ब्रेकिंग : दिलीप ठाकूर यांना टार्गेट करून ऑनलाइन फसवणुकीचा प्रयत्न फसला नांदेड : ऑनलाइन फसवणुकीचा एक नवा प्रकार समोर आला असून, भाजपाचे नांदेड जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सतर्कतेमुळे मोठा आर्थिक फटका बसण्यापासून बचाव झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांनी डिजिटल व्यवहार करताना अधिक सावध राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी ठाकूर यांना 90399 67959 या अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरची व्यक्ती हिंदीत बोलत होती. त्याने स्वतःला सिमा चा नातेवाईक असल्याचे सांगून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. पुढे त्याने “माझा गुगल पे बंद आहे, माझा भाऊ तुमच्या नंबरवर पैसे पाठवेल, ते तुम्ही उद्या मला नगदी द्या,” असे सांगून घाईत फोन कट केला. फोन संपताच ठाकूर यांच्या मोबाईलवर राजू कुमार या नावाने ₹45,500 जमा झाल्याचा मेसेज आला. मात्र, एवढी मोठी रक्कम पाहून ठाकूर यांना संशय आला. काही वेळातच पुन्हा फोन करून संबंधित व्यक्तीने “चुकून जास्त रक्कम पाठवली गेली आहे, त्यातील 20 हजार रुपये तात्काळ परत पाठवा,” अशी मागणी केली.यावेळी ठाकूर यांनी अधिक चौकशी करत संबंधित व्यक्तीकडून स्पष्ट ओळख मागितली. मात्र, त्याने समाधानकारक उत्तर देण्याऐवजी भावनिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. “गरीबाचे पैसे परत करा, नाहीतर शाप लागेल,” असे सांगत घाई निर्माण केली. तरीही ठाकूर यांनी ठाम भूमिका घेतली. यानंतर संबंधित व्यक्तीने शिवीगाळ करत धमक्या देण्यास सुरुवात केली. “तू कुठे आहेस सांग, मी येतो,” असे म्हणत दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठाकूर यांनी निर्भयपणे उत्तर देत तू येच असे स्पष्ट सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने फोन बंद केला. घटनेनंतर अधिक सतर्क होत ठाकूर यांनी आपल्या खात्याची तपासणी केली असता, प्रत्यक्षात कोणतीही रक्कम जमा झाली नसून केवळ बनावट मेसेज पाठवण्यात आल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा संबंधित व्यक्तीकडे व्यवहाराचा स्क्रीनशॉट मागितला असता, त्याने हसून फोन कट करून संपर्क तोडला. या प्रकारामुळे, भावनेच्या भरात पैसे परत पाठवण्याची घाई केली असती तर दिलीप ठाकूर यांना स्वतःच्या खात्यातून रक्कम गमवावी लागली असती, हे स्पष्ट झाले आहे. ठाकूर यांच्या सतर्कतेमुळे हा संभाव्य फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. अशा प्रकारच्या फोन कॉल्स किंवा मेसेजेसवर विश्वास ठेवू नये. कोणतीही रक्कम प्राप्त झाल्याचा दावा केल्यास प्रथम बँक खात्यातील व्यवहाराची खात्री करूनच पुढील निर्णय घ्यावा. ऑनलाइन व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक असल्याचे ॲड. दिलीप ठाकूर यांनी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नागरिकांना आवाहन केले आहे.
