नाशिक जिल्ह्यात ६८० मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरे; ५० हजारांहून अधिक नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ नाशिक : मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समन्वयातून जुलै महिन्यात नाशिक जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाभरात ६८० शिबिरांमधून तब्बल ५० हजार ३२२ लाभार्थ्यांनी विविध आरोग्य सेवा व मोफत तपासण्यांचा लाभ घेतला. या अभियानात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा परिषद, नाशिक महानगरपालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आरोग्य संस्था, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, एचपीसीएल, रोटरी क्लब, आयएमए तसेच विविध स्वयंसेवी संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदविला. जिल्हा परिषदेमार्फत सर्वाधिक ५०१ शिबिरे घेण्यात आली असून ३४ हजार ८७० लाभार्थ्यांना आरोग्य सेवा देण्यात आली. नाशिक महानगरपालिकेने १०८ शिबिरांतून ९ हजार ८७३, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने ३१ शिबिरांतून ५ हजार ७२८, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ४४ उपक्रमांतून ३ हजार ४७४ लाभार्थ्यांची तपासणी केली. निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून आयोजित २० विशेष रक्तदान शिबिरांमध्ये ३४९ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. शिबिरांमध्ये हृदयरोग, कर्करोग, मधुमेह, रक्तदाब, नेत्र, कान-नाक-घसा, त्वचारोग, दंतरोग तसेच माता-बाल आरोग्याशी संबंधित तपासण्या करण्यात आल्या. गरजेनुसार ईसीजी, रक्त तपासणी, मॅमोग्राफी, पॅप स्मिअर आदी तपासण्या करून गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. तसेच आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्ह्यातील सुमारे २४० आरोग्य संस्थांच्या सहभागातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा उद्देश प्रभावीपणे साध्य झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा विशेष कार्यकारी अधिकारी (मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष) रोहितकुमार राजपूत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
नाशिक जिल्ह्यात ६८० मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरे; ५० हजारांहून अधिक नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ नाशिक : मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समन्वयातून जुलै महिन्यात नाशिक जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाभरात ६८० शिबिरांमधून तब्बल ५० हजार ३२२ लाभार्थ्यांनी विविध आरोग्य सेवा व मोफत तपासण्यांचा लाभ घेतला. या अभियानात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा परिषद, नाशिक महानगरपालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आरोग्य संस्था, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, एचपीसीएल, रोटरी क्लब, आयएमए तसेच विविध स्वयंसेवी संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदविला. जिल्हा परिषदेमार्फत सर्वाधिक ५०१ शिबिरे घेण्यात आली असून ३४ हजार ८७० लाभार्थ्यांना आरोग्य सेवा देण्यात आली. नाशिक महानगरपालिकेने १०८ शिबिरांतून ९ हजार ८७३, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने ३१ शिबिरांतून ५ हजार ७२८, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ४४ उपक्रमांतून ३ हजार ४७४ लाभार्थ्यांची तपासणी केली. निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून आयोजित २० विशेष रक्तदान शिबिरांमध्ये ३४९ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. शिबिरांमध्ये हृदयरोग, कर्करोग, मधुमेह, रक्तदाब, नेत्र, कान-नाक-घसा, त्वचारोग, दंतरोग तसेच माता-बाल आरोग्याशी संबंधित तपासण्या करण्यात आल्या. गरजेनुसार ईसीजी, रक्त तपासणी, मॅमोग्राफी, पॅप स्मिअर आदी तपासण्या करून गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. तसेच आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्ह्यातील सुमारे २४० आरोग्य संस्थांच्या सहभागातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा उद्देश प्रभावीपणे साध्य झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा विशेष कार्यकारी अधिकारी (मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष) रोहितकुमार राजपूत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
- येडशीच्या हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आजपासून प्रारंभ; तीन दिवस भक्ती, कव्वाली आणि धार्मिक सलोख्याचा सोहळा येडशीच्या हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आजपासून प्रारंभ; तीन दिवस भक्ती, कव्वाली आणि धार्मिक सलोख्याचा सोहळा येडशी | प्रतिनिधी सुभान शेख धाराशिव तालुक्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडशी येथील हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आज (31 जुलै) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. 