खरीप पीकस्पर्धेत सहभागी व्हा! ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्जाची अंतिम मुदत राज्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक व अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून पीक उत्पादकता वाढवावी, प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या अनुभवाचा लाभ परिसरातील इतर शेतकऱ्यांना व्हावा, या उद्देशाने दरवर्षी राज्यांतर्गत पीकस्पर्धा आयोजित केली जाते. खरीप हंगाम २०२६ साठी अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांची पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 💻 यंदापासून ऑनलाइन नोंदणी यापूर्वी पीकस्पर्धेची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात येत होती. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी खरीप हंगाम २०२६ पासून स्वतंत्र ऑनलाइन संगणक प्रणालीद्वारे पीकस्पर्धेचे अर्ज स्वीकारले जात आहेत. कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘पिक स्पर्धा नोंदणी’ ही सुविधा उपलब्ध आहे. 🌱 नऊ खरीप पिकांचा समावेश खरीप हंगामातील पुढील नऊ पिकांसाठी पीकस्पर्धा घेण्यात येणार आहे : ▪️ भात ▪️ ज्वारी ▪️ बाजरी ▪️ मका ▪️ नाचणी (रागी) ▪️ तूर ▪️ सोयाबीन ▪️ भुईमूग ▪️ सूर्यफूल ही स्पर्धा सर्वसाधारण आणि आदिवासी गटासाठी आयोजित करण्यात येणार असून, तालुका, जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरांवर विजेत्या शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. 🏆 उत्पादकतेच्या आधारे निवड तालुकास्तरावरील पीकस्पर्धेत सहभागी शेतकऱ्यांनी मिळविलेली उत्पादकता आधारभूत धरून तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावरील विजेत्या शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. 👨🌾 कोण सहभागी होऊ शकतो? ▪️ शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. ▪️ संबंधित जमीन शेतकरी स्वतः कसत असणे आवश्यक आहे. ▪️ एका शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा अधिक पिकांसाठी पीकस्पर्धेत सहभागी होता येईल. ▪️ भात पिकासाठी स्वतःच्या शेतावर किमान २० गुंठे सलग क्षेत्रावर लागवड असणे आवश्यक आहे. ▪️ भात वगळता इतर पिकांसाठी किमान ४० गुंठे सलग क्षेत्रावर लागवड असणे आवश्यक आहे. 📄 ऑनलाइन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे पीकस्पर्धेच्या ऑनलाइन अर्जासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत : ▪️ फार्मर आयडी ▪️ ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन ▪️ आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी जात प्रमाणपत्र ▪️ बँक खाते असलेल्या चेक अथवा पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत 💰 पीकनिहाय प्रवेश शुल्क सर्वसाधारण गट : प्रति पीक ₹३०० आदिवासी गट : प्रति पीक ₹१५० 🏅 विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे खरीप हंगामातील सर्व नऊ पिकांसाठी पीकस्पर्धेचा ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२६ आहे. 🌐 कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘पिक स्पर्धा नोंदणी’ या सुविधेवरून ऑनलाइन अर्ज करावा. पीकस्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी शेतकरी बंधू-भगिनींनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

- बुलढाण्यातील चिखलीमध्ये रेशन दुकानात लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवला जातोय असा गंभीर आरोप करण्यात येतोय... याचाच निषेध म्हणून लाभार्थ्यांनी संपूर्ण रेशनचा तांदूळ तहसीलदारांच्या केबीनबाहेर फेकलाय... बुलढाण्यातील चिखलीमध्ये रेशन दुकानात लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवला जातोय असा गंभीर आरोप करण्यात येतोय... याचाच निषेध म्हणून लाभार्थ्यांनी संपूर्ण रेशनचा तांदूळ तहसीलदारांच्या केबीनबाहेर फेकलाय... प्रतिनिधी गजानन राऊत असा तांदूळ जनावरंही खात नाहीत असा संतापही त्यांनी व्यक्त केलाय...बुलढाणा ब्रेकिंग या राशन च्या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी त्यांच्या बायका पोरांसोबत खावी.. मग, आम्ही सुद्धा खाऊ हे तांदूळ आमची कोंबडी पण खात नाही . संतप्त लाभार्थ्यानी चिखली तहसीलदारांच्या कॅबिनसमोर फेकला निकृष्ट दर्जाचा रेशनचा तांदूळ राशन चे दुकानातून मिळालेल्या या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी त्यांचा बायका पोरांसोबत खावी मग आम्ही सुद्धा खाऊ अशा शब्दात आपला संताप व्यक्त करत सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या ढिसाळ कारभाराविरोधात चिखलीत लाभार्थी नागरिकांनी थेट तहसीलदार यांच्या केबिन समोर पोहोचले.. रेशन दुकानातून वाटप करण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे तांदूळ हातात घेऊन त्यांनी चक्क तहसीलदारांच्या कॅबीनसमोरच ते ओतून देत या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी बायका पोरांसोबत खावी; मग आम्ही सुद्धा खाऊ आमच्या कोंबड्या सुद्धा हा तांदूळ खात नाही, असे म्हणत