logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उसन्या घेतलेल्या पैशावरून झालेल्या वादातून एका तरूणास चाकूने भोसकण्यात आले उसन्या घेतलेल्या पैशावरून झालेल्या वादातून एका तरूणास चाकूने भोसकण्यात आले. शहरातील अष्टविनायकनगरमध्ये हा खूनी हल्लयाचा थरार घडला. या हल्ल्यात सूरज राजू कांबळे (वय १९, रा. वारणाली रस्ता, गणेश कॉलनी, सांगली) हा गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी दोघांना संजयनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निहाल रंगारी, बिलाल रंगारी (दोघे रा. गंगानगर, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. जखमी सूरज कांबळे हा पेव्हींग ब्लॉक बसवण्याचे काम करतो. त्याने संशयितांकडून पैसे उसने घेतले होते. संशयित दोघांचे चिकन विक्रीचे दुकान आहे.शनिवारी रात्री सूरज कांबळे व त्याचा मित्र आर्यन मड्डी याच्यासोबत दुचाकीवरुन (क्र. एमएच १० डीवाय९८९२ येत होते त्यावेळी अष्टविनायक नगर मधील गल्ली क्रमांक आठ मध्ये रंगारी बंधू थांबले होते दोघांनी सुरज यास हाक मारून थांबवले व उसने घेतलेले पैशाची मागणी केली त्यानंतर त्याला चाकूने भोकसले.

1 hr ago
user_EXPRESS NEWS
EXPRESS NEWS
Press advisory तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
1 hr ago

उसन्या घेतलेल्या पैशावरून झालेल्या वादातून एका तरूणास चाकूने भोसकण्यात आले उसन्या घेतलेल्या पैशावरून झालेल्या वादातून एका तरूणास चाकूने भोसकण्यात आले. शहरातील अष्टविनायकनगरमध्ये हा खूनी हल्लयाचा थरार घडला. या हल्ल्यात सूरज राजू कांबळे (वय १९, रा. वारणाली रस्ता, गणेश कॉलनी, सांगली) हा गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी दोघांना संजयनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निहाल रंगारी, बिलाल रंगारी (दोघे रा. गंगानगर, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. जखमी सूरज कांबळे हा पेव्हींग ब्लॉक बसवण्याचे काम करतो. त्याने संशयितांकडून पैसे उसने घेतले होते. संशयित दोघांचे चिकन विक्रीचे दुकान आहे.शनिवारी रात्री सूरज कांबळे व त्याचा मित्र आर्यन मड्डी याच्यासोबत दुचाकीवरुन (क्र. एमएच १० डीवाय९८९२ येत होते त्यावेळी अष्टविनायक नगर मधील गल्ली क्रमांक आठ मध्ये रंगारी बंधू थांबले होते दोघांनी सुरज यास हाक मारून थांबवले व उसने घेतलेले पैशाची मागणी केली त्यानंतर त्याला चाकूने भोकसले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आंब्यांची सुंदर सजावट करण्यात आली. यासाठी तब्बल १५१ डझन आंब्यांचा वापर करत आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे.
    1
    जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आंब्यांची सुंदर सजावट करण्यात आली. यासाठी तब्बल १५१ डझन आंब्यांचा वापर करत आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे.
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • रत्नागिरी जिल्ह्यात महामार्गाच्या ठेकेदाराने केलेल्या कामातील चुकीमुळे एक संपूर्ण गाव पाण्याखाली गेले आहे. यामुळे स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
    1
    रत्नागिरी जिल्ह्यात महामार्गाच्या ठेकेदाराने केलेल्या कामातील चुकीमुळे एक संपूर्ण गाव पाण्याखाली गेले आहे. यामुळे स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
    user_Sm7news
    Sm7news
    Farmer Chandgad, Kolhapur•
    8 hrs ago
  • भोर कापूरहोळ मार्गावरील नेकलेस पॉईंट परिसरात मोटारीचा अपघात; एकजण गंभीर जखमी विक्रम शिंदे /भोर दि.११ भोर कापूरहोळ मार्गावरील नेकलेस पॉईंट परिसरात खंडोबाचा माळ येथे तीव्र उतार आणि वळणाचा अंदाज न आल्याने एर्तिगा मोटार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पडल्याची घटना आज दि.11 दुपारी 1 च्या दरम्यान घडली आहे.अपघातात एकजण जखमी असून गाडीचे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले.
