logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महिला आरक्षणाच्या आड राजकीय डाव? मतदारसंघ पुनर्रचनेवर रोहिणी खडसे यांची टीका “लोकसंख्येच्या आधारावर जागा वाटप अन्यायकारक ठरू शकते”; उत्तर-दक्षिण वाद पेटवण्याचा आरोप जळगाव : प्रतिनिधी लोकसभा व विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या विशेष अधिवेशनाचे स्वागत करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)च्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. महिला आरक्षणाच्या निर्णयामागे काही राजकीय हेतू दडलेले आहेत का, असा संशय व्यक्त करत त्यांनी मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रक्रियेवरही टीका केली आहे. रोहिणी खडसे यांनी आपल्या एक्स (माजी ट्विटर) हँडलवरून प्रतिक्रिया देताना म्हटले की, महिलांना राजकारणात अधिक प्रतिनिधित्व मिळणे ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. संसदेत महिलांची संख्या वाढल्यास त्यांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे मांडता येईल, यात शंका नाही. मात्र, या निर्णयाच्या आड सरकार काही वेगळा डाव आखत आहे का, हा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी पुढे मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा मुद्दा उपस्थित करत सांगितले की, केंद्र सरकार लोकसंख्येच्या आधारावर जागांचे पुनर्वाटप करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. परंतु, हा निकष लागू केल्यास ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न केले आहेत, त्यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील अनेक राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात मोठे यश मिळवले आहे आणि महाराष्ट्रानेही या बाबतीत महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. खडसे यांच्या मते, जर लोकसंख्येच्या प्रमाणावरच जागा वाटप झाले, तर उत्तर भारतातील राज्यांना अधिक प्रतिनिधित्व मिळेल आणि दक्षिणेकडील राज्यांची तुलनात्मक घसरण होईल. अशा परिस्थितीत प्रामाणिकपणे लोकसंख्या नियंत्रण करणाऱ्या राज्यांना शिक्षा मिळाल्यासारखे होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी असा आरोपही केला की, केंद्र सरकारचा उद्देश पारदर्शक असता, तर समानतेच्या तत्वावर जागांचे वाटप करून महिला आरक्षणाची अंमलबजावणी केली गेली असती. मात्र सध्याच्या घडामोडींवरून तसं होताना दिसत नाही, असे त्यांनी म्हटले. रोहिणी खडसे यांनी “अखंड भारत”ची भाषा वापरणाऱ्यांवर टीका करताना म्हटले की, आज त्याच विचारसरणीचे लोक देशात उत्तर विरुद्ध दक्षिण असा वाद निर्माण करण्याच्या तयारीत आहेत. हे देशाच्या एकात्मतेसाठी घातक असून अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निर्णयाची आठवण करून दिली. १९९४ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू केले होते. त्या निर्णयामुळे महिलांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली आणि राजकारणात त्यांचा सहभाग वाढला, असे खडसे यांनी सांगितले. आजच्या परिस्थितीत महिला आरक्षण हा विषय केवळ सामाजिक न्यायासाठी नसून, त्याचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जात असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. “महिला आरक्षण तो बहाना है, २०२९ के चुनाव चुराना है?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला. एकूणच, महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना या दोन्ही मुद्द्यांवरून राजकारण तापण्याची चिन्हे दिसत असून, पुढील काळात या विषयावर आणखी वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

7 hrs ago
user_NEWS 24 MAHARASHTRA
NEWS 24 MAHARASHTRA
Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
7 hrs ago
3ea5e231-389d-48b0-b9b5-db1e8dfb0b18

महिला आरक्षणाच्या आड राजकीय डाव? मतदारसंघ पुनर्रचनेवर रोहिणी खडसे यांची टीका “लोकसंख्येच्या आधारावर जागा वाटप अन्यायकारक ठरू शकते”; उत्तर-दक्षिण वाद पेटवण्याचा आरोप जळगाव : प्रतिनिधी लोकसभा व विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या विशेष अधिवेशनाचे स्वागत करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)च्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. महिला आरक्षणाच्या निर्णयामागे काही राजकीय हेतू दडलेले आहेत का, असा संशय व्यक्त करत त्यांनी मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रक्रियेवरही टीका केली आहे. रोहिणी खडसे यांनी आपल्या एक्स (माजी ट्विटर) हँडलवरून प्रतिक्रिया देताना म्हटले की, महिलांना राजकारणात अधिक प्रतिनिधित्व मिळणे ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. संसदेत महिलांची संख्या वाढल्यास त्यांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे मांडता येईल, यात शंका नाही. मात्र, या निर्णयाच्या आड सरकार काही वेगळा डाव आखत आहे का, हा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी पुढे मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा मुद्दा उपस्थित करत सांगितले की, केंद्र सरकार लोकसंख्येच्या आधारावर जागांचे पुनर्वाटप करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. परंतु, हा निकष लागू केल्यास ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न केले आहेत, त्यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील अनेक राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात मोठे यश मिळवले आहे आणि महाराष्ट्रानेही या बाबतीत महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. खडसे यांच्या मते, जर लोकसंख्येच्या प्रमाणावरच जागा वाटप झाले, तर उत्तर भारतातील राज्यांना अधिक प्रतिनिधित्व मिळेल आणि दक्षिणेकडील राज्यांची तुलनात्मक घसरण होईल. अशा परिस्थितीत प्रामाणिकपणे लोकसंख्या नियंत्रण करणाऱ्या राज्यांना शिक्षा मिळाल्यासारखे होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी असा आरोपही केला की, केंद्र सरकारचा उद्देश पारदर्शक असता, तर समानतेच्या तत्वावर जागांचे वाटप करून महिला आरक्षणाची अंमलबजावणी केली गेली असती. मात्र सध्याच्या घडामोडींवरून तसं होताना दिसत नाही, असे त्यांनी म्हटले. रोहिणी खडसे यांनी “अखंड भारत”ची भाषा वापरणाऱ्यांवर टीका करताना म्हटले की, आज त्याच विचारसरणीचे लोक देशात उत्तर विरुद्ध दक्षिण असा वाद निर्माण करण्याच्या तयारीत आहेत. हे देशाच्या एकात्मतेसाठी घातक असून अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निर्णयाची आठवण करून दिली. १९९४ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू केले होते. त्या निर्णयामुळे महिलांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली आणि राजकारणात त्यांचा सहभाग वाढला, असे खडसे यांनी सांगितले. आजच्या परिस्थितीत महिला आरक्षण हा विषय केवळ सामाजिक न्यायासाठी नसून, त्याचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जात असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. “महिला आरक्षण तो बहाना है, २०२९ के चुनाव चुराना है?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला. एकूणच, महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना या दोन्ही मुद्द्यांवरून राजकारण तापण्याची चिन्हे दिसत असून, पुढील काळात या विषयावर आणखी वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • user_श्रीकृष्ण कुलकर्णी
    श्रीकृष्ण कुलकर्णी
    मावळ, पुणे, महाराष्ट्र
    👏
    1 hr ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पिंपरी चिंचवड वाकड, तपास पथकाची कामगिरी ४८ तासांत चेन स्नॅचर जेरबंद; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
    1
    पिंपरी चिंचवड वाकड, तपास पथकाची कामगिरी ४८ तासांत चेन स्नॅचर जेरबंद; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने चिखली येथील आदित्य लॉजवर छापा टाकून एका मोठ्या देहविक्रय व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे... या कारवाईत ९ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यात एका बांगलादेशी तरुणीचा समावेश आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार, चिखली येथील देहू-आळंदी रोडवरील आदित्य लॉजवर ही धाड टाकण्यात आली. या ठिकाणी लॉजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सुटका करण्यात आलेल्या ९ महिलांपैकी एका तरुणीला आरोपींनी बांगलादेशातून तस्करी करून आणले होते. तिला पुन्हा मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी लॉज मॅनेजर अशोक बाबुराव बाबर आणि कामगार अकिबुल खालेक मुल्ला या दोघांना अटक केली आहे. तसेच लॉज चालक सुदर्शन पवार, जागा मालक नाना बोराटे आणि साहिल ऊर्फ शाहीन मंडल यांच्याविरुद्ध चिखली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता आणि पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे... #चिखली #पिंपरीचिंचवड #पोलीसकारवाई #देहविक्रयप्रकरण #मानवीतस्करी #रेस्क्यूऑपरेशन #महिलांचीसुटका #गुन्हेगारी #क्राईमन्यूज #पोलिसछापा #बांगलादेशीपीडित #आदित्यलॉज #Chikhali #PimpriChinchwad #PoliceRaid #SexRacketBusted #HumanTrafficking #RescueOperation #CrimeNews #WomenRescued #BangladeshiVictim #IllegalActivities #LodgeRaid #AdityaLodge
    1
    पिंपरी चिंचवड :-
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने चिखली येथील आदित्य लॉजवर छापा टाकून एका मोठ्या देहविक्रय व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे...