31 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय धार्मिक सोहळ्यासाठी दर्गा परिसर आकर्षक सजावटीने उजळून निघाला असून जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भाग तसेच परराज्यातूनही हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत. श्रद्धा, भक्ती, बंधुता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा ऊरूस दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. हजरत जमादार बाबा रहे यांच्या दर्ग्याला विविध धर्मीय भाविकांची अखंड श्रद्धा लाभलेली आहे. त्यामुळे हा ऊरूस केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. या तीन दिवसांच्या कालावधीत धार्मिक विधींसह विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ऊरूसाच्या पहिल्या दिवशी 31 जुलै रोजी पारंपरिक संदल मिरवणूक मोठ्या भक्तिमय वातावरणात काढण्यात येणार आहे. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्ये, धार्मिक घोषणांनी परिसर दुमदुमून जाणार असून भाविक मोठ्या श्रद्धेने या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. दर्गा परिसरात विशेष रोषणाई आणि सजावट करण्यात आली असून भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 1 ऑगस्ट रोजी ऊर्स शरीफ, कव्वालीची रंगतदार मैफल आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सुप्रसिद्ध कव्वालांच्या जुगलबंदीची विशेष मैफल रंगणार आहे. भोकरदनचे प्रसिद्ध कव्वाल आसिफ अली आणि मिरजच्या प्रसिद्ध कव्वाल रेश्मा ताज यांच्यात भक्तिरसाने ओतप्रोत भरलेली कव्वालीची जुगलबंदी होणार असून, या मैफलीची भाविकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. सूफी परंपरेतील भक्तिगीते आणि आध्यात्मिक संदेशांनी सजलेली ही मैफल रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविक घेणार असून, समाजातील सर्व स्तरातील नागरिक एकत्र येऊन बंधुभावाचा संदेश देणार आहेत. ऊरूसाच्या निमित्ताने परिसरात विविध खाद्यपदार्थांची दुकाने, धार्मिक साहित्याची विक्री, खेळणी तसेच लहान-मोठ्या व्यावसायिकांची दुकानेही उभारण्यात आल्याने यात्रेचे स्वरूप अधिक आकर्षक झाले आहे. 2 ऑगस्ट रोजी जियारत कार्यक्रमाने या धार्मिक सोहळ्याची सांगता होणार आहे. या दिवशी भाविक दर्ग्यात दर्शन घेऊन चादर अर्पण करतील तसेच देशात शांतता, सौहार्द आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात येईल. ऊरूसाच्या काळात भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने प्रशासनाकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्वयंसेवक आणि ऊरूस समितीचे सदस्य भाविकांच्या सेवेसाठी सतत कार्यरत राहणार आहेत. हजरत जमादार बाबा रहे यांच्या ऊरूसाची अनेक दशकांची परंपरा असून, या सोहळ्यामुळे धार्मिक ऐक्य, सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ होत असल्याचे भाविकांनी सांगितले. विविध धर्मीय नागरिक या ऊरूसात सहभागी होऊन परस्परांतील प्रेम, बंधुता आणि एकतेचे दर्शन घडवितात, ही या सोहळ्याची मोठी वैशिष्ट्ये आहेत. ऊरूस समितीने जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील भाविकांना या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रम, कव्वालीची मैफल, महाप्रसाद आणि जियारतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. श्रद्धा, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारा हा तीन दिवसीय ऊरूस येडशी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण करणार असून भाविकांसाठी तो एक अविस्मरणीय आध्यात्मिक पर्व ठरणार आहे.2
- टाकेदेवगावचे सुपूत्र मंत्रालयाचे सचिव संतोष खोरगडे साहेब ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त टाकेदेवगावचे सुपूत्र मंत्रालयाचे सचिव संतोष खोरगडे साहेब ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त; त्र्यंबकेश्वर तालुक्यात आनंदाचे वातावरणत्र्यंबकेश्वर:नाशिक जिल्ह्याचा मानबिंदू आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेदेवगावचे सुपुत्र आदरणीय श्री. संतोष खोरगडे साहेब हे मंत्रालयातील उच्च व तंत्रशिक्षण 'सचिव' या सर्वोच्च पदावरून ३५ वर्षांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेनंतर सन्मानाने सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या या गौरवशाली कामगिरीमुळे संपूर्ण त्र्यंबकेश्वर तालुका आणि नाशिक जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.श्री. खोरगडे साहेब यांनी आपल्या ध्येयवादी प्रशासकीय कारकिर्दीच्या जोरावर आपल्या जन्मभूमीचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात उज्ज्वल केले. त्यांनी प्रशासनात बजावलेली उल्लेखनीय सेवा आणि त्यांचे मार्गदर्शन येथील तरुण पिढीसाठी व मातीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल, अशा भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.त्यांच्या या गौरवशाली निवृत्तीनिमित्त आणि भावी आयुष्यासाठी नाशिक जिल्हा पत्रकार व लाईव्ह महाराष्ट्र टाइम्सचे तळोदा वृत्तांकन प्रतिनिधी श्री. भगवान आचारी (मु.पो. अस्वली हर्ष, ता. त्र्यंबकेश्वर) यांनी खोरगडे साहेबांना पुढील आनंदी, सुदृढ आणि दीर्घायुषी सेवानिवृत्त जीवनाच्या मनःपूर्वक व हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.2
- वणी ता दिंडोरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी दिंडोरी तालुक्यातील वनी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास आबा कड ; किरण गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते सागर चौधरी ;रवी भाऊ सोनवणे पोलीस प्रशासनाच्या वतीने ग्रेड पीएसआय सोनवणे व पोलीस हवालदार बागुल आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते . यावेळेस महामानवांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावर्षी प्रथमच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केल्याने कार्यकर्त्यांचे वनी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य किरण गांगुर्डे यांनी कौतुक केले यावेळेस परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . जागर जनस्थान साठी शामराव सोनवणे दिंडोरी1
