logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बनावट सोन्याच्या बिस्किटांचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा १२ तासांत पर्दाफाश. ५ आरोपी अटक, ५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त. अहमदपूर पोलिसांची मोठी कारवाई. बनावट सोन्याच्या बिस्किटांचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा १२ तासांत पर्दाफाश. ५ आरोपी अटक, ५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त. अहमदपूर पोलिसांची मोठी कारवाई. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026. महिलांना बनावट सोन्याचे बिस्किट देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा अहमदपूर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत पर्दाफाश केला. पोलिसांनी या प्रकरणातील ५ आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून बनावट सोन्याची ४ बिस्किटे, एर्टिगा कार व चोरीस गेलेले सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अहमदपूर शहरात महिलांना हेरून ‘१० ग्रॅम सोन्याचे बिस्किट देतो, त्याबदल्यात तुमचे सोन्याचे दागिने द्या’ असे आमिष दाखवून बनावट सोन्याचे बिस्किट देत फसवणूक केली जात होती. याप्रकरणी दोन महिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्र. ५०९/२०२६, व गुन्हा क्र. ५०७/२०२६ दाखल करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वात अहमदपूर गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. अवघ्या १२ तासांत टोळीचा शोध घेऊन ५ आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र (१२ हजार), ७ ग्रॅम सोन्याचे झुमके (२८ हजार), एर्टिगा कार (५ लाख) तसेच बनावट सोन्याची बिस्किटे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वातील पथकामधील सपोनि श्रीनिवास राठोड, पोलीस अंमलदार तानाजी आरदवाड, हरिदास कांबळवाड, दत्ता इंद्राळे, विशाल सारोळे, गणेश चव्हाण व राष्ट्रपाल कांबळे यांनी केली आहे.

1 day ago
user_Nitin Chalak
Nitin Chalak
Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
1 day ago
62a2db12-e817-4436-9cb2-506014ad2ff2

बनावट सोन्याच्या बिस्किटांचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा १२ तासांत पर्दाफाश. ५ आरोपी अटक, ५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त. अहमदपूर पोलिसांची मोठी कारवाई. बनावट सोन्याच्या बिस्किटांचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा १२ तासांत पर्दाफाश. ५ आरोपी अटक, ५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त. अहमदपूर पोलिसांची मोठी कारवाई. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026. महिलांना बनावट सोन्याचे बिस्किट देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा अहमदपूर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत पर्दाफाश केला. पोलिसांनी या प्रकरणातील ५ आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून बनावट सोन्याची ४ बिस्किटे, एर्टिगा कार व चोरीस गेलेले सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अहमदपूर शहरात महिलांना हेरून ‘१० ग्रॅम सोन्याचे बिस्किट देतो, त्याबदल्यात तुमचे सोन्याचे दागिने

646b8cf4-a6aa-45bf-a3fc-0ae39822401a

द्या’ असे आमिष दाखवून बनावट सोन्याचे बिस्किट देत फसवणूक केली जात होती. याप्रकरणी दोन महिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्र. ५०९/२०२६, व गुन्हा क्र. ५०७/२०२६ दाखल करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वात अहमदपूर गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. अवघ्या १२ तासांत टोळीचा शोध घेऊन ५ आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र (१२ हजार), ७ ग्रॅम सोन्याचे झुमके (२८ हजार), एर्टिगा कार (५ लाख) तसेच बनावट सोन्याची बिस्किटे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वातील पथकामधील सपोनि श्रीनिवास राठोड, पोलीस अंमलदार तानाजी आरदवाड, हरिदास कांबळवाड, दत्ता इंद्राळे, विशाल सारोळे, गणेश चव्हाण व राष्ट्रपाल कांबळे यांनी केली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • लेखन प्रेरणा दिन म्हणून यावर्षीपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यास सुरुवात — माणिक वाघमारे राज्य सरकारकडून माणिक वाघमारे यांच्या मागणीची दखल लेखन प्रेरणा दिन म्हणून यावर्षीपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यास सुरुवात — माणिक वाघमारे राज्य सरकारकडून माणिक वाघमारे यांच्या मागणीची दखल बीड प्रतिनिधी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त यावर्षीपासून १ ऑगस्ट हा दिवस "लेखन प्रेरणा दिन" म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचे विविध साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे. याप्रसंगी अरुण खेमाडे, दत्ताभाऊ सौंदरमल, दीपक तांगडे, मीनाक्षी देवकते, कमल लांडगे, भूषण वाघमारे, सम्यक सरवदे यानी सत्कार केला. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ साहित्यप्रेमी माणिक वाघमारे यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून व शाहिरीतून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या वेदनांना शब्द दिले. त्यांच्या साहित्याने सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली असून नव्या पिढीतील लेखकांना प्रेरणा मिळावी, यासाठी "लेखन प्रेरणा दिन" ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. ते पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ वाचनापुरते मर्यादित नसून ते समाजपरिवर्तनाचा जाहीरनामा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि तरुणांमध्ये लेखनाची आवड निर्माण करण्यासाठी राज्यभर विविध साहित्यिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणे ही स्वागतार्ह बाब आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला "लेखन प्रेरणा दिन" म्हणून मिळालेली ही नवी ओळख त्यांच्या साहित्यकार्याला आणि सामाजिक योगदानाला अभिवादन करणारी असून, नव्या पिढीला लेखन व सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास माणिक वाघमारे यांनी व्यक्त केला.
