लातूरमध्ये रेणापूर नाका परिसरात दोन जणांना बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल लातूरमध्ये रेणापूर नाका परिसरात दोन जणांना बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल लातूर शहरातील जुना रेणापूर नाका परिसरात दोन व्यक्तींना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गजबजलेल्या रेणापूर नाका परिसरात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाच ते सहा जण एकत्र येऊन दोन व्यक्तींना निर्दयीपणे मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहेत. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे घडलेल्या या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी लातूर येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नसून, पोलीस संबंधित फिर्यादीचा शोध घेत आहेत. घटनेची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
लातूरमध्ये रेणापूर नाका परिसरात दोन जणांना बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल लातूरमध्ये रेणापूर नाका परिसरात दोन जणांना बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल लातूर शहरातील जुना रेणापूर नाका परिसरात दोन व्यक्तींना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गजबजलेल्या रेणापूर नाका परिसरात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाच ते सहा जण एकत्र येऊन दोन व्यक्तींना निर्दयीपणे मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहेत. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे घडलेल्या या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी लातूर येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नसून, पोलीस संबंधित फिर्यादीचा शोध घेत आहेत. घटनेची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
- उदगीर शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या सार्वजनिक मुताऱ्या वापरासाठी कधी खुले होणार,नागरिकांचा सवाल उदगीर शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या सार्वजनिक मुतारीच्या उद्घाटनाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. शहरातील विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या या मुताऱ्या वापरासाठी खुल्या न झाल्यामुळे त्या केवळ शोभेच्या वस्तू ठरत आहेत का, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.नगरपालिकेने स्वच्छता आणि सार्वजनिक सोयीसुविधा वाढविण्याच्या उद्देशाने मोठ्या खर्चातून या मुताऱ्या उभारल्या. मात्र प्रत्यक्षात त्या वापरासाठी उपलब्ध नसल्याने नागरिकांना जुन्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः गर्दीच्या भागात स्वच्छतागृहांची तीव्र गरज असताना या सुविधा बंद अवस्थेत दिसत आहेत.स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, “उद्घाटनाचा कार्यक्रम लांबणीवर टाकत बसण्यापेक्षा सुविधा त्वरित सुरू कराव्यात. अन्यथा सार्वजनिक पैशांचा अपव्यय झाल्याची भावना निर्माण होते.” काहींनी तर या प्रकल्पामागील नियोजन आणि अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान, नगरपालिकेकडून या संदर्भात अद्याप स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. संबंधित अधिकाऱ्यांकडून उद्घाटनाची तारीख आणि विलंबाचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ठोस माहिती मिळू शकली नाही.शहरातील स्वच्छता मोहिमेला चालना देण्यासाठी उभारण्यात आलेल्या या सुविधा लवकरात लवकर नागरिकांसाठी खुल्या कराव्यात, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. आता नगरपालिका यावर काय निर्णय घेते, याकडे उदगीरकरांचे लक्ष लागले आहे.1
- विद्यार्थ्यांनी आपापली प्रवेश प्रक्रियेसाठी गरजेची असलेली प्रमाणपत्रे वेळीच काढून घ्यावीत - तहसीलदार बोरगावकर यांचे आवाहन उदगीर (प्रतिनिधी) तालुक्यातील सर्व शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षण प्रक्रियेसाठी आणि प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक प्रमाणपत्रे जसे की उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट, रहिवासी दाखला असे सर्व दाखले प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच काढून घ्यावेत असे आवाहन उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर यांनी केले आहे. वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रतेसाठी अनेक प्रमाणपत्राची गरज असते. त्या प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयात एकाच वेळी गर्दी होते, त्यामुळे वेळेत प्रमाणपत्र मिळतीलच याची शाश्वती नसते, अशाप्रसंगी विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची ही शक्यता असते. या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी वेळीच प्रमाणपत्र काढून घ्यावेत असेही आवाहन तहसीलदार राम बोरगावकर यांनी केले आहे.2
- लातूरच्या रेनापुर नाक्यावर दोन गटात तुंबळ हाणामारी, नेमकं लातूरत घडते तरी काय..?1
