logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता? लातूर शहरातील गरुड चौक ते डी मार्ट अहिल्याबाई होळकर चौक मार्गावरील रस्त्यांची दुरावस्था. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता? लातूर शहरातील गरुड चौक ते डी मार्ट अहिल्याबाई होळकर चौक मार्गावरील रस्त्यांची दुरावस्था. पूर्व भाग कृती समितीने रस्त्यावरील खड्ड्यात बेश्रमाचे झाड लावून प्रशासनाचा जाहीर निषेध करीत केले तीव्र आंदोलन. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. रविवार दिनांक 26 एप्रिल 2026. लातूर शहरातील गरुड चौक, शिवरत्न जीवाजी महाले चौक ते डी मार्ट मार्गे नवीन रेनापूर नाका अहिल्याबाई होळकर चौक रिंग रोडवरील खड्यात आज 26 एप्रिल रोजी दुपारी तळपत्या उन्हात समितीने बेशर्माचे झाड लावून प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदवत केले आंदोलन. लातूर शहराच्या तिन्ही बाजूनी राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून रस्त्याचे रुंदीकरण करून रस्ते विकास करण्यात आले परंतु गरुड चौक शिवरत्न जिवाजी महाले चौक ते डी मार्ट मार्गाने नवीन रेणापूर नाका अहिल्याबाई होळकर चौक दरम्यान असलेला 5 किलोमीटर मार्ग असलेला रस्ता लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीत असल्याने जाणीवपूर्वक या रोडचा अद्यापही विकास करण्यात आला नाही. परिणामी सदरील अरुंद मार्गावर जागोजागी लहान मोठे असंख्य खड्डे पडल्याने नागरिकांना रहदारी करण्यात अनेक समस्या निर्माण होत असून खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात रोज अनेक दूचाकी चालक या मार्गावर पडतात तर चार चाकी चे अपघात होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे तसेच पावसाळ्यात या रोडवर प्रवाशांना जाण्यासाठी खूप मोठा धोका पत्करून जीव मोठे धरून चालावे लागत आहे. सदरील मार्ग मिसिंग रस्ता म्हणून दुरुस्त करण्यात यावा याकरिता स्थानिक आमदार अमित देशमुख यांनी राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता पण अद्याप सदरील रोड नव्याने दुरुस्त करण्यात आलेला नसल्याने अनेक अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली असून पावसाळ्यात शहरातील पाणी या रस्त्यावर येऊन पूरपरिस्थिती निर्माण होऊन रस्ता बंद होतो याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज लातूर शहर पूर्व भाग कृती समितीने सदरील रोडवरील खड्ड्यात बेशरमाचे झाड लावून आंदोलन करीत प्रशासनाने पुढील पंधरा दिवसाच्या आत या रोडची दुरुस्ती नाही केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लातूर शहर पूर्वभाग कृती समितीच्या वतीने दीपक गंगणे, बाबासाहेब बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता कटके, भगवेश्वर धनगर, राहुल गायकवाड, गौतम ससाणेसह परिसरातील नागरिकांकडून देण्यात आला आहे.

