Shuru
Apke Nagar Ki App…
मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेच्या मुख्याध्यापकपदी योगेश कबाडे यांची पदोन्नती मराठा मंदिर श्री शहाजी प्रशाला, अक्कलकोट येथील शिक्षक योगेश पी. कबाडे यांची मुख्याध्यापकपदी पदोन्नती झाल्याने शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जपणूक करणारे शिक्षक म्हणून योगेश कबाडे यांची ओळख आहे. ज्ञान, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि समर्पित सेवेमुळे त्यांनी ही जबाबदारी मिळविल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा मंदिर श्री शहाजी प्रशाला शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात अधिक प्रगती करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या
Akkalkot news
मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेच्या मुख्याध्यापकपदी योगेश कबाडे यांची पदोन्नती मराठा मंदिर श्री शहाजी प्रशाला, अक्कलकोट येथील शिक्षक योगेश पी. कबाडे यांची मुख्याध्यापकपदी पदोन्नती झाल्याने शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जपणूक करणारे शिक्षक म्हणून योगेश कबाडे यांची ओळख आहे. ज्ञान, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि समर्पित सेवेमुळे त्यांनी ही जबाबदारी मिळविल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा मंदिर श्री शहाजी प्रशाला शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात अधिक प्रगती करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या
More news from महाराष्ट्र and nearby areas
- कारंजा चौकात गंगा-जमुनी संस्कृतीचे दर्शन; संदल व मरीआई देवी (थंडी) मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद अक्कलकोट शहरातील कारंजा चौक येथे हजरत पीर शहाहुसेनी बाबा (र.अ.) यांच्या भव्य संदल मिरवणुकीसह गोल्ल समाजाच्या वतीने आयोजित मरीआई देवी (थंडी) मिरवणुकीमुळे धार्मिक सलोखा, सामाजिक ऐक्य आणि गंगा-जमुनी संस्कृतीचे प्रेरणादायी दर्शन घडले. हजरत पीर शहाहुसेनी बाबा (र.अ.) यांच्या पवित्र संदल मिरवणुकीत हजारो भाविकांनी श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने सहभाग घेतला. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्यांचा गजर, धार्मिक जयघोष आणि भक्तिमय वातावरणात निघालेल्या मिरवणुकीने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. याचवेळी गोल्ल समाजाच्या वतीने आयोजित मरीआई देवी (थंडी) मिरवणूकही मोठ्या उत्साहात पार पडली. कारंजा चौक परिसरात दोन्ही मिरवणुकांचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. विविध समाज आणि सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत मिरवणुकांचे स्वागत केले, त्यामुळे अक्कलकोटच्या सामाजिक ऐक्याची आणि परस्पर सौहार्दाची परंपरा पुन्हा अधोरेखित झाली. दोन्ही धार्मिक मिरवणुकांमुळे शहरात दिवसभर भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले. शांतता, बंधुभाव आणि परस्पर आदराच्या भावनेतून पार पडलेल्या या सोहळ्याचे नागरिकांकडून विशेष स्वागत करण्यात आले. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांच्या कडून मिळाली1
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन लाल सलाम1
- 8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष! रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी. महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध! 8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष! रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी. महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध! सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026. लातूर येथील वार्ड क्रमांक 3 मधील महादेवनगर आणि गरुड चौक परिसरात तब्बल 8 दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज घंटागाडी दाखल झाली. नेहमी रखडणाऱ्या या सेवेमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे यांनी घंटागाडीला चक्क पुष्पहार बांधून आणि कर्मचाऱ्यांना फुले देऊन 'गांधीगिरी' पद्धतीने अनोखे आंदोलन केले. लातूर जिल्ह्यातील पूर्व भागात असलेल्या महादेवनगर व गरुड चौक परिसरात गेल्या 8 दिवसांपासून घंटागाडी आली नव्हती. त्यामुळे घरात साचलेला कचरा कुठे टाकायचा? असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला होता. नाईलाजास्तव काही नागरिकांना खुल्या जागेत व रस्त्याच्या कडेला कचरा टाकावा लागत होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून साथीचे आजार व रोगराई पसरण्याची तीव्र भीती व्यक्त केली जात होती. तब्बल आठ दिवसांनंतर आज परिसरात घंटागाडी येताच सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे व स्थानिक नागरिकांनी घंटागाडी चालकाचे स्वागत केले. गाडीला पुष्पहार घालून आणि चालकाला पुष्प देऊन प्रशासनाचा उपरोधिक निषेध नोंदवण्यात आला. "गेल्या 8 दिवसांपासून परिसरात घंटागाडी न आल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण झाले होते. कचऱ्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती आहे. प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन या भागात रोजच्या रोज नियमित वेळात घंटागाडी पाठवावी." यावेळी नागरिकांनी दररोज नियमितपणे परिसरात घंटागाडी पाठवून कचरा संकलन करण्याची आग्रही मागणी दीपक गंगणे (सामाजिक कार्यकर्ते) यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. या अनोख्या 'गांधीगिरी' आंदोलनाची सध्या संपूर्ण प्रभागात चर्चा रंगली आहे.1
- लातूर. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी1
- भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय, सांगोला येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय, सांगोला येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती, जिल्हा परिषद सोलापूर तथा माजी जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या कार्यक्रमास मंडल अध्यक्ष विजय मगर, विजय इंगोले, विशाल बनसोडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- मनसेकडून परंडा पोलीस स्टेशनच्या दोन नवपदोन्नत हवालदारांचा जाहीर सत्कार! परंडा पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रमेश नारायण शिरसागर आणि शिवानंद भीमाशंकर स्वामी यांची पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.1
- मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...1
- छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १,४८२ नागरिकांना विविध योजनांचा लाभ जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत अक्कलकोट तालुक्यात ३१ जुलै २०२६ रोजी आयोजित शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरामधून विविध महसूल व शासकीय योजनांचा लाभ एकूण १,४८२ लाभार्थ्यांना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार विनायक मगर यांनी दिली आहेत. याशिबिरात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, जिवंत सातबारा मोहीम, घरकुल योजना, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत कार्यवाही, शेतजमिनींच्या नोंदणी शुल्क माफीसह विविध राज्य व केंद्र शासनाच्या योजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन व लाभ देण्यात आला. उपलब्ध माहितीनुसार, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत ७०, जिवंत सातबारा मोहिमेत ६०, घरकुल योजनेत ५०, नोंदणी शुल्क माफीचा लाभ २०, तर राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ ६००, केंद्र शासनाच्या योजनांचा ५०, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजनांचा ६५ आणि इतर विविध लाभ ५४१ नागरिकांना देण्यात आले. महसूल विभागाच्या या विशेष अभियानामुळे नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लागण्यास मदत झाली असून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.2