- घरफोडी करणारी सराईत टोळीतील ३२ गुन्ह्यांतील कुख्यात मुख्य आरोपी जेरबंद. लाखो रुपयांच्या चोरीचा पर्दाफाश. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शनिवार दिनांक 25 एप्रिल 2026. लातूर जिल्हा तसेच शेजारील धाराशिव, सोलापूर व कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात मागील दीड ते दोन वर्षांपासून सुरू असलेल्या घरफोडी व चोरीच्या सलग घटना घडत होत्या. बंद घरांचे कुलूप तोडून मौल्यवान दागिने व रोख रक्कम चोरी करणारी ही टोळी अत्यंत चलाख पद्धतीने गुन्हे करीत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र, पोलीस अधीक्षक अमोल तांबे लातूर यांच्या सूचनांनुसार अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने राबविलेल्या विशेष कारवाईत या गुन्हेगारी टोळीतील मुख्य व कुख्यात आरोपीस अटक करण्यात यश मिळवले आहे. पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर (स्थानिक गुन्हे शाखा, लातूर) यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे दि. २४ एप्रिल २०२६ रोजी उजनी येथील उड्डाणपुलाखाली सापळा रचला. या कारवाईदरम्यान सुनिल उर्फ काळ्या श्रावण शिंदे (वय २४ वर्षे, रा. सुंभा, ता. जि. धाराशिव) हा रेकॉर्डवरील व फरार आरोपीला पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले. आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पथकाने तत्परतेने त्यास पकडले. आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून – ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ३ ग्रॅम वजनाची सोन्याची ठुशी व रोख रक्कम ₹५,०००/- असा एकूण ₹३५,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने आपल्या साथीदारांसह लातूर, धाराशिव, सोलापूर तसेच कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली. ही टोळी नियोजनबद्ध पद्धतीने वाहनांचा वापर करून रात्रीच्या वेळी बंद घरे हेरून चोरी करत असल्याचे उघड झाले आहे. तपासाअंती आरोपीविरुद्ध खालीलप्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे 🔴 लातूर जिल्हा – २८ गुन्हे भादा, किल्लारी, कासारशिरसी, औसा, लातूर ग्रामीण व इतर पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे. 🔴 धाराशिव जिल्हा – ४ गुन्हे 🔴 सोलापूर जिल्हा – ५ गुन्हे 🔴 कर्नाटक राज्य (बिदर) – ३ गुन्हे या प्रमाणे एकूण ३२ गुन्हे दाखल असून पुढील तपासादरम्यान गुन्ह्याच्या संख्येमध्ये वाढ होण्याची तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत होण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यातील आरोपीने त्याच्या इतर साथीदारासह टोळी तयार करून गुन्हे केल्याची कबुली दिली आहे असून त्याच्या टोळी मधील काही आरोपींना या अगोदरच अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशावरून अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, पोलीस अमलदार माधव बिल्लापटे, नवनाथ हासबे, रामलिंग शिंदे, तुराब पठाण, राजेश कंचे, गणेश साठे, श्रीनिवास जांभळे, शैलेश सुडे, महिला पोलीस अंमलदार अंजली गायकवाड यांचे पथकाने अत्यंत समन्वय व कौशल्य दाखवत ही कारवाई यशस्वी केली.2
- लातूर सायकलिस्ट क्लब दर वर्षी पंढरपूर वारी करतो आणि यामध्ये दरवर्षी जास्तीत जास्त सायकली सहभागी होतात येणाऱ्या 2026 च्या सायकलवारीचे 80 दिवसाचे चॅलेंज असून त्यामध्ये साठ दिवस ऍक्टिव्हिटी करायची आहे तीन दिवस सायकलिंग आणि उर्वरित दिवसांमध्ये रनिंग वॉकिंग स्विमिंग करू शकता आतापर्यंत 60 सदस्यांनी पंढरपूर वारीचे रजिस्ट्रेशन केलेले आहे लातूर मधील सायकल प्रेमींनी यामध्ये सहभागी व्हावं आणि पंढरपूर वारीचा आनंद घ्यावा सायकलिंग करणे हा एक आनंदाने व्यायामाचा एक प्रकार आहे लातूर सायकलिस्ट क्लबचे अनेक उपक्रम झालेले आहेत यापुढे होऊ घातलेले आहेत लातूरमध्ये सायकल स्पर्धा हा उपक्रम घेण्याचा मानस असून त्याची तारीख लवकरच कळविण्यात येईल एवढाच उद्देश आहे की लहान मुलांनी सायकल वापरावी आणि पर्यावरणाचे रक्षण करावे जेणेकरून मुलांचे आरोग्य सुधरेल तसं तर शाळेला कॉलेजला पहिल्या सायकली होत्या तोच उपक्रम जर आता आला तर देशाला पर्यावरण वाचेल डिझेल पेट्रोलचे आणि आपल्यामध्ये झालेले उष्णतेची वाढ ते सुद्धा कमी होण्यास मदत होईल मला एकच आव्हान करायचे आहे की आपण सर्वांनी कमीत कमी लातूरमध्ये तरी सायकली वापराव्यात आणि एक महाराष्ट्राला आदर्श घालून द्यावा हाच एक उद्देश लातूर सायकलिस्ट क्लबचा आहे1
- Post by Jawed1
- Post by Mohsin ahmed khan1
- लातूरमध्ये रेणापूर नाका परिसरात दोन जणांना बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल लातूर शहरातील जुना रेणापूर नाका परिसरात दोन व्यक्तींना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गजबजलेल्या रेणापूर नाका परिसरात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाच ते सहा जण एकत्र येऊन दोन व्यक्तींना निर्दयीपणे मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहेत. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे घडलेल्या या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी लातूर येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नसून, पोलीस संबंधित फिर्यादीचा शोध घेत आहेत. घटनेची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.1