    4
    लेखन प्रेरणा दिन म्हणून यावर्षीपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यास सुरुवात — माणिक वाघमारे

 राज्य सरकारकडून माणिक वाघमारे यांच्या मागणीची दखल 

लेखन प्रेरणा दिन म्हणून यावर्षीपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यास सुरुवात — माणिक वाघमारे
राज्य सरकारकडून माणिक वाघमारे यांच्या मागणीची दखल 
बीड प्रतिनिधी :
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त यावर्षीपासून १ ऑगस्ट हा दिवस "लेखन प्रेरणा दिन" म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचे विविध साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे. याप्रसंगी  अरुण खेमाडे, दत्ताभाऊ सौंदरमल, दीपक तांगडे, मीनाक्षी देवकते, कमल लांडगे, भूषण वाघमारे, सम्यक सरवदे यानी सत्कार केला.
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ साहित्यप्रेमी माणिक वाघमारे यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून व शाहिरीतून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या वेदनांना शब्द दिले. त्यांच्या साहित्याने सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली असून नव्या पिढीतील लेखकांना प्रेरणा मिळावी, यासाठी "लेखन प्रेरणा दिन" ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे.
ते पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ वाचनापुरते मर्यादित नसून ते समाजपरिवर्तनाचा जाहीरनामा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि तरुणांमध्ये लेखनाची आवड निर्माण करण्यासाठी राज्यभर विविध साहित्यिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणे ही स्वागतार्ह बाब आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला "लेखन प्रेरणा दिन" म्हणून मिळालेली ही नवी ओळख त्यांच्या साहित्यकार्याला आणि सामाजिक योगदानाला अभिवादन करणारी असून, नव्या पिढीला लेखन व सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास माणिक वाघमारे यांनी व्यक्त केला.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • कारंजा चौकात गंगा-जमुनी संस्कृतीचे दर्शन; संदल व मरीआई देवी (थंडी) मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद अक्कलकोट शहरातील कारंजा चौक येथे हजरत पीर शहाहुसेनी बाबा (र.अ.) यांच्या भव्य संदल मिरवणुकीसह गोल्ल समाजाच्या वतीने आयोजित मरीआई देवी (थंडी) मिरवणुकीमुळे धार्मिक सलोखा, सामाजिक ऐक्य आणि गंगा-जमुनी संस्कृतीचे प्रेरणादायी दर्शन घडले. हजरत पीर शहाहुसेनी बाबा (र.अ.) यांच्या पवित्र संदल मिरवणुकीत हजारो भाविकांनी श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने सहभाग घेतला. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्यांचा गजर, धार्मिक जयघोष आणि भक्तिमय वातावरणात निघालेल्या मिरवणुकीने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. याचवेळी गोल्ल समाजाच्या वतीने आयोजित मरीआई देवी (थंडी) मिरवणूकही मोठ्या उत्साहात पार पडली. कारंजा चौक परिसरात दोन्ही मिरवणुकांचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. विविध समाज आणि सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत मिरवणुकांचे स्वागत केले, त्यामुळे अक्कलकोटच्या सामाजिक ऐक्याची आणि परस्पर सौहार्दाची परंपरा पुन्हा अधोरेखित झाली. दोन्ही धार्मिक मिरवणुकांमुळे शहरात दिवसभर भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले. शांतता, बंधुभाव आणि परस्पर आदराच्या भावनेतून पार पडलेल्या या सोहळ्याचे नागरिकांकडून विशेष स्वागत करण्यात आले. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांच्या कडून मिळाली
    1
    कारंजा चौकात गंगा-जमुनी संस्कृतीचे दर्शन; संदल व मरीआई देवी (थंडी) मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद
अक्कलकोट शहरातील कारंजा चौक येथे हजरत पीर शहाहुसेनी बाबा (र.अ.) यांच्या भव्य संदल मिरवणुकीसह गोल्ल समाजाच्या वतीने आयोजित मरीआई देवी (थंडी) मिरवणुकीमुळे धार्मिक सलोखा, सामाजिक ऐक्य आणि गंगा-जमुनी संस्कृतीचे प्रेरणादायी दर्शन घडले.
