logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

छत्रपती संभाजीनगर येथील अभिजीत दिपके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर दिपके यांच्या घरी आज मोठा आनंद साजरा करण्यात आला. या यशानंतर अभिजीत दिपके यांचे आई, वडील आणि भाऊ अत्यंत भावुक झाले असून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू अनावर झाले. आपल्या भावना व्यक्त करताना अभिजीत यांच्या आई म्हणाल्या की, त्यांच्या मुलाने उभे केलेले हे पहिलेच आंदोलन होते आणि त्याला एवढे मोठे यश मिळाले आहे. या आंदोलनादरम्यान अभिजीत यांच्यावर शाई फेकण्यात आली, त्यांना चापट खावी लागली आणि आंदोलनासाठी डासांमध्ये झोपावे लागले. या सर्व हालअपेष्टानंतर अखेर आंदोलनाला यश मिळाल्याचा अत्यंत आनंद होत असल्याचे सांगताना त्यांच्या आईला पुन्हा एकदा आनंदाश्रू अनावर झाले.

2 hrs ago
user_रविंद्र सुरडकर गुरव
रविंद्र सुरडकर गुरव
औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
2 hrs ago

छत्रपती संभाजीनगर येथील अभिजीत दिपके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर दिपके यांच्या घरी आज मोठा आनंद साजरा करण्यात आला. या यशानंतर अभिजीत दिपके यांचे आई, वडील आणि भाऊ अत्यंत भावुक झाले असून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू अनावर झाले. आपल्या भावना व्यक्त करताना अभिजीत यांच्या आई म्हणाल्या की, त्यांच्या मुलाने उभे केलेले हे पहिलेच आंदोलन होते आणि त्याला एवढे मोठे यश मिळाले आहे. या आंदोलनादरम्यान अभिजीत यांच्यावर शाई फेकण्यात आली, त्यांना चापट खावी लागली आणि आंदोलनासाठी डासांमध्ये झोपावे लागले. या सर्व हालअपेष्टानंतर अखेर आंदोलनाला यश मिळाल्याचा अत्यंत आनंद होत असल्याचे सांगताना त्यांच्या आईला पुन्हा एकदा आनंदाश्रू अनावर झाले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध भागांतून पकडण्यात आलेल्या १५ साप आणि एका घोरपडीचे वन्यजीव प्रेमी बहुद्देशीय संस्थेने वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित वनपरिक्षेत्रात यशस्वी पुनर्वसन केले आहे. या मोहिमेत ११ विषारी आणि ४ बिनविषारी सापांचा समावेश होता. यामध्ये नाग, घोणस, मण्यार या विषारी सापांसह कवड्या, कंदोर आणि तस्कर या बिनविषारी सापांना तसेच एका घोरपडीला सुरक्षितपणे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. ही संपूर्ण कारवाई वनरक्षक फड मॅडम व वनमजूर हजारे मामा यांच्या उपस्थितीत पार पडली. या मोहिमेत संस्थेचे अध्यक्ष संघानंद शिंदे, सचिव सुरेश साळवे आणि सदस्य मनोज गायकवाड यांनी सक्रिय सहभाग घेतला. या निमित्ताने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, घर, शेत किंवा परिसरात साप अथवा इतर वन्यजीव आढळल्यास घाबरून त्यांना इजा करू नये किंवा ठार मारू नये; तर तत्काळ वनविभाग किंवा प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करावी.
    4
    छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध भागांतून पकडण्यात आलेल्या १५ साप आणि एका घोरपडीचे वन्यजीव प्रेमी बहुद्देशीय संस्थेने वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित वनपरिक्षेत्रात यशस्वी पुनर्वसन केले आहे. या मोहिमेत ११ विषारी आणि ४ बिनविषारी सापांचा समावेश होता. यामध्ये नाग, घोणस, मण्यार या विषारी सापांसह कवड्या, कंदोर आणि तस्कर या बिनविषारी सापांना तसेच एका घोरपडीला सुरक्षितपणे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

