logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

श्रींच्या पुण्यतिथी उत्सवात भक्तीचा महासागर! ३९७ दिंड्यांचा सहभाग; १ लाख १० हजारांहून अधिक भाविकांना महाप्रसाद शेगावच्या संतभूमीत चार दिवस अध्यात्मिक उत्साहाची पर्वणी; काकडा, गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ अन् श्रीहरी कीर्तनाने परिसर दुमदुमला... श्रींच्या पुण्यतिथी उत्सवात भक्तीचा महासागर! ३९७ दिंड्यांचा सहभाग; १ लाख १० हजारांहून अधिक भाविकांना महाप्रसाद शेगावच्या संतभूमीत चार दिवस अध्यात्मिक उत्साहाची पर्वणी; काकडा, गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ अन् श्रीहरी कीर्तनाने परिसर दुमदुमला शेगाव, प्रतिनिधी : संतनगरी शेगाव येथे श्री गजानन महाराज संस्थानतर्फे आयोजित ११६ वा श्री पुण्यतिथी उत्सव यंदाही अभूतपूर्व भक्तिभाव, शिस्त आणि अध्यात्मिक वातावरणात उत्साहात पार पडला. दि. १२ ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत झालेल्या या उत्सवाने संपूर्ण शेगाव नगरी अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाली. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या ३९७ दिंड्यांचा सहभाग आणि तब्बल १ लाख १० हजारांहून अधिक भाविकांना महाप्रसादाचे वितरण ही या उत्सवाची भव्यता अधोरेखित करणारी ठरली. श्री गजानन महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त संस्थान परिसरात पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. दररोज सकाळी ६ ते ६.४५ काकडा, त्यानंतर ७.३० ते ९ गाथा भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५.३० ते ६ हरिपाठ आणि रात्री ८ ते १० श्रीहरी कीर्तन अशा विविध कार्यक्रमांनी भाविकांना अध्यात्मिक मेजवानी मिळाली. नामस्मरणाने शेगाव नगरी दुमदुमली उत्सवातील विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये ह.भ.प. प्रशांत बुवा ताकोते (शिरसोली), ह.भ.प. सुरेश बुवा बाकडे (पोफाळी), ह.भ.प. भरत बुवा चौधरी (म्हैसवाडी), ह.भ.प. अच्युत बुवा दस्तापूरकर (परभणी), ह.भ.प. निवृत्ती बुवा तराळे (व्याळा) यांच्यासह विविध कीर्तनकारांनी उपस्थित भाविकांना भक्ती, अध्यात्म आणि संतपरंपरेचा संदेश दिला. कीर्तन, भजन आणि हरिपाठाच्या स्वरांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. गणेशयाग-वरुणयागाची पूर्णाहुती श्री गणेशयाग व वरुणयागास भाद्रपद शु. १ रोजी प्रारंभ झाला. धार्मिक विधी पार पडल्यानंतर भाद्रपद शु. ४ रोजी सकाळी १० वाजता यागाची पूर्णाहुती करण्यात आली. तसेच श्रींच्या समाधी सोहळ्यानिमित्त विशेष श्रीहरी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक सोहळ्यालाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ३९७ दिंड्यांनी लावली भक्तीची हजेरी यंदाच्या पुण्यतिथी उत्सवात तब्बल ३९७ दिंड्यांनी श्रींच्या सेवेत सहभाग घेतला. नियमांची पूर्तता केलेल्या ८० नवीन दिंड्यांना संस्थानतर्फे १० टाळ, १ वीणा, १ मृदंग यासह श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम गाथा आणि श्री एकनाथी भागवत हे संत वाङ्मय तसेच श्री माऊली पताका वितरित करण्यात आल्या. जुन्या दिंड्यांना भजनी साहित्याच्या दुरुस्तीसाठी नियमानुसार सानुग्रह अंशदान तसेच इतर व्यवस्थेसाठी सहकार्य देण्यात आले. त्यामुळे वारकरी परंपरेला बळ देण्याचे कामही संस्थानच्या माध्यमातून करण्यात आले. वारकऱ्यांसाठी भोजन, प्रथमोपचाराची सुविधा उत्सवासाठी आलेल्या भजनी दिंड्यांमधील वारकऱ्यांसाठी भोजनप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच भाविकांच्या आरोग्याची काळजी घेत विसावा संकुल येथे प्रथमोपचार केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे धार्मिक उत्सवाबरोबरच सेवाभावाची परंपराही संस्थानने जपली. १ लाख १० हजारांहून अधिक भाविकांना महाप्रसाद उत्सव काळात शेगावसह विविध ठिकाणी श्रींचा समाधी उत्सव संपन्न झाला. पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंपासरोवर, ओंकारेश्वर, जिरडा आदी ठिकाणीही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सर्व ठिकाणी मिळून १ लाख १० हजारांहून अधिक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. चार दिवसांच्या या भक्तिमय सोहळ्याने श्री गजानन महाराज संस्थानची भक्तसेवा, वारकरी परंपरा आणि अध्यात्मिक कार्याची व्यापकता पुन्हा एकदा अधोरेखित केली. शिस्तबद्ध आयोजन, धार्मिक कार्यक्रमांची अखंड मालिका, दिंड्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि हजारो भाविकांची सेवा यामुळे यंदाचा पुण्यतिथी उत्सव संस्मरणीय ठरला. “गण गण गणात बोते” या जयघोषाने शेगावची संतभूमी भक्तीच्या ऊर्जेने भारावून गेली. — श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव

16 hrs ago
user_Sachin kadukar
Sachin kadukar
Photographer Shegaon, Buldhana•
16 hrs ago
d382d6c3-918c-4c7d-be0b-5b5c67d715bc

श्रींच्या पुण्यतिथी उत्सवात भक्तीचा महासागर! ३९७ दिंड्यांचा सहभाग; १ लाख १० हजारांहून अधिक भाविकांना महाप्रसाद शेगावच्या संतभूमीत चार दिवस अध्यात्मिक उत्साहाची पर्वणी; काकडा, गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ अन् श्रीहरी कीर्तनाने परिसर दुमदुमला... श्रींच्या पुण्यतिथी उत्सवात भक्तीचा महासागर! ३९७ दिंड्यांचा सहभाग; १ लाख १० हजारांहून अधिक भाविकांना महाप्रसाद शेगावच्या संतभूमीत चार दिवस अध्यात्मिक उत्साहाची पर्वणी; काकडा, गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ अन् श्रीहरी कीर्तनाने परिसर दुमदुमला शेगाव, प्रतिनिधी : संतनगरी शेगाव येथे श्री गजानन महाराज संस्थानतर्फे आयोजित ११६ वा श्री पुण्यतिथी उत्सव यंदाही अभूतपूर्व भक्तिभाव, शिस्त आणि अध्यात्मिक वातावरणात उत्साहात पार पडला. दि. १२ ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत झालेल्या या उत्सवाने संपूर्ण शेगाव नगरी अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाली. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या ३९७ दिंड्यांचा सहभाग आणि तब्बल १ लाख १० हजारांहून अधिक

daba4e39-1d92-4909-ad3a-208ac4e6cf86

भाविकांना महाप्रसादाचे वितरण ही या उत्सवाची भव्यता अधोरेखित करणारी ठरली. श्री गजानन महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त संस्थान परिसरात पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. दररोज सकाळी ६ ते ६.४५ काकडा, त्यानंतर ७.३० ते ९ गाथा भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५.३० ते ६ हरिपाठ आणि रात्री ८ ते १० श्रीहरी कीर्तन अशा विविध कार्यक्रमांनी भाविकांना अध्यात्मिक मेजवानी मिळाली. नामस्मरणाने शेगाव नगरी दुमदुमली उत्सवातील विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये ह.भ.प. प्रशांत बुवा ताकोते (शिरसोली), ह.भ.प. सुरेश बुवा बाकडे (पोफाळी), ह.भ.प. भरत बुवा चौधरी (म्हैसवाडी), ह.भ.प. अच्युत बुवा दस्तापूरकर (परभणी), ह.भ.प. निवृत्ती बुवा तराळे (व्याळा) यांच्यासह विविध कीर्तनकारांनी उपस्थित भाविकांना भक्ती, अध्यात्म आणि संतपरंपरेचा संदेश दिला. कीर्तन, भजन आणि हरिपाठाच्या स्वरांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. गणेशयाग-वरुणयागाची पूर्णाहुती श्री गणेशयाग व वरुणयागास भाद्रपद शु. १ रोजी प्रारंभ

9a855bde-68f8-4d39-ad71-5c9afef36a33

