लातूरचे प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांची आत्महत्या. राहत्या घरी गोळी झाडून घेतल्याची प्राथमिक माहिती; घटनेने लातूरमध्ये खळबळ. लातूरचे प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांची आत्महत्या. राहत्या घरी गोळी झाडून घेतल्याची प्राथमिक माहिती; घटनेने लातूरमध्ये खळबळ. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर 2026. लातूर शहरातील प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, घटनेचा पंचनामा आणि पुढील तपास सुरू आहे. संजीव सोनवणे यांनी हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून घटनेशी संबंधित सर्व बाबींचा तपास केला जात असून, आत्महत्येचे कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे. सोनवणे यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांच्या कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. अधिकृत पोलिस तपासानंतरच घटनेबाबतची संपूर्ण माहिती स्पष्ट होणार आहे.
लातूरचे प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांची आत्महत्या. राहत्या घरी गोळी झाडून घेतल्याची प्राथमिक माहिती; घटनेने लातूरमध्ये खळबळ. लातूरचे प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांची आत्महत्या. राहत्या घरी गोळी झाडून घेतल्याची प्राथमिक माहिती; घटनेने लातूरमध्ये खळबळ. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर 2026. लातूर शहरातील प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, घटनेचा पंचनामा आणि पुढील तपास सुरू आहे. संजीव सोनवणे यांनी हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून घटनेशी संबंधित सर्व बाबींचा तपास केला जात असून, आत्महत्येचे कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे. सोनवणे यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांच्या कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. अधिकृत पोलिस तपासानंतरच घटनेबाबतची संपूर्ण माहिती स्पष्ट होणार आहे.
- भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सूचना व अभिप्राय द्या! राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा सुचविण्याचे आवाहन. भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सूचना व अभिप्राय द्या! राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा सुचविण्याचे आवाहन. सोनपेठ (दर्शन) :- छत्रपती संभाजीनगर विभागातील विद्यार्थी, परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी आपले सूचना, शिफारशी, हरकती व अभिप्राय द्यावेत. दि.१८ सप्टेंबर २०२६ ⏰ सकाळी १० ते सायंकाळी ६ 📍 आठही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांत विशेष कक्ष 🏛️ २१ सप्टेंबर २०२६ | सकाळी १०.३० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात उच्चस्तरीय समिती नागरिक व संबंधित घटकांशी थेट चर्चा करणार. 📧 प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसल्यास लेखी अभिप्राय पाठवा आपला अभिप्राय — अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह भरती परीक्षेकडे एक महत्त्वाचे पाऊल!1
- मरणार पण शरण जाणार नाही! १८ दिवसांच्या उपोषणानंतर मनोजदादा जरांगे पाटील मुंबईकडे रवाना | Manoj Jarange Patil तब्बल १८ दिवसांच्या कडक आमरण उपोषणानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांनी अखेर मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. प्रकृती अत्यंत खालावली असतानाही "मी मरणार पण शरण जाणार नाही," अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. याबद्दलची सविस्तर बातमी पाहा या व्हिडिओमध्ये. मराठा आरक्षणाचे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक ताज्या घडामोडींचे अचूक आणि खात्रीशीर अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या 'साथ महाराष्ट्राची न्यूज' या चॅनलला नक्की Like, Share आणि Subscribe करा!1
- “ST आरक्षणाची अंमलबजावणीसाठी - मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे आक्रमक" “ST आरक्षणाची अंमलबजावणीसाठी - मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे आक्रमक"1
