Shuru
Apke Nagar Ki App…
चेन्नईत भोरच्या श्लोकची सुवर्ण कामगिरी ; दोनशे मीटर मध्ये पटकावले सुवर्णपदक चेन्नईत भोरच्या श्लोकची सुवर्ण कामगिरी विक्रम शिंदे /भोर दि.१५ चेन्नई येथे पार पडलेल्या रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया स्केट गेम स्पर्धेत भेलकेवाडी ,भोर येथील श्लोक पराग भेलके याने चमकदार कामगिरी केली आहे. दि.१४ ते १७ एप्रिल दरम्यान पार पडलेल्या रोलर स्केटिंग स्पर्धेतील पाचशे आणि दोनशे मीटर स्पर्धेत अनुक्रमे कांस्य आणि सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.देशाच्या विविध राज्यातील खेळाडू सहभागी झाले असून ग्रामीण भागातील असूनही श्लोक याने नेत्रदीपक कामगिरी केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दै.राष्ट्र सह्याद्री reporter
चेन्नईत भोरच्या श्लोकची सुवर्ण कामगिरी ; दोनशे मीटर मध्ये पटकावले सुवर्णपदक चेन्नईत भोरच्या श्लोकची सुवर्ण कामगिरी विक्रम शिंदे /भोर दि.१५ चेन्नई येथे पार पडलेल्या रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया स्केट गेम स्पर्धेत भेलकेवाडी ,भोर येथील श्लोक पराग भेलके याने चमकदार कामगिरी केली आहे. दि.१४ ते १७ एप्रिल दरम्यान पार पडलेल्या रोलर स्केटिंग स्पर्धेतील पाचशे आणि दोनशे मीटर स्पर्धेत अनुक्रमे कांस्य आणि सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.देशाच्या विविध राज्यातील खेळाडू सहभागी झाले असून ग्रामीण भागातील असूनही श्लोक याने नेत्रदीपक कामगिरी केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- सांगलीत प्रेम विवाहाचा करूण अंत; विट्यात पत्नीचा खून अनैतिक संबंधाची झालरं! विटा पोलीस पतीच्या शोधात!1
- काटेवाडीमध्ये आमदार रोहित पवार यांच्यासमोर देवांश लखन पाथरकर या चिमुकल्याने दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर भावनिक भाषण केलं.. रोहित पवार यांनी या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत देवांशचं भाषण एकदम ओक्के अशा शब्दात कौतुक केलंय.. या निरागस चिमुकल्याच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आजही आबालवृद्धांच्या मनात अजितदादांचं स्थान अबाधित असल्याची प्रचिती या निमित्तानं आली..1
- Post by मन्सूर शेख1
- रायगड जिल्ह्यातील काशिद येथे नदीपात्र व समुद्र किनारी सुरू असलेल्या कथित अनधिकृत बांधकामामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवेन चंद्रकांत गाभावाला (मुंबई) यांच्या वतीने काशिद नदीपात्रात अतिक्रमण करून वाढीव बांधकाम सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सदर बांधकामामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होत असून भविष्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः पावसाळ्यात नदीचा मार्ग बदलल्यास आजूबाजूच्या वस्त्यांना व शेतीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. याशिवाय, हे बांधकाम किनारी नियमन क्षेत्र (CRZ) नियमांचे उल्लंघन करत असल्याचेही सांगितले जात आहे. समुद्र किनाऱ्यालगत कोणतेही बांधकाम करताना पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असताना, येथे ते नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा आरोप होत आहे. या प्रकारामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची शक्यता असून स्थानिक जैवविविधतेलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून सदर प्रकरणाची चौकशी करावी व अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, या प्रकरणी महसूल विभाग तसेच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी पाहणी करून सत्यस्थिती समोर आणणे गरजेचे असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. प्रशासनाकडून यावर कोणती भूमिका घेतली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.4
- Post by कर्जत लाईव्ह1
- ठाणे :आज मोखाडा तालुक्यातील पळसपाडा येथे डॉ. सुमित ढाक यांच्या फार्मवर 'काजू प्रक्रिया युनिट'चा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रमोद पवार उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना प्रमोद पवार यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांनी केवळ उत्पादन न घेता त्यावर प्रक्रिया करून बाजारपेठ मिळवली पाहिजे. #डॉ.सुमित_ढाक यांनी सुरू केलेला हा उपक्रम स्थानिक रोजगारासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल. यावेळी भूमिपुत्र एल्गार संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.1
- Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया1