झाला. धार्मिक विधी पार पडल्यानंतर भाद्रपद शु. ४ रोजी सकाळी १० वाजता यागाची पूर्णाहुती करण्यात आली. तसेच श्रींच्या समाधी सोहळ्यानिमित्त विशेष श्रीहरी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक सोहळ्यालाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ३९७ दिंड्यांनी लावली भक्तीची हजेरी यंदाच्या पुण्यतिथी उत्सवात तब्बल ३९७ दिंड्यांनी श्रींच्या सेवेत सहभाग घेतला. नियमांची पूर्तता केलेल्या ८० नवीन दिंड्यांना संस्थानतर्फे १० टाळ, १ वीणा, १ मृदंग यासह श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम गाथा आणि श्री एकनाथी भागवत हे संत वाङ्मय तसेच श्री माऊली पताका वितरित करण्यात आल्या. जुन्या दिंड्यांना भजनी साहित्याच्या दुरुस्तीसाठी नियमानुसार सानुग्रह अंशदान तसेच इतर व्यवस्थेसाठी सहकार्य देण्यात आले. त्यामुळे वारकरी परंपरेला बळ देण्याचे कामही संस्थानच्या माध्यमातून करण्यात आले. वारकऱ्यांसाठी भोजन, प्रथमोपचाराची सुविधा उत्सवासाठी आलेल्या भजनी दिंड्यांमधील वारकऱ्यांसाठी भोजनप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच भाविकांच्या आरोग्याची

7ee28d59-8034-4d6b-91b5-e33918aca097

काळजी घेत विसावा संकुल येथे प्रथमोपचार केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे धार्मिक उत्सवाबरोबरच सेवाभावाची परंपराही संस्थानने जपली. १ लाख १० हजारांहून अधिक भाविकांना महाप्रसाद उत्सव काळात शेगावसह विविध ठिकाणी श्रींचा समाधी उत्सव संपन्न झाला. पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंपासरोवर, ओंकारेश्वर, जिरडा आदी ठिकाणीही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सर्व ठिकाणी मिळून १ लाख १० हजारांहून अधिक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. चार दिवसांच्या या भक्तिमय सोहळ्याने श्री गजानन महाराज संस्थानची भक्तसेवा, वारकरी परंपरा आणि अध्यात्मिक कार्याची व्यापकता पुन्हा एकदा अधोरेखित केली. शिस्तबद्ध आयोजन, धार्मिक कार्यक्रमांची अखंड मालिका, दिंड्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि हजारो भाविकांची सेवा यामुळे यंदाचा पुण्यतिथी उत्सव संस्मरणीय ठरला. “गण गण गणात बोते” या जयघोषाने शेगावची संतभूमी भक्तीच्या ऊर्जेने भारावून गेली. — श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ऋषिपंचमी निमित्त संत नगरी शेगाव भक्तिमय; श्रींच्या पालखीची भव्य प्रभातफेरी जागो जागी रांगोळी काढून स्वागत. ऋषिपंचमी निमित्त संत नगरी शेगाव भक्तिमय; श्रींच्या पालखीची भव्य प्रभातफेरी शेगाव : ऋषिपंचमीच्या पावन पर्वावर संत नगरी शेगाव आज श्री संत गजानन महाराजांच्या भक्तिरसात न्हाऊन निघाली. श्री संत गजानन महाराजांनी दि. ८ सप्टेंबर १९१० रोजी संजीवनी समाधी घेतली. त्यांच्या समाधीला ११६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर श्रींच्या पालखीची अश्वांसह व पताकाधारी वारकरी, पालखीचे भोई, सेवेकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत भव्य प्रभातफेरी संत नगरीतून काढण्यात आली. प्रभातफेरीदरम्यान सर्वत्र “गण गण गणात बोते” आणि “श्री संत गजानन महाराज की जय” या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले. टाळ-मृदंगाचा निनाद, भगव्या पताका, अश्व आणि पालखीचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. श्रींच्या नामस्मरणाने संपूर्ण शेगाव नगरीत आध्यात्मिक आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले. श्री संत गजानन महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन करून, श्री महाराज सर्व भक्तांवर सदैव कृपादृष्टी ठेवोत, सर्वांना सुख, शांती, आरोग्य व समृद्धी लाभो, अशी भक्तिभावाने प्रार्थना करण्यात आली.
