1 ढकल गाडी व इतर साहित्य जप्त करण्यात आले. सदर कारवाई महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये उपशहर अभियंता सुरेश पाटील, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत तसेच अतिक्रमण विभाग व विभागीय कार्यालय क्र. २ मधील कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला. महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील अनधिकृत फेरीवाले तसेच रस्त्यावर दुकाने बाहेर उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्सवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित दुकानदार व फेरीवाल्यांनी आपले अनधिकृत अतिक्रमण त्वरित स्वत:हून काढून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बारामतीत साजरी करण्यात आली भव्य असे मिरवणूक काढून बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आल्या.
    1
    महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बारामतीत साजरी करण्यात आली भव्य असे मिरवणूक काढून बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आल्या.
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने चिखली येथील आदित्य लॉजवर छापा टाकून एका मोठ्या देहविक्रय व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे... या कारवाईत ९ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यात एका बांगलादेशी तरुणीचा समावेश आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार, चिखली येथील देहू-आळंदी रोडवरील आदित्य लॉजवर ही धाड टाकण्यात आली. या ठिकाणी लॉजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सुटका करण्यात आलेल्या ९ महिलांपैकी एका तरुणीला आरोपींनी बांगलादेशातून तस्करी करून आणले होते. तिला पुन्हा मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी लॉज मॅनेजर अशोक बाबुराव बाबर आणि कामगार अकिबुल खालेक मुल्ला या दोघांना अटक केली आहे. तसेच लॉज चालक सुदर्शन पवार, जागा मालक नाना बोराटे आणि साहिल ऊर्फ शाहीन मंडल यांच्याविरुद्ध चिखली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता आणि पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे... #चिखली #पिंपरीचिंचवड #पोलीसकारवाई #देहविक्रयप्रकरण #मानवीतस्करी #रेस्क्यूऑपरेशन #महिलांचीसुटका #गुन्हेगारी #क्राईमन्यूज #पोलिसछापा #बांगलादेशीपीडित #आदित्यलॉज #Chikhali #PimpriChinchwad #PoliceRaid #SexRacketBusted #HumanTrafficking #RescueOperation #CrimeNews #WomenRescued #BangladeshiVictim #IllegalActivities #LodgeRaid #AdityaLodge
    1
    पिंपरी चिंचवड :-
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने चिखली येथील आदित्य लॉजवर छापा टाकून एका मोठ्या देहविक्रय व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे...
या कारवाईत ९ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यात एका बांगलादेशी तरुणीचा समावेश आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार, चिखली येथील देहू-आळंदी रोडवरील आदित्य लॉजवर ही धाड टाकण्यात आली. या ठिकाणी लॉजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सुटका करण्यात आलेल्या ९ महिलांपैकी एका तरुणीला आरोपींनी बांगलादेशातून तस्करी करून आणले होते. तिला पुन्हा मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी लॉज मॅनेजर अशोक बाबुराव बाबर आणि कामगार अकिबुल खालेक मुल्ला या दोघांना अटक केली आहे. तसेच लॉज चालक सुदर्शन पवार, जागा मालक नाना बोराटे आणि साहिल ऊर्फ शाहीन मंडल यांच्याविरुद्ध चिखली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता आणि पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
#चिखली #पिंपरीचिंचवड #पोलीसकारवाई #देहविक्रयप्रकरण #मानवीतस्करी #रेस्क्यूऑपरेशन #महिलांचीसुटका #गुन्हेगारी #क्राईमन्यूज #पोलिसछापा #बांगलादेशीपीडित #आदित्यलॉज
#Chikhali #PimpriChinchwad #PoliceRaid #SexRacketBusted #HumanTrafficking #RescueOperation #CrimeNews #WomenRescued #BangladeshiVictim #IllegalActivities #LodgeRaid #AdityaLodge
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • कात्रज कोंढावा रोड परिसर शत्रुंजय मंदिरा समोर बी जे पार्क बिल्डिंग च्या समोर चा रस्ता. 10 वर्ष झाली रस्ता असाच आहे. कोणी दखल घेत नाही. त्यामुळे दुकानाच्या धंद्यावर मोठया प्रमाणावर फरक पडला आहे. तरी हे काम लवकरात लवकर करावे ही विनंती.
    3
    कात्रज कोंढावा रोड परिसर शत्रुंजय मंदिरा समोर बी जे पार्क बिल्डिंग च्या समोर चा रस्ता.