7 hrs ago
user_Nitin Chalak
Nitin Chalak
Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
7 hrs ago

रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता? लातूर शहरातील गरुड चौक ते डी मार्ट अहिल्याबाई होळकर चौक मार्गावरील रस्त्यांची दुरावस्था. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता? लातूर शहरातील गरुड चौक ते डी मार्ट अहिल्याबाई होळकर चौक मार्गावरील रस्त्यांची दुरावस्था. पूर्व भाग कृती समितीने रस्त्यावरील खड्ड्यात बेश्रमाचे झाड लावून प्रशासनाचा जाहीर निषेध करीत केले तीव्र आंदोलन. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. रविवार दिनांक 26 एप्रिल 2026. लातूर शहरातील गरुड चौक, शिवरत्न जीवाजी महाले चौक ते डी मार्ट मार्गे नवीन रेनापूर नाका अहिल्याबाई होळकर चौक रिंग रोडवरील खड्यात आज 26 एप्रिल रोजी दुपारी तळपत्या उन्हात समितीने बेशर्माचे झाड लावून प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदवत केले आंदोलन. लातूर शहराच्या तिन्ही बाजूनी राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून रस्त्याचे रुंदीकरण करून रस्ते विकास करण्यात आले परंतु गरुड चौक शिवरत्न जिवाजी महाले चौक ते डी मार्ट मार्गाने नवीन रेणापूर नाका अहिल्याबाई होळकर चौक दरम्यान असलेला 5 किलोमीटर मार्ग असलेला रस्ता लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीत असल्याने जाणीवपूर्वक या रोडचा अद्यापही विकास करण्यात आला नाही. परिणामी सदरील अरुंद मार्गावर जागोजागी लहान मोठे असंख्य खड्डे पडल्याने नागरिकांना रहदारी करण्यात अनेक समस्या निर्माण होत असून खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात रोज अनेक दूचाकी चालक या मार्गावर पडतात तर चार चाकी चे अपघात होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे तसेच पावसाळ्यात या रोडवर प्रवाशांना जाण्यासाठी खूप मोठा धोका पत्करून जीव मोठे धरून चालावे लागत आहे. सदरील मार्ग मिसिंग रस्ता म्हणून दुरुस्त करण्यात यावा याकरिता स्थानिक आमदार अमित देशमुख यांनी राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता पण अद्याप सदरील रोड नव्याने दुरुस्त करण्यात आलेला नसल्याने अनेक अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली असून पावसाळ्यात शहरातील पाणी या रस्त्यावर येऊन पूरपरिस्थिती निर्माण होऊन रस्ता बंद होतो याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज लातूर शहर पूर्व भाग कृती समितीने सदरील रोडवरील खड्ड्यात बेशरमाचे झाड लावून आंदोलन करीत प्रशासनाने पुढील पंधरा दिवसाच्या आत या रोडची दुरुस्ती नाही केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लातूर शहर पूर्वभाग कृती समितीच्या वतीने दीपक गंगणे, बाबासाहेब बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता कटके, भगवेश्वर धनगर, राहुल गायकवाड, गौतम ससाणेसह परिसरातील नागरिकांकडून देण्यात आला आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • 📍फटाक्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला लागली आग मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती सोशल मीडियावर होत आहे व्हायरल.
    1
    📍फटाक्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला लागली आग मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती सोशल मीडियावर होत आहे व्हायरल.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    4 hrs ago
  • रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता? लातूर शहरातील गरुड चौक ते डी मार्ट अहिल्याबाई होळकर चौक मार्गावरील रस्त्यांची दुरावस्था. पूर्व भाग कृती समितीने रस्त्यावरील खड्ड्यात बेश्रमाचे झाड लावून प्रशासनाचा जाहीर निषेध करीत केले तीव्र आंदोलन. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. रविवार दिनांक 26 एप्रिल 2026. लातूर शहरातील गरुड चौक, शिवरत्न जीवाजी महाले चौक ते डी मार्ट मार्गे नवीन रेनापूर नाका अहिल्याबाई होळकर चौक रिंग रोडवरील खड्यात आज 26 एप्रिल रोजी दुपारी तळपत्या उन्हात समितीने बेशर्माचे झाड लावून प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदवत केले आंदोलन. लातूर शहराच्या तिन्ही बाजूनी राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून रस्त्याचे रुंदीकरण करून रस्ते विकास करण्यात आले परंतु गरुड चौक शिवरत्न जिवाजी महाले चौक ते डी मार्ट मार्गाने नवीन रेणापूर नाका अहिल्याबाई होळकर चौक दरम्यान असलेला 5 किलोमीटर मार्ग असलेला रस्ता लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीत असल्याने जाणीवपूर्वक या रोडचा अद्यापही विकास करण्यात आला नाही. परिणामी सदरील अरुंद मार्गावर जागोजागी लहान मोठे असंख्य खड्डे पडल्याने नागरिकांना रहदारी करण्यात अनेक समस्या निर्माण होत असून खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात रोज अनेक दूचाकी चालक या मार्गावर पडतात तर चार चाकी चे अपघात होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे तसेच पावसाळ्यात या रोडवर प्रवाशांना जाण्यासाठी खूप मोठा धोका पत्करून जीव मोठे धरून चालावे लागत आहे. सदरील मार्ग मिसिंग रस्ता म्हणून दुरुस्त करण्यात यावा याकरिता स्थानिक आमदार अमित देशमुख यांनी राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता पण अद्याप सदरील रोड नव्याने दुरुस्त करण्यात आलेला नसल्याने अनेक अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली असून पावसाळ्यात शहरातील पाणी या रस्त्यावर येऊन पूरपरिस्थिती निर्माण होऊन रस्ता बंद होतो याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज लातूर शहर पूर्व भाग कृती समितीने सदरील रोडवरील खड्ड्यात बेशरमाचे झाड लावून आंदोलन करीत प्रशासनाने पुढील पंधरा दिवसाच्या आत या रोडची दुरुस्ती नाही केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लातूर शहर पूर्वभाग कृती समितीच्या वतीने दीपक गंगणे, बाबासाहेब बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता कटके, भगवेश्वर धनगर, राहुल गायकवाड, गौतम ससाणेसह परिसरातील नागरिकांकडून देण्यात आला आहे.
    1
    रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?
लातूर शहरातील गरुड चौक ते डी मार्ट अहिल्याबाई होळकर चौक मार्गावरील रस्त्यांची दुरावस्था.
पूर्व भाग कृती समितीने रस्त्यावरील खड्ड्यात बेश्रमाचे झाड लावून प्रशासनाचा जाहीर निषेध करीत केले तीव्र आंदोलन.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
रविवार दिनांक 26 एप्रिल 2026.
लातूर शहरातील गरुड चौक, शिवरत्न जीवाजी महाले चौक ते डी मार्ट मार्गे नवीन रेनापूर नाका अहिल्याबाई होळकर चौक रिंग रोडवरील खड्यात आज 26 एप्रिल रोजी दुपारी तळपत्या उन्हात समितीने बेशर्माचे झाड लावून प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदवत केले आंदोलन.                             लातूर शहराच्या तिन्ही बाजूनी राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून रस्त्याचे रुंदीकरण करून रस्ते विकास करण्यात आले परंतु गरुड चौक शिवरत्न जिवाजी महाले चौक ते डी मार्ट मार्गाने नवीन रेणापूर नाका अहिल्याबाई होळकर चौक दरम्यान असलेला 5 किलोमीटर मार्ग असलेला रस्ता लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीत असल्याने जाणीवपूर्वक या रोडचा अद्यापही विकास करण्यात आला नाही. परिणामी सदरील अरुंद मार्गावर जागोजागी लहान मोठे असंख्य खड्डे पडल्याने नागरिकांना रहदारी करण्यात अनेक समस्या निर्माण होत असून खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात रोज अनेक दूचाकी चालक या मार्गावर पडतात तर चार चाकी चे अपघात होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे तसेच पावसाळ्यात या रोडवर प्रवाशांना जाण्यासाठी खूप मोठा धोका पत्करून जीव मोठे धरून चालावे लागत आहे.
