उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची सुरेंद्र गुदगे यांचेकडून सदिच्छा भेट उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची सुरेंद्र गुदगे यांचेकडून सदिच्छा भेट मायणी दि.१2:- प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ना. श्रीमती सुनेत्राताई पवार यांची मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे व मायणी अर्बन बँकेचे चेअरमन श्री. सुरेंद्र गुदगे यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत मायणी परिसरातील शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील प्रश्नांसह विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर सुनेत्राताई पवार यांची भेट घेताना सुरेंद्र गुदगे यांनी मायणी परिसरातील शेती, पाणी आणि रस्ते विकास यांबाबत उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. प्रामुख्याने मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागात राबवले जाणारे शैक्षणिक उपक्रम आणि मायणी अर्बन बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात होत असलेली प्रगती याबाबत त्यांना आढावा दिला. याभेटीदरम्यान सुनेत्राताई पवार यांनी मायणी परिसरात सुरू असलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचे कौतुक करताना भागातील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे सुरेंद्र गुदगे यांनी सांगितले. "राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या अभ्यासू आणि संयमी नेतृत्वाचा फायदा ग्रामीण भागातील विकासकामांना नक्कीच होईल." — श्री. सुरेंद्र गुदगे (चेअरमन, मायणी अर्बन बँक)

- Post by मन्सूर शेख1
- चेन्नईत भोरच्या श्लोकची सुवर्ण कामगिरी विक्रम शिंदे /भोर दि.१५ चेन्नई येथे पार पडलेल्या रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया स्केट गेम स्पर्धेत भेलकेवाडी ,भोर येथील श्लोक पराग भेलके याने चमकदार कामगिरी केली आहे. दि.१४ ते १७ एप्रिल दरम्यान पार पडलेल्या रोलर स्केटिंग स्पर्धेतील पाचशे आणि दोनशे मीटर स्पर्धेत अनुक्रमे कांस्य आणि सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.देशाच्या विविध राज्यातील खेळाडू सहभागी झाले असून ग्रामीण भागातील असूनही श्लोक याने नेत्रदीपक कामगिरी केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.1
- Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया1
- स्वप्ना यादव यांचा मोबाईल तपासात; सीडीआर अहवालाकडे लक्ष प्रतिनिधी : स्वाती हडकर चिपळूण : पत्रकार दीपक भागवत मारहाण प्रकरणाच्या तपासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतरही पूरक तपास सुरू ठेवत पोलिसांनी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांचा मोबाईल ताब्यात घेतला असून, संबंधित क्रमांकाचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी तथा तपास अधिकारी प्रकाश बेले यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सर्व तांत्रिक पुरावे तपासणे आवश्यक आहे. त्यानुसार संबंधित मोबाईल क्रमांकाचा सीडीआर मिळवण्यासाठी दूरसंचार कंपनीकडे अधिकृत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सीडीआर अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील तपासाची दिशा अधिक स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणात यापूर्वी १० कर्मचाऱ्यांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेज, ओळख परेड आणि साक्षीदारांचे जबाब यांसारख्या पुराव्यांच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशांत यादव यांच्या संदर्भातील सीडीआर तपासात ते घटनास्थळी नसल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. आता स्वप्ना यादव यांच्या सीडीआर तपासातून प्रकरणातील इतर पैलू उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पत्रकारांकडून सुरुवातीपासूनच निष्पक्ष आणि सखोल तपासाची मागणी करण्यात येत होती. पूरक तपासाद्वारे प्रत्येक तांत्रिक बाबींची पडताळणी केली जात असल्याने तपास प्रक्रियेबाबत विश्वास वाढत असल्याची प्रतिक्रिया काही पत्रकारांनी व्यक्त केली आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेला प्रारंभ होणार असला तरी, पूरक तपासातून समोर येणारी माहितीही खटल्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सीडीआर अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, या प्रकरणातील अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेतूनच स्पष्ट होणार आहे.1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- आम्ही कोंढवावासिय भारतीय नागरिक नाहीत का? मूलभूत सुविधांच्या अभावी कोंढवा प्रभाग १९ च्या नागरिकांचा पुणे महानगरपालिका आणि नवनियुक्त लोकप्रतिनिधींवर रोष..! @highlight #kondhwa #all1
- पिंपरी चिंचवड :- काळेवाडी परिसरातील एकतानगर भागात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. केवळ अडीच वर्षांच्या चिमुरडीला आंब्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ४७ वर्षीय नराधमाला काळेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विजय भोसले असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. आरोपीने पीडित मुलीला आंबा खायला देण्याच्या बहाण्याने आपल्या खोलीत बोलावले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मंगळवारी सकाळी चिमुरडीला त्रास होऊ लागल्याने पालकांनी तिला तातडीने महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. आईने विश्वासात घेऊन विचारले असता, मुलीने आरोपीने घरात बोलावून अत्याचार केल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. काळेवाडी पोलिसांनी तत्परता दाखवत एक पथक रुग्णालयात तर दुसरे पथक आरोपीच्या घरी पाठवून त्याला तातडीने अटक केली. याप्रकरणी पीडित मुलीच्या २८ वर्षीय आईने फिर्याद दिली असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे... : राजेंद्र बहिरट ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेवाडी ) #पिंपरीचिंचवड #काळेवाडी #बालसुरक्षा #लैंगिकअत्याचार #गुन्हेगारी #पोलीसकारवाई #निर्भयमहाराष्ट्र #बालहक्क #कडककारवाई #सुरक्षितबालपण #PimpriChinchwad #Kalewadi #ChildSafety #CrimeNews #SexualAbuse #PoliceAction #JusticeForChild #StopChildAbuse #ProtectChildren #LawAndOrder1
- Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया1