*पंचायत राज दिनानिमित्त येरगीत बाल सभा आयोजित* देगलूर : पंचायत राज दिनानिमित्त काल शुक्रवारी तालुक्यातील चालुक्यकालीन ऐतिहासिक नगरी येरगी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल सभेचे आयोजन करण्यात आले. येरगी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने पंचायत राज दिनानिमित्त बालकांच्या विविध समस्या जाणून घेण्याकरता मुले व मुली यांच्याकडून समस्यांचे अर्ज घेण्यात आले. सदर बालक सभेमध्ये बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच सभेला येरगीचे सरपंच, ग्रामसेवक, बालिका पंचायत राज उपसरपंच, यांनी बालस्नेही ग्रामपंचायत व बाल हक्काबाबत मार्गदर्शन केले. यावेळी संतोष पाटील, राजेश तोटावाड, ग्रामसेवक पोदार, प्रभारी मुख्याध्यापक सौ. वैशाली सागावे, तंटामुक्त अध्यक्ष सायलू कांबळे, ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ बागेवार, अशोक बरसमवार, सुरेश सोमावार, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष गजानन भोकसखेडे, बालिका पंचायत राज उपसरपंच पुनम सुर्यवंशी, पोलिस पाटील मोनिका माळगे, महादेवी कुंचगे, रितीका चिटकुलवार, अंगणवाडी सेविका गंगामणी दारलावार, शितल मठपती, हाणमाबाई बरसमवार, मंजुळा सिलमकुटवार, ग्रामपंचायत कर्मचारी संगणक चालक माधव ईज्जरवार, मल्लिकार्जुन मठपती आदी गावकरी मोठ्या संख्येने या सभेस उपस्थित होते. सदरील बाल सभेमध्ये बाल स्नेही सरपंच व इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. ती पुढील प्रमाणे आहे.यात बालस्नेही पंचायत सरपंच म्हणून महादेवी वाघमारे, उपसरपंच सोमनाथ बरसमवार, ग्रामसेवक महेश्वरी दाणेवार, तंटामुक्त अध्यक्ष श्रध्दा कुडते, पोलिस पाटील राजेश्वर चेंडके, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष बालस्नेही पंचायत सदस्य आर्यध्या बरसमवार, साक्षी बरसमवार, श्रावणी बागेवार, ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून संगीता तोटावार यांची निवड करण्यात आली. या निवडीमुळे संपूर्ण गावात बाल स्नेही गाव या संदर्भात सकारात्मक चर्चा होत असल्याचे दिसून आले.

- लातूर तालुक्यात मतदार यादी 'मॅपिंग' मोहिमेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन लातूर (प्रतिनिधी) भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचने नुसार मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी आणि दुबार किंवा तिबार मतदारांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. लातूर तालुक्यात २५ एप्रिल २०२६ पासून या 'मॅपिंग' प्रक्रियेसाठी सर्व मतदान केंद्रांवर मतदार नोंदणी अधिकारी (बीएलओ) दररोज सायंकाळी ४ ते ७ या वेळेत उपलब्ध राहतील, तसेच इतर वेळी ते मतदारांच्या घरोघरी जाऊन भेट देणार आहेत. या पडताळणीसाठी मतदारांना त्यांचे ओळखपत्र बीएलओंना दाखवावे लागेल, ज्याद्वारे २००२ मधील मतदार संघ, यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांकाच्या आधारे माहितीची खातरजमा केली जाईल. ज्या मतदारांचे नाव २००२ च्या यादीत नाही किंवा ज्यांनी त्यानंतर नाव नोंदवले आहे, अशा मतदारांची पडताळणी त्यांच्या आई-वडील किंवा आजी-आजोबांच्या नावाच्या आधारे केली जाणार आहे. जे मतदार ही मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांना भविष्यात मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेवेळी निवडणूक अधिकाऱ्यांसमोरील सुनावणी आणि पुराव्यांच्या पडताळणीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे ही प्रक्रिया टाळण्यासाठी सर्व मतदारांनी प्रशासनाला सहकार्य करून आपले मॅपिंग करून घ्यावे, असे आवाहन लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे (विरोळे) आणि तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.1
