logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रमुख नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. मुंबई येथील पक्षकार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. जयंत पाटील यांचे भाचे असलेल्या प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्याने त्यांची विधान परिषद उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असून, या घडामोडीमुळे शरद पवार गटाला अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्यात राज्यमंत्री म्हणून काम केलेल्या तनपुरे यांचा भाजप प्रवेश जिल्ह्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. यापूर्वी, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अक्षय कर्डीले यांना उमेदवारी मिळवून देण्यापासून ते त्यांना विजयी करून विधानसभेत पाठविण्यापर्यंतच्या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये डॉ. सुजय विखे पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. त्यांनी पक्षांतर्गत समन्वय साधत भाजप नेतृत्वाशी सातत्याने संपर्क ठेवला आणि उमेदवारी निश्चित झाल्यावर स्वतः मैदानात उतरून राहुरी, नगर आणि पाथर्डी मतदारसंघात प्रचाराची प्रभावी धुरा सांभाळली. तब्बल ११ पेक्षा जास्त सभा घेत त्यांनी पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांना एकत्र बांधत अक्षय कर्डीले यांच्या विजयासाठी निर्णायक वातावरण निर्माण केले. त्यामुळे कर्डीले यांच्या विजयामागील प्रमुख रणनीतिकार म्हणून डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे पाहिले गेले होते. याच राजकीय रणनीतीचा पुढचा टप्पा म्हणजे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश झाला असून, जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा अचूक अंदाज घेत डॉ. सुजय विखे पाटील यांनी तनपुरे यांच्याशी संवादाची दारे खुली ठेवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी विधानसभा पोटनिवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे, पोटनिवडणूक जाहीर होण्यापूर्वी तब्बल सहा महिन्यांपासून डॉ. सुजय विखे पाटील प्राजक्त तनपुरे यांच्या संपर्कात होते. अशा प्रकारे, एकीकडे अक्षय कर्डीले यांना आमदार बनवण्यात यश मिळवताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रभावी चेहरा असलेल्या प्राजक्त तनपुरे यांना भाजपमध्ये आणण्याची रणनीती डॉ. सुजय विखे पाटील यांनी यशस्वीपणे राबवली. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविण्यामागे आणि नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करण्यामागे डॉ. सुजय विखे पाटील हेच खरे सूत्रधार असल्याची चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आज रंगली आहे.

7 hrs ago
user_Yogesh Gangarde
Yogesh Gangarde
Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
7 hrs ago
21eba2f0-8182-43c0-b79b-42497f3070a2

अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रमुख नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. मुंबई येथील पक्षकार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. जयंत पाटील यांचे भाचे असलेल्या प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्याने त्यांची विधान परिषद उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असून, या घडामोडीमुळे शरद पवार गटाला अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्यात राज्यमंत्री म्हणून काम केलेल्या तनपुरे यांचा भाजप प्रवेश जिल्ह्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. यापूर्वी, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अक्षय कर्डीले यांना उमेदवारी मिळवून देण्यापासून ते त्यांना विजयी करून विधानसभेत पाठविण्यापर्यंतच्या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये डॉ. सुजय विखे पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. त्यांनी पक्षांतर्गत समन्वय साधत भाजप नेतृत्वाशी सातत्याने संपर्क ठेवला आणि उमेदवारी निश्चित झाल्यावर स्वतः मैदानात उतरून राहुरी, नगर आणि पाथर्डी मतदारसंघात प्रचाराची प्रभावी धुरा सांभाळली. तब्बल ११ पेक्षा जास्त सभा घेत त्यांनी पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांना एकत्र बांधत अक्षय कर्डीले यांच्या विजयासाठी निर्णायक वातावरण निर्माण केले. त्यामुळे कर्डीले यांच्या विजयामागील प्रमुख रणनीतिकार म्हणून डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे पाहिले गेले होते. याच राजकीय रणनीतीचा पुढचा टप्पा म्हणजे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश झाला असून, जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा अचूक अंदाज घेत डॉ. सुजय विखे पाटील यांनी तनपुरे यांच्याशी संवादाची दारे खुली ठेवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी विधानसभा पोटनिवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे, पोटनिवडणूक जाहीर होण्यापूर्वी तब्बल सहा महिन्यांपासून डॉ. सुजय विखे पाटील प्राजक्त तनपुरे यांच्या संपर्कात होते. अशा प्रकारे, एकीकडे अक्षय कर्डीले यांना आमदार बनवण्यात यश मिळवताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रभावी चेहरा असलेल्या प्राजक्त तनपुरे यांना भाजपमध्ये आणण्याची रणनीती डॉ. सुजय विखे पाटील यांनी यशस्वीपणे राबवली. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविण्यामागे आणि नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करण्यामागे डॉ. सुजय विखे पाटील हेच खरे सूत्रधार असल्याची चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आज रंगली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आमदार रोहित पवार यांनी अजित दादांच्या विमान अपघात प्रकरणाच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, सीआयडी या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करत नाहीये, कारण त्यांच्यावर सरकार आणि गृह खात्याचा दबाव असल्याचे स्पष्टपणे दिसते. या संदर्भात माहिती अधिकार (RTI) अर्जांनाही उत्तरे दिली जात नसल्याचे पवार यांनी नमूद केले. यामुळे आता स्वतः रोहित पवार आरटीआय अर्ज दाखल करणार आहेत. जर त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, तर लवकरच एक व्हिडिओ समोर आणून 'या फोटोतील सॉली कोणाच्या गळ्यात आहेत' याचा खुलासा केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. पवार यांच्या म्हणण्यानुसार, सीआयडीकडून योग्य तपासाची अपेक्षा करणे चुकीचे आहे, कारण अजित दादांच्या प्रकरणात सीआयडीवर गृह खात्याचा दबाव आहे.
    1
    आमदार रोहित पवार यांनी अजित दादांच्या विमान अपघात प्रकरणाच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, सीआयडी या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करत नाहीये, कारण त्यांच्यावर सरकार आणि गृह खात्याचा दबाव असल्याचे स्पष्टपणे दिसते.

