उपनगर पोलिसांनी दाखवला कायद्याचा धाक; आरोपींची परिसरातून धिंड फर्नांडिस वाडी व सुंदरनगर परिसरात कोयते हातात घेऊन दहशत माजवत वाहनांची तोडफोड करणाऱ्या दोन टोळ्यांतील सात आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांनी ज्या परिसरात दहशत निर्माण केली त्याच परिसरातून आरोपींची धिंड काढून कायद्याचा धाक दाखविण्यात आला. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास वर्चस्वाच्या वादातून सुंदरनगर व फर्नांडिस वाडी परिसरात काही तरुणांनी हातात कोयते घेऊन दहशत निर्माण केली. तसेच रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले. या प्रकरणी पहिल्या घटनेत आजीम शेख, मोईज शेख, समीर राठोड, प्रतीक राठोड, भैय्यू ढेनवळ, सोनू बेद, प्रेम ढेनवळ, साहिल नायर व इतर अनोळखी आरोपींविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुयोग वायकर करीत आहेत. तपासादरम्यान आजीम शेख, इजान शेख ऊर्फ इन्नी आणि समीर राठोड यांना अटक करण्यात आली. दुसऱ्या घटनेत विजय बहेनवाल ऊर्फ चंगा, राहुल उज्जेनवळ, गणेश काळे, विजय आहेर, चिम्या व इतर अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा उपनगर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात विजय बहेनवाल ऊर्फ चंगा, योगेश आहेर ऊर्फ काका, सचिन गावंडर ऊर्फ अन्नू आणि गणेश काळे यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना त्यांनी ज्या परिसरात दहशत निर्माण केली होती त्या सुंदरनगर व फर्नांडिस वाडी परिसरातून पोलिस बंदोबस्तात फिरविण्यात आले. गुन्हेगारीला कोणतीही माफी दिली जाणार नाही आणि नाशिक शहरात कायद्याचे राज्य कायम राहील, असा स्पष्ट संदेश पोलिसांनी या कारवाईतून दिला. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक डंबाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुयोग वायकर, लोकेश पवार, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे तसेच संदीप पवार, विनोद लखन, जयंत शिंदे, अनिल शिंदे, सुनील गायकवाड, प्रशांत देवरे, गौरव गवळी, पंकज कर्पे, योगेश जाधव, सूरज गवळी, आनंद घुगरे, महिला पोलिस शिपाई मयुरी विझेकर आदींच्या पथकाने केली. दरम्यान, या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध सुरू असून, त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
उपनगर पोलिसांनी दाखवला कायद्याचा धाक; आरोपींची परिसरातून धिंड फर्नांडिस वाडी व सुंदरनगर परिसरात कोयते हातात घेऊन दहशत माजवत वाहनांची तोडफोड करणाऱ्या दोन टोळ्यांतील सात आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांनी ज्या परिसरात दहशत निर्माण केली त्याच परिसरातून आरोपींची धिंड काढून कायद्याचा धाक दाखविण्यात आला. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास वर्चस्वाच्या वादातून सुंदरनगर व फर्नांडिस वाडी परिसरात काही तरुणांनी हातात कोयते घेऊन दहशत निर्माण केली.
