स्वप्ना यादव यांचा मोबाईल तपासात; सीडीआर अहवालाकडे लक्ष प्रतिनिधी : स्वाती हडकर स्वप्ना यादव यांचा मोबाईल तपासात; सीडीआर अहवालाकडे लक्ष प्रतिनिधी : स्वाती हडकर चिपळूण : पत्रकार दीपक भागवत मारहाण प्रकरणाच्या तपासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतरही पूरक तपास सुरू ठेवत पोलिसांनी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांचा मोबाईल ताब्यात घेतला असून, संबंधित क्रमांकाचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी तथा तपास अधिकारी प्रकाश बेले यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सर्व तांत्रिक पुरावे तपासणे आवश्यक आहे. त्यानुसार संबंधित मोबाईल क्रमांकाचा सीडीआर मिळवण्यासाठी दूरसंचार कंपनीकडे अधिकृत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सीडीआर अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील तपासाची दिशा अधिक स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणात यापूर्वी १० कर्मचाऱ्यांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेज, ओळख परेड आणि साक्षीदारांचे जबाब यांसारख्या पुराव्यांच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशांत यादव यांच्या संदर्भातील सीडीआर तपासात ते घटनास्थळी नसल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. आता स्वप्ना यादव यांच्या सीडीआर तपासातून प्रकरणातील इतर पैलू उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पत्रकारांकडून सुरुवातीपासूनच निष्पक्ष आणि सखोल तपासाची मागणी करण्यात येत होती. पूरक तपासाद्वारे प्रत्येक तांत्रिक बाबींची पडताळणी केली जात असल्याने तपास प्रक्रियेबाबत विश्वास वाढत असल्याची प्रतिक्रिया काही पत्रकारांनी व्यक्त केली आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेला प्रारंभ होणार असला तरी, पूरक तपासातून समोर येणारी माहितीही खटल्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सीडीआर अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, या प्रकरणातील अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेतूनच स्पष्ट होणार आहे.
स्वप्ना यादव यांचा मोबाईल तपासात; सीडीआर अहवालाकडे लक्ष प्रतिनिधी : स्वाती हडकर स्वप्ना यादव यांचा मोबाईल तपासात; सीडीआर अहवालाकडे लक्ष प्रतिनिधी : स्वाती हडकर चिपळूण : पत्रकार दीपक भागवत मारहाण प्रकरणाच्या तपासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतरही पूरक तपास सुरू ठेवत पोलिसांनी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांचा मोबाईल ताब्यात घेतला असून, संबंधित क्रमांकाचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी तथा तपास अधिकारी प्रकाश बेले यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सर्व तांत्रिक पुरावे तपासणे आवश्यक आहे. त्यानुसार संबंधित मोबाईल क्रमांकाचा सीडीआर मिळवण्यासाठी दूरसंचार कंपनीकडे अधिकृत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सीडीआर अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील तपासाची दिशा अधिक स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणात यापूर्वी १० कर्मचाऱ्यांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेज, ओळख परेड आणि साक्षीदारांचे जबाब यांसारख्या पुराव्यांच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशांत यादव यांच्या संदर्भातील सीडीआर तपासात ते घटनास्थळी नसल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. आता स्वप्ना यादव यांच्या सीडीआर तपासातून प्रकरणातील इतर पैलू उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पत्रकारांकडून सुरुवातीपासूनच निष्पक्ष आणि सखोल तपासाची मागणी करण्यात येत होती. पूरक तपासाद्वारे प्रत्येक तांत्रिक बाबींची पडताळणी केली जात असल्याने तपास प्रक्रियेबाबत विश्वास वाढत असल्याची प्रतिक्रिया काही पत्रकारांनी व्यक्त केली आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेला प्रारंभ होणार असला तरी, पूरक तपासातून समोर येणारी माहितीही खटल्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सीडीआर अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, या प्रकरणातील अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेतूनच स्पष्ट होणार आहे.
