Shuru
Apke Nagar Ki App…
फुलंब्री नगरपंचायतीकडून विनापरवाना करण्यात आलेल्या बांधकामांवर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. नगरपंचायतीची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता उभारण्यात आलेल्या अशा अनधिकृत बांधकामांवर नगरपंचायत प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
AKBAR SHAHA REPORTER
फुलंब्री नगरपंचायतीकडून विनापरवाना करण्यात आलेल्या बांधकामांवर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. नगरपंचायतीची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता उभारण्यात आलेल्या अशा अनधिकृत बांधकामांवर नगरपंचायत प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- छत्रपती संभाजीनगर येथील अभिजीत दिपके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर दिपके यांच्या घरी आज मोठा आनंद साजरा करण्यात आला. या यशानंतर अभिजीत दिपके यांचे आई, वडील आणि भाऊ अत्यंत भावुक झाले असून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू अनावर झाले. आपल्या भावना व्यक्त करताना अभिजीत यांच्या आई म्हणाल्या की, त्यांच्या मुलाने उभे केलेले हे पहिलेच आंदोलन होते आणि त्याला एवढे मोठे यश मिळाले आहे. या आंदोलनादरम्यान अभिजीत यांच्यावर शाई फेकण्यात आली, त्यांना चापट खावी लागली आणि आंदोलनासाठी डासांमध्ये झोपावे लागले. या सर्व हालअपेष्टानंतर अखेर आंदोलनाला यश मिळाल्याचा अत्यंत आनंद होत असल्याचे सांगताना त्यांच्या आईला पुन्हा एकदा आनंदाश्रू अनावर झाले.2
- दिल्लीत अभिजीत दिपके यांच्या विजयाची घोषणा होताच छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी करत आणि एकमेकांना मिठाई भरवत आपला आनंद व्यक्त केला. या विजयामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, हा विजय म्हणजे सामाजिक न्यायाच्या लढ्याचे प्रतीक असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.1
- फुलंब्री नगरपंचायतीकडून विनापरवाना करण्यात आलेल्या बांधकामांवर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. नगरपंचायतीची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता उभारण्यात आलेल्या अशा अनधिकृत बांधकामांवर नगरपंचायत प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.1
- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज मंदिरात पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास भुमरे यांनी सपत्नीक उपस्थित राहून श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत विधिवत पूजा केली. या प्रसंगी त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धी, शांती, उत्तम आरोग्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. मंदिर परिसरात भाविकांशी संवाद साधत आमदार भुमरे यांनी उपस्थितांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या धार्मिक सोहळ्याप्रसंगी मंदिर संस्थानचे पदाधिकारी, स्थानिक मान्यवर, शिवसैनिक तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.4
- दिल्लीतील जंतर-मंतरवरून सत्यपाल महाराज यांनी अत्यंत आक्रमक आणि तुफान भाषण करत थेट राजीनाम्याची मागणी केली आहे. आपल्या भाषणातून जोरदार फटकेबाजी करताना त्यांनी रोखठोक विधान केले की, 'गुंडांना नेता बनवून ठेवले आहे. आम्ही निवडून दिले आहे, तू आमचा दिवाणजी आहेस, त्यामुळे तू राजीनामा दे.' जंतर-मंतरच्या व्यासपीठावरून सत्यपाल महाराजांनी तीव्र शब्दांत निशाणा साधत हा घणाघात केला आहे.1
- शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज औद्योगिक परिसरात आंदोलनकर्ते अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानाबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलनानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असून पोलीस संपूर्ण परिसरावर बारकाईने नजर ठेवून आहेत. सध्या दिपके यांच्या घरासमोरील परिस्थिती शांत आहे. तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांकडून या परिसरात सातत्याने गस्त घातली जात आहे.1
- देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने 'जीवनदायी' उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत गुलमंडी येथे आयोजित कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत रक्तदान केले.1
- आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाच्या अखंड गजरात पोलीस कर्मचाऱ्यांनीही हरिनामात तल्लीन होत भक्तिरसाचा अनुभव घेतला. आपले कर्तव्य बजावत असतानाच त्यांनी वारकऱ्यांसोबत टाळ-मृदंगाच्या गजरात उत्साहाने सहभाग नोंदवला. 'माऊली... माऊली'च्या जयघोषात पोलीस कर्मचारीही पूर्णपणे तल्लीन झाले. या भक्तिमय क्षणाने तेथे उपस्थित सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेतले, ज्यामुळे परिसरात श्रद्धा, सेवा आणि समर्पणाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.1