logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

दुर्दैवी घटना महावितरण कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या ! महावितरण कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या ! सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील संख परिसरातील पांडोझरी गावच्या हद्दीत महावितरणच्या कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संतोष उर्फ कुमार बिराजदार असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष बिराजदार हे महावितरणमध्ये लिपिक (क्लार्क) पदावर कार्यरत होते. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ते पांडोझरी गावच्या हद्दीतून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक अंदाधुंद गोळीबार केला. गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि इतर पुरावे तपासण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक तपासात ही हत्या व्यक्तिगत वादातून किंवा पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयातून हा हल्ला झाल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणतेही अधिकृत कारण स्पष्ट केलेले नाही. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची गुप्त ठिकाणी कसून चौकशी सुरू आहे. हत्येमागील नेमका सूत्रधार कोण आणि खून करण्यामागचे खरे कारण काय, याचा तपास उमदी पोलीस करत आहेत.

1 hr ago
user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
पत्रकार ओमप्रकाश उढाण
घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
1 hr ago
a6c2ec51-ec5c-406d-8f36-ea4dd1bb7ded

दुर्दैवी घटना महावितरण कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या ! महावितरण कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या ! सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील संख परिसरातील पांडोझरी गावच्या हद्दीत महावितरणच्या कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संतोष उर्फ कुमार बिराजदार असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष बिराजदार हे महावितरणमध्ये लिपिक (क्लार्क) पदावर कार्यरत होते. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ते पांडोझरी गावच्या हद्दीतून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक अंदाधुंद गोळीबार केला. गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि इतर पुरावे तपासण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक तपासात ही हत्या व्यक्तिगत वादातून किंवा पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयातून हा हल्ला झाल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणतेही अधिकृत कारण स्पष्ट केलेले नाही. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची गुप्त ठिकाणी कसून चौकशी सुरू आहे. हत्येमागील नेमका सूत्रधार कोण आणि खून करण्यामागचे खरे कारण काय, याचा तपास उमदी पोलीस करत आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • डिझेलसाठी जीव धोक्यात; टँकर पलटल्यानंतर नागरिकांची कॅन-बाटल्या घेऊन एकच झुंबड डिझेलसाठी जीव धोक्यात; टँकर पलटल्यानंतर नागरिकांची कॅन-बाटल्या घेऊन एकच झुंबड बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात कल्याण ते विशाखापट्टणम महामार्गावरील तालखेड फाटा परिसरात डिझेल वाहतूक करणारा टँकर पलटल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र टँकरमधून डिझेल गळती सुरू होताच परिसरातील नागरिकांनी जीवाची पर्वा न करता डिझेल मिळवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
    1
    डिझेलसाठी जीव धोक्यात; टँकर पलटल्यानंतर नागरिकांची कॅन-बाटल्या घेऊन एकच झुंबड
डिझेलसाठी जीव धोक्यात; टँकर पलटल्यानंतर नागरिकांची कॅन-बाटल्या घेऊन एकच झुंबड
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात कल्याण ते विशाखापट्टणम महामार्गावरील तालखेड फाटा परिसरात डिझेल वाहतूक करणारा टँकर पलटल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र टँकरमधून डिझेल गळती सुरू होताच परिसरातील नागरिकांनी जीवाची पर्वा न करता डिझेल मिळवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • जालना जिल्ह्यातील मामादेवी मस्तागडावर जागेच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तक्रारदाराची जागा इतरांना विकल्याच्या कारणावरून हा वाद पेटला होता. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    1
    जालना जिल्ह्यातील मामादेवी मस्तागडावर जागेच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तक्रारदाराची जागा इतरांना विकल्याच्या कारणावरून हा वाद पेटला होता. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • कीर्तनकार आणि संतांविरोधातील आरोपांनंतर पंढरपूर, आळंदीसह अनेक ठिकाणी निषेध; जाहीर माफी व अटकेची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायात कथित “प्रतिगामी विचारांची घुसखोरी” झाल्याचा आरोप करत काही कीर्तनकार आणि संत-महंतांची नावे सार्वजनिक केल्याने राज्यभर मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदाय, हिंदू संघटना आणि विविध राजकीय पक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वारकरी परंपरा ही महाराष्ट्राच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग असून, लवांडे यांच्या विधानाने संत परंपरेचा अपमान झाल्याचा आरोप केला जात आहे. पंढरपूर, आळंदी यांसह अनेक ठिकाणी निषेध आंदोलने करण्यात आली. आंदोलकांनी लवांडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत तात्काळ अटकेची मागणी केली. दरम्यान, संबंधित संत आणि वारकरी समाजाची जाहीर माफी मागावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही विविध संघटनांनी दिला आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, पुढील काही दिवसांत हा वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    1
    कीर्तनकार आणि संतांविरोधातील आरोपांनंतर पंढरपूर, आळंदीसह अनेक ठिकाणी निषेध; जाहीर माफी व अटकेची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायात कथित “प्रतिगामी विचारांची घुसखोरी” झाल्याचा आरोप करत काही कीर्तनकार आणि संत-महंतांची नावे सार्वजनिक केल्याने राज्यभर मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदाय, हिंदू संघटना आणि विविध राजकीय पक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
वारकरी परंपरा ही महाराष्ट्राच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग असून, लवांडे यांच्या विधानाने संत परंपरेचा अपमान झाल्याचा आरोप केला जात आहे. पंढरपूर, आळंदी यांसह अनेक ठिकाणी निषेध आंदोलने करण्यात आली. आंदोलकांनी लवांडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत तात्काळ अटकेची मागणी केली.
दरम्यान, संबंधित संत आणि वारकरी समाजाची जाहीर माफी मागावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही विविध संघटनांनी दिला आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, पुढील काही दिवसांत हा वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • बिडकीन बस स्टॅन्ड ता. पैठण.जि. औरंगाबाद एस टी महामंडळ पैठण बिडकीन एमआयडीसी बिडकीन बस स्टॅन्ड काम सहा महिन्यापासून बंद आहे. बिडकीन बस स्टँड काम बंद आहे. एसटी बाहेरून जाऊ लागले. बस स्टॅन्ड प्रवाशांना उन्हाळ्यामुळे लय हाल होत आहे. बस स्टॅन्ड मध्ये छत नाही.
    1
    बिडकीन बस स्टॅन्ड ता. पैठण.जि. औरंगाबाद एस टी महामंडळ पैठण बिडकीन एमआयडीसी बिडकीन बस स्टॅन्ड काम सहा महिन्यापासून बंद आहे.
बिडकीन बस स्टँड काम बंद आहे. एसटी बाहेरून जाऊ लागले. बस स्टॅन्ड प्रवाशांना उन्हाळ्यामुळे लय हाल होत आहे. बस स्टॅन्ड मध्ये छत नाही.
    user_Isak Shaha
    Isak Shaha
    Media Consultant Paithan, Aurangabad•
    28 min ago
  • पुण्यात प्रवचनकार विकास लवांडे यांच्यावर हल्ल्याचा आरोप; राष्ट्रवादी शरद पवार गटाचा निषेध आळंदी मातोबाची, ता. हवेली जि. पुणे येथे प्रवचन संपवून परत येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा वारकरी प्रवचनकार विकास लवांडे यांच्या गाडीला अडवून काही जणांनी शाई फेकत धक्काबुक्की व हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना 9 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच हल्लेखोरांनी पिस्तूल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात संग्राम भंडारे आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्र शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास शासन जबाबदार राहील, असे पक्षाचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी म्हटले आहे.
    1
    पुण्यात प्रवचनकार विकास लवांडे यांच्यावर हल्ल्याचा आरोप; राष्ट्रवादी शरद पवार गटाचा निषेध