- लातूरच्या औसा तालुक्यातील गोंद्री येथे उष्माघाताने 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यू. जिल्ह्यातील ही दुसरी घटना. तापमानात वाढ झाल्याची प्रशासनाकडून वेळोवेळी माहिती देण्यात येत असतानाच ही घटना घडली आहे या घटनेचा व्हिडिओ "लाईव्ह टीव्ही 9 मराठी" यांनी केलेल्या बातमीतून कळत आहे.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- हिमायतनगरमध्ये आठवडी बाजारामुळे रुग्णवाहिकांना अडथळा! हिमायतनगर शहरातील आठवडी बाजार सध्या अशा ठिकाणी भरवला जात आहे की, त्यामुळे रुग्णवाहिकांच्या ये-जा मार्गात मोठा अडथळा निर्माण होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो, मात्र गर्दीमुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडचणी येत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. नागरिकांची मागणी : आठवडी बाजार पूर्वीच्या ठिकाणी हलवावा रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध करावा नगरपंचायतीने तात्काळ निर्णय घ्यावा रुग्णांच्या जीवाशी खेळ नको — प्रशासनाने तत्काळ लक्ष द्यावे! #हिमायतनगर #आठवडीबाजार #रुग्णवाहिका #PublicIssue #Nanded Maharashtra BreakingNews1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- उमरखेड़ महसूल प्रशासन की रेती पेड़ धारकों को ट्रेजर बोट लगाने की प्रवानगी सिंधगी बोरी चालगनी साखरा हातला बेलखेड मुलावा संगम चिंचोली सभी पेड़ पर ट्रेजर बोट से रेती निकाली जा रही है प्रशासन गहरी निंद में?1
- लातूर (प्रतिनिधी) लातूर जिल्ह्यातील देवणी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वलांडी बीट मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू आहेत, या संदर्भामध्ये वृत्तपत्रातून बातमी आल्यानंतर तसेच या अनुषंगाने नांदेड परिक्षेत्राच्या पोलीस उपमहा निरीक्षकाच्या विशेष पथकाकडे तक्रार गेल्यानंतर कोणत्याही क्षणी धाड पडू शकते, म्हणून अवैध धंदेवाल्यांना दोन दिवस दुकाने उघडू नका असं असताना देणारे पोलीस हवालदार लामतुरे यांचा आणि एका व्यक्तीचा संवाद ऐका......1
- नांदेडमध्ये तिहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांची कडक कारवाई नांदेड येथील गाजलेल्या तिहेरी हत्याकांड तसेच अर्जित सिंग चव्हाण खून प्रकरणातील मुख्य आरोपी शाहरुख कबूतर, साईलालासह इतर आरोपींची आज देगलूर नाका परिसरात पोलिसांकडून धिंड काढण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा आणि भाग्यनगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ही धिंड काढून नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कायद्याचा धाक दाखवण्यासाठी पोलिसांचा ठोस संदेश! गुन्हेगारांना कोणतीही सवलत नाही कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई निश्चित या कारवाईमुळे परिसरात पोलिसांचा दबदबा वाढला असून नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे. #नांदेड #CrimeNews #PoliceAction #DegloorNaka #BreakingNews Maharashtra LawAndOrder1
- उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे राजकीय वातावरण तापले असून शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला झाल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. ढाणकी शिवसेना शहरप्रमुख संजयभाऊ सलेवाड यांची बहीण (प्रभाग क्रमांक १६ मधील शिवसेना उमेदवार) सौ. शांताबाई मोतेवाड यांचे घरी जाऊन त्यांचे डोळ्यात चटणी टाकून काही गावगुंडांनी हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला राजकीय वैमनस्यातून घडवून आणण्यात आल्याचा आरोप असून, संबंधित गुंडांना काही स्थानिक तसेच तालुकास्तरीय नेत्यांचे पाठबळ असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी आज दि. २५ एप्रिल २०२६ रोजी ढानकी येथे शिवसेनेच्या वतीने जोरदार आवाहन करण्यात आले आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर आरोपींवर तात्काळ व कडक कारवाई झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल तसेच या प्रकरणात निरपराध व्यक्ती गोवन्यात येऊ नये असे म्हटले आहे, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांना निवेदन देते वेळी शिवसेना माजी जिल्हा उपप्रमुख कैलास कदम, शिवसेना उमरखेड शहर प्रमुख एडवोकेट संजीव कुमार जाधव, उपशहर प्रमुख बसवेश्वर क्षीरसागर, विधानसभा प्रमुख सुनील शहाणे,शिवसेना उमरखेड महिला शहर प्रमुख सपना चौधरी,सौ. मंजुषा अनिल नरवाडे, रमेश चव्हाण, विवेक......., शेख इरफान शेख इसा, सुरेंद्रनाथ दळवी तसेच धमकी येथील पदाधिकारी आणि तमाम शिवसैनिक महिला पुरुष उपस्थित होते.3