ही संपूर्ण कारवाई वनरक्षक फड मॅडम व वनमजूर हजारे मामा यांच्या उपस्थितीत पार पडली. या मोहिमेत संस्थेचे अध्यक्ष संघानंद शिंदे, सचिव सुरेश साळवे आणि सदस्य मनोज गायकवाड यांनी सक्रिय सहभाग घेतला. या निमित्ताने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, घर, शेत किंवा परिसरात साप अथवा इतर वन्यजीव आढळल्यास घाबरून त्यांना इजा करू नये किंवा ठार मारू नये; तर तत्काळ वनविभाग किंवा प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करावी.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    44 min ago
  • फुलंब्री येथील प्रभु श्रीराम मंदिरात रामरक्षा पठण करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान अयोध्या येथील श्रीराम मंदिरात देणगीत झालेल्या गैरव्यवहाराचा निषेध करण्यात आला आहे.
    1
    फुलंब्री येथील प्रभु श्रीराम मंदिरात रामरक्षा पठण करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान अयोध्या येथील श्रीराम मंदिरात देणगीत झालेल्या गैरव्यवहाराचा निषेध करण्यात आला आहे.
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • दिल्लीत अभिजीत दिपके यांच्या विजयाची घोषणा होताच छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी करत आणि एकमेकांना मिठाई भरवत आपला आनंद व्यक्त केला. या विजयामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, हा विजय म्हणजे सामाजिक न्यायाच्या लढ्याचे प्रतीक असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.
    1
    दिल्लीत अभिजीत दिपके यांच्या विजयाची घोषणा होताच छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी करत आणि एकमेकांना मिठाई भरवत आपला आनंद व्यक्त केला.

या विजयामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, हा विजय म्हणजे सामाजिक न्यायाच्या लढ्याचे प्रतीक असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज मंदिरात पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास भुमरे यांनी सपत्नीक उपस्थित राहून श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत विधिवत पूजा केली. या प्रसंगी त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धी, शांती, उत्तम आरोग्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. मंदिर परिसरात भाविकांशी संवाद साधत आमदार भुमरे यांनी उपस्थितांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या धार्मिक सोहळ्याप्रसंगी मंदिर संस्थानचे पदाधिकारी, स्थानिक मान्यवर, शिवसैनिक तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
    4
    आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज मंदिरात पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास भुमरे यांनी सपत्नीक उपस्थित राहून श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत विधिवत पूजा केली. या प्रसंगी त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धी, शांती, उत्तम आरोग्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली.

मंदिर परिसरात भाविकांशी संवाद साधत आमदार भुमरे यांनी उपस्थितांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या धार्मिक सोहळ्याप्रसंगी मंदिर संस्थानचे पदाधिकारी, स्थानिक मान्यवर, शिवसैनिक तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • दिल्लीतील जंतर-मंतरवरून सत्यपाल महाराज यांनी अत्यंत आक्रमक आणि तुफान भाषण करत थेट राजीनाम्याची मागणी केली आहे. आपल्या भाषणातून जोरदार फटकेबाजी करताना त्यांनी रोखठोक विधान केले की, 'गुंडांना नेता बनवून ठेवले आहे. आम्ही निवडून दिले आहे, तू आमचा दिवाणजी आहेस, त्यामुळे तू राजीनामा दे.' जंतर-मंतरच्या व्यासपीठावरून सत्यपाल महाराजांनी तीव्र शब्दांत निशाणा साधत हा घणाघात केला आहे.
    1
    दिल्लीतील जंतर-मंतरवरून सत्यपाल महाराज यांनी अत्यंत आक्रमक आणि तुफान भाषण करत थेट राजीनाम्याची मागणी केली आहे. आपल्या भाषणातून जोरदार फटकेबाजी करताना त्यांनी रोखठोक विधान केले की, 'गुंडांना नेता बनवून ठेवले आहे. आम्ही निवडून दिले आहे, तू आमचा दिवाणजी आहेस, त्यामुळे तू राजीनामा दे.' जंतर-मंतरच्या व्यासपीठावरून सत्यपाल महाराजांनी तीव्र शब्दांत निशाणा साधत हा घणाघात केला आहे.
    user_Sudam gadekar
    Sudam gadekar
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर पंढरपूर नगरीत लाखो वारकऱ्यांच्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून चंद्रभागेच्या पवित्र तीरावर "ज्ञानोबा-तुकाराम"च्या गजरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. या आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. महापूजेसाठी मंदिराच्या दर्शन रांगेतील पहिल्या निष्ठावंत वारकरी दांपत्याला मानाचा वारकरी म्हणून बसण्याचा सन्मान दिला जातो. यंदा हा मान धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील बाबासाहेब माधव माने व प्रभावती बाबासाहेब माने या दांपत्याला मिळाला आहे. गेली २० वर्षे अखंड पंढरीची वारी करणारे माने दांपत्य हे वारकरी परंपरेची तिसरी पिढी आहे. साक्षात विठुरायाच्या महापूजेचा मान मिळाल्याने आयुष्य कृतार्थ झाले असून असा बहुमान मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते, अशी भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
    2
    आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर पंढरपूर नगरीत लाखो वारकऱ्यांच्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून चंद्रभागेच्या पवित्र तीरावर "ज्ञानोबा-तुकाराम"च्या गजरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. या आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.