- भूकंपाच्या पार्श्वभूमीवर खासदार भास्कर भगरे यांची सराड आश्रमशाळेत पाहणी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर खासदार भास्कर भगरे यांची सराड आश्रमशाळेत पाहणी बोरगाव : सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात जाणवलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी शासकीय आश्रमशाळा सराड येथे भेट देऊन शाळेच्या इमारतीची तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची पाहणी केली. भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शासकीय आश्रमशाळा सराड येथे मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार भगरे यांनी शाळेत प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांचे निवासस्थान तसेच इमारतीची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शिक्षक व शाळा प्रशासनाकडून माहिती घेतली.यावेळी सुरगाण्याचे तहसीलदार रामजी राठोड, सराडचे सरपंच नामदेव भोये, जनार्दन भोये, हरिभाऊ भोये यांच्यासह ग्रामस्थ व संबंधित अधिकारी उपस्थित होते भूकंपाच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या इमारतीची तांत्रिक तपासणी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात यावे, अशी भूमिका यावेळी खासदार भगरे यांनी व्यक्त केली. भूकंपाच्या धक्क्यानंतर खासदारांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्याने विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांमध्ये काही प्रमाणात दिलासाचे वातावरण निर्माण झाले आहे.1
- केशव सृष्टी तर्फे जिल्हा परिषद केंद्र शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील केशव सृष्टीतर्फे जिल्हा परिषद केंद्र शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलेले आहे शैक्षणिक साहित्य मध्ये मुलांना सुंदर अशी पुस्तक ठेवण्यासाठी बॅग वह्या अशा प्रकारचे साहित्य देण्यात आलेले आहे समाजाची बांधिलकी राखत गोरगरिबांची आदिवासींची मुलं पुढे जाऊयात हा त्यांचा आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्याची कमी पडू नये असा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे3
- येवला विंचूर चौफुलीवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत ५० वर्षीय महिला जागीच ठार येवला विंचूर चौफुलीवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत ५० वर्षीय महिला जागीच ठार येवला: येवला शहरातील विंचूर चौफुली पोलीस चौकीसमोर रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकच्या धडकेत निर्मला बाळासाहेब भिसे (वय ५०, रा. पैलवान गल्ली, येवला) या महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने धाव घेत मृतदेह येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी येवला शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. विंचूर चौफुली ते फत्तेबुरुज नाका परिसरात रस्त्यावर एकही दिशाफलक (Signboard) लावण्यात आलेला नाही. परिणामी, चालकांना अचानक ब्रेक मारावे लागतात किंवा वाहने मागे-पुढे करावी लागतात, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळेच एका निष्पाप महिलेचा जीव गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, चौफुलीवर तातडीने दिशाफलक बसवण्याची जोरदार मागणी होत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- 🅱️सुवर्णपदक विजेता दिलीप गावीत ची मुलाखत! पहा विजेता होतानाचा एक क्षण 🌷👍 सौजन्य सोसिशल मीडिया 🅱️सुवर्णपदक विजेता दिलीप गावीत ची मुलाखत! पहा विजेता होतानाचा एक क्षण 🌷👍 सौजन्य सोसिशल मीडिया2
- श्रमजीवी संघटनेचा पंचायत समिती जव्हार कार्यालयावर ताटली आंदोलन जिल्हा परिषद शाळे मध्ये मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत नाही जव्हार तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी शिक्षक कमी तर शिक्षकांना अतिरिक्त प्रशासनाने दिलेली कामे याचा फटका विदयार्थ्यांच्या शिक्षणावर होतो. अशातच जि. प. शाळांना मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचा धान्य पुरवठा होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा निषेधार्थ श्रमजीवी संघटनाच्या वतीने ताटली आंदोलन करण्यात आले. संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित गायकवाड,गोविंद गावित ता. संघटक,संतोष धिंढा तालूका सचिव यांच्या नेतृत्वात निघालेल्या ताटली आंदोलनात, आदिवासी कष्टकरी ढोर नाही माणूस आहे,माणुसकीची भीक नको, आम्हाला आमचा हक्क हवा अशा घोषणा देत कार्यकर्ते व हजारो पालक व विध्यार्थी सहभागी झाले. संघटण्याच्या म्हणण्यानुसार धान्य नियमित मिळत नसल्याने त्या ठिकाणी बचत गट किंवा वैयक्तिक महिला यांना पोषण आहार स्वखर्चाने धान्य विकत घेऊन शिजवून दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा व भविष्याचा विचार करून प्रशासनाने तातडीने माध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत चालू करावा नाहीतर या पुढचे आंदोलन अधिक तीव्र करनार अशा इशारा संघटनेच्या वतीन देण्यात आला.1