logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

माहिती अधिकार हे भ्रष्टाचाराविरोधातील प्रभावी शस्त्र ॲड. अजित बोराडे यांचे प्रतिपादन; दक्ष नागरिक संघाचा माहिती अधिकार कार्यकर्ता मेळावा उत्साहात पिंपरी चिंचवड/ दिनांक ११ मे २०२६ : सरकारी कार्यालयांत सामान्य नागरिकांना मिळणारी वागणूक पाहता ही खरोखर जनतेची सत्ता आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. ही व्यवस्था बदलण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ‘माहिती अधिकार कायदा २००५’ हे सर्वसामान्यांच्या हातातील प्रभावी शस्त्र असल्याचे प्रतिपादन सहकारतज्ज्ञ ॲड. अजित बोराडे यांनी केले. प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी नागरिकांनी माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. दक्ष नागरिक संघाच्या वतीने चैतन्य सभागृह,चिंचवड येथे रविवारी (दि. १०) आयोजित माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा महामेळावा व पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. कार्यक्रमास कामगार नेते इरफान सय्यद, नगरसेविका सुप्रिया चांदगुडे, पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, नगरसेवक राजू बनसोडे, युवा सेनेचे निलेश हाके,ॲड. श्वेता मांडे-वैद्य, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर नागरगोजे, शांताराम कुंभार, पत्रकार सुरज साळवे, काशिनाथ शिंदे आदी उपस्थित होते. या वेळी खासदार बारणे यांच्या हस्ते संजीवन सांगळे यांना ‘सहकार भूषण’, डॉ. सोनाली गेडाम-नागदेवते यांना ‘विद्यारत्न’, तर पत्रकार सुरज साळवे यांना ‘पत्रकारिता भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ॲड. बोराडे म्हणाले, स्वातंत्र्यानंतरही प्रशासकीय यंत्रणेचा दृष्टिकोन फारसा बदललेला नाही. सुशिक्षित व्यक्तींनाही एखाद्या कामासाठी अनेक महिने कार्यालयांच्या चकरा माराव्या लागतात, तर अशिक्षित नागरिकांची अवस्था अधिक कठीण असते. माहिती अधिकार कायद्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांचे उत्तरदायित्व वाढते आणि त्यांच्या चुकीच्या निर्णयांवर प्रकाश पडतो. माहिती अधिकार कायद्यांतर्गत केवळ कागदपत्रेच नव्हे, तर सरकारी कामातील साहित्य, रस्ते बांधणीसाठी वापरण्यात येणारे सिमेंट, वाळू किंवा औषधांचे नमुने घेण्याचाही अधिकार नागरिकांना आहे. तसेच संबंधित कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष फाईल तपासणी करण्याची तरतूदही या कायद्यात असून, पहिल्या तासासाठी ही तपासणी मोफत असल्याची माहिती त्यांनी दिली. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, माहिती अधिकार कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिक सत्तेच्या केंद्रस्थानी आला आहे. कायद्याचे तांत्रिक ज्ञान नसतानाही केवळ एका अर्जाद्वारे प्रशासकीय कामातील त्रुटी आणि चुका उघड करणे शक्य झाले आहे. चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याचे काम या कायद्याने केले आहे. माहिती अधिकाराचा वापर विधायक कामांसाठी झाल्यास अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास मदत होते. माहिती अधिकार कायद्यामुळे प्रशासनातील पारदर्शकता वाढली असून नागरिकांना त्रास देणाऱ्या प्रवृत्तींना आळा बसला आहे. मात्र काही जण या कायद्याचा चुकीचा वापर करून प्रामाणिक कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या कामातील आणि चारित्र्यातील स्वच्छता जपणे आवश्यक असल्याचेही बारणे यांनी नमूद केले. सूत्रसंचालन ॲड. श्वेता मांडे-वैद्य यांनी केले. विनोद क्षीरसागर यांनी प्रस्ताविक, तर निलेश हाके यांनी आभार मानले. --------- फोटो- दक्ष नागरिक संघाच्या महामेळाव्यात विविध मान्यवरांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. -----

2 hrs ago
user_महाराष्ट्र समाचार
महाराष्ट्र समाचार
Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
2 hrs ago
94bd4279-67d2-4775-abd4-5aafac59ca43

