logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर डिजिटलवर; भव्य स्टारकास्टमुळे उत्सुकता शिगेला कोल्हापूर ०२ सिटी न्यूज नेटवर्क जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित ‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक टीझर’ अखेर डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. नुकताच ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटासोबत चित्रपटगृहांमध्ये विशेषरीत्या प्रदर्शित करण्यात आलेल्या या टीझरला थिएटरमध्ये टाळ्या आणि जल्लोषाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. सोशल मीडियावरही प्रेक्षकांनी टीझर बद्दल प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता हाच टीझर डिजिटल माध्यमातून प्रदर्शित होतो आहे, भारताच्या सर्वश्रेष्ठ महान अश्या राजाची भव्य झलक अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असून, चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून त्यांच्या पराक्रम, स्वाभिमान आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणादायी प्रवासाचे भव्य चित्रण यात करण्यात आले आहे. अभिनेता रितेश विलासराव देशमुख यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून मुख्य भूमिका देखील साकारली आहे. त्यांच्या दिग्दर्शनातून ऐतिहासिक विषयाला आधुनिक सिनेमॅटिक भव्यतेची जोड देण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो. या चित्रपटाची एक मोठी जमेची बाजू म्हणजे त्याची दमदार स्टारकास्ट. संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बमन ईरानी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद जोशी,अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख , आणि रितेश विलासराव देशमुख यांसारख्या दिग्गज कलाकारांची फळी या चित्रपटात एकत्र आली आहे. यात थरारक ॲक्शन दृश्ये, वेधक आणि भावनिक नाट्य, दमदार संवाद आणि अंगावर रोमांच उभे करणारे संगीत यामुळे हा चित्रपट केवळ एक ऐतिहासिक कथा न राहता एक भव्य सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी दिलेले दर्जेदार संगीत, तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी असल्यामुळे ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट मराठीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट तर आहेच याशिवाय भारताच्या ऐतिहासिक वारस्याला जागतिक स्तरावर सादर करण्याची क्षमता ठेवतो. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या टीझरला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद हा या चित्रपटाबद्दलच्या प्रेक्षकांच्या अपेक्षांचा ठोस पुरावा आहे. खचाखच भरलेल्या थिएटर्समध्ये उमटलेल्या टाळ्या, शिट्ट्या आणि जल्लोष यावरून ‘राजा शिवाजी’च्या ऐतिहासिक विश्वात रममाण होण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत, हे स्पष्ट होते. आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर हा टीझर आणखी मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचत असून, या भव्य चित्रपटाच्या यशस्वी प्रवासाची दमदार सुरुवात ठरत आहे. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट एका प्रेरणादायी कथा असून हा चित्रपट भाषेच्या सीमा ओलांडत जागतिक स्तरावर सादर करण्याचे निर्मात्यांचे उद्दिष्ट आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी या बॅनरखाली ज्योती देशपांडे व जिनिलीया देशमुख यांनी निर्मिती केली आहे. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या उदयाला समर्पित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भव्य, प्रेरणादायी आणि अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.

5 hrs ago
user_E city news network
E city news network
Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
5 hrs ago
d5f1cf07-272c-4aa4-8e0c-2b4a64fa40db

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कोल्हापूर: बोंद्रेनगर रोडवरील गंगाई लॉन जवळील एका सुपर बाजारला आज सकाळी भीषण आग लागली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीची भीषणता पाहता सुपर बाजारचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे. या घटनेचा अधिक तपशील अद्याप समजू शकलेला नाही. पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
    1
    कोल्हापूर: बोंद्रेनगर रोडवरील गंगाई लॉन जवळील एका सुपर बाजारला आज सकाळी भीषण आग लागली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीची भीषणता पाहता सुपर बाजारचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे.
या घटनेचा अधिक तपशील अद्याप समजू शकलेला नाही. पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
    user_Journalist Ajay
    Journalist Ajay
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर येथे जुन्या वादातून एका व्यापाऱ्याला अडवून धमकावण्यात आले आणि त्याच्या दुचाकीची तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
    1
    कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर येथे जुन्या वादातून एका व्यापाऱ्याला अडवून धमकावण्यात आले आणि त्याच्या दुचाकीची तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
    user_News reporter मुबारक शेख
    News reporter मुबारक शेख
    हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • सुषमा अंधारे यांनी खरात व दीपक आबा साळुंखे यांच्या संबंधाबद्दल वक्तव्य केले होते त्याला दीपक आबा साळुंखे यांनी प्रत्युत्तर दिले.
    1
    सुषमा अंधारे यांनी  खरात व दीपक आबा साळुंखे यांच्या संबंधाबद्दल वक्तव्य केले होते त्याला दीपक आबा साळुंखे यांनी प्रत्युत्तर दिले.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • जावली तालुक्यात विज व वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा धुरंधर पाउस. नागरिकांचे जनजीवन विस्कळित.
    1
    जावली तालुक्यात विज व वादळी वाऱ्यासह 
जोरदार गारांचा धुरंधर पाउस.
नागरिकांचे जनजीवन विस्कळित.
    user_महाराष्ट्राची जनता न्युज. साता
    महाराष्ट्राची जनता न्युज. साता
    Salesperson जावळी, सातारा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.२ भोर तालुक्यातील वडगाव डाळ येथे राज्याचे कृषी मंत्री दतात्रय भरणे यांनी भर पावसात केली नुकसान ग्रस्त शेतीची पहाणी केली आहे.मागील दोन तीन दिवसांपासून भोर तालुक्याला अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.बऱ्याच ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे.तसेच शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल आहे या पार्श्वभूमीवर आज दि.२ कृषीमंत्री भरणे यांनी भेट देत नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला तसेच पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.२
भोर तालुक्यातील वडगाव डाळ येथे राज्याचे कृषी मंत्री दतात्रय भरणे यांनी भर पावसात केली  नुकसान ग्रस्त शेतीची पहाणी केली आहे.मागील दोन तीन दिवसांपासून भोर तालुक्याला अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.बऱ्याच ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे.तसेच शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल आहे या पार्श्वभूमीवर आज दि.२ कृषीमंत्री भरणे यांनी भेट देत नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला तसेच पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • BARAMATI BREAKING : बारामती तालुक्यात आज गारांसह जोरदार पावसानं हजेरी लावली.. यात मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे.. त्यामुळं शेतकरी धास्तावले असून शासन आता काय निर्णय घेतं याकडे लक्ष लागलं आहे..
    1
    BARAMATI BREAKING : बारामती तालुक्यात आज गारांसह जोरदार पावसानं हजेरी लावली.. यात मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे.. त्यामुळं शेतकरी धास्तावले असून शासन आता काय निर्णय घेतं याकडे लक्ष लागलं आहे..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    1
    Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • सांगोला तालुका वाटंबरे येथे आज आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर मका व इतर पिकांचे नुकसान झाले तसेच मोठमोठे झाडे उन्मळून पडली.
    1
    सांगोला तालुका वाटंबरे येथे आज आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर मका व इतर पिकांचे नुकसान झाले तसेच मोठमोठे झाडे उन्मळून  पडली.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.