- घरकुल योजनेतील भ्रष्टाचारा विरोधात युवासेनेचे ‘भीक मांगो’ आंदोलन; प्रशासनाचे वाभाडे काढले तालुक्यातील रमाई, प्रधानमंत्री आणि मोदी आवास योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत, शिवसेना (युवासेना) तालुकाप्रमुख बालाजी काटशेव यांच्या नेतृत्वाखाली आज मुखेड पंचायत समिती आणि तहसील कार्यालयासमोर लक्षवेधी ‘भीक मांगो‘ आंदोलन करण्यात आले. संबंधित इंजिनीअर, ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या संगनमताने सुरू असलेल्या या लुटीविरोधात प्रशासनाने ठोसकारवाई न केल्याने अखेर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाचा निषेध केला. आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकहिताच्या योजनांमध्ये खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांनाडावलून बोगस लाभार्थ्यांची निवड केली जात आहे. जागेवर घरकुलाचे कोणतेही बांधकाम न करताचबनावट कागदपत्रांच्या आधारे बिलांची रक्कम हडपली जात आहे. गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांच्या संगनमताने लाभार्थ्यांकडून पैशांचे हप्ते घेतले जात आहेत. एवढेच नाही तर, याविरोधात कोणी तक्रार केल्यास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून तक्रारदारांना धमकावणे व शिवीगाळ करणे असे गंभीर प्रकार घडत आहेत. या संपूर्ण गैरप्रकाराबाबत बालाजी काटशेव यांनी ७ सप्टेंबर २०२६ रोजीच प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. या निवेदनानंतर, मुखेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ११सप्टेंबर २०२६ रोजी एक अधिकृत पत्र काढले होते. या पत्राद्वारे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी धर्मेकर डी.पी., धुळगंडे एस.एस., आणि जोगपेठे डी.व्ही. यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच १५ तारखेच्या या ‘भीक मांगो‘ आंदोलनापूर्वी कारवाई करून आंदोलनकर्त्यांचे समाधान करण्याच्या सूचना होत्या. मात्र, प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री सोपस्कार पार पडले आणि प्रत्यक्ष कोणतीही कारवाई न झाल्याने आज हे आंदोलन करण्यात आले. गोरगरिबांच्या हक्काच्या घरांवर डल्ला मारणाऱ्या या भ्रष्ट साखळीची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी व्हावी. तसेच, लाचखोर अधिकारी, इंजिनीअर आणि या घोटाळ्यात सहभागी असलेल्या सरपंचांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी बालाजी काटशेव यांनी केली आहे. या आंदोलनामुळे घरकुल योजनेतील गैरकारभाराचा मुद्दा चव्हाट्यावर आला असून, प्रशासन आता तरीकारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. घरकुल योजनेतील भ्रष्टाचारा विरोधात युवासेनेचे ‘भीक मांगो’ आंदोलन; प्रशासनाचे वाभाडे काढले तालुक्यातील रमाई, प्रधानमंत्री आणि मोदी आवास योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत, शिवसेना (युवासेना) तालुकाप्रमुख बालाजी काटशेव यांच्या नेतृत्वाखाली आज मुखेड पंचायत समिती आणि तहसील कार्यालयासमोर लक्षवेधी ‘भीक मांगो‘ आंदोलन करण्यात आले. संबंधित इंजिनीअर, ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या संगनमताने सुरू असलेल्या या लुटीविरोधात प्रशासनाने ठोसकारवाई न केल्याने अखेर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाचा निषेध केला. आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकहिताच्या योजनांमध्ये खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांनाडावलून बोगस लाभार्थ्यांची निवड केली जात आहे. जागेवर घरकुलाचे कोणतेही बांधकाम न करताचबनावट कागदपत्रांच्या आधारे बिलांची रक्कम हडपली जात आहे. गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांच्या संगनमताने लाभार्थ्यांकडून पैशांचे हप्ते घेतले जात आहेत. एवढेच नाही तर, याविरोधात कोणी तक्रार केल्यास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून तक्रारदारांना धमकावणे व शिवीगाळ करणे असे गंभीर प्रकार घडत आहेत. या संपूर्ण गैरप्रकाराबाबत बालाजी काटशेव यांनी ७ सप्टेंबर २०२६ रोजीच प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. या निवेदनानंतर, मुखेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ११सप्टेंबर २०२६ रोजी एक अधिकृत पत्र काढले होते. या पत्राद्वारे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी धर्मेकर डी.