६३० रुपये मोजूनही HSRP नंबरप्लेटवरील अक्षरे गायब; सिंधुदुर्गातील वाहनधारकांमध्ये संताप कुडाळ: केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने सुरक्षेच्या नावाखाली अनिवार्य केलेली 'हाय सिक्युरिटी नंबर प्लेट' (HSRP) आता वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वाहनांच्या नंबरप्लेटवरील अक्षरे आणि अंक अवघ्या काही महिन्यांतच पुसले जात असल्याचे समोर आले असून, ६३० रुपये खर्चूनही निकृष्ट दर्जाचे साहित्य मिळत असल्याच पाहायला मिळत आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना HSRP प्लेट लावणे बंधनकारक आहे. या प्लेट्स ॲल्युमिनियमच्या असून त्यावर क्रोमियम होलोग्राम आणि लेसर-ब्रँडेड १० अंकी कोड असतो. चोरी आणि बनावटगिरी रोखणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात धावणाऱ्या अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या प्लेट्सवरील काळा रंग उडून जात असून, प्लेट पूर्णपणे कोरी (धूसर) दिसत आहे. महागडी प्लेट, पण दर्जा शून्य? एका नंबरप्लेटसाठी शासनाने साधारण ६३० रुपये दर निश्चित केला आहे. रिवेट्स मारून घट्ट बसवलेली ही प्लेट 'छेडछाड-प्रतिरोधक' असल्याचा दावा केला जातो. पण जर नंबरच वाचता येत नसेल, तर या सुरक्षेचा उपयोग काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. "आम्ही दंडाच्या भीतीने पैसे भरून नंबरप्लेट लावली, पण आता नंबरच दिसत नाहीये. उद्या वाहतूक पोलिसांनी आम्हाला थांबवले, तर नंबर दिसत नसल्याचा दंड आम्ही का भरायचा? अशी संतप्त प्रतिक्रिया वाहन धारकांकडून उमटत आहे. HSRP प्लेटची प्रमुख वैशिष्ट्ये (जी कागदावरच उरली आहेत): * होलोग्राम: डाव्या कोपऱ्यात निळ्या रंगाचा अशोक चक्र होलोग्राम. लेसर कोड: १०-अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर. सुरक्षितता: काढता न येणारे रिवेट्स. दंड: प्लेट नसल्यास १,००० ते १०,००० रुपयांपर्यंत दंडाची तरतूद. निकृष्ट दर्जाच्या प्लेट्स पुरवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होणार का? आणि ज्यांच्या प्लेट्स खराब झाल्या आहेत, त्यांना विनामूल्य नवीन प्लेट्स मिळणार का? याकडे आता सर्व सिंधुदुर्गवासीयांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत मात्र 'नंबर' गायब झालेल्या गाड्या घेऊन फिरणे वाहनधारकांसाठी टांगती तलवार ठरत आहे.

- कुडाळ: केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने सुरक्षेच्या नावाखाली अनिवार्य केलेली 'हाय सिक्युरिटी नंबर प्लेट' (HSRP) आता वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वाहनांच्या नंबरप्लेटवरील अक्षरे आणि अंक अवघ्या काही महिन्यांतच पुसले जात असल्याचे समोर आले असून, ६३० रुपये खर्चूनही निकृष्ट दर्जाचे साहित्य मिळत असल्याच पाहायला मिळत आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना HSRP प्लेट लावणे बंधनकारक आहे. या प्लेट्स ॲल्युमिनियमच्या असून त्यावर क्रोमियम होलोग्राम आणि लेसर-ब्रँडेड १० अंकी कोड असतो. चोरी आणि बनावटगिरी रोखणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात धावणाऱ्या अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या प्लेट्सवरील काळा रंग उडून जात असून, प्लेट पूर्णपणे कोरी (धूसर) दिसत आहे. महागडी प्लेट, पण दर्जा शून्य? एका नंबरप्लेटसाठी शासनाने साधारण ६३० रुपये दर निश्चित केला आहे. रिवेट्स मारून घट्ट बसवलेली ही प्लेट 'छेडछाड-प्रतिरोधक' असल्याचा दावा केला जातो. पण जर नंबरच वाचता येत नसेल, तर या सुरक्षेचा उपयोग काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. "आम्ही दंडाच्या भीतीने पैसे भरून नंबरप्लेट लावली, पण आता नंबरच दिसत नाहीये. उद्या वाहतूक पोलिसांनी आम्हाला थांबवले, तर नंबर दिसत नसल्याचा दंड आम्ही का भरायचा? अशी संतप्त प्रतिक्रिया वाहन धारकांकडून उमटत आहे. HSRP प्लेटची प्रमुख वैशिष्ट्ये (जी कागदावरच उरली आहेत): * होलोग्राम: डाव्या कोपऱ्यात निळ्या रंगाचा अशोक चक्र होलोग्राम. लेसर कोड: १०-अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर. सुरक्षितता: काढता न येणारे रिवेट्स. दंड: प्लेट नसल्यास १,००० ते १०,००० रुपयांपर्यंत दंडाची तरतूद. निकृष्ट दर्जाच्या प्लेट्स पुरवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होणार का? आणि ज्यांच्या प्लेट्स खराब झाल्या आहेत, त्यांना विनामूल्य नवीन प्लेट्स मिळणार का? याकडे आता सर्व सिंधुदुर्गवासीयांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत मात्र 'नंबर' गायब झालेल्या गाड्या घेऊन फिरणे वाहनधारकांसाठी टांगती तलवार ठरत आहे.1
- Post by Akash mane1
- *सांगली–मिरज रोडवर २० वर्षांनंतर अतिक्रमणावर बुलडोझर; पृथ्वीराज पवारांचा इशारा – “अन्याय सहन करणार नाही!”* ================== बातम्या जाहिरातीसाठी संपर्क : 96896960011
- विक्रम शिंदे /भोर दि.17 भोरमधील मोरवाडी पाचलिंगे परिसरात बेकायदेशीर उत्खनन सुरू असून डोंगरांची बेसुमार कत्तल होतं असल्याचा प्रकार सुरू आहे.मात्र तलाठी- मंडलाधिकाऱ्यांचे याकडे डोळेझाक करत असून पर्यावरण प्रेमींनी कारवाईची मागणी केली आहे.1
- फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि फर्स्ट लेडी ब्रिजिट मॅक्रॉन यांचे हार्दिक स्वागत. मुंबईत आगमन झाले असता महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत, भारत-फ्रान्स भागीदारी आणखी मजबूत करून, त्यांच्या भारत भेटीदरम्यान त्यांचे स्वागत करणे ही सन्मानाची गोष्ट होती.1
- AJITDADA STATUE : बारामतीच्या तिरंगा सर्कल येथील नटराज कलामंडळासमोर अजितदादांचा १० फुटी पुतळा उभारला जाणार आहे.. संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी याबद्दल माहिती देत पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलंय.. #AjitPawar #politics #baramatikar #viralpost #viralvideo #maharashtra #development #fypシ #explore #BreakingNews #MaharashtraPolitics1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- विक्रम शिंदे /भोर दि.17 तालुक्याच्या विसगाव खोरे भागातील नीलकंठ येथे गोट्यात बांधलेल्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करत बिबट्याने दोन बकरी ठार केल्याची घटना आज दि.17 उघडकीस आली आहे.याबाबत शेतकयांनी माहिती दिली.या बाबत शेतकयांमध्ये सध्या भीतीचे वातावरण असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.1