    2
    भोर कापूरहोळ मार्गावरील नेकलेस पॉईंट परिसरात मोटारीचा अपघात; एकजण गंभीर जखमी 
विक्रम शिंदे /भोर दि.११
भोर कापूरहोळ मार्गावरील नेकलेस पॉईंट परिसरात खंडोबाचा माळ येथे तीव्र उतार आणि वळणाचा अंदाज न आल्याने  एर्तिगा मोटार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पडल्याची घटना आज दि.11 दुपारी 1 च्या दरम्यान घडली आहे.अपघातात एकजण जखमी असून गाडीचे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • इथं सरकारी पैशानं पंचपकवान्न झोडता येत नाही, स्वाभिमानाची चटणी भाकर खाता येते ज्याची चव मेंदूत आणि जिभेवर रेंगाळत रहाते
    1
    इथं सरकारी पैशानं पंचपकवान्न झोडता येत नाही, स्वाभिमानाची चटणी भाकर खाता येते ज्याची चव मेंदूत आणि जिभेवर रेंगाळत रहाते
    user_संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    Local Politician जावळी, सातारा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • राहुल गांधींसारखा 'बुद्धू' राजकारणी मी पाहिला नाही; नारायण राणेंचा घणाघात ​ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन टंचाई आणि सोने खरेदीबाबत केलेल्या वक्तव्यावर राहुल गांधी आणि एकनाथ खडसे यांनी केलेल्या टीकेला माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "राहुल गांधींना जागतिक अर्थव्यवस्थेचे अज्ञान असून त्यांच्यासारखा 'बुद्धू' राजकारणी मी आजवर पाहिला नाही," अशा शब्दांत राणेंनी राहुल गांधींवर निशाणा साधला. ​अर्थव्यवस्थेचे अज्ञान आणि राहुल गांधींवर टीका ​पंतप्रधानांच्या विधानावर राहुल गांधींनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना राणे म्हणाले की, जेव्हा एखादा देश आयात कमी करतो आणि निर्यात वाढवतो, तेव्हाच त्याची अर्थव्यवस्था मजबूत होते आणि जीडीपी वाढतो. हे साधे गणित राहुल गांधींना समजत नाही. ​"लोकसभेत राहुल गांधी ज्या प्रकारे वावरतात आणि बोलतात, त्यावरून त्यांना पंतप्रधानांशी कसं बोलायचं हे देखील कळत नाही. त्यांनी काँग्रेसच्या राजवटीत काही चांगलं केलं असतं, तर आज त्यांच्या पक्षाची ही दयनीय अवस्था झाली नसती," असेही राणे म्हणाले. ​तसेच, एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, भाजपने बाहेर काढल्यामुळे आता त्यांना शहाणपण सुचत असून, त्यांना आता निवृत्तीचे वेध लागले आहेत. ​इंधन बचत: पंतप्रधानांच्या आवाहनाचे स्वागत ​पंतप्रधानांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांना आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करून इंधन बचतीचा जो संदेश दिला आहे, त्याचे राणेंनी स्वागत केले. ते म्हणाले की, पेट्रोल-डिझेलची समस्या ही देशापुढील मोठी समस्या आहे. मंत्री स्वतःहून गाड्यांची मागणी करत नाहीत, तर सुरक्षा व्यवस्थेनुसार ताफा दिला जातो. मात्र, पंतप्रधानांनी दिलेले मार्गदर्शन योग्य असून अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी यात पुढाकार घेणे गरजेचे आहे. ​राजू शेट्टींच्या आंदोलनावर टोला ​स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी १५ मे रोजी 'वर्षा' बंगल्यावर काढणाऱ्या मोर्चाबाबत बोलताना राणे यांनी त्यांना टोला लगावला. ​शेट्टींचे काम: "राजू शेट्टींना आंदोलनाशिवाय दुसरे काहीच माहित नाही. ते ना शेती करतात, ना धंदा. फक्त काहीतरी करायचं म्हणून ते आंदोलन करतात," असे राणे म्हणाले. ​शेतकरी मदत: कोकणातील आंबा आणि काजू पिकांच्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन काही निधी मंजूर केला आहे. ही मदत शेवटची नसून जून महिन्यात ती वाढवून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ​शेवटी, राजू शेट्टी माझे मित्र आहेत आणि त्यांना योग्य वेळी मी नक्कीच सल्ला देईन, असेही राणे यांनी मिश्किलपणे नमूद केले.
    1
    राहुल गांधींसारखा 'बुद्धू' राजकारणी मी पाहिला नाही; नारायण राणेंचा घणाघात

​
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन टंचाई आणि सोने खरेदीबाबत केलेल्या वक्तव्यावर राहुल गांधी आणि एकनाथ खडसे यांनी केलेल्या टीकेला माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "राहुल गांधींना जागतिक अर्थव्यवस्थेचे अज्ञान असून त्यांच्यासारखा 'बुद्धू' राजकारणी मी आजवर पाहिला नाही," अशा शब्दांत राणेंनी राहुल गांधींवर निशाणा साधला.