या कारवाईत ९ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यात एका बांगलादेशी तरुणीचा समावेश आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार, चिखली येथील देहू-आळंदी रोडवरील आदित्य लॉजवर ही धाड टाकण्यात आली. या ठिकाणी लॉजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सुटका करण्यात आलेल्या ९ महिलांपैकी एका तरुणीला आरोपींनी बांगलादेशातून तस्करी करून आणले होते. तिला पुन्हा मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी लॉज मॅनेजर अशोक बाबुराव बाबर आणि कामगार अकिबुल खालेक मुल्ला या दोघांना अटक केली आहे. तसेच लॉज चालक सुदर्शन पवार, जागा मालक नाना बोराटे आणि साहिल ऊर्फ शाहीन मंडल यांच्याविरुद्ध चिखली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता आणि पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
#चिखली #पिंपरीचिंचवड #पोलीसकारवाई #देहविक्रयप्रकरण #मानवीतस्करी #रेस्क्यूऑपरेशन #महिलांचीसुटका #गुन्हेगारी #क्राईमन्यूज #पोलिसछापा #बांगलादेशीपीडित #आदित्यलॉज
#Chikhali #PimpriChinchwad #PoliceRaid #SexRacketBusted #HumanTrafficking #RescueOperation #CrimeNews #WomenRescued #BangladeshiVictim #IllegalActivities #LodgeRaid #AdityaLodge
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • कात्रज कोंढावा रोड परिसर शत्रुंजय मंदिरा समोर बी जे पार्क बिल्डिंग च्या समोर चा रस्ता. 10 वर्ष झाली रस्ता असाच आहे. कोणी दखल घेत नाही. त्यामुळे दुकानाच्या धंद्यावर मोठया प्रमाणावर फरक पडला आहे. तरी हे काम लवकरात लवकर करावे ही विनंती.
    3
    कात्रज कोंढावा रोड परिसर शत्रुंजय मंदिरा समोर बी जे पार्क बिल्डिंग च्या समोर चा रस्ता.
10 वर्ष झाली रस्ता असाच आहे. कोणी दखल घेत नाही. त्यामुळे दुकानाच्या धंद्यावर मोठया प्रमाणावर फरक पडला आहे. तरी हे काम लवकरात लवकर करावे ही विनंती.
    user_श्री गणेश इंटरप्राईजेस
    श्री गणेश इंटरप्राईजेस
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • आम्ही कोंढवावासिय भारतीय नागरिक नाहीत का? मूलभूत सुविधांच्या अभावी कोंढवा प्रभाग १९ च्या नागरिकांचा पुणे महानगरपालिका आणि नवनियुक्त लोकप्रतिनिधींवर रोष..! @highlight #kondhwa #all
    1
    आम्ही कोंढवावासिय भारतीय नागरिक नाहीत का?
मूलभूत सुविधांच्या अभावी कोंढवा प्रभाग १९ च्या नागरिकांचा पुणे महानगरपालिका आणि नवनियुक्त लोकप्रतिनिधींवर रोष..!
@highlight #kondhwa #all
    user_MAHARASHTRA MANTHAN
    MAHARASHTRA MANTHAN
    Advertising agency पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    1 day ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.16 डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती भोर तालुका (एक तालुका, एक जयंती) यांच्या वतीने विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अविनाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यामध्ये सामुहिक बुद्धवंदना, भव्य मिरवणूक/शोभारथ, व्याख्यान, अभिवादन सभा, आरोग्य शिबिर(निमा), पथनाट्य (अं.नि.स संघटना), आंबेडकरी जलसा (भोर तालुका सिंगर ग्रुप), भोजन इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला स्वराज्य निर्माण करून दिले, तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्या स्वराज्याला संविधानाच्या माध्यमातून टिकविले, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. भोर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व अभ्यासिका साठी 2.50 कोटी मंजूर केले आहेत.. अभिवादन सभेवेळी दिवंगत नेते अजित दादा पवार यांनी आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या माध्यमातून निधी मंजूर केल्याचे रणजितदादा शिवतरे, नगराध्यक्ष नाना आवारे, गटनेते केदार देशपांडे यांनी जाहीर केले. या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष रणजीत दादा शिवतरे, जिल्हा परिषदेचे सदस्य विक्रमदादा खुटवड, प्रविणशेठ जगदाळे, नगराध्यक्ष रामचंद्र नाना आवारे, सभापती मनिषाताई कंक, उपसभापती विशाल बंटी कोंडे, गटनेते केदार देशपांडे, उपविभागीय अधिकारी डॉ.विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, मुख्याधिकारी गजानन शिंदे, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार, पंचायत समिती सदस्य राजेश बोडके, नगरसेवक कुणाल धुमाळ, अनिल भेलके, वन अधिकारी संतोष कंक, अध्यक्ष भोर शहर संदिप शेटे, विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत पडवळ, ओबीसी अध्यक्ष मारूती गोरे, डॉ.अरूण बुरांडे, डॉ.इम्रान खान, डॉ.राजेश धिवार, नेहा डोंबे, परवेझ शेख, सोमनाथ ढवळे, बाळासाहेब खुटवड, बाळा शेटे, गौतम शेलार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. भोर तालुक्यातील अविनाश गायकवाड, राजन घोडेस्वार, गणेश साळुंके, अरूण रणखांबे, अक्षय गायकवाड, रणजीत रणखांबे, मयूर गायकवाड, नितीन माने, निलेश घोडेस्वार, सतीश गायकवाड, संतोष जाधव, सिद्धोधन कांबळे, प्रकाश ओव्हाळ, स्वप्निल सावंत, विशाल शाक्य, महेंद्र सपकाळ, सुनील गायकवाड श्रीकांत जाधव, अमोल भालेराव, विकास सपकाळ, दिपक गायकवाड, अनिल गायकवाड, युवराज शेलार, अंकुश साळुंके इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांनी जयंती महोत्सवाचे आयोजन केले होते. प्रास्ताविक मयूर गायकवाड यांनी, सूत्रसंचालन राजन घोडेस्वार, तर आभार अविनाश गायकवाड यांनी मानले. 🙏
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.16 डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती भोर तालुका (एक तालुका, एक जयंती) यांच्या वतीने विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अविनाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यामध्ये सामुहिक बुद्धवंदना, भव्य मिरवणूक/शोभारथ, व्याख्यान, अभिवादन सभा, आरोग्य शिबिर(निमा), पथनाट्य (अं.नि.स संघटना), आंबेडकरी जलसा (भोर तालुका सिंगर ग्रुप), भोजन इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला स्वराज्य निर्माण करून दिले, तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्या स्वराज्याला संविधानाच्या माध्यमातून टिकविले, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. भोर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व अभ्यासिका साठी 2.50 कोटी मंजूर केले आहेत.. अभिवादन सभेवेळी दिवंगत नेते अजित दादा पवार यांनी आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या माध्यमातून निधी मंजूर केल्याचे रणजितदादा शिवतरे, नगराध्यक्ष नाना आवारे, गटनेते केदार देशपांडे यांनी जाहीर केले.
या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष रणजीत दादा शिवतरे, जिल्हा परिषदेचे सदस्य विक्रमदादा खुटवड, प्रविणशेठ जगदाळे, नगराध्यक्ष रामचंद्र नाना आवारे, सभापती मनिषाताई कंक, उपसभापती विशाल बंटी कोंडे, गटनेते केदार देशपांडे, उपविभागीय अधिकारी डॉ.विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, मुख्याधिकारी गजानन शिंदे, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार, पंचायत समिती सदस्य राजेश बोडके, नगरसेवक कुणाल धुमाळ, अनिल भेलके, वन अधिकारी संतोष कंक, अध्यक्ष भोर शहर संदिप शेटे, विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत पडवळ, ओबीसी अध्यक्ष मारूती गोरे, डॉ.अरूण बुरांडे, डॉ.इम्रान खान, डॉ.राजेश धिवार, नेहा डोंबे, परवेझ शेख, सोमनाथ ढवळे, बाळासाहेब खुटवड, बाळा शेटे, गौतम शेलार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 
भोर तालुक्यातील अविनाश गायकवाड, राजन घोडेस्वार, गणेश साळुंके, अरूण रणखांबे, अक्षय गायकवाड, रणजीत रणखांबे, मयूर गायकवाड, नितीन माने, निलेश घोडेस्वार, सतीश गायकवाड, संतोष जाधव, सिद्धोधन कांबळे, प्रकाश ओव्हाळ, स्वप्निल सावंत, विशाल शाक्य, महेंद्र सपकाळ, सुनील गायकवाड श्रीकांत जाधव, अमोल भालेराव, विकास सपकाळ, दिपक गायकवाड, अनिल गायकवाड, युवराज शेलार, अंकुश साळुंके इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांनी जयंती महोत्सवाचे आयोजन केले होते. प्रास्ताविक मयूर गायकवाड यांनी, सूत्रसंचालन राजन घोडेस्वार, तर आभार अविनाश गायकवाड यांनी मानले. 🙏
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम 24}: श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील प्रीतम प्रकाश नगर परिसरात भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणूक काढण्यात आली. “स्वामी समर्थ महाराज की जय”च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. प्रीतम प्रकाश नगरमधील विविध रस्त्यांवरून पालखी मिरवणूक पार पडली. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसरासह संपूर्ण भाग आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. भक्तांच्या उपस्थितीमुळे परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मिरवणुकीनंतर आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध गायक श्रीहरी विठ्ठल मेहंदरकर यांनी सादर केलेल्या भक्तीगीतांनी वातावरण अधिकच भक्तिमय झाले. यावेळी सादर झालेल्या भजन व भक्तीगीतांनी आध्यात्मिक अनुभूती दिली. कार्यक्रमाची सुरुवात “खेळ मांडियेला” या अभंगाने होत “रूपे सुंदर”, “ॐ ओंकार प्रधान” आणि “ग सारेगमप” यांसारख्या सादरीकरणांनी वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. त्यानंतर “रचिला ऋषीमुनींनी”, “विठू माऊली” व “सेवा धर्मी पुण्य आहे” या गीतांनी श्रद्धेची उंची वाढवली, तर “धाव पाव स्वामी” आणि “हरी म्हणा” या गजरांनी भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला. पुढे “मन लागो रे”, “स्वामी समर्था सदगुरु समर्था”, “कानडा राजा पंढरीचा” आणि “वृंदावनी वेणु” या सादरीकरणांनी कार्यक्रम रंगत गेला. “शाम तेरी बंसी” व “धरिला ला पंढरीचा चोर” यानंतर “माझी रेणुका माऊली” आणि “सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा” ही गीते सादर करण्यात आली “घागर घेऊन”, “भवरा भवरा” व “अबीर गुलाल” “तीर्थ विठ्ठल”, “अवघे गर्जे पंढरपूर” या गीतांनी वातावरण अधिकच भारावले . कार्यक्रमाची सांगता “निघालो घेऊन दत्ताची पालखी” या भक्तिगीताने होत उपस्थित भाविकांना आध्यात्मिक समाधानाचा अनुभव देत सोहळ्याचा समारोप करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा संस्था, शिरूर यांच्या वतीने करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष योगेश वाळकीकर, उपाध्यक्ष अॅड. नारायण पवार, सचिव दीपक वर्मा, खजिनदार गणेश घाडगे यांच्यासह संपत लोखंडे, प्रमोद