10 वर्ष झाली रस्ता असाच आहे. कोणी दखल घेत नाही. त्यामुळे दुकानाच्या धंद्यावर मोठया प्रमाणावर फरक पडला आहे. तरी हे काम लवकरात लवकर करावे ही विनंती.
    user_श्री गणेश इंटरप्राईजेस
    श्री गणेश इंटरप्राईजेस
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : शहरातील अनैतिक मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसायाविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाई करत गुन्हेगारी विश्वाला जोरदार धक्का दिला आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या निर्देशानुसार अनैतिक मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाने चिखली परिसरात मध्यरात्री छापा टाकून एक मोठे रॅकेट उघडकीस आणले. १३ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ११:३० वाजण्याच्या सुमारास देहू-आळंदी रोडवरील लक्ष्मी चौकातील ‘आदित्य लॉज’वर अचानक धाड टाकण्यात आली. या कारवाईत ९ महिलांची सुटका करण्यात आली. यातील एक महिला बांगलादेशातून बेकायदेशीररीत्या तस्करी करून आणण्यात आल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे. संबंधित महिलेच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू असून तिला मायदेशी पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक तपासात ‘आदित्य लॉज’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी लॉज चालक, मालक, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांसह एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता तसेच अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अनैतिक मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाने २०२६ या वर्षात आतापर्यंत ११ ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये ७ मसाज पार्लर आणि ४ हॉटेल्सचा समावेश आहे. या कारवायांमध्ये एकूण ३१ आरोपींना अटक करण्यात आली असून २८ महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, भविष्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांची ही कारवाई केवळ गुन्हेगारीवर प्रहार नसून, पीडित महिलांना नवजीवन देणारी ठरत आहे.
    1
    पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :
शहरातील अनैतिक मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसायाविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाई करत गुन्हेगारी विश्वाला जोरदार धक्का दिला आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या निर्देशानुसार अनैतिक मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाने चिखली परिसरात मध्यरात्री छापा टाकून एक मोठे रॅकेट उघडकीस आणले.
१३ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ११:३० वाजण्याच्या सुमारास देहू-आळंदी रोडवरील लक्ष्मी चौकातील ‘आदित्य लॉज’वर अचानक धाड टाकण्यात आली. या कारवाईत ९ महिलांची सुटका करण्यात आली. यातील एक महिला बांगलादेशातून बेकायदेशीररीत्या तस्करी करून आणण्यात आल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे. संबंधित महिलेच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू असून तिला मायदेशी पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
प्राथमिक तपासात ‘आदित्य लॉज’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी लॉज चालक, मालक, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांसह एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता तसेच अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अनैतिक मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाने २०२६ या वर्षात आतापर्यंत ११ ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये ७ मसाज पार्लर आणि ४ हॉटेल्सचा समावेश आहे. या कारवायांमध्ये एकूण ३१ आरोपींना अटक करण्यात आली असून २८ महिलांची सुटका करण्यात आली आहे.
ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, भविष्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांची ही कारवाई केवळ गुन्हेगारीवर प्रहार नसून, पीडित महिलांना नवजीवन देणारी ठरत आहे.
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • पिंपरी चिंचवड वाकड, तपास पथकाची कामगिरी ४८ तासांत चेन स्नॅचर जेरबंद; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
    1
    पिंपरी चिंचवड वाकड, तपास पथकाची कामगिरी ४८ तासांत चेन स्नॅचर जेरबंद; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Lucknow mein Aag lagne ke Karan Bhari nuksan aur hua Hai
    1
    Lucknow mein Aag lagne ke Karan Bhari nuksan aur hua Hai
    user_AMINIYA COURIER
    AMINIYA COURIER
    Post Office/Courier शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • पिंपरी चिंचवड :- आकुर्डी येथील कै. फकीरभाई पानसरे उर्दू शाळेत आरटीई RTE प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र पडताळणी प्रक्रियेदरम्यान प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. शेकडो पालक आपल्या मुलांसह शाळेत जमा झाले असताना, कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता निघून गेल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे... आरटीई प्रवेशासाठी १५ ते २२ एप्रिल हा कालावधी अत्यंत मर्यादित आहे. या अल्प मुदतीत कागदपत्रे पडताळणे आवश्यक असताना, शाळेतील कर्मचारी पालकांना उन्हात ताटकळत ठेवून अचानक निघून गेले. यामुळे संतापलेल्या पालकांनी विचारणा केली की, जर वेळेत पडताळणी झाली नाही आणि मुलांचे वर्ष वाया गेले, तर याला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण विभागाने आकुर्डीतील गैरसोयीची माहिती मिळताच जादा कर्मचारी पाठवले असून प्रक्रिया सुरळीत पार पडेल याची काळजी घेतली जात आहे. दरम्यान मुदत संपण्यापूर्वी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित व्हावा, यासाठी पालकांची धावपळ सुरू असून प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची मागणी होत आहे... #आकुर्डी #पिंपरीचिंचवड #आरटीईप्रवेश #शिक्षणविभाग #पालकांचा_संताप #प्रशासनाचा_गोंधळ #उन्हातहाल #शाळाप्रवेश #विद्यार्थीप्रश्न #RTEगोंधळ #Akurdi #PimpriChinchwad #RTEAdmission #EducationDepartment #ParentsProtest #AdministrativeFailure #SchoolAdmission #StudentIssues #RTEProcess #BreakingNews
    1
    पिंपरी चिंचवड :-
आकुर्डी येथील कै. फकीरभाई पानसरे उर्दू शाळेत आरटीई RTE प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र पडताळणी प्रक्रियेदरम्यान प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. शेकडो पालक आपल्या मुलांसह शाळेत जमा झाले असताना, कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता निघून गेल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे...
आरटीई प्रवेशासाठी १५ ते २२ एप्रिल हा कालावधी अत्यंत मर्यादित आहे. या अल्प मुदतीत कागदपत्रे पडताळणे आवश्यक असताना, शाळेतील कर्मचारी पालकांना उन्हात ताटकळत ठेवून अचानक निघून गेले. यामुळे संतापलेल्या पालकांनी विचारणा केली की, जर वेळेत पडताळणी झाली नाही आणि मुलांचे वर्ष वाया गेले, तर याला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण विभागाने आकुर्डीतील गैरसोयीची माहिती मिळताच जादा कर्मचारी पाठवले असून प्रक्रिया सुरळीत पार पडेल याची काळजी घेतली जात आहे. दरम्यान मुदत संपण्यापूर्वी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित व्हावा, यासाठी पालकांची धावपळ सुरू असून प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची मागणी होत आहे...
#आकुर्डी #पिंपरीचिंचवड #आरटीईप्रवेश #शिक्षणविभाग #पालकांचा_संताप #प्रशासनाचा_गोंधळ #उन्हातहाल #शाळाप्रवेश #विद्यार्थीप्रश्न #RTEगोंधळ
#Akurdi #PimpriChinchwad #RTEAdmission #EducationDepartment #ParentsProtest #AdministrativeFailure #SchoolAdmission #StudentIssues #RTEProcess #BreakingNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • पिंपरी चिंचवड काळेवाडीत आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक
    1
    पिंपरी चिंचवड काळेवाडीत आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम 24}: श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील प्रीतम प्रकाश नगर परिसरात भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणूक काढण्यात आली. “स्वामी समर्थ महाराज की जय”च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. प्रीतम प्रकाश नगरमधील विविध रस्त्यांवरून पालखी मिरवणूक पार पडली. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसरासह संपूर्ण भाग आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. भक्तांच्या उपस्थितीमुळे परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मिरवणुकीनंतर आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध गायक श्रीहरी विठ्ठल मेहंदरकर यांनी सादर केलेल्या भक्तीगीतांनी वातावरण अधिकच भक्तिमय झाले. यावेळी सादर झालेल्या भजन व भक्तीगीतांनी आध्यात्मिक अनुभूती दिली. कार्यक्रमाची सुरुवात “खेळ मांडियेला” या अभंगाने होत “रूपे सुंदर”, “ॐ ओंकार प्रधान” आणि “ग सारेगमप” यांसारख्या सादरीकरणांनी वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. त्यानंतर “रचिला ऋषीमुनींनी”, “विठू माऊली” व “सेवा धर्मी पुण्य आहे” या गीतांनी श्रद्धेची उंची वाढवली, तर “धाव पाव स्वामी” आणि “हरी म्हणा” या गजरांनी भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला. पुढे “मन लागो रे”, “स्वामी समर्था सदगुरु समर्था”, “कानडा राजा पंढरीचा” आणि “वृंदावनी वेणु” या सादरीकरणांनी कार्यक्रम रंगत गेला. “शाम तेरी बंसी” व “धरिला ला पंढरीचा चोर” यानंतर “माझी रेणुका माऊली” आणि “सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा” ही गीते सादर करण्यात आली “घागर घेऊन”, “भवरा भवरा” व “अबीर गुलाल” “तीर्थ विठ्ठल”, “अवघे गर्जे पंढरपूर” या गीतांनी वातावरण अधिकच भारावले . कार्यक्रमाची सांगता “निघालो घेऊन दत्ताची पालखी” या भक्तिगीताने होत उपस्थित भाविकांना आध्यात्मिक समाधानाचा अनुभव देत सोहळ्याचा समारोप करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा संस्था, शिरूर यांच्या वतीने करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष योगेश वाळकीकर, उपाध्यक्ष अॅड. नारायण पवार, सचिव दीपक वर्मा, खजिनदार गणेश घाडगे यांच्यासह संपत लोखंडे, प्रमोद पवार, विष्णू वेताळ, मंगला