तसेच रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले. या प्रकरणी पहिल्या घटनेत आजीम शेख, मोईज शेख, समीर राठोड, प्रतीक राठोड, भैय्यू ढेनवळ, सोनू बेद, प्रेम ढेनवळ, साहिल नायर व इतर अनोळखी आरोपींविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुयोग वायकर करीत आहेत. तपासादरम्यान आजीम शेख, इजान शेख ऊर्फ इन्नी आणि समीर राठोड यांना अटक करण्यात आली. दुसऱ्या घटनेत विजय बहेनवाल ऊर्फ चंगा, राहुल उज्जेनवळ,
गणेश काळे, विजय आहेर, चिम्या व इतर अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा उपनगर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात विजय बहेनवाल ऊर्फ चंगा, योगेश आहेर ऊर्फ काका, सचिन गावंडर ऊर्फ अन्नू आणि गणेश काळे यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना त्यांनी ज्या परिसरात दहशत निर्माण केली होती त्या सुंदरनगर व फर्नांडिस वाडी परिसरातून पोलिस बंदोबस्तात फिरविण्यात आले. गुन्हेगारीला कोणतीही माफी दिली जाणार नाही आणि नाशिक शहरात कायद्याचे राज्य कायम राहील, असा स्पष्ट
संदेश पोलिसांनी या कारवाईतून दिला. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक डंबाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुयोग वायकर, लोकेश पवार, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे तसेच संदीप पवार, विनोद लखन, जयंत शिंदे, अनिल शिंदे, सुनील गायकवाड, प्रशांत देवरे, गौरव गवळी, पंकज कर्पे, योगेश जाधव, सूरज गवळी, आनंद घुगरे, महिला पोलिस शिपाई मयुरी विझेकर आदींच्या पथकाने केली. दरम्यान, या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध सुरू असून, त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
- *सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा जागतिकस्तरावर नावलौकिक उंचवणार-राज्यपाल जिष्णू देव वर्मा* नाशिक : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणासह जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाचे राज्यापाल जिष्णू देव वर्मा यांनी कौतुक केले. कुंभमेळ्यासाठी करण्यात आलेले नियोजन पाहता नाशिकचा जागतिकस्तरावर नावलौकिक उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात राज्यपाल श्री. वर्मा यांनी कुंभमेळा नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त डाॅ. संदीप कर्णिक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय ऐनापुरे, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, पोलीस अधीक्षक डाॅ. डी. एस. स्वामी, अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे,उपायुक्त नियोजन योगेंद्र चौधरी, त्र्यंबक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांचेसह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. राज्यपाल श्री. वर्मा म्हणाले, कुंभमेळ्याच्या नियोजनामुळे आगामी कुंभ सुंदर, स्मरणीय आणि भव्य होऊन जगात नाशिक त्र्यंबकेश्वरची ओळख प्रस्थापित होईल. उद्योग, पर्यटन, संस्कृती आदी विविध स्तरावर नाशिकची वेगळी ओळख निर्माण होईल. सोहळ्याची भव्यता लक्षात घेता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक चांगले नियोजन करणे शक्य होणार आहे. बारा वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यास समाज माध्यमांद्वारे माहिती मिळणे सुलभ झाल्याने अधिक भाविक येतील. त्यातच यादरम्यान पावसाळा असल्याने नियोजनाचे मोठे आव्हान असेल. विशेषतः स्वच्छता आणि आरोग्याच्या संदर्भात विशेष लक्ष द्यावे लागेल. देशभरातील धार्मिक स्थळावर मोठ्या प्रमाणात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता येणारा कुंभमेळा भव्य- दिव्य ठरेल. आतापर्यंत व्यापक नियोजन केले असले, तरी प्राधिकरणाने प्रयागराज येथील अनुभव लक्षात घेता अधिक तयारी करावी. त्र्यंबकेश्वर येथील नियोजित विकास कामांच्या नियोजनाबाबत राज्यपाल श्री. वर्मा समाधान व्यक्त केले. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश- विदेशातून कोट्यवधी भाविक येण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये खर्चून पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ही सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत. आगामी कुंभमेळ्याचा कालावधी मोठा आहे. त्यामुळे भाविकांची संख्या नेहमीपेक्षा जास्त राहील. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. पायाभूत सोयीसुविधांची कामे वेळेत पूर्ण करताना त्यांचा दर्जा राखला पाहिजे. याबरोबरच कामांना गती द्यावी लागेल. त्र्यंबकेश्वरचे महत्त्व लक्षात घेऊन दीर्घकालीन कामे करावीत. आवश्यकतेनुसार कृत्रिम बुद्धिमत्तेचाही वापर करावा असेही त्यांनी सांगितले. प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गेडाम, आयुक्त श्री. सिंह यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध कामांची माहिती दिली. महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी रामकाल पथ, मलनि:स्सारण प्रकल्पासह विविध कामांची माहिती दिली.1