पवार, विष्णू वेताळ, मंगला बागमार, भूषण कडेकर, चंद्रकांत निघोजकर आदी पदाधिकारी आहेत. दरम्यान, संस्थेच्या वतीने प्रीतम प्रकाश नगर येथे स्वामी समर्थ मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून येथे नियमित रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. तसेच गरजूंना वॉकर, वॉटर बेड आदी वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्याचे सामाजिक कार्यही सातत्याने राबविण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष योगेश वाळकीकर व श्यामसुंदर चिखलीकर यांनी दिली. गरजूंनी या बाबत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे
    3
    शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम 24}: श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील प्रीतम प्रकाश नगर परिसरात भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणूक काढण्यात आली. “स्वामी समर्थ महाराज की जय”च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
प्रीतम प्रकाश नगरमधील विविध रस्त्यांवरून पालखी मिरवणूक पार पडली. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसरासह संपूर्ण भाग आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. भक्तांच्या उपस्थितीमुळे परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
मिरवणुकीनंतर आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध गायक श्रीहरी विठ्ठल मेहंदरकर यांनी सादर केलेल्या भक्तीगीतांनी वातावरण अधिकच भक्तिमय झाले. यावेळी सादर झालेल्या भजन व भक्तीगीतांनी आध्यात्मिक अनुभूती दिली. कार्यक्रमाची सुरुवात “खेळ मांडियेला” या अभंगाने होत “रूपे सुंदर”, “ॐ ओंकार प्रधान” आणि “ग सारेगमप” यांसारख्या सादरीकरणांनी वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. त्यानंतर “रचिला ऋषीमुनींनी”, “विठू माऊली” व “सेवा धर्मी पुण्य आहे” या गीतांनी श्रद्धेची उंची वाढवली, तर “धाव पाव स्वामी” आणि “हरी म्हणा” या गजरांनी भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला. पुढे “मन लागो रे”, “स्वामी समर्था सदगुरु समर्था”, “कानडा राजा पंढरीचा” आणि “वृंदावनी वेणु” या सादरीकरणांनी कार्यक्रम रंगत गेला. “शाम तेरी बंसी” व “धरिला ला पंढरीचा चोर” यानंतर “माझी रेणुका माऊली” आणि “सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा” ही गीते सादर करण्यात आली “घागर घेऊन”, “भवरा भवरा” व “अबीर गुलाल” “तीर्थ विठ्ठल”, “अवघे गर्जे पंढरपूर” या गीतांनी वातावरण अधिकच भारावले
. कार्यक्रमाची सांगता “निघालो घेऊन दत्ताची पालखी” या भक्तिगीताने होत उपस्थित भाविकांना आध्यात्मिक समाधानाचा अनुभव देत सोहळ्याचा समारोप करण्यात आला.
या उपक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा संस्था, शिरूर यांच्या वतीने करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष योगेश वाळकीकर, उपाध्यक्ष अॅड. नारायण पवार, सचिव दीपक वर्मा, खजिनदार गणेश घाडगे यांच्यासह संपत लोखंडे, प्रमोद पवार, विष्णू वेताळ, मंगला बागमार, भूषण कडेकर, चंद्रकांत निघोजकर आदी पदाधिकारी आहेत.
दरम्यान, संस्थेच्या वतीने प्रीतम प्रकाश नगर येथे स्वामी समर्थ मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून येथे नियमित रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. तसेच गरजूंना वॉकर, वॉटर बेड आदी वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्याचे सामाजिक कार्यही सातत्याने राबविण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष योगेश वाळकीकर व श्यामसुंदर चिखलीकर यांनी दिली. गरजूंनी या बाबत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • पिंपरी चिंचवड काळेवाडीत आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक
    1
    पिंपरी चिंचवड काळेवाडीत आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.