logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

साकोलीत मंदिराच्या परिसरात साहित्याची चोरी साकोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

10 hrs ago
user_मनिषा विजय काशीवार
मनिषा विजय काशीवार
साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
10 hrs ago

साकोलीत मंदिराच्या परिसरात साहित्याची चोरी साकोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भंडारा जिल्ह्यात सहा महिन्यात सहा टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई.... गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांत धास्ती... bhandara :- १० वर्षाचा कालावधी बघता मोक्का अंतर्गत १० कारवाई करण्यात आल्या. यामध्ये यावर्षीच्या ६ महिन्यांत ६ टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. यामध्ये खून,खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी, मोटारवाहन चोरी, अंमली पदार्थ तस्करी, अपहरण, खंडनी, दहशत निर्माण करणाऱ्या गणेशपूर टोळी, चंगू- मंगू टोळी, सम्राट टोळी, नंदनवन टोळी, महिलांगे टोळी, टप्पा मोहल्ला टोळी आदींचा समावेश आहे. पुढेही अशा प्रकारच्या कारवाई केले जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांनी सांगितले.
    1
    भंडारा जिल्ह्यात सहा महिन्यात सहा टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई.... गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांत धास्ती...
bhandara  :- १० वर्षाचा कालावधी बघता मोक्का अंतर्गत १० कारवाई करण्यात आल्या. यामध्ये यावर्षीच्या ६ महिन्यांत ६ टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. यामध्ये खून,खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी, मोटारवाहन चोरी, अंमली पदार्थ तस्करी, अपहरण, खंडनी, दहशत निर्माण करणाऱ्या गणेशपूर टोळी, चंगू- मंगू टोळी, सम्राट टोळी, नंदनवन टोळी, महिलांगे टोळी, टप्पा मोहल्ला टोळी आदींचा समावेश आहे. पुढेही अशा प्रकारच्या कारवाई केले जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांनी सांगितले.
    user_A K
    A K
    भंडारा, भंडारा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • सावरला या गावात नही रोड बरोबर आणि या गावा मध्ये खब्या ला लाईट पण नही आहेत आता पावसाडा चालू आहे लाईट हवे आहेत पाहिलेस या गावात वाघाची भीती आहे ही वाढोणा ग्रामपंचायत सावरला गावाकडे दुर्लक्ष करत आहे या गावात लाईट तरी लावून द्या ही विंनती........ s
    1
    सावरला या गावात  नही रोड बरोबर आणि या गावा मध्ये खब्या ला लाईट पण नही आहेत   आता पावसाडा चालू आहे लाईट हवे आहेत पाहिलेस या गावात वाघाची भीती आहे  ही वाढोणा ग्रामपंचायत  सावरला गावाकडे दुर्लक्ष करत आहे   या गावात लाईट तरी लावून द्या   ही    विंनती........ s
    user_Santosh Sadmake
    Santosh Sadmake
    Farmer नागभिर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • रस्ता व सुरक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती प्रादेशिक परिवहन निरीक्षक किरण डोंगरे यांचे मार्गदर्शन भिवापूर । उमरेड (प्रतिनिधी ) प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण यांच्या विद्यमाने स्थानिक विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल अँड जुनिअर कॉलेज भिवापूर येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती कार्यक्रम संपन्न प्रादेशिक परिवहन अधिकारी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती कार्यक्रम शाळेच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून किरण डोंगरे (परिवहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण) तसेच कबीर हिवराळ (सहाय्यक परिवहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण) यांनी उपस्थित राहून रस्ता सुरक्षेचे नियम, वाहतूक कायदे, अपघात प्रतिबंधक उपाययोजना तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास होणारी कायदेशीर कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी भिवापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मस्कर, संस्थेचे संचालक प्रमोद रघुशे, प्राचार्या सौ. ज्योती लांबट तसेच प्रशासकीय अधिकारी देवेंद्र गोवर्धन यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात इयत्ता ८ वी ते १० वीचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, खाजगी वाहनचालक तसेच स्कूल बस चालक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपस्थितांना रस्ता सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतीक्षा रेहपाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
    1
    रस्ता व सुरक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती
प्रादेशिक परिवहन निरीक्षक किरण डोंगरे यांचे मार्गदर्शन
भिवापूर । उमरेड (प्रतिनिधी )
प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण यांच्या विद्यमाने स्थानिक विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल अँड जुनिअर कॉलेज भिवापूर येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती कार्यक्रम संपन्न
प्रादेशिक परिवहन अधिकारी  रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती कार्यक्रम शाळेच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून  किरण डोंगरे (परिवहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण) तसेच  कबीर हिवराळ (सहाय्यक परिवहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण) यांनी उपस्थित राहून रस्ता सुरक्षेचे नियम, वाहतूक कायदे, अपघात प्रतिबंधक उपाययोजना तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास होणारी कायदेशीर कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी भिवापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मस्कर, संस्थेचे संचालक  प्रमोद रघुशे, प्राचार्या सौ. ज्योती लांबट तसेच प्रशासकीय अधिकारी देवेंद्र गोवर्धन यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात इयत्ता ८ वी ते १० वीचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, खाजगी वाहनचालक तसेच स्कूल बस चालक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपस्थितांना रस्ता सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतीक्षा रेहपाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन  संजय गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल
    1
    आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल 
आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • नागपूर सोमलवाडा भागातील शाळेमध्ये शिरला पाणी मुलांना बाहेर निघून जाने झाले कठीण परिस्थिती पाहून प्रशासनाने सुट्टी जाहीर केली
    1
    नागपूर सोमलवाडा भागातील शाळेमध्ये शिरला पाणी मुलांना बाहेर निघून जाने झाले कठीण परिस्थिती पाहून प्रशासनाने सुट्टी जाहीर केली
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • तलावाची पार फुटल्याने 15 ते 20 हेक्टर भातशेतीचे नुकसान... रात्रीच्या पावसाचा फटका.... तलावातील पाणी आणि माती शेतात शिरल्याने भातपीक जमीनदोस्त... bhandara :- भंडारा जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली होती. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. दुसरीकडे आता जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा संपली असून जिल्ह्यात चांगलाच पाऊस बरसत आहे. तर याच पावसामुळे सुंदरी गावातील तलावाची पार फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतीचा मोठा नुकसान झाला आहे.भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सुंदरी गावातील तलावाची पारफुटली. कालपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळं तलावाची माती हळूहळू खचू लागली. व रात्रीच्या सुमारास पार फुटली. या तलावाची पाणी परिसरातील 15 ते 20 हेक्टर शेतीमध्ये शिरल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती पाहायला मिळत आहे. या पाण्यासह तलावातील माती देखील शेतकऱ्यांच्या शेतात साचू लागल्याने शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे. आता प्रशासनाने तात्काळ पार बांधून द्यावी व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत...
    1
    तलावाची पार फुटल्याने 15 ते 20 हेक्टर भातशेतीचे नुकसान... रात्रीच्या पावसाचा फटका....  तलावातील पाणी आणि माती शेतात शिरल्याने भातपीक जमीनदोस्त...
bhandara :- भंडारा जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली होती. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. दुसरीकडे आता जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा संपली असून जिल्ह्यात चांगलाच पाऊस बरसत आहे. तर याच पावसामुळे सुंदरी गावातील तलावाची पार फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतीचा मोठा नुकसान झाला आहे.भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील  सुंदरी गावातील तलावाची पारफुटली. कालपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळं तलावाची माती हळूहळू खचू लागली. व रात्रीच्या सुमारास पार फुटली. या तलावाची पाणी परिसरातील 15 ते 20  हेक्टर शेतीमध्ये शिरल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती पाहायला मिळत आहे. या पाण्यासह तलावातील माती देखील शेतकऱ्यांच्या शेतात साचू लागल्याने शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे. आता प्रशासनाने तात्काळ पार बांधून द्यावी व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत...
    user_A K
    A K
    भंडारा, भंडारा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • निवी निंबार्ते हिचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार निवी संदीप निंबार्ते हिचा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते विशेष गौरव भिवापूर । उमरेड भिवापूर येथील केडीके इंटरनॅशनल स्कुल मध्ये इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असलेली कु. निवी संदीप निंबार्ते हिने आपल्या असामान्य बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या बळावर उल्लेखनीय यश संपादन करून भिवापूर, नागपूर जिल्हा आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. कु. निवी संदीप निंबार्ते हिने डोळ्यांवर पट्टी बांधून भारतीय चलनी नोटांच्या सर्व सहा मूल्यवर्गांवरील सिरीयल क्रमांक अवघ्या 29 सेकंदांत अचूक ओळखून वाचण्याचा अनोखा विक्रम केला. या उल्लेखनीय कामगिरीची नोंद इंडिया वर्ल्ड रेकार्ड मध्ये झाली असून तिच्या असामान्य स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक कौशल्याचे विविध वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांनी विशेष कौतुक केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नागपूर येथे डाँ, किरण मिडब्रेन ॲकडमी आयोजित India World Record Felicitation Ceremony 2026 मध्ये भारत सरकारचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते निवीला प्रमाणपत्र, पदक व स्मृतिचिन्ह प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यास श्रीमंत मुधोजी महाराज भोसले नागपूर, मुस्ताक पठाण जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, महिला व बाल विकास विभाग, नागपूर तसेच डॉ. सुलक्षणा भोयर प्राचार्या, नारायणा ई-टेक्नो स्कूल, नागपूर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी निवीच्या असामान्य बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती आणि कौशल्याचे भरभरून कौतुक करून तिच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या. संचालक डॉ. किरण पवन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवीने स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक क्षमता विकसित करत हे उल्लेखनीय यश संपादन केले. या यशामागे डॉ. काकडे यांचे मोलाचे मार्गदर्शन, अकादमीचे प्रशिक्षण तसेच पालकांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन लाभले. या यशाबद्दल केडीके इंटरनॅशनल स्कुल चे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, डॉ. किरण मिडब्रेन ॲकडमी चे संचालक डॉ. किरण पवन काकडे, तसेच निवीचे पालक श्री. संदीप निंबार्ते व सौ. किर्ती निंबार्ते यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, निवीच्या पुढील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कु. निवी संदीप निंबार्ते हिचे हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर केडीके इंटरनॅशनल स्कुल, भिवापूर, नागपूर जिल्हा आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असून इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी आहे." राजीव पोतदार यांनी केले कौतुक विधानपरिषद आमदार राजीव पोतदार, माजी आमदार सुधीर पारवे, जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, शिवसेना जिल्हाध्यक्ष संदीप इटकेलवार यांनी घरी भेट देत कु.निवीच्या अनोख्या कामागिरीचे कौतुक केले.
    1
    निवी निंबार्ते हिचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार
निवी संदीप निंबार्ते हिचा केंद्रीय मंत्री  नितीनजी गडकरी यांच्या हस्ते विशेष गौरव
भिवापूर । उमरेड
भिवापूर येथील केडीके इंटरनॅशनल स्कुल मध्ये इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असलेली कु. निवी संदीप निंबार्ते हिने आपल्या असामान्य बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या बळावर उल्लेखनीय यश संपादन करून भिवापूर, नागपूर जिल्हा आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे.
कु. निवी संदीप निंबार्ते हिने डोळ्यांवर पट्टी बांधून भारतीय चलनी नोटांच्या सर्व सहा मूल्यवर्गांवरील सिरीयल क्रमांक अवघ्या 29 सेकंदांत अचूक ओळखून वाचण्याचा अनोखा विक्रम केला. या उल्लेखनीय कामगिरीची नोंद इंडिया वर्ल्ड रेकार्ड मध्ये झाली असून तिच्या असामान्य स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक कौशल्याचे विविध वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांनी विशेष कौतुक केले आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नागपूर येथे डाँ, किरण मिडब्रेन ॲकडमी आयोजित India World Record Felicitation Ceremony 2026 मध्ये भारत सरकारचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते निवीला प्रमाणपत्र, पदक व स्मृतिचिन्ह प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यास श्रीमंत मुधोजी महाराज भोसले नागपूर,  मुस्ताक पठाण जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, महिला व बाल विकास विभाग, नागपूर तसेच डॉ. सुलक्षणा भोयर प्राचार्या, नारायणा ई-टेक्नो स्कूल, नागपूर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी निवीच्या असामान्य बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती आणि कौशल्याचे भरभरून कौतुक करून तिच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.
संचालक डॉ. किरण पवन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवीने स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक क्षमता विकसित करत हे उल्लेखनीय यश संपादन केले. या यशामागे डॉ. काकडे यांचे मोलाचे मार्गदर्शन, अकादमीचे प्रशिक्षण तसेच पालकांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन लाभले.
या यशाबद्दल केडीके इंटरनॅशनल स्कुल चे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, डॉ. किरण मिडब्रेन ॲकडमी चे संचालक डॉ. किरण पवन काकडे, तसेच निवीचे पालक श्री. संदीप निंबार्ते व सौ. किर्ती निंबार्ते यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, निवीच्या पुढील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कु. निवी संदीप निंबार्ते हिचे हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर केडीके इंटरनॅशनल स्कुल, भिवापूर, नागपूर जिल्हा आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असून इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी आहे."
