logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव; सलग चौथ्या वर्षी 100% निधी खर्च जळगाव, दि. 1 एप्रिल : जिल्हा वार्षिक योजना (DPDC) अंतर्गत निधीच्या प्रभावी नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणीमुळे जळगाव जिल्हा राज्यात सलग चौथ्यांदाअव्वल ठरला असून, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण/ आदिवासी घटक (TSP/OTSP) व अनुसूचित जाती (SCP) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात विविध शासकीय विभागांच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 834 कोटी 61 लाख 89 हजार रुपयांचा संपूर्ण निधी 100 टक्के खर्च करण्यात प्रशासनाला यश आले आहे. विशेष म्हणजे, सलग चौथ्या वर्षी हा विक्रम प्रस्थापित झाला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे व वस्त्र उद्योगमंत्री संजय सावकारे तसेच खासदार व सर्व आमदार यांच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाने हे यश प्राप्त केले आहे. भविष्यातही विकासकामांना गती देत जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा निर्धार प्रशासनाने यावेळी व्यक्त केला.* यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले की, “100 टक्के निधी खर्च हा जनतेच्या विश्वासाचा सन्मान आहे. प्रशासनाने नियोजनबद्ध काम करत हा विश्वास जपला आहे. , नियोजन आणि टीमवर्कचा हे यश असून प्रत्येक रुपया हा जनतेचा असून तो योग्य ठिकाणी खर्च झाला पाहिजे, ही प्रशासनाची सतत भूमिका राहिली आहे.” “सलग चार वर्ष 100 टक्के निधी खर्च करणे ही प्रशासनाची मोठी कामगिरी आहे. यामागे सर्व विभागांचा समन्वय, अधिकारी व कर्मचाऱ्यांची मेहनत मेहनत आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी आहे. आज करण्यात आलेला सत्कार हा केवळ सन्मान नसून, पुढील काळात आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरणा आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत चालू आर्थिक वर्षात उपलब्ध होणाऱ्या निधीचा नियोजनबद्ध वापर करून विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, सर्व विभागांनी समन्वयाने काम करून जिल्ह्याच्या विकासाला यापुढेही हातभार लावावा, असेही आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. प्रशासनाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये जिल्हाधिकारी रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, पोलीस अधीक्षकडॉ .महेश्वर रेड्डी , महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे तसेच जिल्हा नियोजन अधिकारी भरत साळुंखे , जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील, यावल प्रकल्प संचालक अरुण पवार व विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश होता. यावेळी संपूर्ण प्रशासनाच्या टीमचा प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला. जिल्ह्यासाठी मंजूर निधीपैकी सर्वसाधारण घटकासाठी 677 कोटी रुपये, अनुसूचित जाती घटक (SCP) साठी 93 कोटी रुपये आणि आदिवासी घटक (TSP/OTSP) साठी 64 कोटी 61 लाख 89 हजार रुपये असा एकूण 834 कोटी 61 लाख 89 हजार रुपयांचा निधी पूर्णतः खर्च करण्यात आला. या निधीच्या माध्यमातून विविध विकासकामांना गती मिळत असून, ग्रामीण तसेच शहरी भागात अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. *सन 2026 – 27 साठी मंजूर नियतव्य 900 कोटी* सन 2026 27 या आर्थिक वर्षात एकूण 900 कोटी 05 लक्ष रुपयांचा निधीच्या आराखड्यास शासनाने मान्यता दिली. मागील वर्षाच्या तुलनेत 65 कोटी 43 लाख 11 हजार इतक्या निधीची वाढ झालेली आहे.

4 hrs ago
user_Kiran Mali
Kiran Mali
Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
4 hrs ago
b1f576ec-73f3-4970-bb20-108565de9011

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जळगाव खान्देश मध्ये मुसळधार पाऊस पावसामुळे नागरिक व पब्लिक हॉकर्स आणि शेतकरी परेशान पिकांचे नुकसान हा अवकाळी पाऊस खानदेशासाठी धोकादायक/जय महाराष्ट्र /जय श्रीराम
    1
    जळगाव खान्देश मध्ये मुसळधार पाऊस पावसामुळे नागरिक व  पब्लिक हॉकर्स आणि शेतकरी परेशान पिकांचे नुकसान हा अवकाळी पाऊस खानदेशासाठी धोकादायक/जय महाराष्ट्र /जय श्रीराम
    user_गणेश मौर्य
    गणेश मौर्य
    मुक्ताईनगर, जळगाव, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by Hiralal Barde
    1
    Post by Hiralal Barde
    user_Hiralal Barde
    Hiralal Barde
    Amalner, Jalgaon•
    22 hrs ago
  • किरकोळ वादातून रांजणगाव येथे टोळक्याकडून लाकडी बॅटने मारहाण; गुन्हा दाखल रांजणगाव (ता. पैठण) येथे किरकोळ वादातून एका व्यक्तीवर टोळक्याने लाकडी बॅटने हल्ला केल्याची घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
    1
    किरकोळ वादातून रांजणगाव येथे टोळक्याकडून लाकडी बॅटने मारहाण; गुन्हा दाखल
रांजणगाव (ता. पैठण) येथे किरकोळ वादातून एका व्यक्तीवर टोळक्याने लाकडी बॅटने हल्ला केल्याची घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यातील नरडाणा जवळ एक भीषण अपघात घडला असून डंपरने दोन दुचाकींना चिरडल्याने तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