- सांगलीत प्रेम विवाहाचा करूण अंत; विट्यात पत्नीचा खून अनैतिक संबंधाची झालरं! विटा पोलीस पतीच्या शोधात!1
- काटेवाडीमध्ये आमदार रोहित पवार यांच्यासमोर देवांश लखन पाथरकर या चिमुकल्याने दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर भावनिक भाषण केलं.. रोहित पवार यांनी या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत देवांशचं भाषण एकदम ओक्के अशा शब्दात कौतुक केलंय.. या निरागस चिमुकल्याच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आजही आबालवृद्धांच्या मनात अजितदादांचं स्थान अबाधित असल्याची प्रचिती या निमित्तानं आली..1
- Post by मन्सूर शेख1
- रायगड जिल्ह्यातील काशिद येथे नदीपात्र व समुद्र किनारी सुरू असलेल्या कथित अनधिकृत बांधकामामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवेन चंद्रकांत गाभावाला (मुंबई) यांच्या वतीने काशिद नदीपात्रात अतिक्रमण करून वाढीव बांधकाम सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सदर बांधकामामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होत असून भविष्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः पावसाळ्यात नदीचा मार्ग बदलल्यास आजूबाजूच्या वस्त्यांना व शेतीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. याशिवाय, हे बांधकाम किनारी नियमन क्षेत्र (CRZ) नियमांचे उल्लंघन करत असल्याचेही सांगितले जात आहे. समुद्र किनाऱ्यालगत कोणतेही बांधकाम करताना पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असताना, येथे ते नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा आरोप होत आहे. या प्रकारामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची शक्यता असून स्थानिक जैवविविधतेलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून सदर प्रकरणाची चौकशी करावी व अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, या प्रकरणी महसूल विभाग तसेच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी पाहणी करून सत्यस्थिती समोर आणणे गरजेचे असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. प्रशासनाकडून यावर कोणती भूमिका घेतली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.4
- कुडाळ येथील कचरा डेपोला आज अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचे स्वरूप अत्यंत गंभीर होते, मात्र कुडाळच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता शिरवलकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ही आग वेळीच नियंत्रणात आली असून मोठा अनर्थ टळला आहे. नेमकी घटना काय? आज दुपारच्या सुमारास कुडाळ येथील कचरा डेपोमध्ये अचानक धूर निघू लागला आणि काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. वाऱ्याच्या वेगामुळे आग वेगाने पसरत होती, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नगराध्यक्षा मैदानात घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः घटनास्थळी धाव घेतली. केवळ सूचना देऊन न थांबता, त्या स्वतः अग्निशामक बंबासोबत (Fire Tender) घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांच्या या सक्रिय सहभागामुळे प्रशासकीय यंत्रणा तातडीने कामाला लागली. आग नियंत्रणात नगराध्यक्षांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. आगीवर पाण्याचा मारा करून ती अधिक पसरण्यापासून रोखण्यात आली. नगराध्यक्षांच्या समयसूचकतेमुळे आणि तातडीने घेतलेल्या निर्णयामुळे ही भीषण आग आता पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. या संकटसमयी लोकप्रतिनिधी म्हणून धावून येत कामात प्रत्यक्ष सहभाग घेतल्याबद्दल कुडाळवासीयांकडून नगराध्यक्षांचे कौतुक होत आहे.6
- 🚨 मुंब्रा ग्राउंड का बड़ा सवाल! क्या सच में 175 करोड़ खर्च हुए या फिर ये एक बड़ा घोटाला है? 🤔 जहां बच्चों के लिए सुरक्षित मैदान होना चाहिए, वहां टूटी जालियों में खेलते नजर आ रहे हैं मासूम बच्चे… ⚠️ जिम्मेदार कौन? ⚠️ जांच कब होगी? 📍 मुंब्रा के इस ग्राउंड की जमीनी हकीकत कई सवाल खड़े कर रही है। क्या सिर्फ कागजों में विकास हुआ है या असल में भी कुछ बदला है? 🎥 पूरी रिपोर्ट देखें और अपनी राय जरूर दें 👇 कमेंट में बताएं आपके हिसाब से ये लापरवाही है या घोटाला?1
- Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया1