बागमार, भूषण कडेकर, चंद्रकांत निघोजकर आदी पदाधिकारी आहेत. दरम्यान, संस्थेच्या वतीने प्रीतम प्रकाश नगर येथे स्वामी समर्थ मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून येथे नियमित रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. तसेच गरजूंना वॉकर, वॉटर बेड आदी वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्याचे सामाजिक कार्यही सातत्याने राबविण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष योगेश वाळकीकर व श्यामसुंदर चिखलीकर यांनी दिली. गरजूंनी या बाबत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे
    3
    शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम 24}: श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील प्रीतम प्रकाश नगर परिसरात भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणूक काढण्यात आली. “स्वामी समर्थ महाराज की जय”च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
प्रीतम प्रकाश नगरमधील विविध रस्त्यांवरून पालखी मिरवणूक पार पडली. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसरासह संपूर्ण भाग आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. भक्तांच्या उपस्थितीमुळे परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
मिरवणुकीनंतर आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध गायक श्रीहरी विठ्ठल मेहंदरकर यांनी सादर केलेल्या भक्तीगीतांनी वातावरण अधिकच भक्तिमय झाले. यावेळी सादर झालेल्या भजन व भक्तीगीतांनी आध्यात्मिक अनुभूती दिली. कार्यक्रमाची सुरुवात “खेळ मांडियेला” या अभंगाने होत “रूपे सुंदर”, “ॐ ओंकार प्रधान” आणि “ग सारेगमप” यांसारख्या सादरीकरणांनी वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. त्यानंतर “रचिला ऋषीमुनींनी”, “विठू माऊली” व “सेवा धर्मी पुण्य आहे” या गीतांनी श्रद्धेची उंची वाढवली, तर “धाव पाव स्वामी” आणि “हरी म्हणा” या गजरांनी भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला. पुढे “मन लागो रे”, “स्वामी समर्था सदगुरु समर्था”, “कानडा राजा पंढरीचा” आणि “वृंदावनी वेणु” या सादरीकरणांनी कार्यक्रम रंगत गेला. “शाम तेरी बंसी” व “धरिला ला पंढरीचा चोर” यानंतर “माझी रेणुका माऊली” आणि “सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा” ही गीते सादर करण्यात आली “घागर घेऊन”, “भवरा भवरा” व “अबीर गुलाल” “तीर्थ विठ्ठल”, “अवघे गर्जे पंढरपूर” या गीतांनी वातावरण अधिकच भारावले
. कार्यक्रमाची सांगता “निघालो घेऊन दत्ताची पालखी” या भक्तिगीताने होत उपस्थित भाविकांना आध्यात्मिक समाधानाचा अनुभव देत सोहळ्याचा समारोप करण्यात आला.
या उपक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा संस्था, शिरूर यांच्या वतीने करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष योगेश वाळकीकर, उपाध्यक्ष अॅड. नारायण पवार, सचिव दीपक वर्मा, खजिनदार गणेश घाडगे यांच्यासह संपत लोखंडे, प्रमोद पवार, विष्णू वेताळ, मंगला बागमार, भूषण कडेकर, चंद्रकांत निघोजकर आदी पदाधिकारी आहेत.
दरम्यान, संस्थेच्या वतीने प्रीतम प्रकाश नगर येथे स्वामी समर्थ मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून येथे नियमित रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. तसेच गरजूंना वॉकर, वॉटर बेड आदी वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्याचे सामाजिक कार्यही सातत्याने राबविण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष योगेश वाळकीकर व श्यामसुंदर चिखलीकर यांनी दिली. गरजूंनी या बाबत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.