हजरत पीर शहाहुसेनी बाबा (र.अ.) यांच्या पवित्र संदल मिरवणुकीत हजारो भाविकांनी श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने सहभाग घेतला. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्यांचा गजर, धार्मिक जयघोष आणि भक्तिमय वातावरणात निघालेल्या मिरवणुकीने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले.
याचवेळी गोल्ल समाजाच्या वतीने आयोजित मरीआई देवी (थंडी) मिरवणूकही मोठ्या उत्साहात पार पडली. कारंजा चौक परिसरात दोन्ही मिरवणुकांचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. विविध समाज आणि सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत मिरवणुकांचे स्वागत केले, त्यामुळे अक्कलकोटच्या सामाजिक ऐक्याची आणि परस्पर सौहार्दाची परंपरा पुन्हा अधोरेखित झाली.
दोन्ही धार्मिक मिरवणुकांमुळे शहरात दिवसभर भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले. शांतता, बंधुभाव आणि परस्पर आदराच्या भावनेतून पार पडलेल्या या सोहळ्याचे नागरिकांकडून विशेष स्वागत करण्यात आले.
अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांच्या कडून मिळाली
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांविरोधात कठोर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निषेधार्थ निदर्शने केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.
    1
    महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांविरोधात कठोर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निषेधार्थ निदर्शने केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • मनसेकडून परंडा पोलीस स्टेशनच्या दोन नवपदोन्नत हवालदारांचा जाहीर सत्कार! परंडा पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रमेश नारायण शिरसागर आणि शिवानंद भीमाशंकर स्वामी यांची पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
    1
    मनसेकडून परंडा पोलीस स्टेशनच्या दोन नवपदोन्नत हवालदारांचा जाहीर सत्कार!
परंडा पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रमेश नारायण शिरसागर आणि शिवानंद भीमाशंकर स्वामी यांची पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
    user_Vijay Meher
    Vijay Meher
    Salesperson परंडा, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. पावसाने खुलले सहस्त्रकुंडचे सौंदर्य! पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 🏞️ फेसाळ शुभ्र धारा, हिरवाईने नटलेला परिसर, डोंगरांवरील धुके आणि निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहण्यासाठी किनवट, हिमायतनगर, उमरखेड, नांदेड, यवतमाळ तसेच तेलंगणातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. ⚠️ सूचना: धबधब्याचा प्रवाह सध्या अतिवेगवान आहे. सेल्फीच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नका, नदीपात्रात उतरू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. 📍 सहस्त्रकुंड धबधबा – पावसाळ्यातील निसर्गाचा अद्भुत नजारा! #Sahastrakund #SahastrakundWaterfall #PaingangaRiver #Himayatnagar #Kinwat Nanded Yavatmal Marathwada Vidarbha Telangana Monsoon Nature Tourism Travel Rain Waterfall Maharashtra ALMBharat NNLMarathi
    1
    पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 
पावसाने खुलले सहस्त्रकुंडचे सौंदर्य! 
पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 
🏞️ फेसाळ शुभ्र धारा, हिरवाईने नटलेला परिसर, डोंगरांवरील धुके आणि निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहण्यासाठी किनवट, हिमायतनगर, उमरखेड, नांदेड, यवतमाळ तसेच तेलंगणातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
⚠️ सूचना: धबधब्याचा प्रवाह सध्या अतिवेगवान आहे. सेल्फीच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नका, नदीपात्रात उतरू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
📍 सहस्त्रकुंड धबधबा – पावसाळ्यातील निसर्गाचा अद्भुत नजारा!