- १६० कोटींच्या बनावट शालार्थ घोटाळ्यातील संस्थाचालक जेरबंद नातेपुते येथील फार्महाऊसवरून उपनगर पोलिसांची कारवाई; १,२०० आरोपींचा तपास सुरू बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील प्रमुख आरोपी तथा संस्थाचालक संजय भास्करराव गरूड (वय ६७, रा. के. के. नगर, शेंदुर्णी, ता. जामनेर, जि. जळगाव) याला उपनगर पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील एका फार्महाऊसवरून ताब्यात घेतले. नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोणतीही वैयक्तिक मान्यता अथवा शालार्थ प्रस्ताव नसताना बनावट शालार्थ आदेश तयार करून शालार्थ प्रणालीत नोंदी करण्यात आल्या. त्याआधारे वेतन व थकबाकी काढून शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संबंधित मुख्याध्यापक, संस्थाचालक, तत्कालीन शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक आदींसह अनेकांविरुद्ध गुन्हा दाखल असून, तपासादरम्यान सुमारे १,२०० आरोपी निष्पन्न झाले आहेत. तपासात संजय गरूड यांच्या १५ शैक्षणिक संस्थांमधील १७७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोणतीही अधिकृत वैयक्तिक मान्यता नसताना बनावट मान्यता देण्यात आल्याचे समोर आले. दरम्यान, अटक टाळण्यासाठी गरूड हे नातेपुते (जि. सोलापूर) येथील एका फार्महाऊसवर लपून राहत असल्याची माहिती गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणातून मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला नाशिकमध्ये आणून अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके व गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने केली. सदर घोटाळ्याचा पुढील तपास सुरू आहे.1
- गंगापूर धरणात उत्साहात जलपूजन; नाशिककरांचा पाण्याचा प्रश्न मिटला! विशेष बातमी | नाशिक: नाशिक शहराला आणि परिसराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख गंगापूर धरण पाण्याच्या जोरदार आवकमुळे काठोकाठ भरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याच्या आनंदात आज प्रशासनातर्फे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत गंगापूर धरणावर पारंपरिक पद्धतीने जलपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. विधीवत पूजा आणि श्रीफळ अर्पण धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचला आहे. या शुभप्रसंगानिमित्त: वैदिक मंत्रोच्चारात वरुण राजाची पूजा करण्यात आली. जलाला पुष्पहार व श्रीफळ (नारळ) अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. नाशिककरांना वर्षभर मुबलक पाणी मिळावे आणि बळीराजावर निसर्गाची कृपा राहो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. मान्यवरांची उपस्थिती या जलपूजन सोहळ्याला लोकप्रतिनिधी, महापालिका आयुक्त, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. जलपूजनानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी धरणाच्या सद्यस्थितीची पाहणी केली आणि पाण्याच्या नियोजनाबाबत आढावा घेतला. नाशिककरांना मोठा दिलासा "धरण काठोकाठ भरल्याने शहरावरील पाणीकपातीचे संकट टळले असून वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न सुटला आहे." > — जलसंपदा विभाग/महापालिका प्रशासन धरणात पाण्याची आवक सुरूच असल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. धरणातील या मुबलक जलसाठ्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.4