या संदर्भात माहिती अधिकार (RTI) अर्जांनाही उत्तरे दिली जात नसल्याचे पवार यांनी नमूद केले. यामुळे आता स्वतः रोहित पवार आरटीआय अर्ज दाखल करणार आहेत. जर त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, तर लवकरच एक व्हिडिओ समोर आणून 'या फोटोतील सॉली कोणाच्या गळ्यात आहेत' याचा खुलासा केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

पवार यांच्या म्हणण्यानुसार, सीआयडीकडून योग्य तपासाची अपेक्षा करणे चुकीचे आहे, कारण अजित दादांच्या प्रकरणात सीआयडीवर गृह खात्याचा दबाव आहे.
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • शिरूरच्या आनंद सोसायटी परिसरात झालेल्या २४ लाख रुपयांच्या घरफोडीचा शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाने यशस्वीपणे उलगडा केला आहे. या प्रकरणी, चोराने लंपास केलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंसह तब्बल २४ लाख रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करत मुख्य आरोपी नोकराला नांदेड जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी नितीन मोतीलाल मुथ्था (रा. आनंद सोसायटी, शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, त्यांच्या घरात काम करणारे विलास आनंदा खोसडे आणि सारजा विलास खोसडे (दोघेही रा. भायेगाव, जि. नांदेड) यांनी ४ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घरातील सोन्या-चांदीचे दागिने, चांदीची भांडी आणि अन्य मौल्यवान साहित्य चोरले होते. या गुन्ह्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३०६ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी विशेष तपास पथकाला आरोपींचा आणि चोरीच्या मालाचा शोध घेण्याचे आदेश दिले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू असताना, मुख्य आरोपी विलास आनंदा खोसडे हा मुखेड तालुक्यातील जांब येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नांदेड जिल्ह्यात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आरोपीकडून चोरीस गेलेले सुमारे २४ लाख रुपये किमतीचे ७ किलो १३४ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व वस्तू तसेच ३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. पोलिसांनी चोरीचा जवळपास संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभमकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने पार पाडली. पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्यासह अक्षय कळमकर, नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, अंबादास थोरे, रविंद्र काळे, दादाराव नागरे आणि अजय पाटील यांनी या यशस्वी कारवाईत सहभाग घेतला.
    2
    शिरूरच्या आनंद सोसायटी परिसरात झालेल्या २४ लाख रुपयांच्या घरफोडीचा शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाने यशस्वीपणे उलगडा केला आहे. या प्रकरणी, चोराने लंपास केलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंसह तब्बल २४ लाख रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करत मुख्य आरोपी नोकराला नांदेड जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी नितीन मोतीलाल मुथ्था (रा. आनंद सोसायटी, शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, त्यांच्या घरात काम करणारे विलास आनंदा खोसडे आणि सारजा विलास खोसडे (दोघेही रा. भायेगाव, जि. नांदेड) यांनी ४ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घरातील सोन्या-चांदीचे दागिने, चांदीची भांडी आणि अन्य मौल्यवान साहित्य चोरले होते. या गुन्ह्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३०६ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी विशेष तपास पथकाला आरोपींचा आणि चोरीच्या मालाचा शोध घेण्याचे आदेश दिले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू असताना, मुख्य आरोपी विलास आनंदा खोसडे हा मुखेड तालुक्यातील जांब येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नांदेड जिल्ह्यात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान, आरोपीकडून चोरीस गेलेले सुमारे २४ लाख रुपये किमतीचे ७ किलो १३४ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व वस्तू तसेच ३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. पोलिसांनी चोरीचा जवळपास संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभमकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने पार पाडली. पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्यासह अक्षय कळमकर, नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, अंबादास थोरे, रविंद्र काळे, दादाराव नागरे आणि अजय पाटील यांनी या यशस्वी कारवाईत सहभाग घेतला.
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र मीराबाई आईसाहेब संस्थान महासांगवी येथे मुलांसाठी शालेय शिक्षणासोबतच आध्यात्मिक शिक्षणही सुरू करण्यात आले आहे. या संस्थेमध्ये राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था असून, शाळेत जाण्यासाठी बसची सोय देखील उपलब्ध आहे. संस्थेचे परिसर अत्यंत निसर्गरम्य वातावरणात असून, येथे विद्यार्थ्यांना गायन, वादन, हरिपाठ, गीता आणि कीर्तनाचे धडे दिले जातील. श्री संत मिराबाई आईसाहेब संस्थानच्या महंत राधाताई महाराज (आईसाहेब) यांनी ज्या मुलांना प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. यासाठी संपर्क क्रमांक 9763980777 आणि विठ्ठल महाराज सांगळे यांचा संपर्क क्रमांक 9403039322 उपलब्ध करून देण्यात आला आहे.
    1
    बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र मीराबाई आईसाहेब संस्थान महासांगवी येथे मुलांसाठी शालेय शिक्षणासोबतच आध्यात्मिक शिक्षणही सुरू करण्यात आले आहे. या संस्थेमध्ये राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था असून, शाळेत जाण्यासाठी बसची सोय देखील उपलब्ध आहे.