#Sahastrakund #SahastrakundWaterfall #PaingangaRiver #Himayatnagar #Kinwat Nanded Yavatmal Marathwada Vidarbha Telangana Monsoon Nature Tourism Travel Rain Waterfall Maharashtra ALMBharat NNLMarathi
    user_ALM Bharat
    ALM Bharat
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • ता. गेवराई. जिल्हा बिड. गोपत गोपपिंपळगाव. झोपड. पटी. येथे. रस्त्याची. आटचन. आहे. लहान. मुलाना. रस्ता. नसल्याने. शाळ. बद. आहे
    1
    ता. गेवराई. जिल्हा बिड. गोपत गोपपिंपळगाव. झोपड. पटी. येथे. रस्त्याची. आटचन. आहे. लहान. मुलाना. रस्ता. नसल्याने. शाळ. बद. आहे
    user_दत्ता. सखाराम. बळी
    दत्ता. सखाराम. बळी
    गेवराई, बीड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा
    1
    भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या  79 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व  निष्ठावंत कार्यकर्त्यांना  हार्दिक शुभेच्छा
    user_भाई लक्ष्मण  सोळुंके
    भाई लक्ष्मण सोळुंके
    Bus tour agency निलंगा, लातूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती बीड | प्रतिनिधी : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. १ ऑगस्ट २०२६) सकाळी १० वाजता बीड शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध समाजघटकांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बीडचे जिल्हाधिकारी मा. विवेकजी जॉन्शन यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन केले. तसेच बीडचे आमदार मा. संदीप भैया क्षीरसागर, युवा नेते कल्याणजी डोंगरे, जिल्हाध्यक्ष वीर, अखिल भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष ससाणे, अनिल डोळस, एम. एस. धनवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमास नगरसेवक भारत अण्णा कांबळे, संपादक नितीन मुजमुले, बळीराम चांदणे, विनोद हातागळे, अजिंक्य चांदणे, राजू माहुवाले यांच्यासह बौद्ध समाज, मातंग समाज आणि इतर बहुजन समाजातील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक विचार आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण परिसर घोषणांनी आणि अण्णाभाऊंच्या विचारांच्या जयघोषाने दुमदुमून गेला. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
    3
    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती
बीड | प्रतिनिधी : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. १ ऑगस्ट २०२६) सकाळी १० वाजता बीड शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध समाजघटकांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बीडचे जिल्हाधिकारी मा. विवेकजी जॉन्शन यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन केले. तसेच बीडचे आमदार मा. संदीप भैया क्षीरसागर, युवा नेते कल्याणजी डोंगरे, जिल्हाध्यक्ष वीर, अखिल भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष ससाणे, अनिल डोळस, एम. एस. धनवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमास नगरसेवक भारत अण्णा कांबळे, संपादक नितीन मुजमुले, बळीराम चांदणे, विनोद हातागळे, अजिंक्य चांदणे, राजू माहुवाले यांच्यासह बौद्ध समाज, मातंग समाज आणि इतर बहुजन समाजातील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक विचार आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण परिसर घोषणांनी आणि अण्णाभाऊंच्या विचारांच्या जयघोषाने दुमदुमून गेला. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १,४८२ नागरिकांना विविध योजनांचा लाभ जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत अक्कलकोट तालुक्यात ३१ जुलै २०२६ रोजी आयोजित शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरामधून विविध महसूल व शासकीय योजनांचा लाभ एकूण १,४८२ लाभार्थ्यांना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार विनायक मगर यांनी दिली आहेत. याशिबिरात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, जिवंत सातबारा मोहीम, घरकुल योजना, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत कार्यवाही, शेतजमिनींच्या नोंदणी शुल्क माफीसह विविध राज्य व केंद्र शासनाच्या योजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन व लाभ देण्यात आला. उपलब्ध माहितीनुसार, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत ७०, जिवंत सातबारा मोहिमेत ६०, घरकुल योजनेत ५०, नोंदणी शुल्क माफीचा लाभ २०, तर राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ ६००, केंद्र शासनाच्या योजनांचा ५०, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजनांचा ६५ आणि इतर विविध लाभ ५४१ नागरिकांना देण्यात आले. महसूल विभागाच्या या विशेष अभियानामुळे नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लागण्यास मदत झाली असून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
    2
    छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १,४८२ नागरिकांना विविध योजनांचा लाभ
जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत अक्कलकोट तालुक्यात ३१ जुलै २०२६ रोजी आयोजित शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरामधून विविध महसूल व शासकीय योजनांचा लाभ एकूण १,४८२ लाभार्थ्यांना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार विनायक मगर यांनी दिली आहेत. याशिबिरात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, जिवंत सातबारा मोहीम, घरकुल योजना, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत कार्यवाही, शेतजमिनींच्या नोंदणी शुल्क माफीसह विविध राज्य व केंद्र शासनाच्या योजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन व लाभ देण्यात आला.
उपलब्ध माहितीनुसार, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत ७०, जिवंत सातबारा मोहिमेत ६०, घरकुल योजनेत ५०, नोंदणी शुल्क माफीचा लाभ २०, तर राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ ६००, केंद्र शासनाच्या योजनांचा ५०, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजनांचा ६५ आणि इतर विविध लाभ ५४१ नागरिकांना देण्यात आले.
महसूल विभागाच्या या विशेष अभियानामुळे नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लागण्यास मदत झाली असून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.