Shuru
Apke Nagar Ki App…
शेगाव तालुक्यातील पूर्णा नदी पात्रात आढळलेला मृतदेह ओम साई फाउंडेशन यांच्या रेस्क्यू टीमने पाण्यातून बाहेर काढला. पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. 👉 स्थानिक सत्य बातम्यांसाठी Shegaon Live सोबत राहा 👉 अफवा पसरवू नका @shegaonlive#shegaonlive बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 8975624725
SHEGAONlive

More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by YUVA JALNA NEWS1
- ऐतिहासिक शंकर पटाला दुसऱ्या दिवशी नागरिकांचा व पट शौकिनांचा भरघोस प्रतिसाद चुकीच्या बातम्या प्रसारित केल्याबद्दल कृषक मंडळांनी केली नाराजी व्यक्त व निषेध तळेगाव दशासर येथील ऐतिहासिक व १५१ वर्षांची परंपरा असलेला शंकर पट दुसऱ्या दिवशीही नागरिक व पटशौकिनांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने गजबजलेला दिसून आला. दुसऱ्या दिवशी एक दाणी पटाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले असून दिवसभर अनेक जोड्या पटावर धावल्या. शंकर पटाच्या पहिल्या दिवशी कृषक सुधार मंडळ व पोलीस प्रशासन यांच्यात नियोजनाबाबत चर्चा सुरू असल्यामुळे सुमारे दोन तास पट बंद ठेवण्यात आला होता. मात्र चर्चा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नियोजनबद्ध पद्धतीने पट सुरू करण्यात आला व त्यानंतर कोणताही अडथळा न येता खेळ सुरळीत पार पडला. दरम्यान, सदर दोन तासांच्या विश्रांतीदरम्यान पट बंद असल्याबाबत सत्यता न तपासता काही प्रसार माध्यमांनी चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या. त्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र पसरविण्यात आल्या. या प्रकाराबाबत कृषक सुधार मंडळाने तीव्र नाराजी व्यक्त करत अशा प्रसार माध्यमांचा जाहीर निषेध नोंदविला आहे. कोणतीही बातमी प्रसारित करण्यापूर्वी सत्यता तपासणे ही पत्रकारितेची जबाबदारी असून चुकीच्या बातम्या पसरविणे हे अयोग्य असल्याचे मंडळाने स्पष्ट केले. याउलट, सिटी न्यूजने ऐतिहासिक शंकर पटाबाबत वस्तुनिष्ठ माहिती देत शेतकऱ्यांच्या या पारंपरिक खेळाचे सुंदर व सत्याधारित वार्तांकन केले. याबद्दल कृषक सुधार मंडळाच्या वतीने सिटी न्यूजचे आभार मानण्यात आले आहेत. १५१ वर्षांची परंपरा लाभलेल्या या ऐतिहासिक शंकर पटामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण असून नागरिक, पटशौकिन व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- Post by User96502
- Post by Sameer Sheikh1
- *बीडमध्ये माणुसकीला काळिमा! संक्रांतीच्या दिवशीच धनगर मेंढपाळांना अमानुष मारहाण* मकर संक्रांतीचा सण सर्वत्र गोडवा वाटून साजरा होत असताना, बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील मातोरी येथे एक अत्यंत निंदनीय आणि संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या मेंढ्या चारून उदरनिर्वाह करणाऱ्या धनगर समाजाच्या बांधवांना स्थानिक समाजकंटकांनी जातिवाचक शिवीगाळ करत लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात महिला आणि वृद्धांनाही लक्ष्य करण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यातून संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १४ जानेवारी २०२६ रोजी मातोरी शिवारात धनगर समाजाचे मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारत होते. यावेळी मेंढ्या शेतात शिरल्याच्या कारणावरून स्थानिक काही व्यक्तींनी त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. किरकोळ कारणावरून सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी मेंढपाळांच्या जातीचा उल्लेख करून त्यांना अत्यंत खालच्या थराची वागणूक दिली. केवळ शब्दांवर न थांबता, समाजकंटकांनी संघटित होऊन मेंढपाळ कुटुंबावर हल्ला चढवला. या भ्याड हल्ल्यात लाठ्याकाठ्यांचा वापर करण्यात आला असून, कुटुंबातील पुरुष, महिला आणि वृद्धांनाही अमानुषपणे मारहाण करण्यात आली. यामध्ये काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मेंढ्यांचेही नुकसान झाले आहे. पोलिसांत धाव आणि अटकेची मागणी या घटनेनंतर पीडित कुटुंबाने तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. आरोपींवर 'ॲट्रॉसिटी' आणि 'खुनी हल्ल्याचा प्रयत्न' केल्याप्रकरणी कडक गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी धनगर समाजातील विविध संघटनांनी केली आहे. "सणासुदीच्या दिवशी अशा प्रकारे कष्टकरी समाजावर हल्ला होणे ही जिल्ह्यासाठी भूषणावह बाब नाही," अशी भावना सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. तीव्र आंदोलनाचा इशारा घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे. जर आरोपींना २४ तासांच्या आत अटक केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धनगर समाज आणि विविध सामाजिक संघटनांनी दिला आहे. प्रशासनाने या प्रकरणात कडक पावले उचलून मेंढपाळ समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. "मेंढपाळ समाज हा नेहमीच भटकंती करून आपला उदरनिर्वाह करतो. अशा कष्टकरी लोकांशी जातीवरून भेदभाव करणे आणि त्यांना मारहाण करणे हे माणुसकीला काळिमा फासणारे आहे." 1