संस्थेचे परिसर अत्यंत निसर्गरम्य वातावरणात असून, येथे विद्यार्थ्यांना गायन, वादन, हरिपाठ, गीता आणि कीर्तनाचे धडे दिले जातील. श्री संत मिराबाई आईसाहेब संस्थानच्या महंत राधाताई महाराज (आईसाहेब) यांनी ज्या मुलांना प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. यासाठी संपर्क क्रमांक 9763980777 आणि विठ्ठल महाराज सांगळे यांचा संपर्क क्रमांक 9403039322 उपलब्ध करून देण्यात आला आहे.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • लखनौ येथील साईभक्त श्री. गोविंद गोयल यांनी शिर्डी येथे श्री साईबाबांच्या चरणी तब्बल ₹९२ लाख ०५ हजार ५६० किंमतीचा आणि ७८० ग्रॅम वजनाचा एक सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे. या पवित्र सोहळ्यामुळे शिर्डीत भक्ती आणि श्रद्धेचा एक अद्भुत संगम पाहायला मिळाला, ज्यामुळे भाविकांमध्ये मोठा आनंद आणि उत्साह संचारला.
    1
    लखनौ येथील साईभक्त श्री. गोविंद गोयल यांनी शिर्डी येथे श्री साईबाबांच्या चरणी तब्बल ₹९२ लाख ०५ हजार ५६० किंमतीचा आणि ७८० ग्रॅम वजनाचा एक सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे. या पवित्र सोहळ्यामुळे शिर्डीत भक्ती आणि श्रद्धेचा एक अद्भुत संगम पाहायला मिळाला, ज्यामुळे भाविकांमध्ये मोठा आनंद आणि उत्साह संचारला.
    user_महाराष्ट्र टुडे टीव्ही न्युज
    महाराष्ट्र टुडे टीव्ही न्युज
    Local News Reporter Beed, Maharashtra•
    12 hrs ago
  • अखेर एका संघर्ष योद्ध्याने अंतरवली सराटी या गावात अनवाणी पायाने, भर उन्हात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
    1
    अखेर एका संघर्ष योद्ध्याने अंतरवली सराटी या गावात अनवाणी पायाने, भर उन्हात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
    user_Hanumant Shinde
    Hanumant Shinde
    Voice of people बीड, बीड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • बीड शहरातील नगर नाका परिसरातील चंपावती विद्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग कॉर्नरपासून ते धानोरा रोडवरील पंढरी नगरीपर्यंतचे सर्व पथदिवे आणि हायमास दिवे सध्या बंद अवस्थेत आहेत. यामुळे या संपूर्ण परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. रात्रीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने नागरिक त्रस्त असून, मोठे हायमास दिवे केवळ शोभेची वस्तू बनले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या भागात तात्काळ पथदिवे सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
    1
    बीड शहरातील नगर नाका परिसरातील चंपावती विद्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग कॉर्नरपासून ते धानोरा रोडवरील पंढरी नगरीपर्यंतचे सर्व पथदिवे आणि हायमास दिवे सध्या बंद अवस्थेत आहेत. यामुळे या संपूर्ण परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. रात्रीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने नागरिक त्रस्त असून, मोठे हायमास दिवे केवळ शोभेची वस्तू बनले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या भागात तात्काळ पथदिवे सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • अंतरवाली येथे मराठा समाज तीव्र संताप व्यक्त करत आहे. त्यांच्या सहनशीलतेचा बांध आता फुटला असून, कोणतीही परिस्थिती यापुढे सहन होणार नाही, अशी तीव्र भावना मराठ्यांमध्ये आहे.