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • गडचिरोली पोलिसांनी मेंढा येथील एका हत्या प्रकरणाचा १२ तासांत छडा लावला. आरोपींना तातडीने अटक करून गुन्हेगारांना गजाआड करण्यात आले, ज्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.
    1
    गडचिरोली पोलिसांनी मेंढा येथील एका हत्या प्रकरणाचा १२ तासांत छडा लावला. आरोपींना तातडीने अटक करून गुन्हेगारांना गजाआड करण्यात आले, ज्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • माजी नगरसेविका आशा बिऱ्हाडे यांचा तहसील कार्यालयाविरुद्ध एल्गार; जात पडताळणी फाईलमध्ये फेरफार व माहिती दडपशाहीचा गंभीर आरोप
    1
    माजी नगरसेविका आशा बिऱ्हाडे यांचा तहसील कार्यालयाविरुद्ध एल्गार; जात पडताळणी फाईलमध्ये फेरफार व माहिती दडपशाहीचा गंभीर आरोप
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलिसांनी मध्यरात्री चिखली-कुदळवाडी परिसरात ४ अनधिकृत धार्मिक स्थळे बुलडोझरने जमीनदोस्त केली आहेत. २१ हून अधिक अनधिकृत स्थळे असल्याची माहिती असून, मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. प्रशासनाने अतिक्रमणाविरोधातील मोहीम अधिक तीव्र केल्याचे यातून दिसून येते.
    1
    पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलिसांनी मध्यरात्री चिखली-कुदळवाडी परिसरात ४ अनधिकृत धार्मिक स्थळे बुलडोझरने जमीनदोस्त केली आहेत. २१ हून अधिक अनधिकृत स्थळे असल्याची माहिती असून, मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. प्रशासनाने अतिक्रमणाविरोधातील मोहीम अधिक तीव्र केल्याचे यातून दिसून येते.
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • महाराष्ट्रातील काही पेट्रोल पंपांवर साधे पेट्रोल संपल्याचे सांगून ग्राहकांना सक्तीने पॉवर पेट्रोल विकले जात आहे. यामुळे सामान्य ग्राहकांना नाहक जास्त पैसे मोजावे लागत असून त्यांची फसवणूक होत आहे.
    1
    महाराष्ट्रातील काही पेट्रोल पंपांवर साधे पेट्रोल संपल्याचे सांगून ग्राहकांना सक्तीने पॉवर पेट्रोल विकले जात आहे. यामुळे सामान्य ग्राहकांना नाहक जास्त पैसे मोजावे लागत असून त्यांची फसवणूक होत आहे.
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • पुणे जिल्ह्यातील कुदळवाडीत मध्यरात्री पोकलेन, जेसीबी आणि शेकडो पोलिसांचा फौजफाटा दिसल्याने खळबळ उडाली आहे. 'रात्रीस खेळ चाले' या नावाने ही मोठी कारवाई नेमकी कोणासाठी आणि कोणत्या कारणासाठी सुरू आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
    1
    पुणे जिल्ह्यातील कुदळवाडीत मध्यरात्री पोकलेन, जेसीबी आणि शेकडो पोलिसांचा फौजफाटा दिसल्याने खळबळ उडाली आहे. 'रात्रीस खेळ चाले' या नावाने ही मोठी कारवाई नेमकी कोणासाठी आणि कोणत्या कारणासाठी सुरू आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
    user_MAHARASHTRA MANTHAN
    MAHARASHTRA MANTHAN
    Advertising agency पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • भोर कापूरहोळ मार्गावरील नेकलेस पॉईंट परिसरात मोटारीचा अपघात; एकजण गंभीर जखमी विक्रम शिंदे /भोर दि.११ भोर कापूरहोळ मार्गावरील नेकलेस पॉईंट परिसरात खंडोबाचा माळ येथे तीव्र उतार आणि वळणाचा अंदाज न आल्याने एर्तिगा मोटार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पडल्याची घटना आज दि.11 दुपारी 1 च्या दरम्यान घडली आहे.अपघातात एकजण जखमी असून गाडीचे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले.
    2
    भोर कापूरहोळ मार्गावरील नेकलेस पॉईंट परिसरात मोटारीचा अपघात; एकजण गंभीर जखमी 
विक्रम शिंदे /भोर दि.११
भोर कापूरहोळ मार्गावरील नेकलेस पॉईंट परिसरात खंडोबाचा माळ येथे तीव्र उतार आणि वळणाचा अंदाज न आल्याने  एर्तिगा मोटार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पडल्याची घटना आज दि.11 दुपारी 1 च्या दरम्यान घडली आहे.अपघातात एकजण जखमी असून गाडीचे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • इथं सरकारी पैशानं पंचपकवान्न झोडता येत नाही, स्वाभिमानाची चटणी भाकर खाता येते ज्याची चव मेंदूत आणि जिभेवर रेंगाळत रहाते
    1
    इथं सरकारी पैशानं पंचपकवान्न झोडता येत नाही, स्वाभिमानाची चटणी भाकर खाता येते ज्याची चव मेंदूत आणि जिभेवर रेंगाळत रहाते
    user_संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    Local Politician जावळी, सातारा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • पुणे जिल्ह्यातील थेऊर गावच्या स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे, ज्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पाणी, लाईट आणि स्वच्छ शौचालयांच्या अभावामुळे मृताच्या नातेवाईकांना 'नरकयातना' भोगाव्या लागत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. या गंभीर परिस्थितीवर प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
    1
    पुणे जिल्ह्यातील थेऊर गावच्या स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे, ज्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पाणी, लाईट आणि स्वच्छ शौचालयांच्या अभावामुळे मृताच्या नातेवाईकांना 'नरकयातना' भोगाव्या लागत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. या गंभीर परिस्थितीवर प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.