सदरील मार्ग मिसिंग रस्ता म्हणून दुरुस्त करण्यात यावा याकरिता स्थानिक आमदार अमित देशमुख यांनी राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता पण अद्याप सदरील रोड नव्याने दुरुस्त करण्यात आलेला नसल्याने अनेक अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली असून पावसाळ्यात शहरातील पाणी या रस्त्यावर येऊन पूरपरिस्थिती निर्माण होऊन रस्ता बंद होतो
याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज लातूर शहर पूर्व भाग कृती समितीने सदरील रोडवरील खड्ड्यात बेशरमाचे झाड लावून आंदोलन करीत प्रशासनाने पुढील पंधरा दिवसाच्या आत या रोडची दुरुस्ती नाही केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लातूर शहर पूर्वभाग कृती समितीच्या वतीने दीपक गंगणे, बाबासाहेब बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता कटके, भगवेश्वर धनगर, राहुल गायकवाड, गौतम ससाणेसह परिसरातील नागरिकांकडून देण्यात आला आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील अंधोरी येथे कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना २५ एप्रिल २०२६ रोजी उघडकीस आली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शेतकरी आर्थिक अडचणी व वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे मानसिक तणावाखाली होता. शेतीतील उत्पन्न घटल्याने आणि कर्जफेडीचा ताण वाढल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक कारण समोर येत आहे.
    1
    लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील अंधोरी येथे कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना २५ एप्रिल २०२६ रोजी उघडकीस आली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शेतकरी आर्थिक अडचणी व वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे मानसिक तणावाखाली होता. शेतीतील उत्पन्न घटल्याने आणि कर्जफेडीचा ताण वाढल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक कारण समोर येत आहे.
    user_Janta police taims
    Janta police taims
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • #रामदास_इतिहास आणि #वास्तव! #वाचा_शेयर_करा 🚩 ​अनेक वर्षे आपल्याला खोटा इतिहास सांगून दिशाभूल केली गेली. पण ऐतिहासिक पुरावे आणि मूळ दस्तऐवज काय सांगतात हे आपण वाचायला हवे. सोबत जोडलेला फोटो भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे (Vol. 61, No. 1, July 1982) च्या त्रैमासिकातील आहे. ही आहे 'रामदासाची आदिलशहास अर्जी'! ​यात रामदासाने स्वतःच्या हस्ताक्षरात आदिलशहाला काय विनंती केली आहे, त्या ओळी बघा: ​"पायाचा मी दास । शाह अर्जी ऐकावी ।। सिवाजीच्या राज्याची । धुळधान व्हावी ।। दासाचाही दास आपूल्या । मी रामदासी ।। दरबार आपूला आदिलशाही । हीच माझी कासी ।।" ​यावरून हे स्पष्ट होते की, हा रामदास ठोसर याचा शिवरायांशी संबंध नाहीच, उलट तो आदिलशाहीवर इमान कायम ठेवणारा होता! ज्या माणसाला आदिलशाही दरबार हीच आपली 'काशी' (पवित्र स्थान) वाटते आणि जो 'शिवाजी महाराजांच्या राज्याची धुळधान व्हावी' अशी मागणी आदिलशहाकडे करतो, तो स्वराज्याचा हितचिंतक कसा असू शकतो? ​खरा इतिहास वाचा, सत्य समजून घ्या आणि खोटा प्रचार थांबवा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही पोस्ट शेअर करा. 👇 ​
    1
    #रामदास_इतिहास आणि #वास्तव! #वाचा_शेयर_करा 🚩
​अनेक वर्षे आपल्याला खोटा इतिहास सांगून दिशाभूल केली गेली. पण ऐतिहासिक पुरावे आणि मूळ दस्तऐवज काय सांगतात हे आपण वाचायला हवे. सोबत जोडलेला फोटो भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे (Vol. 61, No. 1, July 1982) च्या त्रैमासिकातील आहे. ही आहे 'रामदासाची आदिलशहास अर्जी'!
​यात रामदासाने स्वतःच्या हस्ताक्षरात आदिलशहाला काय विनंती केली आहे, त्या ओळी बघा:
​"पायाचा मी दास । शाह अर्जी ऐकावी ।।
सिवाजीच्या राज्याची । धुळधान व्हावी ।।
दासाचाही दास आपूल्या । मी रामदासी ।।
दरबार आपूला आदिलशाही । हीच माझी कासी ।।"
​यावरून हे स्पष्ट होते की, हा रामदास ठोसर याचा शिवरायांशी संबंध नाहीच, उलट तो आदिलशाहीवर इमान कायम ठेवणारा होता! ज्या माणसाला आदिलशाही दरबार हीच आपली 'काशी' (पवित्र स्थान) वाटते आणि जो 'शिवाजी महाराजांच्या राज्याची धुळधान व्हावी' अशी मागणी आदिलशहाकडे करतो, तो स्वराज्याचा हितचिंतक कसा असू शकतो?