    4
    ऋषिपंचमी निमित्त संत नगरी शेगाव भक्तिमय; श्रींच्या पालखीची भव्य प्रभातफेरी जागो जागी रांगोळी काढून स्वागत.
ऋषिपंचमी निमित्त संत नगरी शेगाव भक्तिमय; श्रींच्या पालखीची भव्य प्रभातफेरी
शेगाव : ऋषिपंचमीच्या पावन पर्वावर संत नगरी शेगाव आज श्री संत गजानन महाराजांच्या भक्तिरसात न्हाऊन निघाली. श्री संत गजानन महाराजांनी दि. ८ सप्टेंबर १९१० रोजी संजीवनी समाधी घेतली. त्यांच्या समाधीला ११६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
याच पार्श्वभूमीवर श्रींच्या पालखीची अश्वांसह व पताकाधारी वारकरी, पालखीचे भोई, सेवेकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत भव्य प्रभातफेरी संत नगरीतून काढण्यात आली. प्रभातफेरीदरम्यान सर्वत्र “गण गण गणात बोते” आणि “श्री संत गजानन महाराज की जय” या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले.
टाळ-मृदंगाचा निनाद, भगव्या पताका, अश्व आणि पालखीचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. श्रींच्या नामस्मरणाने संपूर्ण शेगाव नगरीत आध्यात्मिक आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले.
श्री संत गजानन महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन करून, श्री महाराज सर्व भक्तांवर सदैव कृपादृष्टी ठेवोत, सर्वांना सुख, शांती, आरोग्य व समृद्धी लाभो, अशी भक्तिभावाने प्रार्थना करण्यात आली.
    user_उमेश राजगुरे
    उमेश राजगुरे
    Fruit & Vegetable Wholesaler शेगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • बुलढाणा जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन खामगाव: बुलढाणा जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मुख्य मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल टिकार पाटील यांनी खामगाव तालुक्यातील अटाळी येथे टावरवर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यात ७ आमदार, १ खासदार आणि ३ मंत्री (केंद्रीय मंत्री, पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री) असूनही जिल्ह्याला दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले, ही दुर्दैवाची बाब आहे. सरकारला आमच्या थडग्यावर राज्य करायचे आहे का?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. जिल्ह्यात पावसाअभावी पिके करपली असून शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. स्थानिक तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांनी आंदोलकांची भेट घेऊन सकारात्मक मध्यस्थीचे व प्रशासकीय स्तरावर १००% प्रयत्न करण्याचे लिखित आश्वासन दिले. प्रशासनाच्या विनंतीवरून हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र येत्या १५ तारखेपर्यंत बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला नाही, तर आमदार आकाश फुंडकर यांच्या घरावर थेट घुसून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
    3
    बुलढाणा जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन

खामगाव: बुलढाणा जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मुख्य मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल टिकार पाटील यांनी खामगाव तालुक्यातील अटाळी येथे टावरवर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यात ७ आमदार, १ खासदार आणि ३ मंत्री (केंद्रीय मंत्री, पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री) असूनही जिल्ह्याला दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले, ही दुर्दैवाची बाब आहे. सरकारला आमच्या थडग्यावर राज्य करायचे आहे का?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. जिल्ह्यात पावसाअभावी पिके करपली असून शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. स्थानिक तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांनी आंदोलकांची भेट घेऊन सकारात्मक मध्यस्थीचे व प्रशासकीय स्तरावर १००% प्रयत्न करण्याचे लिखित आश्वासन दिले. प्रशासनाच्या विनंतीवरून हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र येत्या १५ तारखेपर्यंत बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला नाही, तर आमदार आकाश फुंडकर यांच्या घरावर थेट घुसून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • शेतकऱ्यांच्या ‘क्रांतिकारी राजा’चे बुलढाण्यात दणक्यात आगमन; शेतकऱ्यांच्या ‘क्रांतिकारी राजा’चे बुलढाण्यात दणक्यात आगमन;
    1
    शेतकऱ्यांच्या ‘क्रांतिकारी राजा’चे बुलढाण्यात दणक्यात आगमन;
शेतकऱ्यांच्या ‘क्रांतिकारी राजा’चे बुलढाण्यात दणक्यात आगमन;