पी., धुळगंडे एस.एस., आणि जोगपेठे डी.व्ही. यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच १५ तारखेच्या या ‘भीक मांगो‘ आंदोलनापूर्वी कारवाई करून आंदोलनकर्त्यांचे समाधान करण्याच्या सूचना होत्या. मात्र, प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री सोपस्कार पार पडले आणि प्रत्यक्ष कोणतीही कारवाई न झाल्याने आज हे आंदोलन करण्यात आले. गोरगरिबांच्या हक्काच्या घरांवर डल्ला मारणाऱ्या या भ्रष्ट साखळीची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी व्हावी. तसेच, लाचखोर अधिकारी, इंजिनीअर आणि या घोटाळ्यात सहभागी असलेल्या सरपंचांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी बालाजी काटशेव यांनी केली आहे. या आंदोलनामुळे घरकुल योजनेतील गैरकारभाराचा मुद्दा चव्हाट्यावर आला असून, प्रशासन आता तरीकारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.4
- :श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त देगलूर मध्ये भव्य कीर्तनाचा सोहळा संपन्न देगलूर : ऋषी पंचमीच्या पावन तिथीनिमित्त श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त देगलूर येथील श्री गजानन महाराज व श्री दत्त महाराज मंदिर बापू मार्केट येथे मुंबईचे प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प .श्रीदेवी असावरी रबंदे जोशी यांच्या कीर्तनाचा भव्य सोहळा संपन्न झाला .त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला मोठ्या संख्येने महिला पुरुष मुली मुले या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला . या संस्थानचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य रमेश कंतेवार,वैजनाथ स्वामी,अशोक साखरे ,सायलू तैदलवार,नारायण तोटावर ,सुवर्णकार सूर्यकांत,सत्यनारायण नागोरी,आदी प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . प्रतिनिधी :संदीप देसाई2
- पत्रकार सुरक्षा कायद्यासाठी जंतर- मंतर येथील देशव्यापी आंदोलनात सहभागी व्हा - अमरजान पठाण बीड(प्रतिनिधी):अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS)च्या बीड जिल्हाध्यक्षपदी उच्चशिक्षित व युवा पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांची पुनर्निवड करण्यात आली आहे. यानिमित्त शहरातील नीलकमल हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमात समितीचे मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार,ज्येष्ठ समाजसेवक व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या हस्ते पठाण अमरजान यांनी नियुक्तीपत्र स्वीकारून जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. शहरातील नीलकमल हॉटेल येथे अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पदग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समितीच्या मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांनी राजेश कुमार जोगदंड (मार्गदर्शक), मुक्त पत्रकार एस. एम. युसुफ, पत्रकार बालाजी जगतकर, पत्रकार नितीन जोगदंड, शेख पाशाभाई (सदस्य, मार्गदर्शक मंडळ), रमेश गंगाधरे, शेख पाशुभाई, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. हनीफ पठाण आणि शेख वजीरभाई यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारून अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदाचा पदभार अधिकृतपणे स्वीकारला. पुनर्निवडीनंतर बोलताना पठाण अमरजान यांनी पत्रकारांच्या समस्या, हक्कांचे संरक्षण, पत्रकारांना मिळणारा सन्मान आणि पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न यासाठी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त केला.