आळंदी मातोबाची, ता. हवेली जि. पुणे येथे प्रवचन संपवून परत येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा वारकरी प्रवचनकार विकास लवांडे यांच्या गाडीला अडवून काही जणांनी शाई फेकत धक्काबुक्की व हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना 9 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच हल्लेखोरांनी पिस्तूल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात संग्राम भंडारे आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्र शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास शासन जबाबदार राहील, असे पक्षाचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी म्हटले आहे.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    30 min ago
  • महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण ('अ ब क ड') च्या मागणीसाठी मातंग समाजाने छत्रपती संभाजीनगर येथे भव्य मोर्चा काढला. हजारो समाजबांधव रस्त्यावर उतरले होते, त्यांनी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या.
    1
    महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण ('अ ब क ड') च्या मागणीसाठी मातंग समाजाने छत्रपती संभाजीनगर येथे भव्य मोर्चा काढला. हजारो समाजबांधव रस्त्यावर उतरले होते, त्यांनी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या.
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • जालना येथे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळी शाई आणि ऑइल फेकले. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर चौफुली परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत हा निषेध नोंदवला.
    1
    जालना येथे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळी शाई आणि ऑइल फेकले. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर चौफुली परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत हा निषेध नोंदवला.
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    21 hrs ago
  • धाराशिव-उजनी राज्यमार्गावर झालेल्या भीषण अपघातात बीएलओचे काम पूर्ण करून परतणाऱ्या एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे जिल्ह्यात शोककळा पसरली असून, राज्यमार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
    1
    धाराशिव-उजनी राज्यमार्गावर झालेल्या भीषण अपघातात बीएलओचे काम पूर्ण करून परतणाऱ्या एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे जिल्ह्यात शोककळा पसरली असून, राज्यमार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.