​खरा इतिहास वाचा, सत्य समजून घ्या आणि खोटा प्रचार थांबवा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही पोस्ट शेअर करा. 👇
​
    user_Arun Vasantrao Nagalgave
    Arun Vasantrao Nagalgave
    Farmer उस्मानाबाद, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ महा आंदोलन
    1
    लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ महा आंदोलन
    user_सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ‘पालकमंत्री चषक’ ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेचे दिमाखात बक्षीस वितरण ⚽🏆
    1
    पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ‘पालकमंत्री चषक’ ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेचे दिमाखात बक्षीस वितरण ⚽🏆
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    5 hrs ago
  • जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा मुखेड जि नांदेड शिवसेना मुखेड प्रसाद सेवा
    2
    जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा मुखेड जि नांदेड
शिवसेना मुखेड प्रसाद सेवा
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • *लातूरसह चार जिल्ह्यांत,कर्नाटकात घरफोडी करणारी सराईत टोळीतील, ३२ गुन्ह्यांतील, कुख्यात मुख्य आरोपी जेरबंद, लाखो रुपयांच्या चोरीचा पर्दाफाश.* लातूर जिल्हा तसेच शेजारील धाराशिव, सोलापूर व कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात मागील दीड ते दोन वर्षांपासून सुरू असलेल्या घरफोडी व चोरीच्या सलग घटना घडत होत्या.बंद घरांचे कुलूप तोडून मौल्यवान दागिने व रोख रक्कम चोरी करणारी ही टोळी अत्यंत चलाख पद्धतीने गुन्हे करीत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र, पोलीस अधीक्षक, अमोल तांबे लातूर यांच्या सूचनांनुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने राबविलेल्या विशेष कारवाईत या गुन्हेगारी टोळीतील मुख्य व कुख्यात आरोपीस अटक करण्यात यश मिळवले आहे. पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर (स्थानिक गुन्हे शाखा, लातूर) यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे दि. २४ एप्रिल २०२६ रोजी उजनी येथील उड्डाणपुलाखाली सापळा रचला. या कारवाईदरम्यान सुनिल उर्फ काळ्या श्रावण शिंदे (वय २४ वर्षे, रा. सुंभा, ता. जि. धाराशिव) हा रेकॉर्डवरील व फरार आरोपीला पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले . आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पथकाने तत्परतेने त्यास पकडले. आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून – ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी ३ ग्रॅम वजनाची सोन्याची ठुशी रोख रक्कम ₹५,०००/- असा एकूण ₹३५,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असून आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने आपल्या साथीदारांसह लातूर, धाराशिव, सोलापूर तसेच कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली. ही टोळी नियोजनबद्ध पद्धतीने वाहनांचा वापर करून रात्रीच्या वेळी बंद घरे हेरून चोरी करत असल्याचे उघड झाले आहे. तपासाअंती आरोपीविरुद्ध खालीलप्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे 🔴 लातूर जिल्हा – २८ गुन्हे भादा, किल्लारी, कासारशिरसी, औसा, लातूर ग्रामीण व इतर पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे. 🔴 धाराशिव जिल्हा – ४ गुन्हे 🔴 सोलापूर जिल्हा – ५ गुन्हे 🔴 कर्नाटक राज्य (बिदर) – ३ गुन्हे या प्रमाणे एकूण ३२ गुन्हे दाखल असून पुढील तपासादरम्यान गुन्ह्याच्या संख्येमध्ये वाढ होण्याची तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत होण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यातील आरोपीने त्याच्या इतर साथीदारासह टोळी तयार करून गुन्हे केल्याची कबुली दिली आहे असून त्याच्या टोळी मधील काही आरोपींना या अगोदरच अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशावरून अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, पोलीस अमलदार माधव बिल्लापटे, नवनाथ हासबे, रामलिंग शिंदे, तुराब पठाण, राजेश कंचे, गणेश साठे, श्रीनिवास जांभळे, शैलेश सुडे, महिला पोलीस अंमलदार अंजली गायकवाड यांचे पथकाने अत्यंत समन्वय व कौशल्य दाखवत ही कारवाई यशस्वी केली.
