Shuru
Apke Nagar Ki App…
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज औद्योगिक परिसरात आंदोलनकर्ते अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानाबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलनानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असून पोलीस संपूर्ण परिसरावर बारकाईने नजर ठेवून आहेत. सध्या दिपके यांच्या घरासमोरील परिस्थिती शांत आहे. तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांकडून या परिसरात सातत्याने गस्त घातली जात आहे.
शेख अजहर ताहेर (पत्रकार)
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज औद्योगिक परिसरात आंदोलनकर्ते अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानाबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलनानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असून पोलीस संपूर्ण परिसरावर बारकाईने नजर ठेवून आहेत. सध्या दिपके यांच्या घरासमोरील परिस्थिती शांत आहे. तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांकडून या परिसरात सातत्याने गस्त घातली जात आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज औद्योगिक परिसरात आंदोलनकर्ते अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानाबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलनानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असून पोलीस संपूर्ण परिसरावर बारकाईने नजर ठेवून आहेत. सध्या दिपके यांच्या घरासमोरील परिस्थिती शांत आहे. तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांकडून या परिसरात सातत्याने गस्त घातली जात आहे.1
- छत्रपती संभाजीनगर येथील अभिजीत दिपके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर दिपके यांच्या घरी आज मोठा आनंद साजरा करण्यात आला. या यशानंतर अभिजीत दिपके यांचे आई, वडील आणि भाऊ अत्यंत भावुक झाले असून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू अनावर झाले. आपल्या भावना व्यक्त करताना अभिजीत यांच्या आई म्हणाल्या की, त्यांच्या मुलाने उभे केलेले हे पहिलेच आंदोलन होते आणि त्याला एवढे मोठे यश मिळाले आहे. या आंदोलनादरम्यान अभिजीत यांच्यावर शाई फेकण्यात आली, त्यांना चापट खावी लागली आणि आंदोलनासाठी डासांमध्ये झोपावे लागले. या सर्व हालअपेष्टानंतर अखेर आंदोलनाला यश मिळाल्याचा अत्यंत आनंद होत असल्याचे सांगताना त्यांच्या आईला पुन्हा एकदा आनंदाश्रू अनावर झाले.2
- दिल्लीत अभिजीत दिपके यांच्या विजयाची घोषणा होताच छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी करत आणि एकमेकांना मिठाई भरवत आपला आनंद व्यक्त केला. या विजयामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, हा विजय म्हणजे सामाजिक न्यायाच्या लढ्याचे प्रतीक असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.1
- फुलंब्री नगरपंचायतीकडून विनापरवाना करण्यात आलेल्या बांधकामांवर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. नगरपंचायतीची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता उभारण्यात आलेल्या अशा अनधिकृत बांधकामांवर नगरपंचायत प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.1
- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज मंदिरात पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास भुमरे यांनी सपत्नीक उपस्थित राहून श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत विधिवत पूजा केली. या प्रसंगी त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धी, शांती, उत्तम आरोग्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. मंदिर परिसरात भाविकांशी संवाद साधत आमदार भुमरे यांनी उपस्थितांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या धार्मिक सोहळ्याप्रसंगी मंदिर संस्थानचे पदाधिकारी, स्थानिक मान्यवर, शिवसैनिक तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.4
- दिल्लीतील जंतर-मंतरवरून सत्यपाल महाराज यांनी अत्यंत आक्रमक आणि तुफान भाषण करत थेट राजीनाम्याची मागणी केली आहे. आपल्या भाषणातून जोरदार फटकेबाजी करताना त्यांनी रोखठोक विधान केले की, 'गुंडांना नेता बनवून ठेवले आहे. आम्ही निवडून दिले आहे, तू आमचा दिवाणजी आहेस, त्यामुळे तू राजीनामा दे.' जंतर-मंतरच्या व्यासपीठावरून सत्यपाल महाराजांनी तीव्र शब्दांत निशाणा साधत हा घणाघात केला आहे.1
- नाशिक जिल्हा परिषदेच्या पर्यटन स्थळ योजनेअंतर्गत येवला तालुक्यातील कोटमगाव येथील विठ्ठल मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य निवारा शेडचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. मूलभूत सुविधा आणि अनुषंगिक कामांअंतर्गत उभारण्यात आलेल्या या निवारा शेडसाठी ४२ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. या सोहळ्याचे लोकार्पण शिक्षक आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र दराडे आणि शरदचंद्र पवार गटाचे ॲड. माणिकराव शिंदे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी कुणाल दराडे फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष कुणाल दराडे यांच्यासह गावातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, सरपंच, स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे हे निवारा शेड विठ्ठल मंदिर परिसराच्या सौंदर्यात भर घालणारे ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.1
- पुण्यात जंतरमंतरवरील आंदोलनाच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांना रस्ता पार करण्यासाठी हात देऊन मदत करणाऱ्या एका पुणे पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून या पोलीस कर्मचाऱ्याचे भरभरून कौतुक केले जात असून, दिल्ली पोलीस आणि पुणे पोलीस यांच्यातील हाच खरा फरक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्या या मदत करणाऱ्या वृत्तीने पुणे पोलीस कर्मचाऱ्याने भारतातील सर्वसामान्य माणसांची मने जिंकली आहेत.1