- आमदार श्री हिरामण खोसकर यांच्या मतदारसंघात रस्त्यांची दुरवस्था.. अंजनेरी मुळेगाव रस्त्याची बिकट अवस्था नागरिकांना रोज चिखलातूनच करावा लागतोय प्रवास आमदार हिरामण खोसकर रस्ते कामांसाठी निधी मंजूर करून आनतात पण ठेकेदारानी अर्धवट कामे टाकल्याने आमदार श्री हिरामण खोसकर यांच्या मतदारसंघातील रस्त्यांची दुरावस्था होत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहे का कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर तसेच परिसरातील रस्त्यांची कामे अगदी जोमाने सुरू झाली पण काही ठेकेदारांनी कामे अर्धवट टाकून दिली आहेत या रस्त्याचे काम मागील दोन वर्षापासून चालू आहे त्यामुळे येथे स्थानिक नागरिकांना रोजच या चिखलमेवर रस्त्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे स्थानिक लोकप्रतिनिधी करतात तरी काय का अधिकारी ठेकेदारांची पाठराखण करतात हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे आहे आमदार हिरामण कोसकर यांनी आपल्या मतदारसंघासाठी सर्वाधिक निधी मंजूर करणारे आमदार म्हणून ओळख पण प्रत्यक्ष मात्र खरोखर निधीचा उपयोग होतोय का रोज कितीतरी नागरिकांना या चिखलमय रस्त्यातूनच प्रवास करावा लागतोय प्रशासनाच्या आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे1
- शिष्यवृत्ती परिक्षेत जि.प. शाळा मेसनरखेडे शाळेचे घवघवीत यश ! प्रतिनिधी- सुनिल आण्णा सोनवणे महाराष्ट्र आासनाकडुन रखर्थी र-४ थीआणी इयत्ता सातवी च्या स्कॉलरशीप परिक्षा घेतल्या जातात, तरि मेसनखेडे खुर्द शाळेतील इयत्ता ४धी धनश्री गणेश, थोरात, पियुष नितीन पगारे भाग्यश्री दत्तात्रय पवार हे विद्यार्थी व इयत्ता ७वीमधील साई कात्मिक ठोंबरे निकीता बाळू मार्कंड, धनश्री गणेश जाधव ह्या शाळेतील सहा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करुन गुणवत्ता यादीत स्थान मिळविले याकामी शाळेतील सर्व शिक्षकांनी सदर विद्यार्थ्यांना विषय निहाय संपुर्ण मार्गदर्शन केले, तसेच प्रशासनाकडून दिलेल्या सर्व मागदर्शक सुचनांप्रमाणे विद्यार्थांची तयारी करुन घेतल्याने हे यश मिळाले. गावातील ग्रामपंचायत सदस्य नितीनभाऊ पगारे, दिलिप पगार तसेच शिक्षकही उपश्थित होते. बिडगर, होके, वर्षा अभोणकर वैशाली पवार, गिता माळी, सुरेखा पवार योगिता पगारे अंगणवाडी कर्मचारी देवरे मॅडम उपस्थित होते,1
- देवळा येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी आर.पी.आय. (आठवले) गटाचे पोलिसांना निवेदन देवळा: अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, तसेच यासंदर्भातील अभ्यास गट समितीचा अहवाल जाहीर करून नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) देवळा तालुक्याच्या वतीने देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले. शासनाकडून अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू असून या निर्णयाला समाजाचा तीव्र विरोध असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. उपवर्गीकरणामुळे मागासवर्गीय समाजाच्या ऐक्याला तडा जाऊन समाजात फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी आर.पी.आय.ने केली आहे. निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत: अहवाल जाहीर करावा: निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील अभ्यास गट समितीने तयार केलेला अहवाल, त्यातील निरीक्षणे व शिफारसी सार्वजनिक करण्यात याव्यात. हरकती व सूचना मागवाव्यात: अहवाल जाहीर केल्यानंतर नागरिकांना आणि सामाजिक संघटनांना त्यावर हरकती व सूचना मांडण्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी देण्यात यावा. अधिकारांवर गदा आणू नये: १९३२ च्या ऐतिहासिक पुणे करारामुळे अनुसूचित जातीच्या प्रगतीचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे या समाजाच्या प्रगतीला बाधा आणणारा कोणताही निर्णय शासनाने घेऊ नये. हे निवेदन आर.पी.आय.चे देवळा तालुका अध्यक्ष कैलास रमेश पवार यांनी जिल्हा संघटक आय. यु. शांताराम पवार व जिल्हा उपाध्यक्ष कैलास जिभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनास सुपूर्द केले. याप्रसंगी महेंद्र धोंडीराम आदिले, रमेश पवार, राहुलजी शिरे, समाधान कराटे, प्रदीप अशोक पवार, सुनील वसंत पवार, चंद्रभान गोविंद आहिरे, संदीप पवार, सागर आहिरे, सनी पवार, प्रदीप पवार, शुभम आहिरे, महेश बच्छाव, मेहुल पवार, रितेश पवार यांच्यासह आर.पी.आय.चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.2
- मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातग्रस्त शेंडे कुटुंबाला भाजपकडून मदतीचा हात मोखाडा:१८ मे रोजी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धानिवरी येथे झालेल्या भीषण अपघातात अनेकांनी आपले प्राण गमावले. या दुर्घटनेनंतर शासनाने मृतांच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत जाहीर केली होती. मात्र, बापगाव येथील नामदेव शेंडे यांच्या कुटुंबाकडे त्यानंतर विशेष लक्ष दिले गेले नव्हते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या कुटुंबातील मोठा मुलगा सागर शेंडे यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, तर धाकटा मुलगा न्यूराज शेंडे गंभीर जखमी होऊन कोमात गेला. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने आणि पुरेशी माहिती नसल्यामुळे सागर यांच्या निधनानंतर मिळालेली आर्थिक मदत कुटुंबीयांनी न्यूराजच्या उपचारासाठी खर्च केली. ही बाब माध्यमांमधून समोर आल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तात्काळ दखल घेतली. त्यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष भरत रजपूत आणि खासदार हेमंत सावरा यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूराज शेंडे याला वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तसेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने शेंडे कुटुंबाला आर्थिक मदतही देण्यात आली. याशिवाय, शेंडे कुटुंबाचे मोडकळीस आलेले घर दुरुस्त करून देण्याचा निर्णयही भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. यासाठी वेदांत हॉस्पिटल तसेच बापगाव येथे प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी, कासा मंडळ अध्यक्ष आशिष चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते शैलेश शेठ घारपुरे, स्थानिक सरपंच तसेच भाजप नेते सुरेश पाडवी उपस्थित होते.1
- दीक्षांत समारंभ ज्ञान, परिश्रम आणि मानवसेवेच्या वचनबद्धतेचा सोहळा-राज्यपाल जिष्णू देव वर्मा नाशिक: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात घेतलेले ज्ञान समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचते तेव्हा आरोग्य शिक्षण खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण ठरते. दीक्षांत समारंभ पदवी प्रदान सोहळा नाही, तर ज्ञान, परिश्रम आणि मानवसेवेच्या आजीवन वचनबद्धतेचा उत्सव आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २५ वा दीक्षांत समारंभ आज सकाळी विद्यापीठात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनंत पंढरे, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, उपस्थित होते. यावेळी राज्यपाल श्री. वर्मा यांनी पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना कर्तव्याची शपथ दिली. राज्यपाल श्री. वर्मा म्हणाले की, विद्यार्थ्यांनी घेतलेले ज्ञान ही एक सामाजिक जबाबदारी आहे. तुमच्या सेवाकार्यामुळे रुग्णाचे दुःख कमी होऊन गरजू लोकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण होईल. आरोग्य क्षेत्र व्यावसायिक झाल्याने समाज तुमच्याकडे विश्वास आणि आशेने पाहणार आहे. तुम्ही दिलेली औषधे रुग्ण कदाचित विसरेल. मात्र, तुमची करुणा, सहानुभूती आणि प्रामाणिकपणा तो कधीही विसरणार नाही. विकसित भारत २०४७ ही संकल्पना साकारण्यात आरोग्य क्षेत्राची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी आरोग्य व्यावसायिक केवळ वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असणे पुरेसे नाही. त्यासाठी तंत्रज्ञानाचे ज्ञान, संशोधनाची दृष्टी, नैतिक बांधिलकी आणि सामाजिक जबाबदारीही असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ या मूलभूत बाबींना बळकटी देत आहे ही समाधानाची बाब आहे. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे आधुनिकीकरण, शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा, संशोधनाला प्रोत्साहन आणि विद्यापीठ प्रशासन अधिक पारदर्शक व विद्यार्थी-केंद्रित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे प्रतिबिंब कुलगुरूंच्या अहवालात दिसून येते. पेपरलेस प्रशासन, डिजिटल प्रमाणपत्रे, ॲकेडॅमिक बँक ऑफ क्रेडीटस (Academic Bank of Credits) आणि तंत्रज्ञानाधारित सेवा यांसारख्या उपक्रमांमधून विद्यापीठाची सुशासन आणि कार्यक्षम सार्वजनिक सेवा देण्याची बांधिलकी दिसून येते, असेही ते म्हणाले. संशोधन आणि नवोपक्रमावर दिला जाणारा भर कौतुकास्पद आहे. संशोधन प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य, शिक्षक विकास कार्यक्रम, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण केंद्राची स्थापना यामुळे विद्यापीठाची जागतिक स्तरावरील ओळख अधिक मजबूत होईल. संशोधनातून ज्ञानाची वाढ होते आणि हेच संशोधन आरोग्यसेवेमध्ये परिवर्तन घडवून नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवते, असेही राज्यपाल श्री. वर्मा यांनी सांगितले. आरोग्य शिक्षणातील गुणवत्ता ही थेट समाजातील आरोग्यसेवेच्या गुणवत्तेशी संबंधित आहे. त्यामुळे अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळणे आवश्यक आहे. जनुकीय संशोधन, नवजात शिशू तपासणी, आदिवासी आरोग्य, थॅलेसेमिया