आषाढी एकादशीचे औचित्य साधून प्रति-पंढरपूर मानल्या जाणाऱ्या कोटमगाव येथे दर्शनासाठी मार्गस्थ झालेल्या भाविक व वारकऱ्यांच्या दिंड्यांचे बाबुळगाव येथे भक्तिमय आणि उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. दिंडी गावात दाखल होताच 'ज्ञानबा-तुकाराम' आणि 'विठ्ठल-रुक्मिणी'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गेल्या दहा वर्षांपासून ही स्वागत व महाप्रसादाची परंपरा अविरतपणे जपली जात आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, दिलीप अण्णा खैरे आणि येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देविदास निकम यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वागत सोहळ्याचे आणि फराळाच्या प्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. देविदास निकम यांच्या हस्ते वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले, तसेच सर्व भाविकांसाठी फराळाची उत्तम सोय करण्यात आली होती. याप्रसंगी देविदास निकम म्हणाले की, "वारकऱ्यांची निष्काम सेवा करणे हीच खरी ईश्वरसेवा आहे. भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम राबवून भाविकांना सहकार्य करताना विशेष आनंद व आत्मिक समाधान लाभते." या उपक्रमामुळे तृप्त झालेल्या वारकऱ्यांनी आयोजकांना मनोभावे आशीर्वाद दिले. या सोहळ्यास रमेश गायकवाड, किशोर भाऊ नागरे, अंबादास जाधव, अशोक जाधव, शिवाजी वाबळे, विशाल बनसोडे, चेतन बनसोडे यांच्यासह बाबुळगाव परिसरातील ग्रामस्थ, नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आषाढी एकादशीचे औचित्य साधून प्रति-पंढरपूर मानल्या जाणाऱ्या कोटमगाव येथे दर्शनासाठी मार्गस्थ झालेल्या भाविक व वारकऱ्यांच्या दिंड्यांचे बाबुळगाव येथे भक्तिमय आणि उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. दिंडी गावात दाखल होताच 'ज्ञानबा-तुकाराम' आणि 'विठ्ठल-रुक्मिणी'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गेल्या दहा वर्षांपासून ही स्वागत व महाप्रसादाची परंपरा अविरतपणे जपली जात आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, दिलीप अण्णा खैरे आणि येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देविदास निकम यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वागत सोहळ्याचे आणि फराळाच्या प्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. देविदास निकम यांच्या हस्ते वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले, तसेच सर्व भाविकांसाठी फराळाची उत्तम सोय करण्यात आली होती. याप्रसंगी देविदास निकम म्हणाले की, "वारकऱ्यांची निष्काम सेवा करणे हीच खरी ईश्वरसेवा आहे. भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम राबवून भाविकांना सहकार्य करताना विशेष आनंद व आत्मिक समाधान लाभते." या उपक्रमामुळे तृप्त झालेल्या वारकऱ्यांनी आयोजकांना मनोभावे आशीर्वाद दिले. या सोहळ्यास रमेश गायकवाड, किशोर भाऊ नागरे, अंबादास जाधव, अशोक जाधव, शिवाजी वाबळे, विशाल बनसोडे, चेतन बनसोडे यांच्यासह बाबुळगाव परिसरातील ग्रामस्थ, नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- नाशिक जिल्हा परिषदेच्या पर्यटन स्थळ योजनेअंतर्गत येवला तालुक्यातील कोटमगाव येथील विठ्ठल मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य निवारा शेडचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. मूलभूत सुविधा आणि अनुषंगिक कामांअंतर्गत उभारण्यात आलेल्या या निवारा शेडसाठी ४२ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. या सोहळ्याचे लोकार्पण शिक्षक आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र दराडे आणि शरदचंद्र पवार गटाचे ॲड. माणिकराव शिंदे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी कुणाल दराडे फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष कुणाल दराडे यांच्यासह गावातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, सरपंच, स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे हे निवारा शेड विठ्ठल मंदिर परिसराच्या सौंदर्यात भर घालणारे ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.1
- अपर जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार आणि डॉ. डोलारे यांच्या आश्वासनानंतर मालेगावमध्ये देवा पाटील यांच्या उपोषणाला यश आले असून त्यांच्या उपोषणाची सांगता झाली आहे. शहरात लवकरच बोगस डॉक्टरांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन या वेळी देण्यात आले. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक रुग्णालयात रेटबोर्ड लावण्याबाबत डॉ. डोलारे यांनी नोटिसा बजावल्या आहेत. तसेच आजपासूनच शहरातील अनेक सोनोग्राफी केंद्रांवर प्रत्यक्ष तपासणीलाही सुरुवात झाली आहे.1
- शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज औद्योगिक परिसरात आंदोलनकर्ते अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानाबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलनानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असून पोलीस संपूर्ण परिसरावर बारकाईने नजर ठेवून आहेत. सध्या दिपके यांच्या घरासमोरील परिस्थिती शांत आहे. तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांकडून या परिसरात सातत्याने गस्त घातली जात आहे.1
- नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील सराड परिसरात २५ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजेच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. नाशिकचे जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी डॉ. कश्मिरा संखे, तहसीलदार रामजी राठोड आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रभावित भागांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम सराड गावात भेट देऊन जीवित अथवा वित्तहानीची माहिती घेतली आणि सर्व संबंधित यंत्रणांना आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या. प्रशासकीय दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांनी हतगडजवळील गायदरपाडा येथील अंगणवाडी व शाळेला भेट देऊन इमारतीची सुरक्षितता, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय आणि पोषण आहाराच्या व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर गारमाळ येथे एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडल्याने पीडित कुटुंबाची भेट घेऊन नुकसानाची पाहणी केली. महसूल अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून नियमानुसार मदत देण्याचे निर्देश देण्यात आले असून, नागरिकांना धोकादायक इमारतींपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतर देवलदरी येथे तालुका कृषी विभागाच्या 'खत वितरण बांधावर' या उपक्रमात जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी स्वतः पारंपरिक घोंगडे (इरले) परिधान करून चिखलात उतरत भातलावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यावेळी त्यांनी पावसाचे प्रमाण, भात लागवड, खत पुरवठा आणि कृषी योजनांबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली. दुर्गम आदिवासी भागातील शेतकऱ्यांना वेळेत बियाणे, खते व तांत्रिक मार्गदर्शन पुरवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या दौऱ्यात तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तिखे, संजय पवार, विलास भोये, श्रीमती सहारे आणि पोलीस पाटील रेखा पवार यांच्यासह अनेक अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.2
- आषाढी एकादशीच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर पूर्णपणे विठ्ठलमय झाले आहे. या विशेष प्रसंगी मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.1
- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त नाशिक रोड परिसरातील 'प्रतिपंढरपूर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या विहितगाव येथील श्री विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच हजारो भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली. अखंड नामस्मरण, भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसाने ओथंबून गेला. पहाटे पांडुरंगाच्या मूर्तीचा अभिषेक, काकड आरती, भजन आणि 'रामकृष्ण हरी' नामजपाने सोहळ्याची सुरुवात झाली. पंढरपूरला प्रत्यक्ष दर्शनासाठी जाऊ न शकलेल्या भाविकांनी विहितगावातील विठ्ठलाचे दर्शन घेतले. या सोहळ्यादरम्यान आयोजित आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुपारी गायक सागर कुलकर्णी यांच्या 'चला हो पंढरीसी जाऊ या' या भक्तिसंगीत कार्यक्रमाने भाविकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबल्यावर संगीत कुलकर्णी, हार्मोनियमवर अभिजित भटजिरे आणि मृदंगावर दिनेश मोजाड यांनी साथ दिली. सायंकाळी पळसे येथील संत आईसाहेब महाराज भजनी मंडळाने 'रामवाणी तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल' ही भजन संध्या सादर केली. दिवसभर मंदिर परिसरात 'विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल' या नामाचा अखंड गजर सुरू होता आणि भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले. या प्रसंगी आमदार सरोज अहिरे, माजी मंत्री बबनराव घोलप, सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विती शिंदे, माजी खासदार हेमंत गोडसे, प्रभाग सभापती रमेश धोंगडे, ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे, गटनेते केशव पोरजे, नगरसेवक योगेश गाडेकर, वैशाली दाणी, संजीवनी हंडोरे, डॉ. बाळासाहेब कोठुळे यांच्यासह देवस्थान समितीचे अध्यक्ष रवींद्र हांडोरे, उपाध्यक्ष दिनेश हांडोरे, सचिव शांताराम कोठुळे, खजिनदार शिवाजी हांडोरे, बाळू कोठूळे, उत्तमराव कोठुळे, संजय हांडोरे, विक्रम कोठुळे, अनिल हांडोरे, कैलास हांडोरे, नाना हांडोरे, शरद हांडोरे, विजय हांडोरे, किरण कोठुळे, अमर जमधडे, भक्तिधाम मंडळ विश्वस्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- आषाढी एकादशीचे औचित्य साधून प्रति-पंढरपूर मानल्या जाणाऱ्या कोटमगाव येथे दर्शनासाठी मार्गस्थ झालेल्या भाविक व वारकऱ्यांच्या दिंड्यांचे बाबुळगाव येथे भक्तिमय आणि उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. दिंडी गावात दाखल होताच 'ज्ञानबा-तुकाराम' आणि 'विठ्ठल-रुक्मिणी'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गेल्या दहा वर्षांपासून ही स्वागत व महाप्रसादाची परंपरा अविरतपणे जपली जात आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, दिलीप अण्णा खैरे आणि येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देविदास निकम यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वागत सोहळ्याचे आणि फराळाच्या प्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. देविदास निकम यांच्या हस्ते वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले, तसेच सर्व भाविकांसाठी फराळाची उत्तम सोय करण्यात आली होती. याप्रसंगी देविदास निकम म्हणाले की, "वारकऱ्यांची निष्काम सेवा करणे हीच खरी ईश्वरसेवा आहे. भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम राबवून भाविकांना सहकार्य करताना विशेष आनंद व आत्मिक समाधान लाभते." या उपक्रमामुळे तृप्त झालेल्या वारकऱ्यांनी आयोजकांना मनोभावे आशीर्वाद दिले. या सोहळ्यास रमेश गायकवाड, किशोर भाऊ नागरे, अंबादास जाधव, अशोक जाधव, शिवाजी वाबळे, विशाल बनसोडे, चेतन बनसोडे यांच्यासह बाबुळगाव परिसरातील ग्रामस्थ, नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- 🙏🏛️✅💯 student पॉवर support public power सत्य मेव जयते 🙏🏛️✅💯1