- रायगड - अमुलकुमार जैन एकीकडे निसर्ग संवर्धनासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात भूमाफियांनी कायद्याचा धाक पूर्णपणे सोडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मौजे कोलमांडला (ताराबंदर) येथे राष्ट्रीय हरित लवाद (NGT) आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांना उघडपणे हरताळ फासत पुन्हा एकदा अनधिकृत माती भराव सुरू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास ताराबंदर येथील कांदळवन क्षेत्रात पोकलेन आणि जेसीबी (JCB) मशीनच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर माती भराव करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते. हे ठिकाण आधीच पर्यावरणीय वादाच्या भोवऱ्यात असून, येथे कांदळवन कत्तल झाल्याचा ठपका ठेवत NGT ने पुनर्लागवडीचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. "फॉरेस्टची परवानगी आहे!" – कंत्राटदाराची अरेरावी स्थानिक ग्रामस्थांना या अनधिकृत कामाचा सुगावा लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थ व्हिडिओ चित्रीकरण करत असल्याचे पाहून संबंधित कंत्राटदार आणि कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतला. “हे काम फॉरेस्टच्या (वनविभाग) परवानगीने सुरू आहे,” असा खोटा दावा करत त्यांनी ग्रामस्थांना दडपण्याचा आणि भीती घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांच्या ठाम विरोधापुढे कंत्राटदाराने अखेर नमते घेत तेथून पळ काढला आणि मशिनरी एका कंपाऊंडमध्ये लपवून ठेवल्या. प्रशासनाचे 'अर्थपूर्ण' मौन? या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, फणसाड वन्यजीव विभागाच्या RFO (परिक्षेत्र वन अधिकारी) यांना ग्रामस्थांनी तातडीने माहिती देऊनही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. वारंवार संपर्क करूनही अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत. "ज्या ठिकाणी कोट्यवधींचा दंड आकारला गेला आहे, गुन्हे दाखल आहेत, तिथे पुन्हा भराव होतोच कसा? यामागे नक्की कोणाचे वरदहस्त आहेत?" > — संतप्त सवाल, ताराबंदर ग्रामस्थ. पार्श्वभूमी आणि कारवाईची मागणी दंडात्मक कारवाई: यापूर्वीच याच जागेवर झालेल्या अनधिकृत भरावामुळे महसूल विभागाने कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. गुन्हे दाखल: वनविभागामार्फत याआधी गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. न्यायालयीन लढा: NGT ने येथे कांदळवन पुनरुज्जीवनाचे आदेश दिले आहेत. ताराबंदर ग्रामस्थ मंडळाने आता आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधित दोषींवर आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई न झाल्यास पुन्हा एकदा न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा दिला आहे. संवेदनशील किनारी भागात सुरू असलेला हा 'पर्यावरणीय दहशतवाद' थांबणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.2
- शिवसेनेतील अंतर्गत वाद, एस.आय.टी. चौकशी आणि 'सी.डी.आर.' वरून होणारे आरोप या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "विरोधकांकडे आमच्या विरुद्ध काहीही ठोस पुरावे नसल्याने केवळ ओळखीचे निमित्त करून आम्हाला टार्गेट केले जात आहे, हे एक राजकीय षडयंत्र आहे," अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केसरकर यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. सी.डी.आर. आणि चौकशीवर भाष्य सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना केसरकर म्हणाले की, "एस.आय.टी. आणि ई.डी. या यंत्रणा आपले काम करत आहेत. कोणासोबत फोटो असणे किंवा जुनी ओळख असणे हा गुन्हा नाही. केवळ राजकीय बदनामीसाठी आमची नावे घेतली जात आहेत. यंत्रणांना जिथे संशयास्पद माहिती मिळते, तिथे ते चौकशीसाठी कोणालाही बोलावू शकतात, त्यात गैर काहीच नाही." गोपनीय सी.डी.आर. राजकीय नेत्यांकडे कसे पोहोचले, याची चौकशी सरकार करेल, असेही त्यांनी नमूद केले. अजित पवारांचा अपघात आणि 'काळी जादू'चे आरोप अजित पवार यांच्या अपघातापूर्वी 'काळी जादू' झाल्याच्या आरोपांवर विचारले असता केसरकर म्हणाले, "दादांचा अपघात अत्यंत दुर्दैवी होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः स्पष्ट केले आहे की, या प्रकरणाची सखोल चौकशी होईल आणि दोषींना सोडले जाणार नाही. मात्र, कोणीही काहीही विधाने करणे आणि त्याला मी उत्तर देणे योग्य नाही." शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदलाची मागणी शक्तीपीठ महामार्गाबाबत महत्त्वाची भूमिका मांडताना केसरकर यांनी सध्याच्या आराखड्यावर आक्षेप घेतला. ते म्हणाले: सध्याचा मार्ग कोकणावर अन्याय करणारा आहे, कारण तो थेट प्रवाशांना गोव्याला नेतो.हा मार्ग आजऱ्यावरून थेट रेडी बंदराला जोडला जावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. यामुळे कोकणातील पर्यटन, कोस्टल रोड आणि स्थानिक बंदरांचा विकास होईल.तिलारी आणि चंदगड मार्गे 'फोर लेन' रस्ता करून दक्षिण व उत्तर गोव्याला जोडल्यास इको-सेन्सिटिव्ह झोनचेही रक्षण होईल. शिवसेनेतील अंतर्गत खदखद डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर केलेल्या विधानावर केसरकर यांनी सावध प्रतिक्रिया दिली. "हा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्तरावरील आहे. जर कुठे चूक झाली असेल, तर मुख्यमंत्री संबंधितांना योग्य त्या सूचना देतील. पक्षामध्ये कोणतीही नाराजी राहणार नाही याची मला खात्री आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. आंबा-काजू उत्पादकांना मदत आंबा आणि काजू उत्पादकांना मिळालेली मदत तुटपुंजी असल्याच्या आरोपावर ते म्हणाले की, आंब्याला नुकसान भरपाई मिळण्याची ही केवळ दुसरीच वेळ आहे. ही शेतकऱ्यांसाठी समाधानाची बाब असून भविष्यात अधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.1