Shuru
Apke Nagar Ki App…
नेपाल में भीषण बाढ़ का कहर, भारी तबाही! आपदा में 105 भारतीय नेपाल में आई विनाशकारी बाढ़ से अब तक 16 लोगों की मौत हो चुकी है। इस भीषण आपदा में 105 भारतीय नागरिकों समेत कुल 291 विदेशी पर्यटक लापता बताए जा रहे हैं। कई घर और गाड़ियां पानी के तेज बहाव में बह गईं। प्रशासन की ओर से युद्धस्तर पर राहत और बचाव कार्य जारी है।
Gaurishankar Dhikar
नेपाल में भीषण बाढ़ का कहर, भारी तबाही! आपदा में 105 भारतीय नेपाल में आई विनाशकारी बाढ़ से अब तक 16 लोगों की मौत हो चुकी है। इस भीषण आपदा में 105 भारतीय नागरिकों समेत कुल 291 विदेशी पर्यटक लापता बताए जा रहे हैं। कई घर और गाड़ियां पानी के तेज बहाव में बह गईं। प्रशासन की ओर से युद्धस्तर पर राहत और बचाव कार्य जारी है।
More news from महाराष्ट्र and nearby areas
- ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा शहरात रूट मार्च खामगाव : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात मुख्य मार्गांवरून भव्य रूट मार्च काढण्यात आला. हा रूट मार्च शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काढण्यात आला. शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे या रूट मार्चचा समारोप झाला. शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती मजबूत राहावी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी,यासाठी या रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर, शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंदार पुरी यांसह दंगा नियंत्रण पथक,राज्य राखीव पोलीस बलाचे जवान तसेच खामगाव शहर व शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार , होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आगामी सण-उत्सव सर्वांनी शांततेत आणि उत्साहात साजरे करावेत,असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.4
- अकोल्यात ‘ऑपरेशन प्रहार’चा धडाका! हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर छापा; 4.98 लाखांचा मुद्देमाल जप्त अकोल्यात अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव परिसरात छापा टाकला. या कारवाईत तब्बल 3,200 लिटर सडवा मोहामाल, 71 लिटर गावठी हातभट्टी दारू आणि इतर साहित्य असा एकूण 4 लाख 98 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. अवैध दारूविरोधातील पोलिसांच्या या कारवाईची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. 📍 ठिकाण: नायगाव, अकोला 🚔 कारवाई: स्थानिक गुन्हे शाखा, अकोला 💰 जप्त मुद्देमाल: ₹4,98,600 👥 ताब्यात: 2 आरोपी India News R7 Marathi — अकोला आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्यासोबत रहा. व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 करा.2
- अकोट शहर पोलिसांचा धडाका आठ चोरीच्या दुचाकींसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त अकोला : अकोट शहर पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या प्रकरणाचा छडा लावत दोन आरोपींना ताब्यात घेत ८ चोरीच्या मोटारसायकली, दोन इंजिन, चेसीस व स्पेअर पार्ट असा तब्बल ६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गजानन प्रभुदास रायबोले (२३) व अब्दुल जावेद अब्दुल जमील जमादार (३०), दोघेही रा. इंदिरानगर, येवदा, ता. दर्यापूर, जि. अमरावती, अशी आरोपींची नावे आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता अकोट शहर व परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार किशोर जुनघरे व गुन्हे शोध पथकाने केली.1
- मोहम्मद पैगंबर यांचा जन्म मानवजातीच्या कल्याणासाठी सुखकर - आमदार सुलभा खोडके.. 1
- हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक 26/08/26 कारंजा येथे एकोपा आणि उत्साहाची रॅली कारंजा, महाराष्ट्र - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त कारंजा शहरात एक भव्य आणि उत्साहाने भारलेली रॅली काढण्यात आली. या रॅलीने केवळ धार्मिक सलोखाच नव्हे, तर सामाजिक एकोपा आणि सामुदायिक बांधिलकीचे एक सुंदर उदाहरण सादर केले. शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. या रॅलीमध्ये समाजसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सर यांच्यासह निसार वहीद भाई, काँग्रेसचे कारंजा शहर अध्यक्ष अब्दुल राजीक आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, सर्वपक्षीय नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन पैगंबर जयंतीचा हा पवित्र सोहळा साजरा केला, हे विशेष उल्लेखनीय होते. त्यांच्या उपस्थितीने रॅलीला एक सामाजिक आणि राजकीय वजन प्राप्त झाले. या प्रसंगी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमर चौरे आणि पीएसआय खान साहेब यांची उपस्थिती लक्षवेधी होती. त्यांनी केवळ सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारीच सांभाळली नाही, तर स्वतः या सोहळ्यात सहभागी होऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अशा धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे हे समाजातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते, हे त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली आणि कार्यक्रमाला एक अधिकृत स्वरूप प्राप्त झाले. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. 'साहब' आणि 'साहेब' या संबोधनांनी एकमेकांचा आदर व्यक्त करत, त्यांनी या पवित्र दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. हा केवळ एक धार्मिक उत्सव नव्हता, तर तो सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकोप्याचा संदेश देणारा एक महत्त्वपूर्ण प्रसंग होता. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार, प्रेम, शांती आणि मानवतेचा संदेश या रॅलीतून सर्वदूर पोहोचवण्यात आला. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे समाजात सलोखा वाढतो आणि विविध धर्मांचे लोक एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करतात, ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी मिळते. कारंजा शहरातील या रॅलीने हेच सिद्ध केले की, धर्म कोणताही असो, सलोखा आणि एकोपा हेच मानवी जीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत.4
- अवैध हातभट्टीवर अकोला एलसीबीचा दणका ४.९८ लाखांचा माल जप्त अकोला : ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने अकोट फाईल हद्दीतील नायगाव येथे गावठी हातभट्टीवर धडक कारवाई केली. छाप्यात हुसैन बुध्दु नौरंगाबादी व संतोष शिवराम घणे या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी तब्बल ३२०० लिटर सडवा मोहामाच, ७५ लिटर गावठी दारू व इतर साहित्य असा ४ लाख ९८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. हातभट्टी चालकांविरोधातील या धडक कारवाईने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.1
- नेपाल में भीषण बाढ़ का कहर, भारी तबाही! आपदा में 105 भारतीय नेपाल में आई विनाशकारी बाढ़ से अब तक 16 लोगों की मौत हो चुकी है। इस भीषण आपदा में 105 भारतीय नागरिकों समेत कुल 291 विदेशी पर्यटक लापता बताए जा रहे हैं। कई घर और गाड़ियां पानी के तेज बहाव में बह गईं। प्रशासन की ओर से युद्धस्तर पर राहत और बचाव कार्य जारी है।1
- इन्स्टाग्रामच्या आक्षेपार्ह कमेंटने धार्मिक भावना दुखावल्याने तणाव; पोलिसांचा तगडा बंदोबस्त, रात्री गावाला छावणीचे स्वरूप... इन्स्टाग्रामच्या आक्षेपार्ह कमेंटने धार्मिक भावना दुखावल्याने तणाव; पोलिसांचा तगडा बंदोबस्त, रात्री गावाला छावणीचे स्वरूप... जळगाव जामोद (प्रतिनिधी) : सोशल मीडियावरील आक्षेपार्ह कमेंटमुळे जामोद गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मोठा बंदोबस्त तैनात केला. त्यामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण जामोद गावाला अक्षरशः छावणीचे स्वरूप आले होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामोद येथील हरीष देविदास घाटोळे (वय २५) यांच्या फिर्यादीवरून कायमी अप क्र. 541/2026, कलम 299, 3(5) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीच्या आरोपानुसार,‘ahsanshaikh8126’ व ‘mr_sameer_22’ या इन्स्टाग्राम आयडीवरून एका पोस्टवर धार्मिक भावना दुखावणाऱ्या आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्या. संबंधित मजकूर सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने आपल्यासह सकल हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला.अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहन माछरे, जळगाव जामोद ठाणेदार सचिन बागुल, तामगाव ठाणेदार श्रीकांत निचळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोड, पीएसआय अमोल पंडित, पीएसआय नागेश खाडे, पीएसआय गणेश कायंदे यांच्यासह जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे अधिकारी-कर्मचारी तसेच आरसीपी पथक घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, संपूर्ण प्रकरण शांत करण्यात पोलिसांना यश आले.रात्री उशिरापर्यंत जामोद परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.दरम्यान, सोशल मीडियावर कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असा मजकूर, पोस्ट अथवा कमेंट व्हायरल करू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोड करीत आहेत.1