    1
    मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यातील नरडाणा जवळ एक भीषण अपघात घडला असून डंपरने दोन दुचाकींना चिरडल्याने तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • पत्रकार रामेश्वर दरेकर साहेब यांच्यावरील कारवाई आणि त्याविरोधात 'ऑल इंडिया पँथर सेने'ने घेतलेली आक्रमक भूमिका हा विषय सध्या लोकशाहीतील 'चौथ्या स्तंभा'च्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी ​प्रश्नांची भीती वाटते का? एखाद्या पत्रकाराने शेतकऱ्यांच्या किंवा कष्टकऱ्यांच्या व्यथा मांडल्या तर ते 'गुन्हा' कसे ठरतात? सरकारला जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा प्रश्न विचारणाऱ्याचा आवाज दाबणे सोपे वाटते का? ​लोकशाही की हुकूमशाही? संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करण्याऐवजी, कायद्याचा धाक दाखवून पत्रकारांना गप्प करणे ही अघोषित आणीबाणी नाही का? ​कारवाईचा निकष काय? ज्या वेगाने पत्रकारांवर गुन्हे दाखल होतात, त्याच वेगाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा कष्टकऱ्यांचे शोषण थांबवण्यासाठी सरकार पावले का उचलत नाही? कारवाईचा रोख नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहणाऱ्यांकडेच का असतो? ​दडपशाहीने प्रश्न सुटतील का? रामेश्वर दरेकर यांच्यासारख्या पत्रकाराला कायदेशीर कचाट्यात अडकवून तुम्ही प्रश्न संपवू पाहत आहात की ते अधिक प्रखर करू पाहत आहात? ही दडपशाही जनतेचा असंतोष वाढवणारी ठरणार नाही का? ​पोलिस प्रशासनाचा राजकीय वापर? सामान्यांचा आवाज उठवणाऱ्यांविरुद्ध पोलिस यंत्रणेचा वापर करणे हा सत्तेचा दुरुपयोग नाही का? ऑल इंडिया पँथर सेनेने उपस्थित केलेले प्रश्न हे केवळ एका संघटनेचे नसून संपूर्ण लोकशाही प्रेमी जनतेचे आहेत, त्याचे उत्तर सरकार कधी देणार? ​ लोकशाहीत टीका सहन करण्याची क्षमता हा सत्तेचा दागिना असतो. जेव्हा लेखणीवर निर्बंध येतात, तेव्हा समाज अधोगतीकडे जातो. रामेश्वर दरेकर यांच्यावरील कारवाईचा निषेध करणे हा केवळ एका व्यक्तीचा बचाव नसून, तो 'बोलण्याच्या स्वातंत्र्याचा' बचाव आहे. ​या प्रकरणात सरकारने केवळ कारवाई मागे न घेता, पत्रकारांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. ​
    1
    पत्रकार रामेश्वर दरेकर साहेब यांच्यावरील कारवाई आणि त्याविरोधात 'ऑल इंडिया पँथर सेने'ने घेतलेली आक्रमक भूमिका हा विषय सध्या लोकशाहीतील 'चौथ्या स्तंभा'च्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी 
​प्रश्नांची भीती वाटते का?
एखाद्या पत्रकाराने शेतकऱ्यांच्या किंवा कष्टकऱ्यांच्या व्यथा मांडल्या तर ते 'गुन्हा' कसे ठरतात? सरकारला जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा प्रश्न विचारणाऱ्याचा आवाज दाबणे सोपे वाटते का?
​लोकशाही की हुकूमशाही?
संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करण्याऐवजी, कायद्याचा धाक दाखवून पत्रकारांना गप्प करणे ही अघोषित आणीबाणी नाही का?
​कारवाईचा निकष काय?
ज्या वेगाने पत्रकारांवर गुन्हे दाखल होतात, त्याच वेगाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा कष्टकऱ्यांचे शोषण थांबवण्यासाठी सरकार पावले का उचलत नाही? कारवाईचा रोख नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहणाऱ्यांकडेच का असतो?
​दडपशाहीने प्रश्न सुटतील का?
रामेश्वर दरेकर यांच्यासारख्या पत्रकाराला कायदेशीर कचाट्यात अडकवून तुम्ही प्रश्न संपवू पाहत आहात की ते अधिक प्रखर करू पाहत आहात? ही दडपशाही जनतेचा असंतोष वाढवणारी ठरणार नाही का?
​पोलिस प्रशासनाचा राजकीय वापर?
सामान्यांचा आवाज उठवणाऱ्यांविरुद्ध पोलिस यंत्रणेचा वापर करणे हा सत्तेचा दुरुपयोग नाही का? ऑल इंडिया पँथर सेनेने उपस्थित केलेले प्रश्न हे केवळ एका संघटनेचे नसून संपूर्ण लोकशाही प्रेमी जनतेचे आहेत, त्याचे उत्तर सरकार कधी देणार?
​
लोकशाहीत टीका सहन करण्याची क्षमता हा सत्तेचा दागिना असतो. जेव्हा लेखणीवर निर्बंध येतात, तेव्हा समाज अधोगतीकडे जातो. रामेश्वर दरेकर यांच्यावरील कारवाईचा निषेध करणे हा केवळ एका व्यक्तीचा बचाव नसून, तो 'बोलण्याच्या स्वातंत्र्याचा' बचाव आहे.
​या प्रकरणात सरकारने केवळ कारवाई मागे न घेता, पत्रकारांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याची  कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
​
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    पत्रकार सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • रिपोर्टर सिल्लोड मुजीब शेख
    1
    रिपोर्टर सिल्लोड मुजीब शेख
    user_Mujeeb Shaikh
    Mujeeb Shaikh
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    1
    Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    user_अब तक न्यूज महाराष्ट्र
    अब तक न्यूज महाराष्ट्र
    Farmer भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Jansagar 9 Marathi
    1
    Post by Jansagar 9 Marathi
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Bhokardan, Jalna•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.