संविधान जनजागृतीसाठी समाजाने पुढे यावे – अजहर शहा परभणीत संविधान प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न परभणी (प्रतिनिधी) : भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाही व्यवस्थेचे प्रमुख आधारस्तंभ असून प्रत्येक नागरिकाला समान हक्क व कर्तव्ये प्रदान करणारे आहे. त्यामुळे संविधानाबाबत जनजागृती करणे ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे, असे मत अजहर शहा यांनी व्यक्त केले. संविधान साक्षरता अभियानांतर्गत रविवारी (दि. १९ एप्रिल) परभणी येथील विश्वकर्मा महाविद्यालयात एक दिवसीय संविधान प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विविध क्षेत्रातील नागरिक, विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला.कार्यक्रमात संविधानाचे महत्त्व, मूलभूत हक्क व कर्तव्ये, तसेच लोकशाही मूल्यांची जपणूक याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संविधानाची माहिती घेऊन समाजात जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रसाद गोरे, प्रेम घोंगडे, डॉ. चंद्रकांत गांगुर्डे, राजेश सासंगुंडे, दीपक कनकुटे, शेख मेहमूद, अॅड. मुजामिल पटेल, भूषण मोरे, ताताराव वाकळे, सतीश भिसे, राहुल कनकुटे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

- Skyline Builders & Developers “क्षितिज पुरम – जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो स्वतःचा पत्ता ” क्षितिज पुरम… जिथे आकाशातील स्वप्नं… जमिनीवर उतरतात!2
- Post by Ramesh Mulgir1
- Post by Today One Live1
- महात्मा बसेश्वर महाराजांची जयंती मंठा येथील उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यासाठी.1
- Post by माधव गायकवाड4
- लिलाव प्रक्रियेदरम्यान गोदामात तारण मालच नसल्याचे उघड झाले. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याला श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.1
- Post by Anil Rathod1
- दरेगाव येथील वन विभागाच्या शिवारात असलेल्या जंगल परिसरात एका व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित व्यक्ती संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली. दरम्यान, या घटनेमुळे तालुका पोलीस ठाण्यात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, खुनामागील कारणांचा तपास तालुका पोलीस करत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.1