- 🔥💥KING MAKER 💥🔥Nandkumar Ghodele #politics #shortvideo #edit1
- बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा परिसरात दिनांक १४ जानेवारी रोजी एका दुर्मिळ गिधाड पक्ष्याचे दर्शन झाले. माहिती मिळताच वनविभाग व पशुवैद्यकीय विभागाने तत्काळ कारवाई करत गिधाडाचे सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत गिधाडाची प्रकृती पूर्णपणे ठणठणीत असल्याचे आढळले. तपासणीनंतर पुढील निरीक्षण व संवर्धनासाठी गिधाडास संशोधन केंद्रात सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले. सोनाळा परिसरात दुर्मिळ गिधाड आढळले. वनविभागाने रेस्क्यू करून तपासणीनंतर संशोधन केंद्रात स्थलांतर केले.@shegaonlive चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा बातम्या व जाहिरातीसाठी व्हाट्सअप 89756247251
- ऐतिहासिक शंकर पटाला दुसऱ्या दिवशी नागरिकांचा व पट शौकिनांचा भरघोस प्रतिसाद चुकीच्या बातम्या प्रसारित केल्याबद्दल कृषक मंडळांनी केली नाराजी व्यक्त व निषेध तळेगाव दशासर येथील ऐतिहासिक व १५१ वर्षांची परंपरा असलेला शंकर पट दुसऱ्या दिवशीही नागरिक व पटशौकिनांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने गजबजलेला दिसून आला. दुसऱ्या दिवशी एक दाणी पटाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले असून दिवसभर अनेक जोड्या पटावर धावल्या. शंकर पटाच्या पहिल्या दिवशी कृषक सुधार मंडळ व पोलीस प्रशासन यांच्यात नियोजनाबाबत चर्चा सुरू असल्यामुळे सुमारे दोन तास पट बंद ठेवण्यात आला होता. मात्र चर्चा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नियोजनबद्ध पद्धतीने पट सुरू करण्यात आला व त्यानंतर कोणताही अडथळा न येता खेळ सुरळीत पार पडला. दरम्यान, सदर दोन तासांच्या विश्रांतीदरम्यान पट बंद असल्याबाबत सत्यता न तपासता काही प्रसार माध्यमांनी चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या. त्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र पसरविण्यात आल्या. या प्रकाराबाबत कृषक सुधार मंडळाने तीव्र नाराजी व्यक्त करत अशा प्रसार माध्यमांचा जाहीर निषेध नोंदविला आहे. कोणतीही बातमी प्रसारित करण्यापूर्वी सत्यता तपासणे ही पत्रकारितेची जबाबदारी असून चुकीच्या बातम्या पसरविणे हे अयोग्य असल्याचे मंडळाने स्पष्ट केले. याउलट, सिटी न्यूजने ऐतिहासिक शंकर पटाबाबत वस्तुनिष्ठ माहिती देत शेतकऱ्यांच्या या पारंपरिक खेळाचे सुंदर व सत्याधारित वार्तांकन केले. याबद्दल कृषक सुधार मंडळाच्या वतीने सिटी न्यूजचे आभार मानण्यात आले आहेत. १५१ वर्षांची परंपरा लाभलेल्या या ऐतिहासिक शंकर पटामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण असून नागरिक, पटशौकिन व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- *छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज एमआयडीसी येथे आज सकाळी घडलेल्या आगीच्या भीषण घटना* वाळूज एमआयडीसीत आगीचे तांडव: 'सुप्रीम सिलिकॉन' खाक; ५ कोटींची राख रांगोळी वाळूज औद्योगिक वसाहतीतील (MIDC) वातावरण आज सकाळी आगीच्या भडक्याने हादरून गेले. येथील प्रसिद्ध 'सुप्रीम सिलिकॉन' कंपनीच्या प्लांट क्रमांक ५५ ला लागलेल्या भीषण आगीत सुमारे ५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, वेळीच सावधगिरी बाळगल्यामुळे मोठी जीवितहानी टळली असली तरी, कंपनीचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. नेमकी घटना काय? आज शनिवार, १७ जानेवारी रोजी सकाळी ६:३० च्या सुमारास जेव्हा रात्रपाळी संपून सकाळच्या शिफ्टची लगबग सुरू होती, तेव्हा ही दुर्घटना घडली. कंपनीच्या मुख्य मशिनरी विभागातून अचानक काळा धूर बाहेर येऊ लागला. पाहता पाहता, सिलिकॉन ऑइल आणि रसायनांच्या संपर्कात आल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. अवघ्या १५ मिनिटांत संपूर्ण प्लांट आगीच्या विळख्यात सापडला. अग्निशमन दलाची ३ तासांची झुंज घटनेची माहिती मिळताच ७:१५ वाजेपर्यंत महापालिका आणि एमआयडीसीचे ५ ते ६ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, उष्णतेमुळे कंपनीचे लोखंडी स्ट्रक्चर आणि छत वाकून गेले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावत ही आग शेजारील इतर कंपन्यांमध्ये पसरण्यापासून रोखली. तब्बल ३ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आली.1