ब्रेकिंग : दिलीप ठाकूर यांना टार्गेट करून ऑनलाइन फसवणुकीचा प्रयत्न फसला नांदेड : ऑनलाइन फसवणुकीचा एक नवा प्रकार समोर आला असून, भाजपाचे नांदेड जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सतर्कतेमुळे मोठा आर्थिक फटका बसण्यापासून बचाव झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांनी डिजिटल व्यवहार करताना अधिक सावध राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी ठाकूर यांना 90399 67959 या अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरची व्यक्ती हिंदीत बोलत होती. त्याने स्वतःला सिमा चा नातेवाईक असल्याचे सांगून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. पुढे त्याने “माझा गुगल पे बंद आहे, माझा भाऊ तुमच्या नंबरवर पैसे पाठवेल, ते तुम्ही उद्या मला नगदी द्या,” असे सांगून घाईत फोन कट केला. फोन संपताच ठाकूर यांच्या मोबाईलवर राजू कुमार या नावाने ₹45,500
जमा झाल्याचा मेसेज आला. मात्र, एवढी मोठी रक्कम पाहून ठाकूर यांना संशय आला. काही वेळातच पुन्हा फोन करून संबंधित व्यक्तीने “चुकून जास्त रक्कम पाठवली गेली आहे, त्यातील 20 हजार रुपये तात्काळ परत पाठवा,” अशी मागणी केली.यावेळी ठाकूर यांनी अधिक चौकशी करत संबंधित व्यक्तीकडून स्पष्ट ओळख मागितली. मात्र, त्याने समाधानकारक उत्तर देण्याऐवजी भावनिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. “गरीबाचे पैसे परत करा, नाहीतर शाप लागेल,” असे सांगत घाई निर्माण केली. तरीही ठाकूर यांनी ठाम भूमिका घेतली. यानंतर संबंधित व्यक्तीने शिवीगाळ करत धमक्या देण्यास सुरुवात केली. “तू कुठे आहेस सांग, मी येतो,” असे म्हणत दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठाकूर यांनी निर्भयपणे उत्तर देत तू येच असे स्पष्ट सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने फोन बंद केला. घटनेनंतर अधिक
सतर्क होत ठाकूर यांनी आपल्या खात्याची तपासणी केली असता, प्रत्यक्षात कोणतीही रक्कम जमा झाली नसून केवळ बनावट मेसेज पाठवण्यात आल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा संबंधित व्यक्तीकडे व्यवहाराचा स्क्रीनशॉट मागितला असता, त्याने हसून फोन कट करून संपर्क तोडला. या प्रकारामुळे, भावनेच्या भरात पैसे परत पाठवण्याची घाई केली असती तर दिलीप ठाकूर यांना स्वतःच्या खात्यातून रक्कम गमवावी लागली असती, हे स्पष्ट झाले आहे. ठाकूर यांच्या सतर्कतेमुळे हा संभाव्य फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. अशा प्रकारच्या फोन कॉल्स किंवा मेसेजेसवर विश्वास ठेवू नये. कोणतीही रक्कम प्राप्त झाल्याचा दावा केल्यास प्रथम बँक खात्यातील व्यवहाराची खात्री करूनच पुढील निर्णय घ्यावा. ऑनलाइन व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक असल्याचे ॲड. दिलीप ठाकूर यांनी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नागरिकांना आवाहन केले आहे.
- महाराष्ट्रामध्ये आरक्षण वर्गीकरणासाठी संघर्ष सुरू असून, लोक स्वराज्य आंदोलनाने १९ मे रोजी 'वज्रमुठ महाआंदोलन' पुकारले आहे. या महाआंदोलनात समाज बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.1
- नांदेड जिल्ह्यातील एका राजकीय विश्लेषकाने सध्याच्या घडामोडींवर महत्त्वाचे भाष्य केले. त्यांच्या या निरीक्षणातून स्थानिक राजकीय परिस्थितीचे आकलन होण्यास मदत होईल.1
- औरंगाबादमधील MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला. या कारवाईमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.1
- नांदेड शहरातील शाहू नगर परिसरात विद्यार्थ्यांसाठी 'यशस्वी' व 'लक्ष्मीनारायण' हॉस्टेलचे थाटात उद्घाटन झाले. खासदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा व अभ्यासिकेची सोय मिळेल. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सुरक्षित व अभ्यासपूर्ण वातावरण उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.1
- परभणी येथे महापौर आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत तब्बसुम्म बेगम वसीम शेख यांनी प्रभाग समिती (क) सभापती पदाचा कार्यभार स्वीकारला. या नवीन जबाबदारीमुळे प्रभाग समितीच्या कामकाजाला नवी गती मिळण्याची अपेक्षा आहे.1
- हैदराबाद येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात देविदास महामुने यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाने परभणी जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- गंगाखेड शहरातील सारडा कॉलनीतील शिक्षकाच्या घरात भरदिवसा घरफोडी झाली होती. गंगाखेड पोलिसांनी अवघ्या २४ तासांत जालन्यातून आरोपीला अटक केली असून, चोरलेला १ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.1