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • दुष्काळ जाहीर करा, नाहीतर २८ पासून आमरण उपोषण!” जळगाव जामोद च्या शेतकऱ्यांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा; दुष्काळ जाहीर करा, नाहीतर २८ पासून आमरण उपोषण!” जळगाव जामोद च्या शेतकऱ्यांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा; जळगाव जामोद(प्रतिनिधी): अल्प व अनियमित पावसामुळे खरीप हंगाम अक्षरशः संकटात सापडला असून, पिकांची वाढ खुंटल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर संपूर्ण जळगाव जामोद तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा, या मागणीसाठी निंभोरा बु. व खेर्डा खुर्द येथील शेतकऱ्यांनी मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन दिले.प्रशासनाने मागण्यांची तातडीने दखल घेऊन कार्यवाही न केल्यास २८ सप्टेंबर २०२६ पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.त्यामुळे प्रशासनासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.यावेळी शेतकऱ्यांनी जळगाव जामोद तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करून प्रस्ताव शासनाकडे पाठवावा.खरीप पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.दुष्काळी सवलती व विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा.पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याची समस्या लक्षात घेऊन चारा व पाण्याची तातडीने व्यवस्था करावी.सन २०२५-२६ चा पीक विमा विनाविलंब शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा अशा मागण्या केल्या आहेत.या निवेदनाची प्रत बुलढाणा जिल्हाधिकारी तसेच जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी यांनाही देण्यात आली आहे. अस्मानी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.निवेदन देतेवेळी अमोल बहादरे, ज्ञानेश्वर खंडारे, पांडुरंग उगले, रमेश देशमुख, आनंद सुरळकर, आनंद बुंदे, नारायण खंडारे, विठ्ठल दिघडे, विलास डवंगे, अनंता कोंडे, प्रज्वल देशमुख, ज्ञानेश्वर अंभोरे, गजानन बुंदे, दशरथ उगले, भीमराव वानखडे, सागर सपकाळ यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.
    1
    दुष्काळ जाहीर करा, नाहीतर २८ पासून आमरण उपोषण!” 
जळगाव जामोद च्या शेतकऱ्यांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा;
दुष्काळ जाहीर करा, नाहीतर २८ पासून आमरण उपोषण!” 
जळगाव जामोद च्या शेतकऱ्यांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा;
जळगाव जामोद(प्रतिनिधी):
अल्प व अनियमित पावसामुळे खरीप हंगाम अक्षरशः संकटात सापडला असून, पिकांची वाढ खुंटल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर संपूर्ण जळगाव जामोद तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा, या मागणीसाठी निंभोरा बु. व खेर्डा खुर्द येथील शेतकऱ्यांनी मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन दिले.प्रशासनाने मागण्यांची तातडीने दखल घेऊन कार्यवाही न केल्यास २८ सप्टेंबर २०२६ पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.त्यामुळे प्रशासनासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.यावेळी शेतकऱ्यांनी जळगाव जामोद तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करून प्रस्ताव शासनाकडे पाठवावा.खरीप पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.दुष्काळी सवलती व विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा.पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याची समस्या लक्षात घेऊन चारा व पाण्याची तातडीने व्यवस्था करावी.सन २०२५-२६ चा पीक विमा विनाविलंब शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा अशा मागण्या केल्या आहेत.या निवेदनाची प्रत बुलढाणा जिल्हाधिकारी तसेच जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी यांनाही देण्यात आली आहे. अस्मानी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.निवेदन देतेवेळी अमोल बहादरे, ज्ञानेश्वर खंडारे, पांडुरंग उगले, रमेश देशमुख, आनंद सुरळकर, आनंद बुंदे, नारायण खंडारे, विठ्ठल दिघडे, विलास डवंगे, अनंता कोंडे, प्रज्वल देशमुख, ज्ञानेश्वर अंभोरे, गजानन बुंदे, दशरथ उगले, भीमराव वानखडे, सागर सपकाळ यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • आमच्या गावाची स्वच्छता आमच्या dalambi गावामध्ये खूप प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. ओला कचरा सुखा कचरा आणि घरातील wastage कचरा यामुळे गावात बिमारी च प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.