महापूजेसाठी मंदिराच्या दर्शन रांगेतील पहिल्या निष्ठावंत वारकरी दांपत्याला मानाचा वारकरी म्हणून बसण्याचा सन्मान दिला जातो. यंदा हा मान धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील बाबासाहेब माधव माने व प्रभावती बाबासाहेब माने या दांपत्याला मिळाला आहे. गेली २० वर्षे अखंड पंढरीची वारी करणारे माने दांपत्य हे वारकरी परंपरेची तिसरी पिढी आहे. साक्षात विठुरायाच्या महापूजेचा मान मिळाल्याने आयुष्य कृतार्थ झाले असून असा बहुमान मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते, अशी भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
    user_सुभाष मस्के पत्रकार
    सुभाष मस्के पत्रकार
    Construction Contractor पैठण, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज औद्योगिक परिसरात आंदोलनकर्ते अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानाबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलनानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असून पोलीस संपूर्ण परिसरावर बारकाईने नजर ठेवून आहेत. सध्या दिपके यांच्या घरासमोरील परिस्थिती शांत आहे. तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांकडून या परिसरात सातत्याने गस्त घातली जात आहे.
    1
    शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज औद्योगिक परिसरात आंदोलनकर्ते अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानाबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलनानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असून पोलीस संपूर्ण परिसरावर बारकाईने नजर ठेवून आहेत.

सध्या दिपके यांच्या घरासमोरील परिस्थिती शांत आहे. तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांकडून या परिसरात सातत्याने गस्त घातली जात आहे.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर येथील अभिजीत दिपके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर दिपके यांच्या घरी आज मोठा आनंद साजरा करण्यात आला. या यशानंतर अभिजीत दिपके यांचे आई, वडील आणि भाऊ अत्यंत भावुक झाले असून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू अनावर झाले. आपल्या भावना व्यक्त करताना अभिजीत यांच्या आई म्हणाल्या की, त्यांच्या मुलाने उभे केलेले हे पहिलेच आंदोलन होते आणि त्याला एवढे मोठे यश मिळाले आहे. या आंदोलनादरम्यान अभिजीत यांच्यावर शाई फेकण्यात आली, त्यांना चापट खावी लागली आणि आंदोलनासाठी डासांमध्ये झोपावे लागले. या सर्व हालअपेष्टानंतर अखेर आंदोलनाला यश मिळाल्याचा अत्यंत आनंद होत असल्याचे सांगताना त्यांच्या आईला पुन्हा एकदा आनंदाश्रू अनावर झाले.
    2
    छत्रपती संभाजीनगर येथील अभिजीत दिपके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर दिपके यांच्या घरी आज मोठा आनंद साजरा करण्यात आला. या यशानंतर अभिजीत दिपके यांचे आई, वडील आणि भाऊ अत्यंत भावुक झाले असून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू अनावर झाले.

आपल्या भावना व्यक्त करताना अभिजीत यांच्या आई म्हणाल्या की, त्यांच्या मुलाने उभे केलेले हे पहिलेच आंदोलन होते आणि त्याला एवढे मोठे यश मिळाले आहे. या आंदोलनादरम्यान अभिजीत यांच्यावर शाई फेकण्यात आली, त्यांना चापट खावी लागली आणि आंदोलनासाठी डासांमध्ये झोपावे लागले. या सर्व हालअपेष्टानंतर अखेर आंदोलनाला यश मिळाल्याचा अत्यंत आनंद होत असल्याचे सांगताना त्यांच्या आईला पुन्हा एकदा आनंदाश्रू अनावर झाले.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.