राजीव पोतदार यांनी केले कौतुक
विधानपरिषद आमदार राजीव पोतदार, माजी आमदार सुधीर पारवे, जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, शिवसेना जिल्हाध्यक्ष संदीप इटकेलवार यांनी घरी भेट देत कु.निवीच्या अनोख्या कामागिरीचे कौतुक केले.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला! ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला! ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक नवी दिल्ली : ISSF विश्वचषक 2026 मधील 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांनी शानदार कामगिरी करत देशाची मान उंचावली आहे. ईशा सिंग हिने सुवर्णपदक जिंकत भारताला अभिमानास्पद यश मिळवून दिले, तर मनू भाकर हिने कांस्यपदक पटकावत आणखी एक गौरवास्पद कामगिरी नोंदवली. या दोन्ही खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जागतिक नेमबाजी क्षेत्रात भारताची वाढती ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यांच्या यशातून भारतीय क्रीडा व्यवस्थेची गुणवत्ता आणि खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे प्रतिबिंब दिसून येते. ईशा सिंग आणि मनू भाकर यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातही त्या अशाच दमदार कामगिरीने देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करतील आणि नव्या पिढीतील खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्याची व त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करण्याची प्रेरणा देतील, अशा शुभेच्छा.
    1
    दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला!
ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक

दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला!
ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक
नवी दिल्ली : ISSF विश्वचषक 2026 मधील 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांनी शानदार कामगिरी करत देशाची मान उंचावली आहे. ईशा सिंग हिने सुवर्णपदक जिंकत भारताला अभिमानास्पद यश मिळवून दिले, तर मनू भाकर हिने कांस्यपदक पटकावत आणखी एक गौरवास्पद कामगिरी नोंदवली.
या दोन्ही खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जागतिक नेमबाजी क्षेत्रात भारताची वाढती ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यांच्या यशातून भारतीय क्रीडा व्यवस्थेची गुणवत्ता आणि खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे प्रतिबिंब दिसून येते.
ईशा सिंग आणि मनू भाकर यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातही त्या अशाच दमदार कामगिरीने देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करतील आणि नव्या पिढीतील खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्याची व त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करण्याची प्रेरणा देतील, अशा शुभेच्छा.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • 🚨 धान रोवणीच्या चिखलामुळे स्टार बस घसरली; तितूर–चितापूर मार्गावर मोठी दुर्घटना थोडक्यात टळली तीतूर–चितापूर मार्गावर स्टार बस घसरली; दुचाकीचे नुकसान, जीवितहानी टळली कुही : तीतूर ते चितापूर मार्गावर आज दुपारी सुमारे १२ वाजता नागपूरवरून तीतूर मार्गे चितापूरकडे जाणारी स्टार बस रस्त्यावर साचलेल्या चिखलावर घसरून रस्त्याखाली उतरली. अपघातात बसची धडक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका दुचाकीला बसल्याने तिचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने बसमध्ये एकच प्रवासी होता आणि चालकासह कोणालाही दुखापत झाली नाही. धान रोवणीमुळे ट्रॅक्टरच्या चाकांवरील चिखल रस्त्यावर साचत असल्याने अपघाताचा धोका वाढल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
    1
    🚨 धान रोवणीच्या चिखलामुळे स्टार बस घसरली; तितूर–चितापूर मार्गावर मोठी दुर्घटना थोडक्यात टळली
तीतूर–चितापूर मार्गावर स्टार बस घसरली; दुचाकीचे नुकसान, जीवितहानी टळली
कुही : तीतूर ते चितापूर मार्गावर आज दुपारी सुमारे १२ वाजता नागपूरवरून तीतूर मार्गे चितापूरकडे जाणारी स्टार बस रस्त्यावर साचलेल्या चिखलावर घसरून रस्त्याखाली उतरली. अपघातात बसची धडक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका दुचाकीला बसल्याने तिचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने बसमध्ये एकच प्रवासी होता आणि चालकासह कोणालाही दुखापत झाली नाही. धान रोवणीमुळे ट्रॅक्टरच्या चाकांवरील चिखल रस्त्यावर साचत असल्याने अपघाताचा धोका वाढल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
    user_Reporter Kharabe
    Reporter Kharabe
    Local News Reporter कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.