​अर्थव्यवस्थेचे अज्ञान आणि राहुल गांधींवर टीका
​पंतप्रधानांच्या विधानावर राहुल गांधींनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना राणे म्हणाले की, जेव्हा एखादा देश आयात कमी करतो आणि निर्यात वाढवतो, तेव्हाच त्याची अर्थव्यवस्था मजबूत होते आणि जीडीपी वाढतो. हे साधे गणित राहुल गांधींना समजत नाही.
​"लोकसभेत राहुल गांधी ज्या प्रकारे वावरतात आणि बोलतात, त्यावरून त्यांना पंतप्रधानांशी कसं बोलायचं हे देखील कळत नाही. त्यांनी काँग्रेसच्या राजवटीत काही चांगलं केलं असतं, तर आज त्यांच्या पक्षाची ही दयनीय अवस्था झाली नसती," असेही राणे म्हणाले.
​तसेच, एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, भाजपने बाहेर काढल्यामुळे आता त्यांना शहाणपण सुचत असून, त्यांना आता निवृत्तीचे वेध लागले आहेत.
​इंधन बचत: पंतप्रधानांच्या आवाहनाचे स्वागत
​पंतप्रधानांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांना आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करून इंधन बचतीचा जो संदेश दिला आहे, त्याचे राणेंनी स्वागत केले. ते म्हणाले की, पेट्रोल-डिझेलची समस्या ही देशापुढील मोठी समस्या आहे. मंत्री स्वतःहून गाड्यांची मागणी करत नाहीत, तर सुरक्षा व्यवस्थेनुसार ताफा दिला जातो. मात्र, पंतप्रधानांनी दिलेले मार्गदर्शन योग्य असून अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी यात पुढाकार घेणे गरजेचे आहे.
​राजू शेट्टींच्या आंदोलनावर टोला
​स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी १५ मे रोजी 'वर्षा' बंगल्यावर काढणाऱ्या मोर्चाबाबत बोलताना राणे यांनी त्यांना टोला लगावला.
​शेट्टींचे काम: "राजू शेट्टींना आंदोलनाशिवाय दुसरे काहीच माहित नाही. ते ना शेती करतात, ना धंदा. फक्त काहीतरी करायचं म्हणून ते आंदोलन करतात," असे राणे म्हणाले.
​शेतकरी मदत: कोकणातील आंबा आणि काजू पिकांच्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन काही निधी मंजूर केला आहे. ही मदत शेवटची नसून जून महिन्यात ती वाढवून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
​शेवटी, राजू शेट्टी माझे मित्र आहेत आणि त्यांना योग्य वेळी मी नक्कीच सल्ला देईन, असेही राणे यांनी मिश्किलपणे नमूद केले.
    user_MH07NEWS
    MH07NEWS
    कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • माजी नगरसेविका आशा बिऱ्हाडे यांचा तहसील कार्यालयाविरुद्ध एल्गार; जात पडताळणी फाईलमध्ये फेरफार व माहिती दडपशाहीचा गंभीर आरोप
    1
    माजी नगरसेविका आशा बिऱ्हाडे यांचा तहसील कार्यालयाविरुद्ध एल्गार; जात पडताळणी फाईलमध्ये फेरफार व माहिती दडपशाहीचा गंभीर आरोप
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • युवा नेते जय पवार यांनी बारामती येथे 'जनता दरबार' आयोजित केला. या माध्यमातून त्यांनी जनसेवेची परंपरा कायम ठेवत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
    1
    युवा नेते जय पवार यांनी बारामती येथे 'जनता दरबार' आयोजित केला. या माध्यमातून त्यांनी जनसेवेची परंपरा कायम ठेवत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार राम पाचकाळे यांनी अनोखे आंदोलन करत जाळीत उडी घेतली. आपल्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याऐवजी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी आहे. त्यांनी दोषींवर कडक कारवाई आणि कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी केली.
    1
    पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार राम पाचकाळे यांनी अनोखे आंदोलन करत जाळीत उडी घेतली. आपल्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याऐवजी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी आहे. त्यांनी दोषींवर कडक कारवाई आणि कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी केली.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) रवींद्र खेबुडकर यांनी स्वतः बेशिस्तपणे लावलेल्या दुचाकींची हवा काढल्याने खळबळ उडाली आहे. खासदार नारायण राणे यांच्या दौऱ्यापूर्वी पार्किंग शिस्त लावण्यासाठी त्यांनी हे कडक पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
    1
    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) रवींद्र खेबुडकर यांनी स्वतः बेशिस्तपणे लावलेल्या दुचाकींची हवा काढल्याने खळबळ उडाली आहे. खासदार नारायण राणे यांच्या दौऱ्यापूर्वी पार्किंग शिस्त लावण्यासाठी त्यांनी हे कडक पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
    user_MH07NEWS
    MH07NEWS
    कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.