- रायगड - अमुलकुमार जैन एकीकडे निसर्ग संवर्धनासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात भूमाफियांनी कायद्याचा धाक पूर्णपणे सोडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मौजे कोलमांडला (ताराबंदर) येथे राष्ट्रीय हरित लवाद (NGT) आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांना उघडपणे हरताळ फासत पुन्हा एकदा अनधिकृत माती भराव सुरू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास ताराबंदर येथील कांदळवन क्षेत्रात पोकलेन आणि जेसीबी (JCB) मशीनच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर माती भराव करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते. हे ठिकाण आधीच पर्यावरणीय वादाच्या भोवऱ्यात असून, येथे कांदळवन कत्तल झाल्याचा ठपका ठेवत NGT ने पुनर्लागवडीचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. "फॉरेस्टची परवानगी आहे!" – कंत्राटदाराची अरेरावी स्थानिक ग्रामस्थांना या अनधिकृत कामाचा सुगावा लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थ व्हिडिओ चित्रीकरण करत असल्याचे पाहून संबंधित कंत्राटदार आणि कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतला. “हे काम फॉरेस्टच्या (वनविभाग) परवानगीने सुरू आहे,” असा खोटा दावा करत त्यांनी ग्रामस्थांना दडपण्याचा आणि भीती घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांच्या ठाम विरोधापुढे कंत्राटदाराने अखेर नमते घेत तेथून पळ काढला आणि मशिनरी एका कंपाऊंडमध्ये लपवून ठेवल्या. प्रशासनाचे 'अर्थपूर्ण' मौन? या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, फणसाड वन्यजीव विभागाच्या RFO (परिक्षेत्र वन अधिकारी) यांना ग्रामस्थांनी तातडीने माहिती देऊनही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. वारंवार संपर्क करूनही अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत. "ज्या ठिकाणी कोट्यवधींचा दंड आकारला गेला आहे, गुन्हे दाखल आहेत, तिथे पुन्हा भराव होतोच कसा? यामागे नक्की कोणाचे वरदहस्त आहेत?" > — संतप्त सवाल, ताराबंदर ग्रामस्थ. पार्श्वभूमी आणि कारवाईची मागणी दंडात्मक कारवाई: यापूर्वीच याच जागेवर झालेल्या अनधिकृत भरावामुळे महसूल विभागाने कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. गुन्हे दाखल: वनविभागामार्फत याआधी गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. न्यायालयीन लढा: NGT ने येथे कांदळवन पुनरुज्जीवनाचे आदेश दिले आहेत. ताराबंदर ग्रामस्थ मंडळाने आता आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधित दोषींवर आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई न झाल्यास पुन्हा एकदा न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा दिला आहे. संवेदनशील किनारी भागात सुरू असलेला हा 'पर्यावरणीय दहशतवाद' थांबणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.2
- ठाणे :मिरवणुका, डीजेचा आवाज आणि अनावश्यक खर्च टाळून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त 'भूमीपुत्र एल्गार संघटनेने' एक अत्यंत अभिनव आणि डोळस उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील तब्बल १३५ अनाथ, निराधार आणि मजूर कुटुंबातील मुलांचे 'शैक्षणिक पालकत्व' स्वीकारून संघटनेने महामानवाला खऱ्या अर्थाने कृतिशील आदरांजली वाहिली आहे. आज १४ एप्रिल रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. प्रमोद पवार यांनी या उपक्रमाची अधिकृत घोषणा करताना सांगितले की, केवळ जयघोष करून विचार जपले जात नाहीत, तर ते जगले पाहिजेत. बाबासाहेबांनी दिलेला शिक्षणाचा मंत्र प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठीच आम्ही या १३५ कोवळ्या फुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हा 'शैक्षणिक एल्गार' यशस्वी करण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस एक करून दुर्गम पाड्यांचा दौरा केला. यामध्ये अत्यंत पारदर्शक पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून मोखाडा तालुक्यातील ३८, जव्हारमधील १८, डहाणूतील २३, तलासरीमधील १५, पालघरमधील १५, भिवंडीतील १०, वाड्यातील १० आणि विक्रमगड तालुक्यातील ६ विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील लोणे, सरचिटणीस नवनाथ भोये, आदिम शक्ती प्रमुख स्वप्नील वाघ यांनी आपल्या टीमने प्रत्यक्ष गावागावात जाऊन या पाल्यांच्या परिस्थितीची पाहणी केली. निवडलेल्या मुलांमध्ये प्रामुख्याने ज्यांना आई-वडील नाहीत, ज्यांचे पालक गंभीर आजाराने ग्रस्त किंवा दिव्यांग आहेत अशा मुलांचा प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. आर्थिक अभावामुळे ही मुले शाळा सोडू शकतात किंवा स्थलांतरामुळे शिक्षणापासून वंचित राहू शकतात, हे ओळखून संघटनेने त्यांच्या शैक्षणिक साहित्यापासून ते आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्यापर्यंतची सर्व जबाबदारी उचलली आहे. या मोहिमेत युवा शक्ती प्रमुख रूपेश जाधव, नाशिक जिल्हा प्रमुख मुरलीधर कनोजे, राज्य उपाध्यक्ष कल्पेश जाधव, असगर पटेल, भूषण घोडविंदे, ॲड. सोनाली मनोरे-पवार, उपकार्याध्यक्ष दूषांत घायवट, विजय राऊत, प्रमिला तरसे आणि सुनीता वळवी यांच्यासह सर्व तालुका अध्यक्ष मनोज पारधी, अनिल करबट, गणेश माळी, रामा होला, विजय नडगे,विकास धोडी, प्रसाद भालेराव, मनोज धर्ममेहर, भावेश पढेर इत्यादी पदाधिकारी हिरिरीने सहभागी झाले आहेत. बडेजाव टाळून समाजाचे देणे लागते या भावनेतून राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत असून, १३५ मुलांची ही फक्त सुरुवात असून येत्या काळात वंचितांच्या शिक्षणासाठी संघटना सदैव कटिबद्ध राहील, अशी ग्वाही प्रमोद पवार यांनी दिली आहे.1