    2
    *लातूरसह चार जिल्ह्यांत,कर्नाटकात घरफोडी करणारी सराईत टोळीतील, ३२ गुन्ह्यांतील, कुख्यात मुख्य आरोपी जेरबंद, लाखो रुपयांच्या चोरीचा पर्दाफाश.*
लातूर जिल्हा तसेच शेजारील धाराशिव, सोलापूर व कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात मागील दीड ते दोन वर्षांपासून सुरू असलेल्या घरफोडी व चोरीच्या सलग घटना घडत होत्या.बंद घरांचे कुलूप तोडून मौल्यवान दागिने व रोख रक्कम चोरी करणारी ही टोळी अत्यंत चलाख पद्धतीने गुन्हे करीत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
मात्र, पोलीस अधीक्षक, अमोल तांबे  लातूर यांच्या सूचनांनुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने  राबविलेल्या विशेष कारवाईत या गुन्हेगारी टोळीतील मुख्य व कुख्यात आरोपीस अटक करण्यात यश मिळवले आहे.
पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर (स्थानिक गुन्हे शाखा, लातूर) यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे दि. २४ एप्रिल २०२६ रोजी उजनी येथील उड्डाणपुलाखाली सापळा रचला. या कारवाईदरम्यान सुनिल उर्फ काळ्या श्रावण शिंदे (वय २४ वर्षे, रा. सुंभा, ता. जि. धाराशिव) हा रेकॉर्डवरील व फरार आरोपीला पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले . आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पथकाने तत्परतेने त्यास पकडले. आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून –
५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी
३ ग्रॅम वजनाची सोन्याची ठुशी रोख रक्कम ₹५,०००/- असा एकूण ₹३५,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असून आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने आपल्या साथीदारांसह लातूर, धाराशिव, सोलापूर तसेच कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली. ही टोळी नियोजनबद्ध पद्धतीने वाहनांचा वापर करून रात्रीच्या वेळी बंद घरे हेरून चोरी करत असल्याचे उघड झाले आहे.
तपासाअंती आरोपीविरुद्ध खालीलप्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे 
🔴 लातूर जिल्हा – २८ गुन्हे
भादा, किल्लारी, कासारशिरसी, औसा, लातूर ग्रामीण व इतर पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे.
🔴 धाराशिव जिल्हा – ४ गुन्हे
🔴 सोलापूर जिल्हा – ५ गुन्हे
🔴 कर्नाटक राज्य (बिदर) – ३ गुन्हे
या प्रमाणे एकूण ३२ गुन्हे दाखल असून पुढील तपासादरम्यान गुन्ह्याच्या संख्येमध्ये वाढ होण्याची तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत होण्याची शक्यता आहे.
या गुन्ह्यातील आरोपीने त्याच्या इतर साथीदारासह टोळी तयार करून  गुन्हे केल्याची कबुली दिली आहे असून त्याच्या टोळी मधील काही आरोपींना या अगोदरच अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशावरून अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ,  पोलीस अमलदार माधव बिल्लापटे, नवनाथ हासबे, रामलिंग शिंदे, तुराब पठाण, राजेश कंचे, गणेश साठे, श्रीनिवास जांभळे, शैलेश सुडे, महिला पोलीस अंमलदार अंजली गायकवाड यांचे पथकाने अत्यंत समन्वय व कौशल्य दाखवत ही कारवाई यशस्वी केली.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.