    1
    अंतरवाली येथे मराठा समाज तीव्र संताप व्यक्त करत आहे. त्यांच्या सहनशीलतेचा बांध आता फुटला असून, कोणतीही परिस्थिती यापुढे सहन होणार नाही, अशी तीव्र भावना मराठ्यांमध्ये आहे.
    user_Tej maharashtra varta
    Tej maharashtra varta
    पंढरपूर, सोलापूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • बीड शहरात शिवसेनेचे नेते श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर होर्डिंग्ज, कट-आउट्स आणि हुल लावण्यात आले होते. हे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आचारसंहितेची घोषणा झाल्यानंतर लावण्यात आले होते. या कृतीमुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचे स्पष्ट असून, निवडणूक आयोग यावर कारवाई करणार का, की हा नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे, अशी चर्चा शहरात सुरू आहे. नेत्याचे किती जवळचे आणि मोठे चाहते आहोत हे दाखवण्यासाठी बीड शहरात कट-आउट्स लावण्याची जणू स्पर्धाच लागली होती. परंतु, या प्रयत्नात नेते आणि कार्यकर्ते हे विसरले की स्थानिक स्वराज्य संस्थेची आचारसंहिता लागू झाली आहे आणि अशा काळात अशा जाहिराती लावता येत नाहीत. बीड नगरपालिकेकडून पोस्टर काढण्यासाठी ‘थातूरमातूर’ कारवाई करण्यात आली, तरीही सत्ताधाऱ्यांकडून हजारो बॅनर्स अनधिकृतपणे रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आले होते. या सर्व प्रकारामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे; नागरिक विचारत आहेत की निवडणूक आयोग ‘झोपेचं सोंग’ करत आहे का. सर्वसामान्यांसाठी एक न्याय आणि राजकीय सत्ताधाऱ्यांसाठी वेगळा न्याय आहे का, असा सवालही विचारला जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर निवडणूक आयोग काय कारवाई करते, याकडे बीडमधील सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    बीड शहरात शिवसेनेचे नेते श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर होर्डिंग्ज, कट-आउट्स आणि हुल लावण्यात आले होते. हे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आचारसंहितेची घोषणा झाल्यानंतर लावण्यात आले होते. या कृतीमुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचे स्पष्ट असून, निवडणूक आयोग यावर कारवाई करणार का, की हा नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे, अशी चर्चा शहरात सुरू आहे.

नेत्याचे किती जवळचे आणि मोठे चाहते आहोत हे दाखवण्यासाठी बीड शहरात कट-आउट्स लावण्याची जणू स्पर्धाच लागली होती. परंतु, या प्रयत्नात नेते आणि कार्यकर्ते हे विसरले की स्थानिक स्वराज्य संस्थेची आचारसंहिता लागू झाली आहे आणि अशा काळात अशा जाहिराती लावता येत नाहीत. बीड नगरपालिकेकडून पोस्टर काढण्यासाठी ‘थातूरमातूर’ कारवाई करण्यात आली, तरीही सत्ताधाऱ्यांकडून हजारो बॅनर्स अनधिकृतपणे रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आले होते.

या सर्व प्रकारामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे; नागरिक विचारत आहेत की निवडणूक आयोग ‘झोपेचं सोंग’ करत आहे का. सर्वसामान्यांसाठी एक न्याय आणि राजकीय सत्ताधाऱ्यांसाठी वेगळा न्याय आहे का, असा सवालही विचारला जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर निवडणूक आयोग काय कारवाई करते, याकडे बीडमधील सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.