कळमनुरी शहरात विधान परिषदेच्या भाजपा आमदार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांच्या जनसंपर्क कार्यालयात २२ जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास या रक्तदान शिबीरास सुरुवात झाली, ज्यामध्ये मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून रक्तदान केले. आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात हिंगोली येथील वैद्यकीय महाविद्यालयातील रक्त व रक्त विघटन केंद्राच्या पथकाने रक्त संकलन केले. या पथकात डॉ. शुभम गोरे, डॉ. प्राप्ती धामणकर, डॉ. साक्षी बालदी, संदीप साळुंखे, रामेश्वर गरुड, संतोष सोनटक्के, वैभव खिल्लारे, सचिन ढाकरे, एकनाथ घ्यार आणि पंढरीनाथ डाखोरे यांचा समावेश होता. शिबिरप्रसंगी आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्या शुभहस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कळमनुरी शहरात विधान परिषदेच्या भाजपा आमदार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांच्या जनसंपर्क कार्यालयात २२ जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास या रक्तदान शिबीरास सुरुवात झाली, ज्यामध्ये मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून रक्तदान केले. आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात हिंगोली येथील वैद्यकीय महाविद्यालयातील रक्त व रक्त विघटन केंद्राच्या पथकाने रक्त संकलन केले. या पथकात डॉ. शुभम गोरे, डॉ. प्राप्ती धामणकर, डॉ. साक्षी बालदी, संदीप साळुंखे, रामेश्वर गरुड, संतोष सोनटक्के, वैभव खिल्लारे, सचिन ढाकरे, एकनाथ घ्यार आणि पंढरीनाथ डाखोरे यांचा समावेश होता. शिबिरप्रसंगी आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्या शुभहस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- कळमनुरी शहरात विधान परिषदेच्या भाजपा आमदार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांच्या जनसंपर्क कार्यालयात २२ जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास या रक्तदान शिबीरास सुरुवात झाली, ज्यामध्ये मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून रक्तदान केले. आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात हिंगोली येथील वैद्यकीय महाविद्यालयातील रक्त व रक्त विघटन केंद्राच्या पथकाने रक्त संकलन केले. या पथकात डॉ. शुभम गोरे, डॉ. प्राप्ती धामणकर, डॉ. साक्षी बालदी, संदीप साळुंखे, रामेश्वर गरुड, संतोष सोनटक्के, वैभव खिल्लारे, सचिन ढाकरे, एकनाथ घ्यार आणि पंढरीनाथ डाखोरे यांचा समावेश होता. शिबिरप्रसंगी आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्या शुभहस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- पावसाच्या जोरदार हजेरीमुळे सोयाबीनचे पीक चांगलेच बहरले आहे. पावसामुळे पिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकरी वर्ग पूर्णपणे सुखावला आहे.1
- हिंगोली क्षेत्रात शहरकडून गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री सुमारे १०:४० वाजता साप दिसून आला आहे.2
- दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील अमानुष मारहाण, लाठीचार्ज आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. या वेळी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते थेट आमने-सामने आले. या दरम्यान दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाल्याचे दिसून आले आणि त्यांच्या जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. मात्र, घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.1
- नवी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नांदेडच्या मुजीब भाई मित्र मंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भारत सरकारला निवेदन सादर करत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. सय्यद मुजीब भाई यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन देणाऱ्या सीजेपी (कॉक्रोज जनता पार्टी) च्या भूमिकेलाही मंडळाने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. शासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास संविधानाच्या चौकटीत राहून महाराष्ट्रभर राज्यव्यापी जनआंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा मंडळाने दिला आहे. सादर करण्यात आलेल्या निवेदनात विद्यार्थ्यांवरील कथित बळाच्या वापराची निष्पक्ष व न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करावी, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. याशिवाय सोनम वांगचूक यांना तात्काळ मुक्त करून त्यांच्या प्रकरणात कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, आणि परीक्षा, भरती प्रक्रिया, पेपरफुटी व रोजगारासंदर्भातील प्रश्नांवर वेळबद्ध कृती आराखडा जाहीर करावा, अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. सदर निवेदनावर मुजीब भाई मित्र मंडळाच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, ते जिल्हाधिकारी, नांदेड यांच्यामार्फत मा. राष्ट्रपती, भारत सरकार, मा. पंतप्रधान, मा. केंद्रीय गृहमंत्री, मा. केंद्रीय शिक्षणमंत्री, सीजेपी (कॉक्रोज जनता पार्टी) व प्रसारमाध्यमांकडे पाठविण्यात येणार आहे. लोकशाही, संविधान, सामाजिक न्याय आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या या लढ्याला मंडळाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.1
- दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ नांदेडमध्ये काँग्रेसच्या वतीने महात्मा फुले पुतळ्यासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही असा इशारा देत काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी अचानक रास्ता रोको केल्याने पोलिसांनी घटनास्थळी कारवाई करत काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड केली. या निदर्शनांद्वारे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.1
- नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे २३ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त झाले आहे. नीटचा पेपर फुटल्याने २३ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून, सरकारनेच या विद्यार्थ्यांचे भविष्य पूर्णपणे उद्ध्वस्त केले असल्याचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.1
- नांदेडमधील नवामोंढा परिसरात असलेल्या काँग्रेस कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाने काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा घेत तीव्र निदर्शने केली आहेत. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून हे आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप करत भाजपने काँग्रेसचा तीव्र निषेध केला. भाजप महानगराध्यक्ष आमदार अमर राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले. या निदर्शनांमध्ये संजय कौडगे, प्रवीण साले आणि उपमहापौर दीपकसिंग रावत यांच्यासह भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते व असंख्य पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कथित राजकीय भूमिकेविरोधात “काँग्रेसच्या राजकारणाचा निषेध!” अशा जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेसविरोधात तीव्र एल्गार पुकारला.1