प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला.. या अनोख्या आंदोलनामुळे महसूल तसेच पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.. शिवाय राशन दुकानातून मिळणारा तांदूळ किती निकृष्ट आहे , यावर ही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .. बुलढाणा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातून शासनामार्फत वितरित होणारे धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी यापूर्वी अनेक नागरिकांकडून सातत्याने होत आहेत. याच पार्श्वभूमीवर चिखली शहरातील काही लाभार्थ्यी कुटुंबाला वितरित करण्यात आलेले तांदूळ खराब, चुरियुक्त आणि खाण्यायोग्य नसल्याचा आरोप करण्यात आला आहे .. संतापलेल्या नागरिकाने हे धान्य थेट तहसील कार्यालयात आणले आणि तहसीलदारांच्या कॅबीनसमोर ओतून आपला रोष व्यक्त केला.. जे धान्य जनावरेही खाणार नाहीत, ते माणसांच्या ताटात देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळणार का असा संतप्त सवाल यावेळी करण्यात आला.. बाईट - लाभार्थी .. बाईट - प्रियंका सोनकुसळे , निरीक्षण अधिकारी ..4
- जय मल्हार बोलो अमरावती चलो मेंढपाळ रक्षक वैजनाथ पावडे सर्वांना विनंती1
- नेपाळमध्ये जालना जिल्ह्यातील पर्यटक अडकले? प्रशासनाचे आवाहन; तात्काळ हेल्पलाइनवर संपर्क साधा!1
- नेपाळमध्ये अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही,त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. यासाठी 9405408939 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधता येईल. नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे .1
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील1
- 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” शेतकरी स्टाईलने हिसका दाखवू, 📍 वसमत, जि. हिंगोली शक्तिपीठ महामार्गाच्या आक्षेप अर्जावरील सुनावणीत वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका मांडली— 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” असा स्पष्ट इशारा! ✊ जमीन आमची — निर्णय आमचा! 🔥 एकच जिद्द — शक्तिपीठ महामार्ग रद्द! #शक्तिपीठमहामार्ग #वसमत #हिंगोली #शेतकरी_एकजूट1
- नेपाळमध्ये पूर संकट; बुलढाण्यातील नागरिक अडकले असल्यास तात्काळ माहिती द्या..! नेपाळमध्ये पूर संकट; बुलढाण्यातील नागरिक अडकले असल्यास तात्काळ माहिती द्या! भोटे कोशी नदीच्या महापुराने नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले असून, विविध देशांसह महाराष्ट्रातील अनेक पर्यटक आणि नागरिक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे आणि तातडीचे आवाहन केले आहे. नेपाळमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील कोणताही नागरिक, पर्यटक किंवा नातेवाईक अडकले असतील अथवा त्यांच्याशी संपर्क होत नसेल, तर त्यांच्या कुटुंबीयांनी तात्काळ अधिकृत संकेतस्थळावर माहिती नोंदवावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. माहिती नोंदविताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, सध्याचे ठिकाण, हॉटेलचा तपशील, प्रवासाची माहिती आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक अचूक नमूद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन संपर्क : 📞 जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष : ०७२६२-२४२६८३ 📞 पोलीस नियंत्रण कक्ष : ०७२६२-२४२४०० 📞 टोल फ्री : १०७७ 📱 मोबाईल : ७०२०४३५९५४ जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी नागरिकांना घाबरून न जाता प्रशासनाशी संपर्क साधून अधिकृत माध्यमांद्वारे माहिती नोंदविण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाकडून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून मदतकार्य सुरू आहे.1
- Buldhana News : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप Buldhana News : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप (गजानन राऊत बुलढाणा) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं होमटाऊन असलेल्या मेहकर मध्येच आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडवणारा धक्कादायक प्रकार काल घडला...! ग्रामीण रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या घरात एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर त्या महिलेचा पती ऑटोरिक्षा आणण्याकरता गेला असता महिला घरात एकटीच होती. प्रसुती वेदना असह्य झाल्याने महिला घराच्या बाहेर रस्त्यावर आली व कुणाच्या मदततीची अपेक्षा करू लागली मात्र त्यातच अर्धवट प्रसुती झाली आणि विव्हळतच व तळमळत या महिलेच्या आवाजाने शेजारी योगेश सौभागे हे उठले. ते पत्नीसह या महिलेजवळ गेले असता महिलेची अर्धवट प्रस्तुती बघून ते हादरले ग्रामीण रुग्णालय पन्नास फुटावर असल्याने ते धावतच ग्रामीण रुग्णालयात गेले मात्र तेथील उपस्थित परिचारिकेने त्यांना त्या महिलेला रुग्णालयात घेऊन या असे फर्मावले... अशा परिस्थितीतही योगेश यांनी त्या परिचारिकेला विनंती केली . मात्र त्यांनी असमवेदनशीलता दाखवत मी येऊ शकत नाही असं फर्मावलं...4