    3
    आमच्या गावाची स्वच्छता 
आमच्या dalambi गावामध्ये खूप प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. ओला कचरा सुखा कचरा आणि घरातील wastage कचरा यामुळे गावात बिमारी च प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.
    user_विकास इंगळे
    विकास इंगळे
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • अकोली जहागीर शेतशिवारात बिबट्याची दहशत; शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण कुत्र्याची शिकार; दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शितशिवारात गायीचीही शिकार केल्याची घटना! अकोली जहागीर शेतशिवारात बिबट्याची दहशत; शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण कुत्र्याची शिकार; दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शितशिवारात गायीचीही शिकार केल्याची घटना! अकोट तालुका प्रतिनिधी... अकोट तालुक्यातील अकोली जहागीर परिसरातील शेतशिवारात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी व शेतमजूर वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याने आकोली जहांगीर शेतशिवारात एका कुत्र्याची शिकार केली असून, दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शेतशिविरात एका गायीचीही शिकार सुद्धा केल्याची घटना घडल्याचे येथील नागरीकांन कडुन सांगण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांमध्ये चिंतेचे व भिंतीचे वातावरण आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने भविष्यात मनुष्य किंवा पाळीव प्राण्यांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन विभागाने तातडीने या परिसराची पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून जोर धरत आहे.
    2
    अकोली जहागीर शेतशिवारात बिबट्याची दहशत; शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण
कुत्र्याची शिकार; दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शितशिवारात गायीचीही शिकार केल्याची घटना!
अकोली जहागीर शेतशिवारात बिबट्याची दहशत; शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण
कुत्र्याची शिकार; दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शितशिवारात गायीचीही शिकार केल्याची घटना!
अकोट तालुका प्रतिनिधी...
अकोट तालुक्यातील अकोली जहागीर परिसरातील शेतशिवारात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी व शेतमजूर वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याने आकोली जहांगीर शेतशिवारात एका कुत्र्याची शिकार केली असून, दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शेतशिविरात एका गायीचीही शिकार सुद्धा केल्याची घटना घडल्याचे  येथील नागरीकांन कडुन सांगण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांमध्ये चिंतेचे व भिंतीचे वातावरण आहे.
बिबट्याचा वावर वाढल्याने भविष्यात मनुष्य किंवा पाळीव प्राण्यांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन विभागाने तातडीने या परिसराची पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून जोर धरत आहे.
    user_राजकुमार वानखडे राज
    राजकुमार वानखडे राज
    News Anchor अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • बुलढाणा:-गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी देऊळघाटमध्ये पोलिसांचे शक्तीप्रदर्शन; चोख बंदोबस्तासह काढला जोरदार रूटमार्च
    1
    बुलढाणा:-गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी देऊळघाटमध्ये पोलिसांचे शक्तीप्रदर्शन; चोख बंदोबस्तासह काढला जोरदार रूटमार्च
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या :- संभाजी ब्रिगेड सद्ध्याच्या परिस्थितीत पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला असून, तातडीच्या उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे. सध्या मराठवाड्यासह विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील शेतीची परिस्थिती अत्यंत भयावह असून कोरडा दुष्काळसदृश बनली आहे. तरी मुख्यमंत्री यांनी वरील विभागातील परिस्थितीचा आढावा घेऊन कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी बँका, विविध पतपुरवठा संस्था तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. मात्र, पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावरच पाऊस न झाल्याने या शेतकऱ्यांसमोर कर्ज फेडण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, कोरडा दुष्काळ जाहीर करून सवलती लागू कराव्यात : विशेषतः बुलढाणा जिल्हा जो कोरडा दुष्काळ यादीतून वगळला आहे तो तातडीने कोरडा दुष्काळ म्हणून घोषित करावा.सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सर्व शासकीय सवलती द्या, तातडीची आर्थिक खरीप पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आर्थिक मदत, आगामी रब्बी हंगामाचे नियोजन, बियाणे उपलब्धता, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था यावर तातडीने निर्णय घ्या,शेतीच्या नुकसानीकडे लक्ष देताना कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क व स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करून दिलासा द्या, पावसाअभावी तलाव, विहिरी आणि इतर जलस्रोतांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पुढील काळात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. यासाठी टँकरने पाणीपुरवठा आणि चारा छावण्या यांचे पूर्वनियोजन करणे आवश्यक आहे. मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेऊन, मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन मदतीचे विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी आमची आग्रही मागणी आहे. तरी आपण वरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय द्यावा व शेतकरी सुरक्षित ठेवावा या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचे निवेदन आज नांदूर तहसील मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.हे निवेदन संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष ॲड.मनोज आखरे यांच्या आदेशानुसार व प्रदेश संघटक शिवश्री योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनात व बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमर रमेश पाटील यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी जिल्हा मार्गदर्शक विनोद वनारे,शेतकरी नेते अरविंद बाठे,जिल्हा कार्याध्यक्ष सचिन बाठे,तालुका उपाध्यक्ष सचिन गणगे,वाहतूक आघाडी तालुकाध्यक्ष अमोल भगत,विशाल इंगळे,विनायक वडोदे,रोहन मनस्कार,सुनील अंभोरे,प्रतीक धांडे,संतोष पारस्कार,ज्ञानेश्वर मनस्कार,अंबादास मनस्कार,बाळू डाबेराव,सुनील बाठे,श्रीकृष्ण गायेल,पत्रकार अमोल करुटले व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    2
    महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या :- संभाजी ब्रिगेड


सद्ध्याच्या परिस्थितीत पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला असून, तातडीच्या उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे.
सध्या मराठवाड्यासह विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील शेतीची परिस्थिती अत्यंत भयावह असून कोरडा दुष्काळसदृश बनली आहे. तरी मुख्यमंत्री यांनी वरील विभागातील परिस्थितीचा आढावा घेऊन कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी बँका, विविध पतपुरवठा संस्था तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. मात्र, पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावरच पाऊस न झाल्याने या शेतकऱ्यांसमोर कर्ज फेडण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, कोरडा दुष्काळ जाहीर करून सवलती लागू कराव्यात : विशेषतः बुलढाणा जिल्हा जो कोरडा दुष्काळ यादीतून वगळला आहे तो तातडीने कोरडा दुष्काळ म्हणून घोषित करावा.सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सर्व शासकीय सवलती द्या, तातडीची आर्थिक खरीप पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आर्थिक मदत, आगामी रब्बी हंगामाचे नियोजन, बियाणे उपलब्धता, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था यावर तातडीने निर्णय घ्या,शेतीच्या नुकसानीकडे लक्ष देताना कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क व स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करून दिलासा द्या, पावसाअभावी तलाव, विहिरी आणि इतर जलस्रोतांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पुढील काळात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. यासाठी टँकरने पाणीपुरवठा आणि चारा छावण्या यांचे पूर्वनियोजन करणे आवश्यक आहे. मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेऊन, मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन मदतीचे विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी आमची आग्रही मागणी आहे. तरी आपण वरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय द्यावा व शेतकरी सुरक्षित ठेवावा या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचे निवेदन आज नांदूर तहसील मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.हे निवेदन संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष ॲड.मनोज आखरे यांच्या आदेशानुसार व प्रदेश संघटक शिवश्री योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनात व बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमर रमेश पाटील यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
यावेळी जिल्हा मार्गदर्शक विनोद वनारे,शेतकरी नेते अरविंद बाठे,जिल्हा कार्याध्यक्ष सचिन बाठे,तालुका उपाध्यक्ष सचिन गणगे,वाहतूक आघाडी तालुकाध्यक्ष अमोल भगत,विशाल इंगळे,विनायक वडोदे,रोहन मनस्कार,सुनील अंभोरे,प्रतीक धांडे,संतोष पारस्कार,ज्ञानेश्वर मनस्कार,अंबादास मनस्कार,बाळू डाबेराव,सुनील बाठे,श्रीकृष्ण गायेल,पत्रकार अमोल करुटले व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.