प्रतिबंध, तंबाखू नियंत्रण आणि इतर स्थानिक आरोग्यविषयक समस्यांवर केले जाणारे संशोधन हे राज्यातील जनतेच्या वास्तविक आरोग्य गरजा पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाची बांधिलकी दर्शवते. शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी कधीही शिकणे थांबवू नये. वैद्यकीय विज्ञान दररोज विकसित होत आहे आणि आजीवन शिक्षण ही प्रत्येक यशस्वी आरोग्य व्यावसायिकाची ओळख आहे. नैतिकतेची सर्वोच्च मूल्ये जपावीत. नैतिक आचरणाशिवाय केवळ व्यावसायिक कौशल्य समाजाचा विश्वास संपादन करू शकत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल नवकल्पना ही प्रभावी साधने आहेत; मात्र उपचाराची सुरुवात सहानुभूतीतून होते, असेही राज्यपाल श्री. वर्मा यांनी सांगितले. डॉ. पंढरे म्हणाले की, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने चांगली कामगिरी बजावली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ठसा त्यांनी उमटविला आहे. विद्यार्थ्यांनी आता अभ्यासातून समाजसेवेकडे वाटचाल करताना गरिबांची सेवा करावी. गुणवत्ता हे एकमेव साधन आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाने मोठे व्हावे. त्यांनी मोठे ध्येय ठेवावे, असेही त्यांनी सांगितले. कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी विद्यापीठाच्या वाटचालीची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, १९९८ मध्ये या विद्यापीठाची स्थापना झाली. तेव्हापासून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यापीठ कटिबद्ध आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून आरोग्य विषयक विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. संशोधन, नावीण्यपूर्ण उपक्रमांना चालना देण्यात येत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा विद्यापीठातर्फे स्वीकार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सरदेशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. स्वप्नील तोरणे यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. तोरणे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विद्यार्थी, त्यांचे पालक, विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. सदानंद सरदेशमुख यांना डी. लिट. विद्यापीठातर्फे डॉ. सदानंद सरदेशमुख यांना त्यांच्या सेवेबद्दल डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. सरदेशमुख यांनी आयुर्वेद विद्याशाखेतील शिक्षण, सेवा आणि मानव कल्याणासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. पुणे विद्यापीठातून आयुर्वेदातील डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी मिळविणारे ते पहिले पदवीधारक आहेत. साहित्य, शिक्षण, संशोधन, आरोग्य सेवा आणि वारशाचे जतन आणि संवर्धनासाठी त्यांनी कार्य केले आहे. त्यांनी ४० वर्षांपेक्षा अधिक काळ शैक्षणिक सेवेसाठी समर्पित भावनेने काम केले आहे. त्यांनी १९६७ पासून आयुर्वेद सल्लागार म्हणून काम सुरू केले. १९९४ मध्ये एकात्मिक कर्करोग संशोधन प्रकल्प सुरू केला. या उपक्रमाच्या माध्यमातून १६ हजारांहून अधिक कर्करोगाच्या रुग्णांना लाभ झाला आहे. याबरोबरच एचआयव्ही एड्स, संधीवात, महिला व बालकल्याण, हाडांच्या उपचारावर त्यांनी भरीव संशोधन केले आहे. आरोग्य सेवेत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना आरोग्य विज्ञान विद्यापीठाने डी. लिट. पदवी प्रदान करीत सन्मानित केले आहे. १२ हजार २६३ विद्यार्थ्यांना पदवी या सोहळ्यात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधील पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या व आंतरवासिता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या १२ हजार २६३ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. तसेच २० विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती (पीएच. डी), तर विविध विद्याशाखेतील ९९ विद्यार्थ्यांना १४६ सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. दीक्षांत समारंभात वैद्यकीय विद्याशाखा पदवीचे ६६२१, दंत विद्याशाखा पदवीचे २१९२, आयुर्वेद व युनानी विद्याशाखा पदवीचे १३३, होमिओपॅथी विद्याशाखा पदवीचे ४०५, नर्सिंग विद्याशाखा पदवीचे ७३२, फिजिओथेरपी व ऑक्युपेशनल थेरपी पदवीचे ३६९, पदव्युत्त वैद्यकीय शाखेचे २०७, दंत, बी. एससी. पॅरामेडिकलचे ३१५, आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथीचे १२७२, अलाईडच्या १७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.1