बीड जिल्ह्यातील पत्रकारांना संघटित करून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ठामपणे उभे राहण्यासोबतच पत्रकारांवरील हल्ले, धमक्या, दबाव तसेच खोटे गुन्हे दाखल करून होणाऱ्या कथित अन्यायाविरोधात कायदेशीर व लोकशाही मार्गाने लढा उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांवरील हल्ले आणि पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न गंभीर होत असताना देशभरात पत्रकार सुरक्षा कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथील जंतर-मंतरवर १ डिसेंबरपासून आयोजित देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पठाण अमरजान यांनी उपस्थित पत्रकारांना दिली. पत्रकारांना निर्भयपणे काम करण्यासाठी सक्षम कायदेशीर संरक्षण मिळणे आवश्यक असून, देशभर पत्रकार सुरक्षा कायदा लागू होईपर्यंत लोकशाही आणि संविधानिक मार्गाने हा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS)चे शेख जावेद, सय्यद रेहान हुसेनी, शेख मोहसीन, शेख इद्रीस, सह समितीचे इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.3
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे अभियान राबविण्यात येणार १७ सप्टेंबरपासून राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे अभियान राबविण्यात येणार १७ सप्टेंबरपासून राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ सोनपेठ (दर्शन) :- शासकीय सेवा थेट नागरिकांच्या दारी ; महिनाभर लोकसहभागातून सेवेचा जागर ‘सेवा सेतूपासून ‘जनसेवक महाकुंभापर्यंत विविध उपक्रम ; गाव-वॉर्डस्तरावर सामाजिक सेवेची चळवळ शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्यांचा प्रत्यक्ष लाभ पात्र नागरिकांच्या हातात पोहोचावा,प्रशासन आणि सामान्य माणूस यांच्यातील अंतर कमी व्हावे आणि लोकसहभागातून सेवाभावाची व्यापक चळवळ उभी राहावी,या उद्देशाने राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे अभियान राबविण्यात येणार आहे.‘सेवा परमो धर्म’ या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्याच्या भूमिकेतून या महिनाभराच्या अभियानाची आखणी करण्यात आली आहे. तालुक्यात ‘सेवा सेतू’; एकाच ठिकाणी योजनांचा लाभ अभियानातील महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘सेवा सेतू अभियान’. प्रत्येक तालुकास्तरावर शिबिर घेऊन राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचे लाभ पात्रतेनुसार नागरिकांना थेट उपलब्ध करून दिले जाणार आहेत.‘आपले सरकार सेवा केंद्रा’मार्फत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून शक्यतो शिबिरातच लाभ देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.तसेच प्रत्येक तालुक्यात किमान एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित केले जाणार आहे. वनहक्क दाव्यांसाठी ग्रामस्तरीय, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय वनहक्क समित्यांच्या बैठका घेऊन नवीन दावे तसेच पूर्वीच्या दाव्यांतील दुरुस्त्यांची कार्यवाही केली जाणार आहे.अभियानाच्या कालावधीत सर्व दावे निर्णयित होतील,यासाठी जिल्हानिहाय वेळापत्रक तयार करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची राहणार आहे. सातबाऱ्यापासून आधारपर्यंत २२ सेवा ‘सेवा सेतू’ शिबिरांमधून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित २२ महत्त्वाच्या सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश आहे. प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा व जिवंत सातबारा मोहीम,गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप,मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते उपलब्ध करणे,पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका वितरण,नॉन- क्रिमीलेअर प्रमाणपत्र,वनहक्क दावे मंजूर करणे,मालमत्ता हस्तांतरण नोंद,नवीन नळजोडणी, मालमत्ता कर आकारणी व मागणीपत्र,प्रलंबित घरगुती वीजजोडणी मंजुरी आणि मालमत्ता हस्तांतरणानंतर वीजजोडणीवर नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे यांचा त्यात समावेश आहे. याशिवाय बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत सिंचन विहिरींसाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी,दिव्यांग प्रमाणपत्र,विवाह नोंदणी प्रमाणपत्र,आधार कार्ड,जन्म-मृत्यू नोंद व प्रमाणपत्र,शिकाऊ वाहनचालक परवाना,महिला बचतगट नोंदणी,ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र,महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप, ७/१२ व ८-अ मधील नोंदी अद्ययावत करणे आणि जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार जमिनीच्या मोजणीशी जोडणे या सेवांचाही समावेश आहे. युवकांच्या कल्पकतेला ‘इनोव्हेशन चॅलेंजचे व्यासपीठ राज्यातील युवक,विद्यार्थी, स्टार्टअप्स,व्यावसायिक,कॉर्पोरेट इनोव्हेटर्स तसेच ग्रामीण भागात नवी समाधाने विकसित करणाऱ्यांना एकत्र आणण्यासाठी राज्यस्तरीय ‘इनोव्हेशन चॅलेंज ’आयोजित करण्यात येणार आहे. शैक्षणिक संस्था,स्टार्टअप नेटवर्क, इन्क्युबेशन सेंटर आणि खासगी कंपन्यांचा यात सहभाग असेल. उत्कृष्ट इनोव्हेटर्सना तज्ज्ञांसमोर आपल्या कल्पना मांडण्याची संधी मिळेल आणि त्यातून राज्यस्तरीय उत्कृष्ट इनोव्हेटर्सची निवड केली जाईल.कौशल्य,रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यासाठी नोडल विभाग असेल. प्रत्येक गाव-वॉर्डात ‘सेवा माझे योगदान’ अभियानाला खऱ्या अर्थाने लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी प्रत्येक गाव आणि वॉर्डात ‘सेवा माझे योगदान’ कार्यक्रम होणार आहे.युवक,महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह शिक्षण,कला, साहित्य,क्रीडा व समाजसेवा क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींना सहभागी करून घेतले जाणार आहे.समुद्रकिनारे,नदीघाट आणि बारवांच्या स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबवून भविष्यात नियमित स्वच्छता व्हावी यासाठी स्थानिक समित्याही स्थापन केल्या जाणार आहेत.स्वच्छतेनंतर सामूहिक संकल्प घेतला जाणार असून या कामाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येईल. या उपक्रमात स्थानिक गरजेनुसार रक्तदान शिबिर,अनाथालय- वृद्धाश्रम भेट,वृक्षारोपण,‘स्वच्छता ही सेवा’,आरोग्य तपासणी,‘एक गाव दत्तक घ्या-सेवा कार्य’, योग व ध्यान सत्र,प्लास्टिकमुक्ती जागृती, महिलांचे आरोग्य व स्वच्छता, वंचित मुलांसाठी शिक्षण सहकार्य, करिअर कौन्सिलिंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल साक्षरता असे उपक्रम घेता येणार आहेत. यासोबतच अवयवदान संकल्प, व्यसनमुक्त भारत,पोषण व ॲनिमिया,रस्ते सुरक्षा,जलसंधारण व जलस्रोत स्वच्छता,कचरा वर्गीकरण व कंपोस्टिंग,सायबर सुरक्षा,फिट इंडिया खेळ सत्र, वीरगाथा व सैनिकांचा सन्मान, दिव्यांगजन सहयोग, मतदार जागृती व नोंदणी,‘व्होकल फॉर लोकल’,सरकारी योजनांची जनजागृती आणि विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व प्रमाणपत्रे देण्यासंबंधी उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.ग्रामीण भागात गटविकास अधिकारी,तर शहरी भागात मुख्याधिकारी अथवा वॉर्ड अधिकारी नोडल अधिकारी असतील. ‘विकसित भारताचा बदल नागरिकांसमोर राज्यातील महत्त्वाचे व परिवर्तनकारी प्रकल्प आणि क्षेत्रांची यादी तयार करून या प्रकल्पांमुळे नागरिकांच्या जीवनमान,सुरक्षा,अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा आणि संधींमध्ये झालेल्या बदलांची माहिती संकलित केली जाणार आहे. ‘विकसित भारत-२०४७ सेवा ज्योत यात्रा’ प्रत्येक गावातून काढण्यात येईल,तर शहरी भागात बाइक रॅली आयोजित केली जाईल.गाव आणि शहरांतील प्रमुख ठिकाणी विकसित भारत-२०४७ तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली जाईल.कार्यक्रमाच्या शेवटी ‘विकसित भारत-२०४७’चा सामूहिक संकल्प घेतला जाईल. जिल्हास्तरावर पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या स्वप्नातील भारत कागदावर अन् शब्दांत शासकीय आणि खासगी शाळांमध्ये ‘विकसित भारत’ संकल्पनेवर चित्रकला स्पर्धा होईल.‘मुलांच्या स्वप्नातील भारत’ आणि ‘विकसित भारत-२०४७’ या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येतील.विजेत्यांना पुरस्कार देण्यात येतील.निवडक स्पर्धकांचे व्हिडिओ तयार करून जिल्हास्तरीय आणि त्यानंतर राज्यस्तरीय प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. तालुकास्तरावर गटशिक्षण अधिकारी नोडल अधिकारी असतील. अंगणवाडी उत्सवात माता-बालकांच्या आरोग्यावर भर सर्व अंगणवाडी केंद्रांवर मुलांसोबत मातांनाही निमंत्रित करून ‘अंगणवाडी उत्सव’ साजरा केला जाणार आहे. महिलांना आरोग्य व पोषण योजनांची माहिती, मुलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच फळे व मिठाईचे वाटप केले जाईल.अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.लाभार्थी महिलाही पोषण व आरोग्य योजनांमुळे झालेल्या फायद्यांचे अनुभव सांगतील. लाभार्थ्यांच्या घरी पेटणार ‘आशीर्वादाचा दिवा’ अभियानातील हृदयस्पर्शी उपक्रम म्हणून ‘आशीर्वादाचा दिवा’ राबविण्यात येणार आहे.केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी संबंधित विभागांचे अधिकारी जाऊन दीप प्रज्वलित करतील. विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या याद्या ११ सप्टेंबरपर्यंत मुख्य सचिवांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्व मंत्रालयीन विभागांना देण्यात आले आहेत. ‘बदलाची गोष्ट’ सांगणार लाभार्थ्यांची यशोगाथा शासकीय योजनांनी एखाद्या कुटुंबाच्या आयुष्यात नेमका काय बदल घडविला,हे आता लाभार्थी स्वतः सांगणार आहेत.‘बदलाची गोष्ट’ या उपक्रमांतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमुळे लाभार्थ्यांच्या जीवनमानात झालेल्या सकारात्मक बदलांच्या यशोगाथा नावासह व्हिडिओ स्वरूपात संकलित केल्या जातील. उत्कृष्ट व्हिडिओ व रिल्सची राज्यस्तरावर निवड केली जाणार आहे. १७ सप्टेंबरला ‘आभार आणि संकल्पाची रांगोळी’ १७ सप्टेंबर रोजी राज्यातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी जनकल्याणकारी योजना,राष्ट्रीय प्रतीके आणि विकसित भारत या संकल्पनांवर आधारित मानवी रांगोळी साकारली जाणार आहे. नैसर्गिक साहित्याचा वापर करून कला- परंपरा,पर्यटन, निसर्ग आणि संस्कृतीवर आधारित रांगोळ्याही काढण्यात येतील. सांस्कृतिक कार्य विभाग या उपक्रमासाठी नोडल विभाग असेल. २ ऑक्टोबरला ‘नमो सेवागाथा’ केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती कला व नाट्यपथकांद्वारे शाळा,महाविद्यालये आणि ग्रामपंचायतस्तरापर्यंत पोहोचविली जाणार आहे.उत्कृष्ट पथकांना जिल्हा व राज्यस्तरावर सादरीकरणाची संधी मिळेल आणि स्थानिक कलाकार,विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान केला जाईल. २ ऑक्टोबर रोजी तालुकास्तरावर ‘नमो सेवागाथा’ कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. संकल्प यात्रा याच अभियानांतर्गत ‘जल,जन आणि सेवा संकल्प यात्रा’ धुळे जिल्ह्यातून जाणार असून तेथे यात्रेचे स्वागत करून स्थानिक योजना आणि विकासकामांबाबत संवाद कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.यात्रेतील एलईडी स्क्रीनवर माहितीपट दाखविण्यात येतील.१७ ऑक्टोबरला ‘जनसेवक महाकुंभ’ ; अभियानाची सांगता अभियानाचा समारोप १७ ऑक्टोबर रोजी ‘जनसेवक महाकुंभा’ने होईल. ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत काम करणारे लोकप्रतिनिधी यात सहभागी होतील.सरपंचापासून संसद सदस्यांपर्यंत विविध स्तरांवरील लोकप्रतिनिधी विकसित भारताबाबत आपले अनुभव मांडतील. मा.पंतप्रधान हे उपस्थित लोकप्रतिनिधींना संबोधित करतील.त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व लोकप्रतिनिधी विकसित भारताचा संकल्प करतील.त्यानंतर ‘सेवा संकल्प अभियानाची’ सांगता होईल. ग्रामविकास विभाग या कार्यक्रमासाठी नोडल विभाग असेल.हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. संकलन : जिल्हा माहिती कार्यालय परभणी1
- बीडमधून हजारो मराठा बांधव अंतरवली सराटीकडे रवाना; मनोज जरांगे यांना जाहीर पाठिंबा! मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव आणि तरुण मोठ्या जोशामध्ये मोटरसायकल रॅलीने अंतरवली सराटीकडे रवाना झाले आहेत. बीड शहरासह ग्रामीण भागातून शेकडो दुचाकींवर स्वार होऊन तरुण या महा-रॅलीत सहभागी झाले असून, संपूर्ण परिसर 'जय जिजाऊ, जय शिवराय' आणि जरांगे-पाटील यांच्या समर्थनाच्या घोषणांनी दुमदुमून गेला आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी आपल्या 'साथ महाराष्ट्राची न्यूज' पेजला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!1
- ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा एल्गार; 17 सप्टेंबरला परभणीत महामोर्चा - भारत आव्हाड ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा एल्गार; 17 सप्टेंबरला परभणीत महामोर्चा - भारत आव्हाड1